Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

वैनगंगा नदीच्या पुराने 8 गावांना फटका, प्रशासन सज्ज!

AAASHISH AMBADE
Jul 09, 2025 10:34:07
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0907ZT_CHP_FLLODY_VILLAGE ( single file sent on 2C)  टायटल : वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावाना फटका, बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावाना फटका बसलाय. ग्रामस्थांच्या मदतीसाठी बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. गोसेखुर्द धरणामधून वैनगंगा नदीत सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. वाढत्या पाण्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला बसलाय. नदीकिनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव आदी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना हलविले जाणार आहे.  वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 67.8 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आलाय.  चिमूर तालुक्यात 151 मिलिमीटर, ब्रह्मपुरी तालुक्यात 145 मिलिमीटर, नागभीड तालुक्यात 150 आणि सिंदेवाही तालुक्यात 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बाईट १) सतीश मसाल, तहसीलदार, ब्रह्मपुरी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
12
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top