Back
लोणावळ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक!
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 18, 2025 08:00:32
Pune, Maharashtra
Reporter name: Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1807ZT_MAVAL_LON_POCSO
Total files : 03
Headline : लोणावळयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोणावळा शहर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपींना ठोकल्या बेड्या
Anchor:
लोणावळा शहरात खासगी बंगल्यासमोर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला असून या प्रकरणी, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीने अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करून विनयभंगाची संधी साधली, तसेच अल्पवयीन मुलीचे नाव आणि मोबाईल नंबर जबरदस्तीने घेऊन या मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ७४, ७८ आणि पोक्सो अधिनियम कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे...
बाईट : राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक लोणावळा (file no.03)
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 12:09:55Akola, Maharashtra:
Anchor - अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव-डोणगाव मार्गालगतच्या वसाली बीटमधील वनक्षेत्रात गुरे चारणाऱ्या गुराख्याला अर्धवट पुरलेला मृतदेह दिसून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुराख्याने तात्काळ स्थानिक पोलीस पाटलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत हे ठिकाण चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चान्नीचे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक पाहणीत मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहावर निळ्या रंगाची जीन्स पॅण्ट, कमरेला पट्टा, डोक्यावर लांब केस, तसेच हातात पांढऱ्या कड्या असल्याचे आढळले. त्यामुळे मृत व्यक्ती महिला असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले होते. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी घटनास्थळाजवळील मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले असून, संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आहे. मृतदेह ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात येत आहेत. सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी हत्या होऊन मृतदेह गाडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, गुन्हा इतरत्र घडून मृतदेह येथे फेकण्यात आला की घटनास्थळीच गुन्हा घडला, याबाबत तपास सुरु आहे.
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 18, 2025 12:07:43Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1807ZT_GAD_CONG_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात डीएपी- युरिया खताची मोठी टंचाई ,काँग्रेसने लक्ष वेधण्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर केले घंटा नाद आंदोलन
अँकर:-- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी- युरिया खताची मोठी टंचाई भासत आहे. यामुळे ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांवर संकट ओढविले आहे. याशिवाय खत बी बियाणे यांच्यामध्ये भेसळ, लिंकिंग औषधे घेण्याची बळजबरी व ताज्या अतिवृष्टीचे पंचनामे व नुकसान भरपाई चा प्रश्न या सर्वांसंदर्भात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामुळे काँग्रेसने आज घंटानाद आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने दूर करा अन्यथा या पुढच्या काळात गुराढोरांसह कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करू असा इशाराही काँग्रेसने दिला.
बाईट १) महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 18, 2025 12:02:45Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण निर्णयाचं सकल हिंदू समाजाच्यावतीने जल्लोषात स्वागत..
अँकर - सांगलीच्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं इस्लामपूर मध्ये स्वागत करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारच्या निर्णयाचा जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. फटाक्यांची अतिषबाजी आणि साखर वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करावं,अशी मागणी हिंदुत्वादी संघटनांकडून करण्यात आली होती,यावर अधिवेशनामध्ये राज्य सरकारने इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात असल्याची घोषणा केली आहे,यावरून इस्लामपूर मध्ये ईश्वरपूर नामांतराच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. इस्लामपूर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे.
बाईट - प्रवीण परीट - इस्लामपूर - सांगली
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 18, 2025 11:33:38kolhapur, Maharashtra:
2c को बाईट attach किया है
--------
बाईट --ब्रिगेडियर विद्याधर गोळे, डिफेन्स एक्स्पर्ट
---मेरा स्पष्ट मानना है.. किसी भी क्षेत्र मे.. निजी यां टीम, देश के स्तर पर किसी पाकिस्तानी को अपने बराबर का दर्जा देना यह आतंकवादी को अपने बराबर का दर्जा देने के समान है.. यह कभी करना नहीं चाहिए
2
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 11:10:06Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KUSGAON
सातारा - वाई तालुक्यातील कुसगाव येथील ब्लॅक जेम स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या लॉंग मार्चला थांबवण्यासाठी तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हाधिकारी रजेवर असल्यामुळे सोमवारी चर्चा होईल, तोपर्यंत क्रशरवरील सर्व प्रक्रिया थांबवण्याचे लेखी आश्वासन देण्याचे सांगितले.आंदोलनकर्त्यांनी यावर लेखी पत्राची मागणी केली. मात्र तहसीलदारांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या पत्रात फक्त जिल्हाधिकारी सोबतच्या बैठकीचा उल्लेख होता; क्रशरवरील प्रक्रिया थांबवण्याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. हे लक्षात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली आणि लॉंग मार्च सुरू ठेवला.या प्रकारामुळे तहसीलदारांची भूमिका संशयास्पद ठरत असून, आंदोलनकर्त्यांकडून त्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली जात आहे. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांची फसवणूक सुरू असतानाच, क्रशरवर उत्खनन सुरुच असल्याने संताप वाढत आहे.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 11:00:42Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_RAJE_BYTE
*उदयनराजे बाईट पॉईंटर*
आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर उदयनराजेंनी असा वाद होऊ नाही असं मत व्यक्त करून हा वाद कोणामुळे झाला कोणी केला यापेक्षा लोक तुम्हाला निवडून देतात त्यांच्या अपेक्षा असतात. लोकप्रतिनिधींकडून कामे झाले पाहिजेत. अशा फालतुगिरी बाजूला ठेवून या लोकांनी विकास कामावर जोर दिला पाहिजे... कोणाची चूक आहे याच्यापेक्षा हे घडलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चुकीची मांडणी करत असल्याचे उदयनराजे म्हणाले
बाईट- उदयनराजे भोसले
मी उदयनराजे भोसले बोलतोय असे सांगून आमिर खान यांची फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील अली अमानत शेख या अज्ञात व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी "आमिर खान माझे चांगले मित्र आहेत कोणीही असं वागू नये. जर वागत असतील तर या मागचा हेतू नेमका काय आहे.. हे पोलीस तपासामध्ये समोर येणे गरजेचे आहे. एखादं कर्तुत्व बनवायला वेळ लागतो. जे कोणी माझ्या नावाचा गैरवापर करत असतील त्यांना शासन झालं पाहिजे. असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलंय
बाईट -उदयनराजे भोसले
आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन बसाव अशी माझी मनापासून इच्छा असल्याचे स्पष्ट करत हा निर्णय मी एकटा घेणार नाही. स्थानिक पातळीवर राजकारण आणू नये. मी कधी आयुष्यात राजकारण केलेले नाही.मी जास्तीत जास्त लोकांची सेवा केली आहे. राजकारण करायला अक्कल लागत नाही. नगरपालिकेच्या साठी मनोमिलन झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे. पण सध्या शिवेंद्रराजे बिझी आहेत कारण ते मिनिस्टर आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी उदयनराजेंनी दिली
बाईट - उदयनराजे भोसले
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 18, 2025 10:42:48kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडले आहे
------
नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शेकडो परिचारिका आज पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे... काल परिचारिकांकडून एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आले होते.. आज पासून मात्र बेमुद्दत संपाला सुरवात झाली आहे. एक दिवसीय लाक्षणिक संप करून ही प्रशासनाने मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे परिचारिकांनी आजपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू केला आहे.. सातव्या वेतन आयोगमधील वेतन त्रुटी दूर करावी अशी परिचारिकांनी प्रमुख मागणी आहे.. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी विविध सोयी बद्दलच्या मागण्या ही आहेत.. त्यामुळे परिचारिकांकडून संप करण्यात आला आहे.. नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच जीएमसी याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेयो आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालय या तीन रुग्णालयातील शेकडो परिचारिका संपावर गेल्यामुळे तीनही रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे... काल लाक्षणिक संपाच्या दिवशीही होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या अर्धी झाली होती.. त्यामुळे बेमुदत संपाच्या काळात सर्वसामान्य रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो...
----------------
Byte - नूतन बांते
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 18, 2025 10:41:10Pandharpur, Maharashtra:
18072025
slug - PPR_MANDAP_HOUSE
feed on 2c
file 01
------
Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दर्शन रांग टेंडर घोटाळ्याचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. आर्थिक देवाणघेवाण ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली तरीही मंदिर समिती कडून फक्त तक्रार आली नाही या कारणावरून कोणतीही कारवाई केली जात नाही असा मुद्दा उपस्थित केला
-----
sound clip - आमदार अभिजीत पाटील
2
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 18, 2025 10:40:58Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KAAS
सातारा - सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.खा.उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेवक आणि महिला पदाधिकारी यांच्या हस्ते आज कास तलावाचे ओटी भरण करण्यात आले.या कास तलावाची उंची सातारा नगरपालिकेच्या वतीने वाढविण्यात आली आहे त्यामुळे याची पाणी पातळी देखील वाढली आहे.जून महिन्यातच हा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
0
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 18, 2025 10:40:38Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1807_BHA_RAIN
FILE - 3
भंडाऱ्यात पुन्हा पावसाची हजेरी..... शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात आठवडाभरा आधी दमदार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आता भंडारा जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात रोवणीच्या कामाला लागला असल्याने पावसाची आवश्यकता होती आणि अशा दमदार पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरीवर्ग सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 18, 2025 10:40:30Ambernath, Maharashtra:
बदलापूरात जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातला दुग्धाभिषेक
जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घातला दुग्धाभिषेक
Bdl ncp agitation
Anchor काल विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली या घटनेमुळे विधिमंडळाचे नाव देशात बदनाम झालं आहे. वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाहक बदनामी केली जात असून त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते यामुळे आज राष्ट्रवादीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून त्यांना समर्थन दर्शविले , तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांचा फोटो वर मै हु गुंडा असे लिहून त्यांचा निषेध केला ,
Byte अविनाश देशमुख
चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 18, 2025 10:02:43Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1807ZT_WSM_EBIKE_FIRE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम च्या काकडदाती परिसरातील साई लिला नगर मध्ये राहणाऱ्या गोविंद गाभणे यांची जॉय कंपनी ची इलेक्ट्रिक स्कुटी आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.गोविंद गाभणे यांचा मुलगा आदित्य गाभणे याने या इलेक्ट्रिक स्कुटी ला चावी लावताच तिला अचानक आग लागली.सुदैवाने आदित्य गाभणे हा वेळीच बाजूला गेल्याने अनर्थ टळला मात्र आग लागून काही मिनिटातच ही जॉय कंपनी ची स्कुटी जळून खाक झाली आहे.या आगीत परिसरातील एअर कंडिशनर आणि इतर साहित्य ही जळाले आहे.आगीत स्कुटी जळून नुकसान झाल्याने जॉय कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी गोविंद गाभणे यांनी केली आहे.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 18, 2025 09:34:48Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक ........ पशुसंवर्धन उपायुक्तांना घातला घेराव ......... खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी ....... कुक्कुट खाद्याच्या बँगांवर अन्नघटक नमूद नाहीत. ....... शासनाने निर्णय घेवून देखील अंमलबजावणी नाही .........
अँकर - पोल्ट्री कंपन्या व खाद्य पुरवठादारांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देवून त्यांनी उपायक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. पोल्ट्रीतील पक्षांना पुरवल्या जाणारया खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही. शासनाने याबाबतचा निर्णय घेवून देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारक संतापले आहेत. वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकरयांनी केलाय.
बाईट 1 – पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी
बाईट 2 – डॉ. सचिन देशपांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन ....
3
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 18, 2025 09:32:03Akola, Maharashtra:
Anchor : राज्यभरातील शासकीय परिचारिकांनी आजपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहेय..या आंदोलनामुळे शस्त्रक्रिया प्रक्रियेत मोठा अडथळा आलेला आहेय..अकोल्यात शासकीय रुग्णालयात सुद्धा सामान्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत..सध्या फक्त अतिदक्षता आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया सुरू आहेत,तर अन्य सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत... हे आंदोलन रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम टाकू शकते, त्यामुळे प्रशासनाला या प्रश्नावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहेय.. परिचारिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत जेणे करून रुग्णांचे होणारे हाल थांबतील...
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 18, 2025 09:06:29Pandharpur, Maharashtra:
18072025
Slug - PPR_CLEAN_WORKER
feed.on 2c
file 02
-----
सफाई कामगार जल्लोष व्हिडिओ
सफाई कामगार काम करताना व्हिडिओ
0
Share
Report