Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

कुर्डू मुरूम उपसा बेकायदा: रिपोर्ट आई, गोरे की कड़ी कार्रवाई

AAABHISHEK ADEPPA
Sept 12, 2025 04:31:24
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : कुर्डू मध्ये झालेला मुरूम उपसा हा बेकायदेशीर होता त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे - मंत्री जयकुमार गोरे ऑन मंत्री गोरे सोलापूर पाहणी. - शहराच्या दृष्टीने कचऱ्याचा, पाण्याचा, ड्रेनेजचा विषय महत्त्वाचा आहे - सोलापुरातील काही झोपडपट्टी भागात ड्रेनेजची मोठी समस्या आहे. - यामुळेच शहरातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि तेथील वस्तुस्थिती समजून घेतलं. - जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत तिथला उपाय करणं सोपं जात नाही. - सोलापुरातील सर्वात मोठी अडचण सार्वजनिक शौचालयाची आहे. - यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात बैठक घेतली. *- ऑन कुर्डू मुरूम उपसा अहवाल :* - *कुर्डू मुरूम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया* *- कुर्डू मध्ये झालेला मुरूम उपसा हा बेकायदेशीर होता त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे.* *- त्या ठिकाणी जी काम मंजूर झाली होती त्याची मुदत संपलेली होती तसेच उत्खनन करण्यासाठी कोणतेही परवानगी घेतलेली नव्हती* - *- या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग आहे त्यामुळे ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये* - जी वस्तुस्थिती आहे ती समोर आलीय. ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. समन्वयाने पुढे गेले पाहिजे. गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाहीत. - ज्या गोष्टी आता घडल्या त्या पुन्हा घडू नये. - वाळू तस्करी मुरूम तस्करी यासाठी कोणीही कितीही प्रेशर आणला तरी या कारवाया थांबणार नाहीत. - ज्या घटना घडल्या त्याची योग्य की अयोग्य याची चौकशी होईल. - मात्र वाळू किंवा मुरूम उत्खनन जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरपणे चालू दिले जाणार नाही. - सरकार म्हणून आम्ही शंभर टक्के अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू. कोणी कितीही प्रेशर आणले तरी कारवाई होणारच. *- मुरूम उत्खनन थांबवा ही अधिकाऱ्यांची भूमिका योग्यच होती* - काही लोक यात राजकारण आणून व्यवस्थेवर प्रेशर आणून स्वतःचे काम करून घेण्याचा प्रयत्न करतात. ते आम्ही होऊ देणार नाही. - जे उत्खनन सुरू होतं ते बेकायदेशीरच होतं. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई होईल. - स्थानिक व्यक्तींकडून राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणे, लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देणे हे चुकीचंच आहे. - यामध्ये भविष्यात काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. *ऑन भुजबळ अराजकता विधान* *- हैद्राबाद गॅझेटचा जो विषय आहे, यासंदर्भात मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा झालेली होती.* - त्यांचे जे काही समज गैरसमज असतील त्याबाबत मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी चर्चा करतील आणि चर्चेतून मार्ग निघेल. - त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य जबाबदार व्यक्तींनी टाळली पाहिजेत. *- सामाजिक सलोखा राखणं, एकमेकांबद्दल कटूता निर्माण होणार नाही याची काळजी घेणं शासन म्हणून आपली जबाबदारी आहे.* - माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्याने सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. - सर्व समाज बांधवांचे प्रश्नही समजून घेतले आहेत आणि त्यातून ते मार्गही काढत आहेत. *- ऑन मराठा जीरआर विरोधी याचिका :* - आपला देश लोकशाही प्रधान देश आहे. यात व्यवस्था आणि शासन व्यवस्था आहे. ते आपलं काम करत असतात. - शासनाने सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ओबीसींच्या आरक्षणाचंही रक्षण केलं. *- ज्यांना असुरक्षित वाटतं ते न्याय देवताकडे जातील. न्यायदेवता योग्य तो निर्णय देईल.* *Byte : जयकुमार गोरे (पालकमंत्री)*
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Sept 12, 2025 07:05:32
Yavatmal, Maharashtra:बहुजन रयत परिषदेच्या मागण्यांना प्रतिसाद देत अण्णा भाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. मणिष सांगोळे यांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. मातंग समाजातील तरुणांना २ ते ५ लाखांच्या कर्जासाठी केवळ एकच जामीनदार घ्यावा, नोंदणीकृत बँड दुकानदार व कलाकारांची जिल्हानिहाय यादी तयार करावी, थांबवलेली ऑनलाईन वेबसाईट त्वरित सुरू करावी तसेच उद्योजक प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज, जिल्ह्यात स्थायी व्यवस्थापक नेमणे अशा मागण्या मंजूर करण्यात आल्या. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अँड. कोमलताई साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर क्षिरसागर, विदर्भ जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे, महिला आघाडी अध्यक्ष हिराताई खडसे आदींसह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
4
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 12, 2025 07:03:23
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 12, 2025 06:17:20
Nashik, Maharashtra:नाशिक - *बाळा नांदगावकर बाईट पॉईंट्स* - नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आमचा संयुक्त मोर्चा - या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय - ज्या नाशिकला तुम्ही दत्तक घेतलय त्या नाशिककडे मंत्रिमंडळाच किती लक्ष आहे? - नाशिकमध्ये नेमकं काय चालू आहे? त्यासाठी हा संयुक्त मोर्चा शिवसेना उबाठा आणि मनसेने काढलेला आहे - नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, दिवसागणिक खून सत्र सुरू आहे - एमडी ड्रग्स टपऱ्यांवर विकले जात आहेत - शाळा, कॉलेजच्या आजुबाजूला ड्रग्स विकले जात असतील आणि सरकारच त्याकडे लक्ष नसेल तर सरकार म्हणून काय भूमिका घेणार - हनीट्रॅप प्रकरणाचं पुढे काय झालं? - शेतमालाला भाव, पीक विमा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न - आदिवासी शिक्षकांचा प्रश्न अजून सुटला नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं - राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक - नाशिकवर राज ठाकरेंच प्रेम - मधल्या काळात नाशिककरांच प्रेम काहीस कमी झालेलं असलं तरी राज ठाकरेंच प्रेम कमी झालेलं नाही - नाशिकचा विकास होत नाही, स्वतःला कर्तबगार समजणाऱ्या गिरीश महाजन काय करताय - छगन भुजबळ, दादा भुसे काय करत आहेत - सरकारला जाग आणण्यासाठी आजचा मोर्चा - कुणाला काय टीका करायची करू द्या, तुम्ही काम केलं असतं तर मोर्चा काढायची वेळ आली असती का? - नाशिक दत्तक घेऊन काय केलं? नाशिककरांच्या तोंडाला पानं पुसली - नाशिकची लोकं तुम्हाला विचारत आहेत, सिंहस्थ कामाच काय झालं? - प्रकल्प उद्ध्वस्त झाले - जबाबदार कोण? मुख्यमंत्री राज्याचे पालक असतात - नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती तरी राज ठाकरेंनी चांगली कामे केली - राज ठाकरेंनी केलेली कामं तरी टिकवली का? - आज त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे - लोकांनी आम्हाला नाकारलं ते ही चांगलं केलं - ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय केलं? हे लोकांना कळलं - हनीट्रॅप प्रकरण तडीस नेणे गरजेचं, शहराची नाचक्की झाली - कारवाई होणे गरजेचं - सरकारच्या नाकर्तेपणाचा आजचा आक्रोश मोर्चा -आयुक्तांना विनंती, भारताच भविष्य ड्रग्सच्या माध्यमातून उद्ध्वस्त होतंय - तुम्ही त्याकडे लक्ष द्यायला हवं - ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच काय होईल, हे मला आता सांगता येणार नाही - मी शिवसेनेचा घटक होतो आणि मनसेचा घटक - आम्हाला संघर्ष करायची सवय - सर्वपक्षीय लोकांनी आजच्या मोर्चात सहभागी व्हावे - आजचा मोर्चा जनतेचा, सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे - निवडणुकीच पुढे पाहता येईल - कुंभमेळ्याची तयारी अजून दिसत नाही - राज्यसरकारने यात लक्ष घातलं पाहिजे - प्रवीण गेडाम उत्तम अधिकारी, ते उत्तम काम करतील अशी अपेक्षा - अजूनही मुख्यमंत्र्यांना सर्व व्यवस्थित करण्याची संधी *ऑन आरक्षण* - राज ठाकरेंनी सुरुवातीच्या काळात भूमिका स्पष्ट केलीय - घटनेप्रमाणे कुणालाही धक्का न लागता आरक्षणहोतं द्यायला हरकत नाही - मात्र आमची सुरुवातीपासूनची भूमिका आर्थिक निकषावर आरक्षण हवं - मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला हवं - सर्वच बाबतीत राजकारण केलं जातंय - आरक्षणाच्या बाबतीतही राजकारण - फक्त राज ठाकरे एकमेव नेते आहेत, ज्यांच्या पोटात आणि ओठात एकच आहे
9
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 06:16:29
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे.काही दिवसांपूर्वी अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता,त्यामुळे अकोल्यात सामाजिक तसेच राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती.आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी केली होती यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी अकोला पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे.आरोपीचा शोध घेण्यासाठी अकोला पोलिसांनी विविध राज्यांमध्ये पथके पाठवली होती.अखेर पोलिसांना यश मिळाले असून, मध्यप्रदेश येथील इंदौर येथून फरार आरोपीला तौहीद समीर बेदला अटक करण्यात आली आहे.फरार आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधात चार राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये शोध घेतला तर इंदौर येथील सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी सुद्धा केली.आता या अटकेनंतर पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Byte : अर्चित चांडक , पोलीस अधीक्षक , अकोला.
9
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 12, 2025 06:02:12
Junnar, Maharashtra:Feed 2C Slug: Junnar Kedkar Tamasha Badnam Rep: Hemant Chapude(Junnar) *कला केंद्रातील घटनांमुळे तमाशाला बदनाम करू नका...!* तमाशा आणि कला केंद्राचं नातं जोडणं चुकीचं कला केंद्रात "बैठक" नावाचा शो होतो, तो कोण बंद करणार? कला केंद्रात जाणारे लोक राजकारणी, पुढारी, पैसेवाले आणि मोठे अधिकारी असतात. त्यांच्याशी पंगा आम्ही कसा घेणार?” रघुवीर खेडकर - Anc :- कला केंद्रात घडणाऱ्या घटनांमुळे तमाशाला बदनाम केलं जात असल्यामे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आक्रमक झाले आहेत. Vo :- तमाशा आणि कला केंद्राचा काहीही संबंध नाही. कला केंद्राच्या बा-या एका जातीपुरत्या आहेत, पण तमाशा हा अठरापगड जातींचा आहे असं स्पष्ट करत आमच्या पोटावर पाय आणू नका अशी हात जोडुन विनवनी रघुवीर खेडकरांनी केलीय तमाशात खाजगी बैठक किंवा शो होत नाही. कला केंद्राची कला चार भिंतींच्या आत दाखवली जाते. त्यामुळे तमाशा आणि कला केंद्राचं नातं जोडणं चुकीचं असुन कला केंद्रात "बैठक" नावाचा शो होतो, तो कोण बंद करणार? आम्ही तमासगिरांनी तो बंद करायचा का? मग त्यांच्याशी आमचं वाईट व्हायचं का? असे सवाल करत कला केंद्रात जाणारे लोक राजकारणी, पुढारी, पैसेवाले आणि मोठे अधिकारी असतात. त्यांच्याशी पंगा आम्ही कसा घेणार?”, असा थेट प्रश्नही रघुवीर खेडकर यांनी उपस्थित केला. Byte :- रघुवीर खेडकर - अध्यक्ष आखिल भारतीय तमाशा परिषद... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
5
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 12, 2025 05:34:21
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीतील तिहेरी खून प्रकरणातील जयगड पोलिसात दाखल केलेल्या सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खुनाचा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. एक वर्ष उलटूनही राकेश जंगम याच्या बेपत्ता प्रकरणाचा उलगडा जयगड पोलिसांना करता आला नव्हता. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार दोन्ही खुनांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात संशयित आरोपी दुर्वास मयेकर याने सीताराम लक्ष्मण वीर व राकेश अशोक जंगम या दोघांचा खून केल्याची कबुली दिली होती. दुर्वास आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीत सीताराम यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेचा साक्षीदार असलेला राकेश जंगम बेपत्ता होता. मात्र त्याचाही खून केल्याची कबुली दुर्वासने दिली होती..
12
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 12, 2025 05:33:19
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत लचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील वर्ग-१ अधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी तब्बल २४,००० रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती १६,५०० रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. एकाच वेळी तीन लोकसेवकांना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने, रत्नागिरीच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
13
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 12, 2025 05:32:53
13
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 12, 2025 05:18:17
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात पुन्हा एकदा पोलिसांची गुंडागर्दी उघडकीस आली आहे. कायद्याचे रक्षण करणारेच पोलिस सामान्य नागरिकांवर हल्ला करत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. V/O - काही दिवसांपूर्वी कोल्हार गावात रात्री दहा वाजता सर्व आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. Lत्यानुसार व्यापारी वेळेवर दुकाने बंद करत असतात. मात्र मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास केक शाॅपची आवराआवर करत असलेल्या कैलास पिलगर यांच्यावर अचानक सिव्हिल ड्रेसमधील पोलिस हवालदाराने बेदम मारहाण केली.सदर हवालदार लोणी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या कोल्हार दुय्यम पोलिस चौकीत कार्यरत असल्याचे समजते. दुकानदार कैलास पिलगर यांनी सांगितले की, “मी फक्त दुकान आवरत होतो. तेव्हा पोलिसाने इतर दुकानदारांनाही बंद करायला लावा एवढं सांगितलं. मात्र अचानक त्याने मला मारहाण सुरू केली.”या घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पोलिसांकडूनच गुंडागर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. Bite - कैलास पिलगर
12
comment0
Report
Advertisement
Back to top