Back
कोपरगावमध्ये ९० दिवसात पैसे दुप्पट करण्याचे आमिष, आरोपी अटक!
KJKunal Jamdade
FollowJul 17, 2025 07:07:24
Shirdi, Maharashtra
Anc - "९० दिवसात पैसे दुप्पट करून देतो" असे आमिष दाखवून कोपरगाव, शिर्डी आणि राहाता परिसरातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ईश्वरप्रसाद सुदाम शिंदे याला कोपरगाव पोलिसांनी पंढरपुरातून अटक केली आहे. आरोपीने फिर्यादी अनीसा शेख यांच्याकडून ४ लाख रुपये घेऊन गंडवले होते. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपीने आणखी काही जणांना फसवल्याचा संशय असून, पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहे.
4
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowJul 17, 2025 13:35:18Kalyan, Maharashtra:
कल्याण मध्ये ठाकरे गटाचा गांधीगिरीतून ओला-उबेर बंद न मानणाऱ्यांना चालकाचा हार-श्रीफळ देत गांधीगिरी मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा
Anc..पंधरा तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर ओला उबेर कंपनीच्या मनमानी विरोधात चालकांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलन दरम्यान ओला उबेर चालकानी राज्यभरात बंदचा इशारा देखील दिला आणि या आंदोलनात सर्व चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही चालकांनी या बंदला पाठिंबा दिला नाही आणि अधिक पैसे मिळतात म्हणून रस्त्यावर आपली वाहने चालवत आहे अशाच चालका विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाले असून , आज ठाकरे गटाचे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेने आगळ्यावेगळ्या प्रकारे आंदोलन केले. यावेळी ओला-उबेरच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी न झालेल्या चालकांना त्यांनी हार आणि श्रीफळ देऊन 'सत्कार' केला. मात्र हा सत्कार वाटत असला तरी, तो गांधीगिरीतून दिलेला एक कडक इशारा होता.उबेर चालकांच्या आत्महत्या झाल्या आहेत. उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते हा बंद तुमच्यासाठीच आहे आज हाल आणि श्रीपत देऊन आपले सत्कार करत आहोत उद्यापासून आमचा आंदोलन तीव्र होईल असा इशारा ओला चालकांना ठाकरे गटांनी दिलेला आहे त्याचबरोबर आज जरी गांधीगिरीने या चालकांचे 'स्वागत' झाले असले, तरी जर आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र होईल. या सर्व परिस्थितीची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर राहील, असा स्पष्ट इशाराही देखील यावेळेस ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे .
Byte :- निलेश भोर ( गटाचे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष )
1
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 17, 2025 13:33:22Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - निवासी सैनिकी शाळेत विद्यार्थ्याला, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण,निकृष्ट जेवण आणि शिक्षण देत असल्याचाही पालकांचा आरोप..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये एका निवासी शाळेत विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून यामध्ये विद्यार्थ्याला नाकातून रक्त येऊ पर्यंत मारण्यात आले आहे,शाळेच्या संस्थाचालकाकडुन ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप पालकांकडुन करण्यात आला आहे.कवठेमहांकाळ मधील मोहन माळी इंटरनॅशनल सैनिकी स्कूल मध्ये हा प्रकार घडला आहे.घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेमध्ये मोठी गर्दी केली होती,
तसेच निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट पद्धतीचे जेवण व शिक्षण आणि चुकीचे औषध उपचार देण्यात येत असल्याचा आरोप देखील पालक आणि विद्यार्थ्यांना केली असून संतप्त झालेल्या पालकांकडून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
बाईट - अक्की तुषार आडे - पालक .
बाईट - शबाना इनामदार - पालक
बाईट -विद्यार्थी -
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 17, 2025 13:33:15Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - निवासी सैनिकी शाळेत विद्यार्थ्याला, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण,निकृष्ट जेवण आणि शिक्षण देत असल्याचाही पालकांचा आरोप..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये एका निवासी शाळेत विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून यामध्ये विद्यार्थ्याला नाकातून रक्त येऊ पर्यंत मारण्यात आले आहे,शाळेच्या संस्थाचालकाकडुन ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप पालकांकडुन करण्यात आला आहे.कवठेमहांकाळ मधील मोहन माळी इंटरनॅशनल सैनिकी स्कूल मध्ये हा प्रकार घडला आहे.घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेमध्ये मोठी गर्दी केली होती,
ए निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट पद्धतीचे जेवण देण्यात येत असल्याचा आरोप देखील पालक आणि विद्यार्थ्यांना केली असून शाळेच्या संस्था चालकांसह शाळेवर कारवाईची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
बाईट - अक्की तुषार आडे - पालक .
बाईट - शबाना इनामदार - पालक
बाईट -विद्यार्थी -
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 17, 2025 13:33:06Parbhani, Maharashtra:
अँकर - हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी युवक कल्याण संघ व आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. राज्य सरकारने अनुसूचित जमातींची जवळपास 85 हजार रिक्त पदे भरली नाहीत. ती रिक्त पदे भरण्यात यावीत त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची रखडलेली विशेष पदभरती घेण्यात यावी. यासह इतर मागण्यासाठी या विद्यार्थ्यांनी हे साखळी उपोषण सुरू केलं आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून शासनाने आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होत आहे.
बाईट - सतीश पाचपुते- आंदोलक
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 17, 2025 13:02:16Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेच्या वकिलांनी दिली अधिकच माहिती
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेच्या वकिलांनी दिली अधिकची माहिती
- दीपक काटेसह त्याच्या सहकाऱ्याला आज अक्कलकोट येथील दिवाण व फौजदारी न्यायालयात दाखल केल्यानंतर मिळाली होती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- मात्र आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर अखेर दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्याला जामीन मंजूर
बाईट-
हेमंतकुमार साका ( दीपक काटेचे वकील )
( ॲपवरून लाइव्ह सुद्धा दिलेले आहे )
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 17, 2025 13:02:00Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा
पानी के लीये हंडा मोर्चा
FTP slug - nm handa morcha
shots-
byet- women
reporter- swati naik
navi mumbai
anchor -खारघर मद्ये पावसाळ्यात देखील कमी पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्गात संतापाचे वातावरण असून सिडको निर्मित स्वप्नपूर्ती सोसयटी मद्ये पाणी येत नसल्याने येथील महिलांनी रायगड भवन वर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त केला झाले आहे, बुधवारी खारघर मधील माजी नगरसेवकांनी पाण्यासाठी सिडको कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते, आज महिलांनी मोर्चा काढल्याने खारघर मधील पाणी टंचाई भीषण असल्याचे स्पष्ट होत आहे ।
बाईट -महिला
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 17, 2025 12:36:13Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1707ZT_CHP_MEDIATION
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राबविण्यात येत आहे 90 दिवसांची विशेष 'राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम
अँकर:-- सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मुंबई उच्च न्यायालयाच्या निदेशनुसार, चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत 'राष्ट्रासाठी मध्यस्थी' ही ९० दिवसांची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश प्रलंबित न्यायप्रकरणे पक्षकारांच्या परस्पर सहमतीने जलद सोडवणे, वेळ, श्रम व खर्च वाचवणे आणि न्यायालयीन भार कमी करणे असा आहे. दिवाणी, फौजदारी (तडजोड योग्य), चेक बाउन्स, बँक कर्ज वसुली, अपघात भरपाई, जमीन अधिग्रहण, भाडेकरू-विवाद, कौटुंबिक प्रकरणे, घरगुती हिंसा आणि अन्य प्रकरणे सामंजस्याने सोडविली जाणार आहेत. नागरिकांनी आपल्या प्रकरणांसाठी चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाईट १) पी.पी कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 17, 2025 12:34:29Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1707ZT_BARAMATIHAKE
BYTE 3
बारामती_ ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट पॉइंटर
माहिती अधिकारी कार्यकर्ते पोपट धावडे यांच्या कार्यालयाला भेट दिली आहे.
माळेगांव नीरा वागज या आजुबाजूच्या गावात ही भेटी दिल्या.
आगामी काळात राज्यातील ओबीसी जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांचा खूप मोठा लढा उभा राहतोय.
अधिवेशन संपताच त्याच्या बैठका राज्यात आम्ही सुरू करीत आहोत.
त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आलो आहे.
*ऑन_प्रवीण गायकवाड*
झालेल्या हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध करतो
आम्ही लोकशाही मानणारी मानस आहोत.
*संभाजी ब्रिगेडने गेल्या 15 ते 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात हेच केलं आहे ना ? त्यांनी गिरीश कुबेर सारख्या पत्रकारांचं तोंड काळ करण्याचं काम केलं आहे.*
अनेक ग्रंथालय फोडली,पुतळे उकडून फेकले.
*बहुजन समाजातील काही नेत्यांना यांनी नेहमी टार्गेट केलं*
*आज गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर बहुजनवर हल्ला झाला,पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला अस पुढे येत पण विधानसभेच्या अगोदर लक्षण हाके यांच्यावर हल्ला का झाला होता ? कोणत्या ब्रिगेडर ने केला होता ? त्यावेळी प्रवीण गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत*
*प्रवीण गायकवाड हे बेगडी पुरोगामी आहेत नाव बहुजनांच घ्यायचं काम मात्र पवार कुटुंब, कोल्हापूर चे महाराज वतनदार झागीरदारंच करायचं संघर्ष करायची वेळ आली की घरात लपून बसायचं*
एका बाजूला म्हणायचं मी काशीरामांच्या विचारांचा पाईक आहे दुसऱ्या बाजूला ज्या काशीरामांनी पक्ष दिला,निवडणुका लढल्या त्याच्या एकाही मुद्द्याचा फॉलो नाही करायचा.
*कसले तुम्ही पुरोगामी ? काय आहे तुमचा बहुजनवाद*
बहुजनवादात मराठा सोडून इतर कुठल्या जातीला तुम्ही स्थान दिले आहे.
मी प्रवीण गायकवाड यांना साहित्यातला खूप मोठा पुरस्कार द्यावा म्हणून शिफारस करतो.
*चॅरिटेबल काम करून परिवर्तन होत नसत त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते*
वतनदारांचे जीवन जगून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत.
बदल घडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करावा लागतो.
*ऑन_लोकसभा उमेदवारी*
प्रवीण गायकवाड हे महादेव जानकर,आण्णासाहेब डांगे,शेंडगे कुटुंबाबद्दल बरंच बोलले आहेत.
रासपच्या पक्ष स्थापनेच्या पहिल्या स्टेजवर होतात तर मग नंतर कुठे गेलात ?
एका धनगराच पोरगं पक्ष चालवतेय म्हणून तुम्हाला तिथे जावं अस वाटल नाही
तिथे तुम्ही जात वर्चस्वाची भावना आड आली
*ज्या शरद पवारांची तळी उचलतात ना हे प्रवीण गायकवाड त्यांना सवाल आहे ज्यावेळी सोनिया गांधी बरोबर फारकत घेऊन पवार दिल्लीहून मुंबईत आले त्या विमानतळावर सर्वात पहिला har घालणारे आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते*
त्यावेळी शेंडगे बापूंच स्टेटमेंट होत की मी तमाम धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांना पाठिंबा देतोय.
शरद पवार यांनी शेंडगे यांना काय फळ दिलं तर पुढच्याच निवडणुकीत कवठे महांकाळ मतदार संघात शिवाजी शेंगडे यांचा प्रभाव केला
माढा लोकसभा मतदारसंघात 6 ते 7 लाख लोक होती तुम्ही माझ्या अडीचशे मतावर बोलताय
*मी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता*
महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात उभे होते त्यांची काय ग्रामपंचायत होती का इथे ? तरी त्यांनी तुम्हाला घाम फोडला होता.
*आम्ही वंचित घटकातील आहोत आमची तेवढी हैशियत असती तर आम्ही तुम्हाला कशाला तिकीट मागायला आलो असतो.*
*प्रवीण गायकवाड बात बहुजनांची करतात पण काम वतनदारांच करतात*
*ऑन_आर एस एस चा कट*
प्रवीण गायकवाड नेहमी मनुवादी भाजपावर टीका करतात
अजित पवार त्याच मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधील खीर वरपण्याचं काम करत आहेत ना?
*अजित पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर वरपत आहेत*
तुम्ही कधी बहुजनांची लढाई लढलात.
या पवारांनी,या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी एकूण बजेट मधील 1 टक्का तरतूद ओबीसी ला केली नाही.
प्रवीण गायकवाड यांनी नेहमी इतिहास उकरून काढला ब्राम्हणांवर टीका केली.कधी माळी तर कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं
महाराष्ट्रात दोन नंबर ला संख्या असणाऱ्या धनगर समाजाचं एकही कारखाना होऊ शकला नाही.
*प्रवीण गायकवाड अभी तो बात सुरू हुई है दूर तक जाएगी*
*ऑन _सामाजिक न्याय विभाग कामकाज नाराजी*
याला जबाबदार अजित पवार आहेत,जातीयवादी अजित पवार
आदिवासी विभागाचा शेकडो कोटींचा निधी, समाजकल्याण चा शेकडो कोटी निधी, ओबीसी च्या महाज्योतीची 150 कोटीचा बॅकलॉक सारथी च्या विद्यार्थ्यांना 8 लाख जमा करणारे हे अजित पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना एक रुपया द्यायला तयार नाहीत.
*सोशल जस्टिस म्हणजे काय? अजित पवारांना काय कळत*
*महाराष्ट्रातील लोकांनी कारखानदारांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत*
*अजित पवारांकडून आम्हाला न्यायची अपेक्षा नाही,फडणवीसांवर आच विश्वास,येऊ घातलेल्या काळात मुख्यमंत्री बोलले नाहीत तर संघर्ष पुढचा काळ ओबीसींचा असेल*
*प्रवीण गायकवाड आणि त्याची सर्व संघटना डुप्लिकेट आहे*
*ऑन_धनगर आरक्षण*
2014 ला बारामतीत सात दिवसाच उपोषण झालं त्यातला कार्यकर्ता आहे.
धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही हे सांगीतले कोणी ?
केंद्रामध्ये धनगर हा ओबीसी मध्येच आहे.
त्यामुळं आमच्या ताटातील आरक्षण वाचवणं आमची जबाबदारी आहे.
धनगर समाजाची एस टी ची लढाई चालू राहील पण अगोदर ताटातील वाचवलं पाहिजे.
*ऑन_अजित पवार*
आम्ही हक्क मागितला की जातीय व्देष का ?
अभिजित वंजारी यांनी काल विधानसभेत प्रश्न उभा केला तेव्हा उत्तर द्यायला काय मुख्यमंत्री आले होते का
अर्थमंत्री ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यानेच उत्तर दिल ना
उत्तरदायित्व अजित पवारांकडे आहेत तर आम्ही त्याच्यावरच बोलणार ना ?
नेहमी गुळाला मुंग्या चिकटतात तसं अर्थ खात कशासाठी हवं असतं.
*उत्पादन शुल्क खाते अजित पवारांना यासाठी हवा आहे की जय पवार यांचा जो दारूचा कारखाना आहे त्याचं डेली उत्पादन एक लाख हजार लिटरचा आहे तो कारखाना चालवायचा आहे*
*त्या कायद्यामध्ये खडाखोड करायचे आहे त्यासाठी त्यांना या गोष्टी लागतात*
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 17, 2025 11:36:50Hingoli, Maharashtra:
अँकर -हिंगोली जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाच्या वतीने भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी निविष्ठा विक्री केंद्रामध्ये तपासणी केली असता गोरेगाव येथील नऊ कृषी निविष्ठा विक्री केंद्रात अनियमितता आढळून आली होती. याचा अहवाल कृषी अधीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर हिंगोलीचे जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी याप्रकरणी सुनावणी घेऊन या नऊ दुकानांचे परवाने निलंबित केलेत. काही दुकानांचे परवाने हे पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत तर काही दुकानांचे परवाने सात दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 17, 2025 11:36:40Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक ........ पशुसंवर्धन आयुक्तांना घातला घेराव ......... खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी ....... खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद नाहीत. ....... शासनाने निर्णय घेवून देखील अंमलबजावणी नाही .........
अँकर - पोल्ट्री कंपन्या व खाद्य पुरवठादारांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देवून त्यांनी आयुक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. पक्षांना पुरवल्या जाणारया खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही. शासनाने याबाबतचा निर्णय घेवून देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारक संतापले आहेत. वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकरयांनी केलाय.
बाईट 1 – पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी
बाईट 2 – डॉ. सचिन देशपांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन ....
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 17, 2025 11:36:24Beed, Maharashtra:
बीड: कौटुंबिक कलहातून पतीकडून विष प्राशन करण्याचा प्रयत्न, बीड पोलिस अधीक्षक कार्यालयातील घटनेने खळबळ... पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले...!!
Anc- नवरा-बायकोतील भांडणे भरोसा सेलमध्ये आले. बायको नांदण्यास तयार होती, परंतू पतीने नकार दिला. त्यांच्यात मनजुळवणी सुरू होती, परंतू पती नकार देत होता. अशातच आपल्यावर गुन्हा दाखल केल्यास आपण आत्महत्या करू, असा ई-मेल सहा दिवसांपूर्वी पतीने पोलिसांना पाठविला. त्याप्रमाणे गुरूवारी दुपारच्या सुमारास या पतीने तळ मजल्यातील भरोसा सेलसमोरच विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी त्याला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला.
बबन श्रीराम पाखरे असे आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो शिरूर कासार तालुक्यातील पाडळी गावचा रहिवासी आहे. पती छळ करून मारहाण करत असल्याची तक्रार पत्नीने भरोसा सेलला केली होती. त्याप्रमाणे दोन तारखा झाल्या. या बबन यांच्याकडून समेट घडविण्यास पूर्ण नकार दिला होता. त्यामुळे त्याच्यावर छळाचा गुन्हा दाखल होणार होता. हे समजल्यानेच त्याने सहा दिवसांपूर्वी पोलिसांना ई-मेल करून माझ्यावर अन्याय झाल्यास मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली होती. त्यादृष्टीने पोलिस सतर्क होते. गुरूवारी दुपारी भरोसा सेलमध्ये बोलणे सुरू असतानाच बबन तेथून बाहेर पळाला आणि सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखत बाटली हिसकावली. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती.
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 17, 2025 11:36:09Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Police Chor Zatapat
File:02
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
Anc: पुण्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरी करुन गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी चोरी करण्यासाठी आलेल्या दोघा सराईत चोरट्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झालीय, पोलिस हवालदार विकास पाटील व राम जाधव यांनी रात्रीच्या सुमारास पाठलाग करत चोरट्यांशी झटापट करुन अखेर शिताफीने चोरट्यांना पकडले आहे.
रात्रगस्त घालत असताना पोलिसांना दोन संशयित युवक दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र दोघेजण दुचाकीहून पळून जात असताना चोरट्यांच्या गाडीची पोलिसांच्या गाडीला धडक बसली नंतर ते दुचाकी सोडून पळ काढत असताना पोलिसांची आणि चोरट्यांची यावेळी झटापट झाली आणि पोलिसांनी चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे...
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 17, 2025 11:33:44kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
----
नागपुरात पावसाच्या जोरदार सरी मुळे पावसामुळे सखल भागात खासकरून रेल्वे अंडरपास मध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.. उत्तर पूर्व नागपुरातील खैरिपुरा मेहदीबाग अंडरपास मध्ये गुडघाभर पाणी साचला आहे... त्यामुळे वाहतूक बंद झालीच आहे.. शिवाय परिसरातील मुलांनी साचलेल्या पाण्याचा वापर स्विमिंग पूल सारखा करत तिथे पोहणे सुरू केले आहे..
3
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 17, 2025 11:10:49Beed, Maharashtra:
बीड: साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण; आरोपी पोलिस शिपाई शीतल कदमची जामीन रद्द करा.. साक्षीच्या आईची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे आर्त हाक..!!
Anc- बीडच्या केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळे या तरुणीने छेडखानी आणि लैंगिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपी अभिषेक एकनाथ कदम आणि रेल्वे पोलिस कर्मचारी असलेली त्याची बहीण शीतल कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी अभिषेक कदम याची जामीन रद्द करण्यात आली आहे. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी अनुसूचित जाती जमातीचे आयोग आज बीडमध्ये आले होते. यावेळी साक्षीची आई कोयना यांची आयोगाने भेट घेत विचारपूस केली. या प्रकरणातील जामीन रद्द झालेला आरोपी अद्याप अटकेत नाही. शिवाय त्याची बहिण आरोपी शीतल कदम हिचेही जामीन रद्द करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.
बाईट: कोयना, मयत साक्षीची आई...
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 17, 2025 11:05:46Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Dowry
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारल्या प्रकरणी नांदेड मध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथिल ताऊबाई चव्हाण हिचा विवाह 2 जुलै रोजी राठोडवाडी येथिल सुधाकर राठोड याच्याशी झाला होता. 7 तारखेला परतनीला माहेरी येऊन नवविवाहिता 8 तारखेला सासरी गेली. 9 तारखेला मुलीला उलट्या होत असल्याचा फोन माहेरी आला. सुरुवातीला ताऊबाईवर मुखेड येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपाचारासाठी हैद्राबादला हलवण्यात आले. उपाचारा दरम्यान 13 जुलै रोजी नवविवाहितेचा मृत्यू झाला. हुंद्यासाठीच मुलीला विष पाजवून मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. एकूण 6 लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. 5 लाख रुपये हुंडा लग्नात देण्यात आला होता. पण एक लाख रुपयासाठी विष पाजवून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खूण आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपी पतिसह सासू, सासरे अश्या चौघाना अटक करण्यात आली असून विवाहितेला विष पाजन्यात आले का तिने स्वतः विष प्राशन केले याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
Byte - वामन चव्हाण - मुलीचे वडील
Byte - अशोक राठोड - मुलीचा मामा
Byte - शांताबाई - नातेवाईक
Byte - अबिनाशकुमार
----------------------------------
1
Share
Report