Back
कल्याण-डोंबिवली: चिकन-मटण विक्रीवर आंदोलनाची तयारी!
ABATISH BHOIR
Aug 15, 2025 02:30:54
Kalyan, Maharashtra
कल्याण-डोंबिवली मनपा मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त; चिकन-मटण विक्री विरोधात आंदोलनाचा इशारा
अँकर: आज, १५ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने चिकन-मटण विक्री संदर्भात घेतलेल्या निर्णयाला विरोध करत खाटीक समाज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्याने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळपासूनच पालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस आणि सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत. १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहणासाठी पालिका आयुक्त येथे येणार आहेत. याचवेळी आंदोलक एकत्र येण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
पालिकेच्या या निर्णयामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी असून, याविरोधात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.
याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt... आतिश भोईर
कल्याण
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowAug 15, 2025 04:51:50Akola, Maharashtra:
Anchor : स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला..यावेळी उपस्थित नागरिकांसह देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी 2047 पर्यंत महाराष्ट्र राज्य आत्मनिर्भर, समृद्ध, तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम, सामाजिक समतेचे आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.
Sound Byte : आकाश फुंडकर , राज्य कामगार मंत्री.
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 15, 2025 04:34:51Beed, Maharashtra:
बीड:पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न...
Anc: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिमझिम पावसाच्या सरींमध्येही देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रीय गीताचे सूर गुंजले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
3
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 04:34:39Nashik, Maharashtra:
nsk_muttonchoupal
feed by live u 51
Anchor नाशिक शहरात आज 800 पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटन विक्री दुकाने सर्रास सुरू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यास 78 वर्ष पूर्ण झाल्याने आज नाशिक महापालिकेने आज शहरातील सर्व खतरखाने बंद ठेवावेत असे लेखी आदेश दिले होते. असताना सरकारचा आदेश जुगारत दुकानात खुलेआम सुरू ठेवण्यात आले आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
2
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 04:34:34Nashik, Maharashtra:
nsk_flaghoisting
feed by live u 51
अँकर - नाशिकला अद्याप पालकमंत्री लाभलेले नसतांना मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज स्वातंत्र्यदिन निमित्ताने शासकीय ध्वजारोहन सोहळा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी संपन्न होणार आहे. 26 जानेवारी, 1 मे नंतर तिसऱ्यांदा पालकमंत्री नसताना गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान नाशिकला देण्यात आला. महायुतीतील तीनही पक्षांना हा मान दिला जाईल अशी अपेक्षा असताना भुजबळांना गोंदिया पाठविण्यात येत होते...मात्र भुजबळांनी मी कायम नाशिकमध्ये ध्वजारोहण केले आहे असे सांगत नकार दिल्याने स्वातंत्र्यदिनी नाराजीनात्य रंगले आहे. आज त्यावर भुजबळ काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे
4
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 04:34:21Nashik, Maharashtra:
nsk_muttonchoupal
feed by live u 51
Anchor नाशिक शहरात आज 800 पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटन विक्री दुकाने सर्रास सुरू आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यास 75 पूर्ण झाल्याने आज नाशिक महापालिकेने आज शहरातील सर्व खतरखाने बंद ठेवावेत असे लेखी आदेश दिले होते. असताना सरकारचा आदेश जुगारत दुकानात खुलेआम सुरू ठेवण्यात आले आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी
2
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 15, 2025 04:33:35Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur School Independence Day
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
शिरूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Anc:शिरूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी शाळांमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत सादर केली, देशभक्तीपर भाषणे केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशप्रेम व्यक्त केले.
विशेष म्हणजे अनेक शाळांनी सफाई कामगारांचा सन्मान करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमांमुळे स्वातंत्र्य दिनाचा संदेश अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 15, 2025 04:33:24Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
*धाराशिव:*
DHARA_HEVY_RAIN
धाराशिव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी,अनेक ठिकाणी नदीला आला पुर .
परंडा तालुक्यातील सिरसाव गावामध्ये चांदणी नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसले गावात ग्रामपंचायत,शाळा व दुकानांमध्ये शिरले पाणी
Anchor: धाराशिव जिल्ह्यात गेली दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदुर दमदार पाऊस झाला आहे.परंडा तालुक्यातील सिरसाव येथील चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे गावात पाणी शिरले त्यामुळे गावातील ग्रामपंचायत शाळा व दुकानांमध्ये पाणी शिरले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या पंधरा वर्षात असा महापूर कधीही आला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तर या पावसामुळे मांजरा नदीची उपनदी असलेल्या वाशी तालुक्यातील वाशीरा नदीला मोठा पुर आला असुन उंच पुलावरून पाणी वाहु लागल्याने मांजरा नदी पाञ दुथडी भरुण मोठ्या प्रवाहाने वाहु लागले आहे.कळंब इटकुर पारा रस्ता बंद झाला असुन अनेकांचे शेतातील गोठे,घरात पाणी शिरले तर भुम तालुक्यातील आरसोली प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी आल्याने नागरीकांची दानादान उडाली आहे.कळंब धाराशिव, तुळजापूर,उमरगा,लोहारा या भागात देखील दमदार पाऊस झाला आहे.
0
Report
MAMILIND ANDE
FollowAug 15, 2025 04:31:06Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग*
EXCLUSIVE आहे
SLUG- 1508_WARDHA_AATMDAHAN
- वर्ध्यात कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदाराचे आत्मदहन
- वर्ध्यात स्वतंत्र दिनाच्या दिवशी कंत्राटदार बाबा जाकीर यांचे आत्मदहन
- वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेट वरील धक्कादायक प्रकार
- पोलिसांच्या सातर्कतेने बचावला कंत्राटदार
- कंत्राटदार बाबा जाकीर यांनी घेतले अंगावर डिझेल
- बांधकाम विभागात त्यांचे दीड कोटीचे देयके प्रलंबित असल्याने आत्मदहनाचा प्रयत्न
- 20 दिवसा पूर्वी कंत्राटदार बाबा जाकीर यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न
- बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे हे देयके देत नसल्याने आत्मदहन करणार असा इशारा
अँकर - वर्ध्यात आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धक्कादायक प्रकार संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर कंत्राटदार बाबा जाकीर यांनी कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बाबा जाकीर यांच्या दीड कोटी रुपयांच्या देयकांची फाइल महिन्यापासून प्रलंबित असून, अंभोरे यांच्याकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. आज सकाळी त्यांनी गेटसमोर अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला आणि तातडीने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. विशेष म्हणजे, 20 दिवसांपूर्वीही बाबा जाकीर यांनी अशाच प्रकारचा प्रयत्न करत बांधकाम विभागासमोर तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली होती. कंत्राटदारांचा असा आरोप आहे की, बांधकाम विभागातील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार यामुळे प्रलंबित देयकांची विलंब होत आहे. या प्रकारानंतर विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 15, 2025 04:15:42Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यातील वंचित बहुजन कार्यालया येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रनिर्मिती आणि स्वराज्याबाबत भाष्य करताना सरकारवर टोला लगावला. “अडीच हजार वर्षांची गुलामी संपवून आपण नवीन राष्ट्र निर्माण केलं आहे. राष्ट्रात वरचढपणा चालत असतो, पण आपण स्वतः आपल्या भूमीवर राज्य करत आहोत यातच आपण धन्यता मानतो,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले..या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Byte : प्रकाश आंबेडकर , वंचित बहुजन आघाडी, नेते
4
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 15, 2025 04:01:12Nashik, Maharashtra:
Nsk_tribalflaghosting
Feed by live u 51
Anchor आदिवासी विकास आयुक्तालय समोर आंदोलन करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना आज स्वातंत्र्य दिन आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर साजरा करावा लागला.. यावेळी या सर्वांना पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर उभे करण्यात आलं होतं. ध्वजाचा दर्शनही त्यांना होत नव्हतं. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनातील रोजंदारी कर्मचारी आपल्या ला कायमसवेत घेण्याची मागणी करत आहे मात्र आदिवासी विभाग खाजगी टेंडर काढून इतर लोकांना सेवेत घेण्याची तयारी करत आहे. त्यामुळे गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून सातत्याने शाळेवर स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या या शिक्षक शिक्षिकांना डोळ्यात पाणी आलं होतं.
Byte आंदोलक रोजंदारी शिक्षिका आणि शिक्षक
1
Report
AKAMAR KANE
FollowAug 15, 2025 04:01:07Nagpur, Maharashtra:
Ngp Rss Flag Hosting
live u ने फीड पाठवले
-------------------
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय महाल येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.... महानगर संघचालक राजेश लोया यांनी यांनी ध्वजारोहण केले.... स्वयंसेवक व सुरक्षाकर्मी उपस्थित होते... यावेळी संघ मुख्यालय मधून भाषण देताना राजेश लोहया यांनी स्वचा वापर करताना स्वदेशी व आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याच्या संदेश दिला
-----
बाईट--
राजेश लोया,महानगर संघचालक,
------------
नागपूर
राजेश लोय, महानगर संघचालक, (भाषण)
-- आज संकल्प करायचा आहे
ज्याने आपल्या देशावर वक्रदृष्टी ठेवली त्यांना सैन्याने चोख उत्तर दिले
-- शत्रूना सडेतोड उत्तर दिले आहे
-- आपले स्वाभिमान दिसून आले
-- आता स्व चे जागरण होतेय
--- स्वदेशीचा वापर वाढवा
-= स्व चा बोध परिवार, नागरिकांमध्ये करावा
--- भाषा स्वयंम की मातृभाषा हो.... सर्वत्र वापरणारी भाषा हिंदी.. जिथे राहतो त्या भाषेचा आदर करा.. परकीय भाषा नको
-- स्व परिधान असो.. प्रदेशनुसार
--युवामध्ये ते कमी दिसते.. त्यांना
--उपासना पद्धती नियमित घरी वापर करावा.भजन करावे.. समूह भजन केल्याने चांगले विचार पोहचतात.. संस्कृती तिथून पोहचते
-- त्यामुळे कोणी मतांतर करू शकणार नाही
-- जिथे राहतो तिथे(घरी) आपल्या संस्कृती, व प्रेरणा देणाऱ्या गोष्टी ठेवाव्या (फोटो -- स्वातंत्र्यवीर, महापुरुष )
--तुळसी असावी
-- भ्रमण परदेशात करता मात्र... आपले तीर्थस्थळ, किल्ले, येथे जावे
-- अतिशय जाण्याचा फल जास्ती आहे तो कमी करून भारतात जास्त भ्रमण करावे ( पर्यटन)
--
2
Report
KJKunal Jamdade
FollowAug 15, 2025 03:45:21Shirdi, Maharashtra:
Nashik News Flash
आदिवासी आयुक्तालयातील आंदोलक आक्रमक..
स्वतंत्र दिवस साजरा करण्यासाठी कार्यालयात न घेतल्याने आक्रमक..
राज्यगीत सुरू असताना आदिवासी आयुक्तालयातील तीन अधिकाऱ्यांनी अवमान केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी...
त्या अधिकाऱ्यांना शोधून चपलीने मारण्याचा अधिकार आम्हाला आहे... - आंदोलकांचा इशारा
9
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 15, 2025 03:45:11Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av
Feed attached
स्वातंत्र्य दिनानिमित्त संभाजी नगरच्या जायकवाडी धरणाला भारताच्या ध्वजाची रोशनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे धरण अधिकच खुलून दिसतंय. जायकवाडी धरणावर छत्रपती संभाजीनगर जालना यासह 300 पेक्षा अधिक खेड्याची तहान अवलंबून आहे .आणि यावर्षी आनंदाची बातमी म्हणजे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे..
9
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 15, 2025 03:30:11Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - दक्षिण सोलापूर तालुक्यात कालपासून पावसाचा जोर ओसरला मात्र शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी
- दक्षिण सोलापूर तालुक्यात कालपासून पावसाचा जोर वसरला, शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी.
- दक्षिण सोलापूर तालुक्यात जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या बांधावर येऊन अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे शेतकऱ्यांची अपेक्षा
- दक्षिण सोलापूर तालुक्यात चार-पाच दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक नदी - नाले ओसंडून भरून वहायला सुरवात
- त्यामुळे अनेक गावातील खरीप हंगामाच्या पिकांना बसला होता फटका.
- तूर मूग उडीद सोयाबीन कांदा पिकांचे जोरदार पावसामुळे झालं होतं नुकसान.
- तालुका प्रशासनाकडून पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
Byte : ग्रामस्थ
8
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 15, 2025 03:16:32Pandharpur, Maharashtra:
15082025
slug - PPR_TRICOLOUR_WKT
file 01
---
Anchor भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिरंगी फुलांमध्ये सजून गेला आहे.
विठुरायाचा गाभारा चौखांबी सोळखांबी या ठिकाणी सुंदर फुलांचा वापर करून ही तिरंगा पद्धतीची सजावट केलेली आहे तिरंगी ध्वज प्रमाणे सजावट करण्यात आलेली आहे. विठुरायाच्या पोशाखामध्ये सुद्धा भारतीय ध्वजातील तीन रंग असणारा असलेला परिधान करण्यात आलेला आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे
13
Report