Back
अंबरनाथमध्ये लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलाला मारहाण, सीसीटीव्हीत कैद!
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 10:37:48
Ambernath, Maharashtra
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये मारहाण!
रहिवाशाने कानशीलात लगावत घेतला हाताचा चावा
बाहेर भेटल्यावर चाकूने मारण्याचीही दिली धमकी
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Amb boy beating cctv
Anchor : अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलाला सोसायटीतील रहिवाशाने लिफ्टमध्ये मारहाण केल्याची घटना घडलीये. या मुलाला ५ कानशिलात लगावत या विकृताने हाताचा चावाही घेतला. ही संतापजनक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी विकृत रहिवासी कैलास तनवाणी याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Vo : अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरातील पटेल जियम सोसायटीत ४ जुलै ही घटना घडली. या सोसायटीत राहणारा एक अल्पवयीन मुलगा सायंकाळी क्लासला जात असताना लिफ्टमध्ये कैलास तनवाणी आला, त्याने तू मोहित का दोस्त है ना? अशी विचारणा करत थेट या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या लहानग्याच्या तब्बल ५ कानशिलात लगावत त्याने प्रतिकार करण्यासाठी हात मध्ये आणला असता या विकृताने त्याच्या हाताचा चावा घेतला. हा सगळा प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. दरम्यान, ही मारहाण करताना कैलासच्या हातात चावी आणि मोबाईल असल्यानं या लहानग्याला अंतर्गत दुखापत झाली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याबाबतचा तपास असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे.
Byte पीडीत मुलगा ,आणि त्याचे वडील
Byte रमेश पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowJul 09, 2025 13:36:05Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0907ZT_JALNA_CRIME(3 FILES)
जालना : तलवार बाळगून इन्स्टाग्राम वर व्हिडीओ व्हायरल करून दहशत, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अँकर : तलवार बाळगून इन्स्टाग्राम वर व्हिडीओ व्हायरल करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे.संभाजी जऱ्हाड आणि विशाल धोंगडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत.यातील संभाजी जऱ्हाड याने त्याचा मित्र विशाल धोंगडे याच्याकडील तलवार आणून व्हिडीओ तयार करून हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करून दहशत पसरवली.त्यामुळे पोलिसांनी दोन्हीही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करत तलवार जप्त केली आहे.तसेच तालुका पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
बाईट : पंकज जाधव,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,जालना
3
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 09, 2025 13:08:18Buldhana, Maharashtra:
बुलढाणा पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; दिसला त्याला चावला ; जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी; 14 जणांना घेतला चावा.
Anchor- बुलढाणा शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने आज दिवसभरापासून चांगलाच हैदोस घातला आहे.. शहरातील संगम चौक परिसरातील जिजामाता प्रेक्षागार जयस्तंभ चौक हिरवे पेट्रोल पंप या परिसरात आणि विविध भागातील तब्बल 14 जणांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे..जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळपासून एकापाठोपाठ एक रुग्ण दाखल झाले यामध्ये लहान बालके युवक व महिलांचाही समावेश आहे.. हे रुग्ण कुत्रा चावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते.. सर्वांना चावणारा कुत्रा एकच असल्याने या कुत्र्याला स्थानिकांनी युवकांनी मारून टाकल्याचेही सांगण्यात आले आहे.. तर जखमी असलेल्या 14 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे..
बाईट-डॉ. भागवत भुसारी,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक..
12
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 13:08:10Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात तरुणाने दुकानातील मोबाईल आपटून फोडले
ईएमआयवर मोबाईल न दिल्याच्या रागातून कृत्य
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
Ulh mobile
Anchor : उल्हासनगरात एका तरुणाने मोबाईलच्या दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेले मोबाईल आपटून फोडल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Vo : उल्हासनगरच्या कॅम्प ५ भागातील एका मोबाईलच्या दुकानात ७ जुलै रोजी हा प्रकार घडला. या दुकानात अतुल नावाचा एक तरुण मोबाईल घेण्यासाठी आला आणि त्याने ईएमआयवर मोबाईल मागितला. मात्र दुकानदाराने आमच्याकडे ईएमआय वर मोबाईल मिळत नाही, असं त्याला सांगताच त्याला राग आला. याच रागातून त्याने दुकानदाराला शिवीगाळ करत काउंटरमध्ये ठेवलेले २ मोबाईल आपटून फोडले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
10
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 09, 2025 12:37:44Kalyan, Maharashtra:
मराठी आणि हिंदीचा वाद सुरू असतानाच कल्याण मध्ये शेकडो उत्तर भारतीयांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
काँग्रेस पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात, जय भारत" या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः मराठी अस्मितेवरून ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात मराठी भाषेच्या अवमानावरून शिंदे यांच्यावर जोरदार टीका झाली.मात्र दुसरीकडे, शिंदे गट मात्र आपली राजकीय गणितं नव्याने आखताना दिसतो आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शहाड परिसरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात काँग्रेसला मोठा झटका देत उत्तर भारतीय समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत सामील करून घेतले. या पक्षप्रवेशामुळे कल्याणच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.मराठी-हिंदी भाषेच्या संघर्षाचा वाद अजूनही तापलेला असतानाच, कल्याणमधील ‘उत्तर भारतीय जंबो भरती’मुळे शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ही भरती केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर राज्यभरात राजकीय दृष्टिकोनातून चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर भारतीय मतदारांच्या उपस्थितीमुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा ‘हिंदी पट्टा’ अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Byte :- विश्वनाथ भोईर (. शिवसेना शिंदे गट कल्याण पश्चिम आमदार )
12
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 09, 2025 12:32:36Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_MSMRA
साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली यामध्ये संघटना समन्वय समिती च्या वतीने कामगार हक्कासाठी याबरोबरच कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी वैद्यकीय प्रतिनिधींना वैधानिक संरक्षण मासिक योग्य वेतन मिळावे. यासह अनेक मागण्यांसाठी राज्य सरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपंचायत आणि कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते...
बाईट: युवराज गोडसे
12
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 09, 2025 12:32:27Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकींग
SLUG- 0907_WARDHA_DEADBODY
- वर्ध्यात शेतकऱ्याचा विजेचा करंट लागून मृत्यू
- वर्ध्याच्या भुगाव येथील घटना
- संतापलेल्या नागरिकांनी नेला महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याच्या दालनासमोर शेतकऱ्याचा मृतदेह
- वर्ध्यात शेतकऱ्याला शेतात विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू
- शेतकऱ्यांचा मृतदेह आणला महावितरण कार्यालयात
- वर्ध्याच्या भुगाव येथील धक्कादायक घटना
- प्रदीप उगेमुगे असं मृतक शेतकऱ्यांचे नाव
- तब्बल 2 तासापासून मृतदेह महावितरण च्या कार्यालयात, न्यायाची मागणी
- दुपारच्या वेळेस शेतामध्ये गेले असता विद्युत प्रवाहाचा झटका लागून झालं होता मृत्यू
- महावितरण च्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
- घटणेने वर्ध्याच्या महावितरण कार्यालयात तणाव
- पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
बाईट- मिलिंद भेंडे,गावकरी
10
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 09, 2025 12:11:52Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0907_BHA_ROAD_ISSUE
FILE - 9 VIDEO
भंडारा ब्रेकिंग
पहिल्याच पावसात वैनगंगा नदीवर तयार करण्यात आलेल्या पुलाची पिचिंग गेली वाहून..... 735 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला नवीन बायपास रोड.... पावसानी केली पोलखोल.... भविष्यात रस्ता खचण्याची शक्यता....
Anchor :- भंडारा शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 735 कोटींचा निधी खर्चून भंडारा शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग 53 नवा बायपास रस्ता तयार करण्यात आलं... मात्र गेल्या तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे सर्वत्र पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळते. तर याच पावसामुळे भंडारा जिल्ह्यातून जाणारा नवीन बायपास रस्त्याची पिचिंग अक्षरशः वाहून गेली. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे पितळ उघडे पडले असून अगदी चार दिवसाआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या उद्घाटनापूर्वीसुद्धा आलेल्या पावसामुळे एका बाजूचे मुरूम माती व काँक्रीट सह पिचिंग वाहून गेल्याने या बायपासचा निकृष्ट दर्जासमोर आला होता. मात्र तरीसुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचा लोकार्पण पार पडला. आता जेमतेम पावसाळ्याची सुरुवात असताना 735 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या पुलाचे असे हाल पाहायला मिळत आहेत. पुढे किती वर्ष हा बायपास टिकेल ?? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाची सखोल चौकशी करून स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे... तर पुलावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी.....
WKT - प्रविण तांडेकर....
10
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 09, 2025 12:07:11Wardha, Maharashtra:
वर्धा अपडेट
SLUG- 0907_WARDHA_STUCK_UPR1
- वर्ध्याच्या चानकी गावात अडकलेल्या 4 मजुरांना सुरक्षित काढले बाहेर
12
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 09, 2025 12:07:03Wardha, Maharashtra:
वर्धा अपडेट
SLUG- 0907_WARDHA_STUCK_UPDATE
- वर्ध्याच्या चानकी गावात अडकलेल्या 4 मजुरांना सुरक्षित काढले बाहेर
अँकर - वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसाने यशोदा नदीला पूर आला आणि येथे देवळी हिंगणघाट या दोन तालुक्याच्या सीमेवर यशोदा नदी पात्रालगत असलेल्या चानकी या गावाजवळ चार बांधकाम मजूर पुराच्या दुसऱ्या बाजूला अडकले होते..रात्रीपासून हे मजूर दुसऱ्या बाजूला होते.. स्वतः जिल्हाधिकारी वान्मथी सी. चानकी गावात जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आदेश दिले व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या चारही मजुरांच्या सुरक्षेसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. चारही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहेय..
12
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 09, 2025 12:02:29Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KARAD_GHONAS
कराड - कराडच्या प्रीतीसंगम बागेत गेल्या दोन महिन्यापासून घोणस सापांचा सुळसुळाट सुटला होता. गेल्या दोन महिन्यात तब्बल 17 छोटे घोणस साप सर्पमित्रांनी पकडले होते. एका महिलेस घोणस सापाने चावा घेतल्याने भीतीपोटी पर्यटकांनी या बागेकडे पाठ फिरवली होती. आज पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बागेची स्वच्छता करताना सर्वात मोठी घोणस प्रीतीसंगम बागेत आढळून आली. सर्पमित्रांनी या घोणस सापास रेस्क्यू केले आहे
11
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 09, 2025 11:38:40Raigad, Maharashtra:
स्लग - वीज कर्मचाऱ्यांचे रायगडात आंदोलन .......
अँकर - केंद्र व राज्य सरकारच्या खाजगी करणाच्या धोरणा विरोधात आज रायगडमधील वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. एक दिवसाचा संप करीत पेण येथील मुख्यालयासमोर निदर्शने केली. विविध संघटना या आंदोलनात उतरल्या होत्या. समांतर वीज परवाना धोरण, खाजगीकरण या विरोधात लवकरच राज्यव्यापी संपाचा इशारा यावेळी देण्यात आला.
14
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 11:38:31Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_BANK_POLL
( single file sent on 2C)
टायटल:-- तब्बल तेरा वर्षानंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उद्या होणार निवडणूक, जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी बँक आपल्या ताब्यात राहावी यासाठी चालवले आटोकाट प्रयत्न, भाजप कडून स्वतंत्र फील्डिंग तर काँग्रेसनेही परंपरागत मतदारांना केले आकृष्ट
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 10 जुलै रोजी तब्बल तेरा वर्षानंतर निवडणूक होत आहे. बँकेत एकूण 21 संचालक जागा आहेत. यापैकी नऊ जागा अविरोध निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी ही बँक आपल्या ताब्यात राहावी यासाठी आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. भाजपकडून स्वतंत्र फिल्डिंग होत असून काँग्रेसनेही परंपरागत मतदारांना आकृष्ट केले आहे. ओबीसी गटातून चार, अनुसूचित जाती -जमाती गटातून पाच तर भटक्या विमुक्त गटातून तीन संचालक पदांसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 14 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्य पोचले आहे. चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट येथे 11 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व कायम ठेवण्यासाठी खा. प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार एकत्र आले आहेत. या मनोमिलनानंतर काँग्रेस भाजप पेक्षा वरचढ ठरेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात भाजपनेही सर्व शक्तीनिशी प्रयत्न चालवले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजप आमदारांना एकत्रित प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदानासाठी जिल्हा उपनबंधक कार्यालयाने शंभर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौज फाटा तैनात केला आहे. ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बाईट 1) चंद्रशेखर बोदड, निवडणूक निर्णय अधिकारी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 11:35:11Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - लैंगिक अत्याचार व आत्महत्या प्रकरणी संवर्धना नाटक दुसऱ्या दिवशी करगणी ग्रामस्थांचं गाव बंद आंदोलन..
अँकर - सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी दुसऱ्या दिवशीही करगणी गाव बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला आहे.तसेच आटपाडी पोलिसांची चौकशी करण्याची मागणी देखील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
सोमवारी करगणी मधील एका इयत्ता दहावीचे शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता,तर आटपाडी पोलिसांच्या कडून कारवाईत दिरंगाई झाला,असा आरोप करत आटपाडी पोलीसांची चौकशीची मागणी ग्रामस्थ आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
बाईट - सोमनाथ सरगर - पीडित मुलीचे काका,करगणी, आटपाडी.
बाईट - महेश सरगर - नातेवाईक, करगणी ,आटपाडी.
व्ही वो - दरम्यान लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करत प्रमुख संशयित राजू गेंड सह
चौघांना अटक करण्यात आली आहे,तसेच पुढील तपास विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे आटपाडी स्पष्ट केले आहे.
बाईट - विनय बहिर - पोलीस निरीक्षक, आटपाडी.
13
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 11:31:00Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0907ZT_WSM_PRIVATIZATION_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : केंद्र सरकार आणि राज्य सरकार वीज कंपन्यांचे खाजगीकरण करत असल्याने या विरोधात देशातील आणि राज्यातील वीज कर्मचारी संपात उतरले असुन आज त्यांनी कजगिकरण थांबविण्यासह इतर 14 मागण्यांसाठी आज एकदिवसीय संप पुकारला आहे.या संपात वाशिम जिल्ह्याच्या 6 उपविभागातील 32 उपकेंद्रात कार्यरत 450 महावितरण आणि महापारेषण चे वीज कर्मचारी सामील झाले आहेत.या संपात सामील सर्व कामर्मचाऱ्यांनी वाशिम च्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.यावेळी खाजगीकरण थांबविण्यासह 14 रखडलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीतर याहून ही अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
बाईट प्रभाकर लहाने,जिल्हा समन्वयक,कृती समिती
13
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 09, 2025 11:07:01Pune, Maharashtra:
pimpri tweet
kailas puri Pune 9-7-35
feed by 2c
ANCHOR - अहिल्यानगर बोगस जीआर प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असली तरी त्यावर कारवाई होईल असं वाटत नसल्याचे मत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केले. विजय कुंभार यांनी फेक जीआर प्रकरणी दोनच दिवसांपूर्वी ट्विट करत याबाबत कारवाईची मागणी केली होती. दोन महिन्यापूर्वी अहिल्यानगर बनावट जीआर च प्रकरण समोर आलं आहे मात्र त्यावर कारवाई होत नसल्याने यामध्ये मोठे आयएएस अधिकारी मंत्री यांचाही समावेश असण्याची शक्यता कुंभार यांनी व्यक्त केली. याच संदर्भात विजय कुंभार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas puri wkt+ vis
14
Share
Report