Back
पैनगंगा आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा, उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा!
MNMAYUR NIKAM
Jul 12, 2025 11:06:59
Buldhana, Maharashtra
पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा...
उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा
Anchor - बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना काल रात्री कडी आणि भात खाल्ल्याने विषबाधा झाली, अचानक मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे....आणि सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे..
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowAug 31, 2025 16:30:13kolhapur, Maharashtra:
Ngp Londhe mahalkshmi
फिड live u ने पाठवले आहे
------------------
सर्वत्र गणेशोत्सव आनंदाने साजरा होत आहे आणि आज घरोघरी गौरींचे आगमन ही थाटात झाले आहे.. विदर्भात हा महालक्ष्मीचा उत्सव म्हणून ओळखला जातो... विदर्भात अनेक घरांमध्ये आज गौरी म्हणजेच महालक्ष्मी चे आगमन झाले असून विधीवत पूजन करून प्रत्येक कुटुंब आपला परंपरेने चालत आलेला कुळाचार पूर्ण करतोय...
*काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या कुटुंबियांकडे महालक्ष्मीची 250 वर्षांपेक्षा जास्त काळापासून परंपरा आहे..दरवर्षी मोठ्या भक्ती भावाने लोंढे कुटुंब महालक्ष्मीची स्थापना आणि पूजा करतात*...
पहिल्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना केल्यानंतर *खास काकडीचे थालीपीठाचे नैवेद्य अर्पण* केले जाते तर दुसऱ्या दिवशी *सोळा भाज्यांचा आणि पंच पक्वनांचा खास नैवैद्य* महालक्ष्मीला अर्पण केला जातो...लोंढे कुटुंबाशी सवांद साधला आमचे प्रतिनिधी आमचे अमर काणे यांनी
-------------------
बाईट --अतुल लोंढे, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते
--प्राची लोंढे
2
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 31, 2025 15:19:51Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Maratha
Feed on - 2C
----------------------------
Anchor - मराठा आरक्षण देण्यात कायदेशीर अडचणी आहेत, त्या दूर करून टिकणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. हा विषय लवकर संपला पाहिजे, त्यात तोडगा निघाला पाहिजे. हीच भूमिका मी समितीचा अध्यक्ष असताना माझी होती आजही तीच भूमिका आहे. मुख्यमंत्री आणि सरकार या बाबतीत सकारात्मक आहेत असेही चव्हाण म्हणाले. हा कायदेशीर विषय आहे. सरकारला करायच आहे पण काही बाबतीत कायदेशीर अडचणी आहेत. त्या दूर केल्या पाहिजे. मला खात्री आहे विखे पाटील लक्ष घाततील आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण राहील पाहीजे, इतरांचा आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण कसं देता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे असे चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षण मिळण्याकरिता जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून आरक्षण देता आल तर चांगल आहे. पुढे सामाजिक संघर्ष होऊ नये हा महत्त्वाचा भाग असल्याचे चव्हाण म्हणाले.
Byte - खा. अशोक चव्हाण
----------------------------------------
सुप्रिया सुळे यांना घेराव, गाडीवर बॉटल फेकने चुकीचे
Anchor - एखादा लोकप्रतिनिधी चर्चेसाठी आला असेल तर त्याला बोलू न देणे चुकीचे आहे. आरक्षण मिळावे हीच सर्वांची भूमिका. घेराव घालणे, गाडीवर बॉटल फेकने असे घडले असेल तर ते चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
Byte - खा. अशोक चव्हाण
----------
8
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 31, 2025 15:16:05Ratnagiri, Maharashtra:
मुंबई गोवा महामार्गाचा खडतर प्रवास प्रभाकर मोरे यांचा बाप्पाला गाऱ्हाण
चिपळूण
मराठी अभिनेते विनोदी कलाकार प्रभाकर मोरे
गणपतीला गावी आले आहेत
चिपळूण तालुक्यातील 'वहाळ' त्यांचे गाव आहे
गावच्या मोरेवाडीत
प्रभाकर मोरे यांचे घर आहे. मुंबईपासून येताना असणारा खडतर प्रवास आणि विविध ठिकाणी पडलेले खड्डे यासंदर्भात त्यांनी गणपतीला गाऱ्हाणं घातले. राजकीय लोकांना सद्बुद्धी दे असं ते म्हणत आहेत पाहूया प्रभाकर मोरे यांनी आपल्या गणपतीला घातलेलं गाऱ्हाणं
14 15 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग संदर्भात गणपतीला साकडं घातलं
5
Report
ABATISH BHOIR
FollowAug 31, 2025 15:02:46Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या गणेशघाटवर पाच दिवसांचे गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन..
Anc..कल्याणच्या गणेशघाटावर आणि कृत्रिम तलावात भक्ती भावाने पूजा,अर्चा करत आज कल्याण आणि डोंबिवलीतील पाच दिवसाच्या गणरायाचा विसर्जन
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणेश घाट, तसेच अनेक ठीक ठिकाणी कृत्रिम तलावात गणपती बाप्पा चे विसर्जनाची तयारी करण्यात आले आहे आज संध्याकाळपासून पाच दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्ती भावाने पूजा चर्चा करत निरोप दिला.
2
Report
AKAMAR KANE
FollowAug 31, 2025 15:01:03kolhapur, Maharashtra:
Ngp BJp MLa
live u ने फीड
--------
नागपूर
विदर्भातील OBC आमदारांची महत्वपूर्ण पत्रपरिषद
राज्यमंत्री पंकज भोयर घेणार प्रेस कॉन्फरन्स
आमदार प्रवीण दटके, आमदार समीर मेघे, आमदार कृष्णा खोपडे, माजी खासदार रामदास तडस, सुनील मेंढे, माजी आमदार सुधाकर कोहळे उपस्थित,
-====---------
[31/08, 18:18] Z Amar Kane: पंकज भोयर, राज्यमंत्री
--- मी सरकारची भूमिका मांडण्यासाठी आलॊय
--मी मुंबईत होतो... जरांगे यांच्या आंदोलमुळे मुंबईत जीवनमान परिणाम होतोय
*OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही*
-- त्यांची आडमुठी भूमिका आहे.. चर्चेतून मार्ग निघेल
--न्यायालयात टिकले पाहिजे
-- आंदोलनाला अजून मुदतवाढं दिली नाही.. मात्र गैरसोय नको
-- कायदेशीर कारवाई होइल.. पण लोकांची गैरसोय नको
--सरसकट दाखले देता येत नाही
====जरागेला रसद कोण देत आहे हे नेतृत्वला माहित आहे
--- मराठाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न...
-----(on छगन भुजबळ )
-- OBC करता आम्ही त्याकरता इथे बसलो... भुजबळ तिथे बैठक घेताय
on सुप्रिया सुळे
ते स्वतः इतके वर्ष सत्तेत होते.. इतके वर्ष भुलथापा मारत होते.. त्यामुळे लोकांनी असे केले
निवडणुका पुढे असताना पॉलिटिकल एजेंडा लक्षात घेऊन कदाचित आंदोलन होतेय याला दुजोरा आहे
on मुंबई व्यवस्था
सरकारने पूर्ण नियोजन केलेय..... सर्वसामान्य लोकांची तिथे त्रास करू नये
---सरकारची विनंती आहे आंदोलन लोकशाही पद्धतीने करावे.... पाच हजारपेक्षा जास्त लोक आले
2
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 31, 2025 15:00:58Akola, Maharashtra:
Anchor : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या भावना तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंतचे सर्व आंदोलन शांततेत पार पडले असून सध्या सुरू असलेले आंदोलन देखील शांततेतच सुरू आहे. मात्र, अलीकडेच घडलेल्या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( श.प ) नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर काही आंदोलकांनी रोष व्यक्त केला. या प्रकाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प ) आमदार अमोल मिटकरी यांनी आंदोलन शांततेत पार पाडावा असे आवाहन केले आहे. आंदोलकांनी अशा प्रकारे वागू नये, असे आवाहन करत त्यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. कालच अमोल मिटकरी यांनी मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता.तर लढाई ही शांततेच्या मार्गानेच जिंकायची आहे त्यामुळे आंदोलन शांततेत आणि संयमानं सुरू राहिलं पाहिजे,असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले.
Byte : अमोल मिटकरी, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प )
1
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 31, 2025 15:00:48Pandharpur, Maharashtra:
31082025
Slug - PPR_GAURI_ALANKAR
file.01
----
Anchor - ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस अलंकार परिधान केले आहेत.
ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हि-याचा कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे जोड, मोहनमाळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ, नाम निळाचा तसेच श्री रूक्मिणीमातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.
याशिवाय, आज राधाष्टमी (श्री राधिक मातेचा जन्म दिवस) असल्याने मंदिरातील श्री राधिकामातेस पांढरा पोशाख व सोन्या मोत्याचे अलंकार परिधान करण्यात आले व गुलाल टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये सोन्याचा नक्षी टोप, मोत्याचा कंठा, खड्याचा पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसुत्र, बाजीराव गरसोळी इत्यादी अलंकाराचा समावेश आहे.
2
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 31, 2025 14:31:14Nala Sopara, Maharashtra:
Date-31aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NSP DRUNK
Feed send by 2c
Type-Av
Slug- नालासोपारा रेल्वे स्थानकात दोन तरुणांचा गोंधळ
दारूच्या नशेत रेल्वे पोलिसांना शिवीगाळ, हुज्जत
पोलिसांकडून तरुण कारवाईसाठी ताब्यात
अँकर - नालासोपारा रेल्वे स्थानकावर दोन तरुणांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे... मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते...
चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या शेवटच्या लोकलमधून हे दोघे नालासोपारा स्थानकात उतरले... त्यानंतर स्थानक परिसरातच हे दोघे दारू पित असल्याचे आरपीएफ आणि होमगार्ड पोलिसांच्या निदर्शनास आले... पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी शिवीगाळ करत धिंगाणा घातला...
या दोन तरुणांची नावे पीटर डिसोजा आणि अय्यर अशी असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील कारवाई केली आहे...
6
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 31, 2025 14:31:04Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला
LIVE LINK (((( https://www.facebook.com/share/v/18wWXmpfMW/ ))))
*मंत्री चंद्रकांत पाटील ऑन गणपती*
मी गणपतीला प्रार्थना करतो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा भयानक झाला आहे
सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट असताना शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही
गणपतीला आम्ही अशी प्रार्थना करतो, आम्ही माणूस म्हणून प्रयत्न करतो, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गणपती राया आम्हाला ताकद दे
आणि दुसरी प्रार्थना आम्ही करतो मराठा समाजाला एकता सुबकता असूनही तुकडे पडतात तो एक किंवा दोन गुंठ्यांचा मालक झाला आहे
त्या मराठा समाजाची आर्थिक सुबकता होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे
2017 सण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं आणि ते न्यायालयात टिकलं
*टिकणार आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकलं, 50 टक्के च्या वरती दिलं तरी ते टिकला, पण ते महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही.*
त्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के आरक्षण दिलं, ते न्यायालय टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
जरांगे पाटील यांचं आजही म्हणणं आहे. 50 टक्के आतील आरक्षण द्या, ओबीसी मधलं द्या म्हणजे ते टिकेल असं जरांगे पाटील म्हणतात, पण मी बाप्पाकडे प्रार्थना करतो, यातून काहीतरी मार्ग निघावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं.
गणरायाकडे प्रार्थना करून न थांबता आम्हीही प्रयत्न करतो, मी गणपतीची आरती करण्यापूर्वी एका कायदे तज्ञांची मोठी बैठक झाली.
आम्ही सांगितलं आहे काहीतरी मार्ग काढा मराठा समाजाला जे आरक्षण देत आहोत ते कायद्यात टिकलं पाहिजे
*ऑन जरंगे पाटील विधान*
*मनोज जारंगे पाटील आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात अनेक बैठकांना जरांगे पाटील यायचे, त्यामुळे माझ्या आणि जरांगे पाटील यांच्यात भांडण लावू नका*
मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणं आहे की, कुणबी आणि ओबीसी मधून आरक्षण मिळेल, मी चार वेळा ते म्हणतो पण ते म्हणण्याने मिळणार आहे का!
त्यासाठी राज्य सरकारकडून कायदेशीर सर्व प्रयत्न सुरू आहेत, ओबीसीतून मिळेल किंवा कुणबीतून मिळेल यासंदर्भातले जर तरचे प्रयत्न सुरू आहेत.
आम्ही तज्ञांसोबत घेतलेल्या बैठकीत तज्ञ मंडळी सकारात्मक आहे. पहिलं तीन ते चार दाखले दिले की कुणबी दाखला मिळायचा.
*मात्र 23 कागदपत्रे समितीने सांगितले आहेत, आतापर्यंत नोंदी 58 लाखापर्यंत गेले आहेत. दाखले दहा लाखापर्यंत मिळाले आहेत.*
मुख्यमंत्री आत्ताचे पण आधीचे पण यांना खोटं बोलणं अजिबात जमत नाही, राजकीय परिणीमाची ते चिंता करत नाहीत, जे खरं आहे तेच खरं म्हणतात,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यातून काय मार्ग काढता येईल ते पाहत आहे.
*मराठा समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे भांडण लावून काही होणार नाही*
मुख्यमंत्री यांनी आझाद मैदानावरती पाच हजार लोकांची परवानगी दिली होती, आझाद मैदानावर पेक्षा बाहेर लोकांची जास्त गर्दी दिसत आहे.
पहिल्या दिवशी नियोजनाचा गोंधळ झाला..आता महापालिकेने उत्तम व्यवस्था केली आहे.
*ऑन उपसमिती बैठक*
राज्याचे जनरल एडवोकेट यांच्यासोबत बैठक आहे. ते मुख्यमंत्री यांच्यासह विविध जणांसोबत बोलत आहेत.
आज दिवसभर प्रस्ताव काढले असून त्याच्यावरती विचारविनिमय झाला आहे. त्यातून आम्ही मुद्दे मांडल्या आहेत हे हे पर्याय असू शकतात. यामध्ये भावना आणि कायदा हा वेगळा विषय आहे.
*ऑन जरागे पाटील टीका*
जरांगे पाटील अनेक वर्षापासून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी काम करत आहेत,त्यातून त्यांच्या तब्येतीकडे त्यांचं लक्ष नाही त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे
*जरांगे पाटील यांची एक भाषा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर रागवत नाही*
जरांगे पाटलांना एक विनंती आहे त्यांना जे बोलायचं आहे त्यांनी तेच बोलावं..
जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस वर बोलला बोलतात..
फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी काय खस्ता खाल्ल्या आहेत..
*फडणवीस यांच्या पारदर्शकतेवर आणि हेतूवर चॅलेंज करणे हा त्यांच्यावरचा अन्याय आहे*
तरी ते मुख्यमंत्री झाले आहे त्यामुळे त्यांनी सहन केलं पाहिजे..
*तरी त्यांच्या आई आणि बायकोवर बोलतात*
जरांगे पाटील यांची ग्रामीण भाषा आहे आणि त्याच्यावर अतिक्रमण करण्यात आमचा हेतू नाही..
*यावरही जरांगे पाटील काही बोलू नये, त्यांना मैत्रीच्या नाते विनंती आहे*
*ऑन सुप्रिया सुळे प्रकरण*
मी याच्यावर काही टिपणी करणार नाही..
याचं कारण आंदोलनाच्या मनातल्या भावना तीव्र आहेत..
त्यामुळे त्यांनी काय करावे हे मी कसं सांगणार..
*ऑन ओबीसी आरक्षण*
मुख्यमंत्र्यांचा हा आदेश आहे की जाती-जातीत भांडण नको..
जे कायद्याच्या चौकटीत बसत आहे ते करूया..
लोकशाहीतच्या चौकटी सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे..
आम्ही फक्त असं सांगतो की एकमेकांच्या मनात कायमची कडूता निर्माण होईल असं काही करू नका..
*Byte : चंद्रकांत पाटील, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री*
5
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 31, 2025 14:01:59Raigad, Maharashtra:
स्लग - सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन
...... महिला वर्गात उत्साहाचे वातावरण ..... रायगड जिह्यात 15 हजार 832 गौरींचे आगमन ....... कोकणात गौरीगणपती सणाची धूम ........
अँकर - रायगडमध्ये आज मोठ्या उत्साहात गौराईचे आगमन झाले. रायगडमध्ये पाणवठ्यावरून खड्यांच्या तसेच माळरानावरून तेरड्याच्या गौराई आणण्याची परंपरा आहे त्यानुसार आज शुभ मुहूर्तावर घरोघरी गौराई आणण्यात आल्या. जिह्यात 15 हजार 832 गौरींचे आज आगमन झाले. पाणवठ्यावर सुपामध्ये तेरड्याची रोपे, वेगवेगळी फुलं पानांनी गौराई सजवण्यात आली. पाणवठ्यावर विधीवत पुजा करीत पारंपारिक खालूबाजाच्या गजरात मिरवणुकीने गौराई घरी आणण्यात आली . पुढील दोन दिवस एका माहेरवाशीणी प्रमाणे या गोराईचे कोडकौतुक केले जाईल. गौरीच्या आगमनाने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. गौरी आगमनाच्या वेळी अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या.
बाईट - महिला
7
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 31, 2025 13:33:08Pandharpur, Maharashtra:
31082025
Slug - PPR_PRASAD_WORM_
file 03
----
Anchor - पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची ढीसाळ कार्यपद्धती, विठ्ठलाच्या लाडू प्रसादामध्ये बंद पाकीटात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कडून पंढरपुरात आलेल्या भाविकांना घरी नेण्यासाठी लाडू प्रसाद अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिला जातो. बुंदीचे लाडू भावीक आवर्जून प्रसाद म्हणून घरी नेत असतात. मात्र याच प्रसादाच्या लाडवाच्या बंद पाकीटात चक्क मृत अळी आढळली आहे.
समितीचा प्रसाद करताना स्वच्छतेचे निकष न पाळल्याने तसेच योग्य काळजी न घेतल्याने यात लाडू भरण्याच्या पाकीटात अळी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर आणि अध्यक्षांवर सुरू आहे. त्यामुळे भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. यापूर्वीही अनेक विविध घटना मुळे समिती आणि प्रशासना वादाच्या भोवऱ्यात आले आहे. मात्र यात सुधारणा होण्या ऐवजी रोज नवे प्रकार समोर येत आहेत
9
Report
AKAMAR KANE
FollowAug 31, 2025 13:33:00kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे
-------
नागपूर
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा आमदार प्रवीण द lटके यांनी उपस्थिती लावली.... या साखळी उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला. यापूर्वी भाजपा आमदार आशिष देशमुख आणि आमदार परीने फुके यांनीही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात समर्थन करत आणि उपस्थिती लावली आहे
------
*साउंड बाइट - प्रवीण दटके (भाजप आमदार)*
(भाजप आमदार प्रवीण दटके यांनी ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणास भेट देत आपला पाठिंबा दर्शविला..)
मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाला न्याय देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न राहिला आहे.
2014 ते 2019 दरम्यान देखील मोठ मोठे मोर्चे निघाले.. त्यानंतर मराठा समाजाला दिल्या गेलेल आरक्षण टिकवण्याची जबाबदारी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती.. आणि त्यांनी टिकवून दाखवली..
दुर्दैवानी त्यानंतर अडीच वर्षात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात ते टिकवून ठेवू शकले नाही...
नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता दिलं.. तेही टिकवण्याची जबाबदारी सरकारने घेतली..
त्यामुळे मागणी करताना ती सवैधानिक आहे का..?त्याचे अधिकार केंद्राला आहे की राज्याला आहे याची जाणीव ठेवली पाहिजे..
ओबीसी महासंघाने चर्चेतून समाजाच्या अनेक मागण्या मान्य करून घेतल्या.. *त्यामुळे चर्चा केली तर निश्चित मार्ग निघेल असे मला विश्वास त्यामुळे चर्चेशिवाय मार्ग नाही...*
मराठा समाजाचा आरक्षण मराठा बांधवासाठी आणि ओबीसी आरक्षण ओबीसी बांधवांसाठी यामध्ये कुठेही चलबिचल होणार नाही.. असा निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार घेतील असा विश्वास
11
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 31, 2025 13:32:48Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_ganesh_visrjan
पाचव्या दिवशी गणरायाचं विसर्जन
अँकर
नाशिक मध्ये मोठ्या उत्साहात पाचव्या दिवशी गणरायाचं विसर्जन करण्यात आलं... शहरातील चोपडा लॉन्स परिसरात असलेल्या कृत्रिम तलावात अनेक भाविकांनी विधिवत पूजा आणि आरती करत मूर्ती दान केल्या... गणरायाला निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यात पाणी देखील आले तर लहानग्यांनी देखील गणरायाला निरोप देताना वाईट वाटत असेल अशी भावना देखील व्यक्त केली.. शहरात 49 पेक्षा जास्त नैसर्गिक कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे... आणि याच ठिकाणी अनेक भाविकांनी गणरायाच्या पाचव्या दिवशी मूर्ती दान करून गणरायाला निरोप दिलाय.... यासंदर्भात नाशिक मधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
11
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 31, 2025 13:32:44Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3108ZT_CHP_REVIEW
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनपाच्या उच्च अधिकार्यांसह केली विसर्जन स्थळाची पाहणी, चंद्रपूरात 6 सप्टेंबर रोजी आहे सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक, चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरच्या इरई नदी किनाऱ्यावर यासाठी करण्यात आलीये विशेष व्यवस्था
अँकर:-- चंद्रपूर शहरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचे मिरवणुकीसह विसर्जन 6 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी चंद्रपूर शहरातील सुमारे 300 सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुर्त्या मिरवणुकीसह विसर्जित केल्या जातील. शहरातील प्रमुख मार्गांवर फिरून ही मिरवणूक दाताळा मार्गावरील नदीकाठवर पोचणार आहे. गेल्या वर्षी चंद्रपूर मनपाच्या वतीने इरई नदीच्या रामसेतू पुलाखाली यासाठी स्थायी काँक्रीट विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. यंदा या विसर्जन स्थळाचा आढावा घेण्यासाठी पोलीस, प्रशासकीय यंत्रणा आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी होणारी गर्दी, गर्दीचे नियंत्रण यासह विसर्जन स्थळी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी घेतली. त्यांनी उपस्थितांना योग्य त्या सूचनाही दिल्या.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Report
Waghapur, Maharashtra:
दारव्हा (प्रतिनिधी) – दारव्हा–तळेगाव या आठ किमी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने ऑटोचालक-मालक आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे बुजवून त्यात बेशरमाचे झाडे लावून प्रशासनाचा निषेध केला. अनेक तक्रारी व निवेदने देऊनही उपाययोजना न झाल्याने हा प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आला. या वेळी बिमोद मुधाने, काशीराम जाधव, प्रशांत रामटेके यांच्यासह तळेगाव, घाटकिन्ही, फुबगांव येथील नागरिक व ऑटोचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
6
Report