Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

मूसलाधार बारिश ने किसानों की सोयाबीन-उड़द-मूग-कपाशी पानी में डुबो दी

GDGAJANAN DESHMUKH
Sept 16, 2025 09:26:16
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागात शेती पीक अक्षरशः नासुन जात आहेत. शेतकऱ्यांनी उपसलेले कष्ट यामुळे व्यर्थ गेले असून पिकांना लावलेला खर्च पाण्यात बुडालाय. आज पूर्णा तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन उडीद मूग कपाशीचे सडलेले धान घेऊन थेट पूर्ण तहसीलदारांना भेट देत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याची मागणी केली. बाईट- शेतकरी
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Sept 16, 2025 12:03:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अजित पवार पॉइंटर शिवाजी राव चोथे यांनी आज प्रवेश केला त्यांचे स्वागत त्यांनी आणि मी आमदार असताना सोबत काम केले सध्या वातावरण राज्यात वेगळं आहे, पावसाची परिस्थिती आहे.. मराठवाडा आणि इतर भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत बाळासाहेबांनी मुंबई डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेचची स्थापना केली, मात्र काँग्रेस देशव्यापी काम करत होता मात्र ठराविक माणसे काम करत होती.. नवीन लोकांना वाटत होते आपल्याला संधी कधी अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेस च्या विचारसरणीने काम केले, समाजात काम करायचे असेल तर सर्व विचारधारा सोबत घेऊन काम करावे लागते आम्ही शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, मात्र निसर्ग कधी कधी कठोर होतो... पाटबंधारे मंत्री असताना माझ्यावर बिंनबुडाचे आरोप झाले मला बदनाम केले मात्र नाथ सागर ( जायकवाडी ) पासून नांदेड पर्यंत अनेक बंधारे बांधले, त्यातुन शेतीला फायदा झाला अजूनही अनेक समस्या आहेत... *मुसळधार पाऊस काही भागात मराठवाड्यात झाला, अतिशय पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान झाले, आम्ही बळीराजाच्या पाठीशी आहोत* **आज आम्ही निर्णय घेतला सगळीकडे पंचनामे करायला सांगितले, पशुधन नुकसान ,* मनुष्य हानी सगळी माहिती घेतोय.. काल बीड ला हेलिकॉप्टर पाठवून लोकांना वाचवलं, आज रात्री मी बीड मध्ये आढावा बैठक घेईल* **शेतकऱ्याला उभारी देऊ, सगळे पालकमंत्री बारकाईने लक्ष देईल, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे.. काहो राहील तर आमच्या लक्षात आणून द्या..* पंचनामे तात्काळ सुरू करा आदेश दिले, शासन मदत करेल हा माझा शब्द आहे... जिल्हाधिकारी यांनी तातडीने सगळे प्रस्ताव पाठवावा त्यातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जाईल चिंता करू नका* * *शेतीसाठी A I चा वापर करायला लागेल त्यातून उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावा लागेलं* पाणी बचत, खत बचत त्यातून होऊ शकेल... सध्याचा कृषी मंत्री हाडाचा शेतकरी आहे, ते ही लक्ष घालताय... त्यांच्याकडे पूर्वी काही नव्हते आता मात्र कष्टाने 15 ते 20 हजार टन ऊस जातो शेतकरी याना वीज माफी केली आहे ते राज्य सरकार भरते *कांद्या बाबत आज मंत्रिमंडळात चर्चा झाली, कांद्याचा वांदा झालाय, अनेक चाळी वाहून गेल्या आहेत मात्र त्याबाबत ही तोडगा काढू* आज प्रवेश करणाऱ्यांनी चांगल्या पक्षात प्रवेश केलाय विश्वास ठेवा *आज शिवाजी राव ला घेतले उद्या आणखीन कुणी आले तर काय असा प्रश्न पडेल ( राजेश टोपे बाबत नाव न घेता ) चिंता करू नका तिकीट आम्ही देतो आगीतून फुफाट्यात तुम्ही जाणार नाही* 2017 नंतर आता निवडणूक होताय.. पक्षाचा कार्यकर्त्याला संधी मिळाली नव्हती , आपल्याला आता माजबुतीने पूढे जायचे आहे ,काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते.. आज सुप्रीम कोर्टमें सांगितले जानेवारी पर्यंत निवडणूक संपवा, आता बघता बघता निवडणूक येतील.. सगळ्यांनी कामाला लागा *सगळं आता लवकर होईल कोर्टापुढे कुणी नाही, राज्य निवडणूक आयोग अंमलबजावणी करेल, आता पुढं नवरात्र दसरा आहे... कामाला लागा* *पंचनामे सुरू आहे साधारण दसर्यापर्यंत मदत मिळेल असे आमचा प्रयत्न आहे* आमचं लक्ष आहे काळजी करू नका... *वेगवेगळ्या जातीत प्रश्न निर्माण होताय कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेते, मागण्या करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र सगळं नियमात करून कोर्टाचे आदेश उल्लंघन होणार नाही याची काळजी सरकार घेताय, वेगवेगळ्या समाजात यातून संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्या, बोलताना खबरदारी घ्या आपला पक्ष कुठल्या एक जातीचा नाही, सर्वांचा आहे ( ओबीसी मराठा वाद सुरू आहे मराठवाड्यात त्यावर ) सर्व जाती धर्माचा कल्याणकरता सरकार काम करतय..*
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 16, 2025 12:03:04
Ambernath, Maharashtra:कॅप्टन आशिष दामले यांना मंत्रीपदाचा दर्जा! दामले परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्य सरकारने जारी केला शासन निर्णय Bdl damale Anchor : परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे. राज्य सरकारने १६ सप्टेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. Vo : राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली होती. या महामंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून कॅप्टन आशिष दामले यांची निवड करण्यात आली होती. कोणत्याही महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो. मात्र कॅप्टन आशिष दामले यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे. या निर्णयामुळे दामले यांच्या समर्थकांसोबतच ब्राह्मण समाजातही आनंदाचं वातावरण आहे. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 16, 2025 12:01:19
Ratnagiri, Maharashtra:दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरात दापोली पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत तब्बल चार लाख रुपयांचा चरस साठा जप्त केला. संशयित आरोपी अब्रार इस्माईल डायली याच्या राहत्या घराच्या मागील पडवीत तपासादरम्यान ९९८ ग्रॅम चरस सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी दिली आहे.. जप्त करण्यात आलेला हा माल गडद लाल-सोनेरी रंगाच्या प्लास्टिकच्या वेष्टनात, आत हिरव्या रंगाच्या पॅकिंगमध्ये ठेवलेला होता. चरसला तपकिरी रंग व तीव्र वास असून, वेष्टनावर इंग्रजीत "6 GOLD" असे तसेच कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला. पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीत हा मुद्देमाल सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी दापोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीवर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Byte - महेश तोरसकर, पोलीस निरीक्षक, दापोली
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 16, 2025 11:52:45
Ambernath, Maharashtra:अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयातील लिफ्ट सुरू करा! प्रहार पक्षाचं तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन Amb agitation Anchor : अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयातील लिफ्ट बंद असल्यानं दिव्यांग, वृद्ध नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात मंगळवारी प्रहार पक्षानं तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी नवीन लिफ्ट बसवण्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली. Vo : अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीची इमारत चार मजली असून दररोज शासकीय कामानिमित्त अनेक दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांनाही या इमारतीत यावं लागतं. मात्र इमारतीच्या दोन्ही लिफ्ट बंद असल्यानं त्यांना जिने चढून जाणं शक्य होत नाही. या त्रासाबाबत प्रहार पक्षाने दिव्यांग बांधवांना सोबत घेत आंदोलन केलं. या आंदोलनानंतर सध्या असलेल्या लिफ्ट या तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून त्यांची दुरुस्ती शक्य नाही. त्यामुळे नवीन लिफ्ट बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली. Byte : आलम खान, प्रहार पक्ष byte : अमित पुरी, तहसीलदार चंद्रशेखर भुयार,  अंबरनाथ
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 16, 2025 11:50:51
Thane, Maharashtra:*खासदार नरेश मस्के बाईट पॉईंटर* *ऑन वाहतूक कोंडी* - घोडबंदर रोड मुख्य रोड सेवा रस्ता या सर्वांची काम सुरू आहे त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे - अहमदाबाद वरून येणारी वाहने जेएनपीटी कडून जाणारी वाहने मोठे हेवी वैकल त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होते - तेथील नागरिकांची मागणी होती की आमदाबाद कडून येणाऱ्या मोठ्या हेवी वेहिकल या भाईंदर कडे पार कराव्यात दिवसा सोडून आहे तसेच जेएनपीटी कडून येणारे वाहने सोडू नये त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते - काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बैठक घेतली दोन्ही विभागाचे ग्रामीण शहरी व वाहतूक पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी आणि आरटीओचे अधिकारी या सर्वांनी एकत्र बोलावलं होतं काल निर्णय देखील घेण्यात आले की रात्री बारा वाजता नंतर शहरांमध्ये अवजड वाहने सोडण्यात यावे सकाळी सात वाजता हेवी वेहिकल शहरात बंद केले जातील. - अशा पद्धतीचा निर्णय काल झालेला आहे - अवजड वाहनांना शहरांमध्ये दिवसा बंदी घालण्यात आलेले आहे - अशा प्रकारचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत जर अधिकारी हाय काय करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे - भाईंदर वसई आमदाबाद हायवेवर अवजड वाहनांचा पार्किंग केलं जाईल आणि त्यांना रात्री 12 नंतर सोडण्यात येईल... जे एन पी टी वरून जी वाहन सोडण्यात येतील दिवसा ती सोडली जाणार नाहीत ती रात्री सोडण्यात येतील तशा प्रकारच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत - रस्त्यावर अवजड वाहनांमुळे जी वाहतूक कोंडी होत होती ती यामुळे होणार नाहीत *ऑन नागला बंदर आंदोलन* - आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे कदाचित रात्री घेतलेला निर्णय तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल - नागरिकांमध्ये देखील दोन-तीन संघटना आहेत कदाचित त्यांच्या मधला काही वाद असेल परंतु हा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि नागरिकांचा तो अधिकार आहे आणि तो त्यांना आज मेसेज कळला गेला असेल सकाळी त्यामुळे नागरिकांची जी अडचण आहे ती दूर होणार आहे *ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस* - आपल्या देशाचं नाव वाढवण्याकरता आपल्या देशाची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरिता आणि फार मोठी अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वा खाली गरीब कामगार तरुण शेतकरी मध्यमवर्गीय समाजात सगळ्या समाजात करता ते काम करतात त्यांना आणखीन काम करण्याची शक्ती आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो भली मोठी शक्ती तू दे त्यांना हे करण्याकरिता आपल्या देशाचं नाव जगभरात उंचावलेला आहे ते आणखीन वाढवण्यासाठी त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे आणि आणखीन वर्षानुवर्ष त्यांचं नेतृत्व हे भारताला मिळू दे हेच त्यांच्या वाढदिवसा समई मी त्यांना शुभेच्छा देतो.. *ऑन जीएसटी भर कमी* - जीवनावश्यक ज्या ज्या काही वस्तू आहेत त्यांच्या किमती या उतरलेल्या आहेत - किमती कमी झालेला आहे हे फार मोठे गिफ्ट त्यांना मिळालेला आहे *ऑन धाराशिव जिल्हा* - काही छोट्या मोठ्या असतील सर्वपक्षीय कार्यकर्ते असतील मला काय याची कल्पना नाही कोण गेलं काय गेलं - शेवटी प्रत्येकाच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही - कुठले लोक आहेत ती मी माहिती घेतो कुठल्या पक्षाचे लोक आहेत ती - *धाराशिव हा शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला राहणारच* *ऑन टीकेला त्याच पद्धतीने उत्तर* - एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत आणि नेत्यांवर जर कोणी चुकीच्या पद्धतीने टीका करत असेल आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून त्याच पद्धतीने उत्तर देणार मग कोणी ही असो *ऑन युती धर्म* - मी असं म्हणालो की लोकसभेमध्ये महायुती होती विधानसभेमध्ये सुद्धा महायुती होती आणि महानगरपालिकेत सुद्धा आम्ही महा युती म्हणून निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत - जर काही ठिकाणी कोणाला आमच्या सोबत लढायांचं नसेल तर आम्ही इलेक्शन सोडून नाही देणार.... आम्ही सुद्धा स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयार आहोत
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 16, 2025 11:49:52
2
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 11:38:53
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 11:38:04
Beed, Maharashtra:बीड:लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणूक लढवायची असेल म्हणूनच त्यांचे दौरे वाढले... खासदार बजरंग सोनवणे यांनी सर्वच सांगितले...!! Anc: लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणुक लढवायची असेल म्हणून ते सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर जास्त आहेत. अशी मिश्किल टीका बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. लक्ष्मण हाके यांनी निरक्षर खासदार म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर आज पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी हाके यांचा समाचार घेतला. बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शाब्दिक वारांचा जोर वाढताना दिसतो आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके यांच्यावर मिश्किल टीका केली. लक्ष्मण हाके बीड जिल्हा दौऱ्यावर जास्त फिरत आहेत, कारण त्यांना बीडमधून आगामी निवडणुका लढवायच्या आहेत. अशा शब्दांत सोनवणे यांनी हाके यांचा समाचार घेतला. बाईट: बजरंग सोनवणे - खासदार बीड
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 16, 2025 11:30:14
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 11:21:50
Kolhapur, Maharashtra:गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेसर किरणांमुळे एका व्यक्तीच्या डोळ्यांना गंभीर इजा, इचलकरंजीतील घटना मिरवणुकीत बेकायदा लेसरचा परिणाम सामान्यांना बंगळुरातील तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू Story:- Laser Light impact Feed:- File Anc :- इचलकरंजीत गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेसर किरणांमुळे एका व्यक्तीच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याच समोर आलं आहे. गांधी पुतळा परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. उपचार घेत असलेल्या या व्यक्तीबाबत झालेला प्रकार उशिरा उजेडात. एका जुन्या नावाजलेल्या टेलर व्यावसायिकाच्या डोळ्याला लेसर किरणांमुळे इजा झाल्याची चर्चा शहरात आहे. लेसरच्या वापरावर बंदी घातली असताना केवळ आकर्षणासाठी मिरवणुकीत बेकायदा लेसर वापरल्याने त्याचा परिणाम सामान्यांना भोगावा लागत आहे. मिरवणुकीत लावलेल्या लेसरमुळे या टेलर व्यावसायिकाच्या डोळ्याला धुसर दिसू लागले. रात्रभर उपचार उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोळ्याची पूर्णपणे दृष्टी गेली. त्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू झाले. पाचहून अधिक तज्ज्ञांना दाखवून तब्बल 50 हजारांहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. सध्या बंगळुरातील तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून, पुन्हा दृष्टी येण्यासाठी सहा महिने लागतील असा डॉक्टरांनी अंदाज वर्तवला आहे.
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 16, 2025 11:10:32
Chandrapur, Maharashtra: Feed slug :--- 1609ZT_CHP_TRIBAL_PRO ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात बंजारा -धनगर समाजाच्या संभाव्य एसटी प्रवर्ग समावेशा विरोधात गोंडवाना गणतंत्र पार्टी सह आदिवासींचे धरणे आंदोलन, सरकारने असा प्रयत्न केल्यास विदर्भभर आंदोलन करण्याचा इशारा अँकर:-- चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया पुढे आज गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकर्त्यांनी समस्त आदिवासी बांधवांसह जोरदार निदर्शने केली. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील बंजारा आणि धनगर समाजाच्या संभाव्य एसटी प्रवर्ग समावेशा संदर्भात मागण्या केल्या जात आहेत. मात्र या दोन्ही समाजाच्या चालीरीती राज्यघटनेनुसार आदिवासी प्रथा परंपरानुसार नाही. त्यामुळे या दोन्ही समाजांचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये अशी आग्रही मागणी आदिवासी आंदोलकांनी केली आहे. तसा प्रयत्न झाल्यास विदर्भभर आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. बाईट १) आंदोलक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 16, 2025 11:04:18
Washim, Maharashtra:वाशीम: File:1609ZT_WSM_SHELU_HEAVY_RAIN रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:वाशीम जिल्ह्यातील शेलुबाजारसह परिसरात आज दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेलुबाजार परिसरातील नाले व नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या. परिणामी शेलुबाजार मुख्य चौकात असलेल्या भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक तसेच खाजगी व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.अति पावसामुळे व्यापाऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.चौकातून जाणाऱ्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण हे यामागील मुख्य कारण असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.परिणामी पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर व दुकानांत घुसते.व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नालेसफाई व अतिक्रमण हटविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 16, 2025 10:47:14
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1609ZT_CHP_JIVATI_PATTA ( single file sent on 2C)  टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील अति दुर्गम जिवती तालुक्यात 21 हजार 624 एकर जमीन राज्य शासनाने वनक्षेत्रातून वगळण्याचा घेतला ऐतिहासिक निर्णय, या निर्णयामुळे तालुक्यातील 22 गावांतील सुमारे 12 हजार शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील 21 हजार 624 एकर जमीन राज्य शासनाने वनक्षेत्रातून वगळल्याने 22 गावांतील 12 हजार शेतकऱ्यांची दीर्घकाळची समस्या मार्गी लागली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमिनीवर कायदेशीर हक्क मिळणार असून, शेतीसाठी सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचे भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला असून, जिवतीवासीयांनी शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहे. बाईट 1) महेश देवकते, जिल्हाध्यक्ष, भाजयुमो चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
Advertisement
Back to top