Back
अकोला के मूर्तीजापूर स्टेशन पर 55 मिनट की जद्दोजहद में प्रवासी की जिंदगी बची
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 14:18:15
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर रेल्वे स्थानकावर एका धक्कादायक घटनेने प्रवाशांचे लक्ष वेधले.अमरावती-पुणे एक्सप्रेसमधून उतरताना एक 50 वर्षीय प्रवशी रेल्वेच्या पायरी आणि प्लॅटफॉर्म मधील अरुंद जागेत अडकला. तब्बल 55 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याची सुटका करण्यात आली.मुस्ताक मोईन खान हे मूर्तीजापूर येथे नातेवाईकाच्या निधनानिमित्त आले होते. ट्रेन थांबल्यानंतर उतरताना त्यांचा तोल जाऊन पाय प्लॅटफॉर्मवर न पडता थेट रेल्वेच्या पायरीखाली व प्लॅटफॉर्मच्या अरुंद जागेत अडकला. त्यामुळे ते पूर्णपणे अडकून गेले आणि हालचाल करणे अशक्य झाले.घटनेनंतर उपस्थित प्रवासी, रेल्वे कर्मचारी, व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेतली. गाडीच्या पायऱ्या कटरने कापण्यात आल्या तसेच प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडून अखेर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रक्रियेत त्यांचा उजवा पाय गंभीर जखमी झाला.प्राथमिक उपचारासाठी त्यांना मूर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, व पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.ही घटना सावधगिरी न बाळगल्याने किंवा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेतील जागेच्या अपुऱ्या डिझाइनमुळे घडली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.रेल्वे प्रशासनाने याबाबत चौकशी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 16:32:381
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 16:15:280
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 15:46:581
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 15:31:490
Report
HBHeeralal Bhati
FollowSept 15, 2025 15:17:477
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 15:03:121
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 14:46:584
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 14:31:571
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 14:31:464
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 14:03:182
Report
ABATISH BHOIR
FollowSept 15, 2025 14:03:072
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 13:51:504
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 13:51:362
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 13:35:273
Report