Back
कोल्हापुरी चपलीचा प्रसाद द्या, मिळवा 1 लाख 11 हजारांचे बक्षीस!
AAABHISHEK ADEPPA
Aug 22, 2025 09:46:37
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाकेंना कोल्हापुरी चपलीचा प्रसाद द्या आणि मिळवा 1 लाख 11 हजारांचे बक्षीस ( 1 to 1 )
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात सोलापुरात मराठा समाज आक्रमक
- लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबाबत केलेल्या विधानाचा करण्यात आला जाहीर निषेध
- लक्ष्मण हाकेंना कोल्हापूरी चपलीचा प्रसाद देणाऱ्याला 1 लाख 11 हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा
- सुपारी बहाद्दर लक्ष्मण हाकेला मराठा समाज कधीही सोडणार नाही
- लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचे स्वयंघोषित नेते असल्याचा केला आरोप
- मराठा समाज हा माळी समाजाच्या पाठीमागे मोठ्या भावाच्या भूमिकेत उभा असल्याची दिली माहिती
याविषयी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 11:33:14Beed, Maharashtra:
बीड: वडवणीतील सरकारी वकील आत्महत्या प्रकरण, न्यायाधीशावर गुन्हा दाखल करण्यासाठी वकील संघ आक्रमक, पोलिस अधीक्षकांची घेतली भेट
Anc: बीडच्या वडवणी येथील न्यायालयात एका सरकारी वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी मयत वकिलाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये न्यायाधीश आणि कारकून यांचे नाव असल्याचे समजते. मात्र चिठ्ठी अद्याप समोर आलेली नाही. याच अनुषंगाने बीड जिल्हा वकील संघ कारवाईसाठी आक्रमक झाले आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे जो कोणी आरोपी असेल त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र घटना घडवून तीन दिवस उरले असले तरी अद्याप याप्रकरणी कसलाही गुन्हा दाखल झाला नाही. संबंधित आरोपींवर चौकशी करून गुन्हा दाखल करावी या मागणीसाठी बीडच्या वकील संघाने आज पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. कारवाई तात्काळ करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा वकील संघाने दिला आहे.
बाईट: भीमराव चव्हाण - वरिष्ठ ॲड
0
Report
KPKAILAS PURI
FollowAug 22, 2025 11:33:05Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri mask man
kailas puri Pune 22-8-25
feed by 2c
Anchor : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी मध्ये हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या मास्क मॅन चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.... त्याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हातात धारदार चाकू घेऊन फिरणारा मास्क मॅन हा मनोरुग्ण भंगार वेचक असल्याच पुढ आलंय...! मच्छिंद्र नारायण नवघिरे वय 68 वर्ष अस मास्क मॅन व्यक्तीच नाव आहे. मच्छिंद्र नारायण नवघिरे हा कचरा आणि भांगर वेचक असून तो निगडी मध्ये कचरा आणि भांगर वेचकाच काम करून उदरनिर्वाह करतो...! मच्छिंद्र नारायण नवघिरे याच वागणं हे दहशत निर्माण करणार असल्याने निगडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला समज पत्र दिल आहे.
byte - भोजराज मिसाळ , पोलीस निरीक्षक निगडी पोलीस स्टेशन
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 22, 2025 11:23:33Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2208ZT_WSM_MAHILA_POLA
रिपोर्टर : गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा गावात मागील ८ वर्षांपासून महिलांना बैलपोळा साजरा करण्याचा मान दिला जात आहे.पारंपरिकरीत्या शेतकरी पुरुषांचा सण मानला जाणारा पोळा येथे महिलांनी उत्साहात साजरा केला. सकाळपासूनच महिलांनी बैल सजवून, पूजा करून व कासरे हाती घेऊन मोठ्या थाटामाटात सण साजरा केला.पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना स्थान मिळावे यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 11:20:48Beed, Maharashtra:
बीड:जिवलग मैत्रिणीच्या प्रियकरावर जडलं प्रेम; सख्या मैत्रिणीनेच मैत्रिणीला संपवले.. बीड मधल्या त्रिकोणी प्रेमाचा करून अंत..!!
Anc:रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नातं सर्वश्रेष्ठ असते.. हे अनेक काव्यपंक्तीतून समोर आले. मात्र मैत्रीचं नातं बीडमध्ये कलंकित झाले आहे. प्रियकरावर डोळा ठेवल्याने मैत्रिणीने मैत्रीणचा गळा दाबून खून केलाय. एखाद्या चित्रपटातील कथानकालाही मागे टाकेल अशा क्रूर घटनेने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. पाहूयात बीड मधील त्रिकोणी प्रेमाची क्रूर कहानी...
बीड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपी महिलेकडे जरा नीट पहा... तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिने केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप दिसून येणार नाही... माझ्या प्रियकरावर का प्रेम केलंस? म्हणून सख्ख्या मैत्रिणीचा तिने गळा दाबून खून केलाय.. सिनेमातल्या कथानकाला देखील मागे पाडेल अशी क्रूर घटना या आरोपी महिलेने केलीय.. बीडच्या अंबिका चौक परिसरात वृंदावनी फरताळे या आरोपी महिलेचे घर आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात होमगार्ड पदावर असलेल्या आयोध्या व्हरकडे आणि वृंदावनी फरताळे या दोघींची मैत्री जमली. दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले.... मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती... आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची केली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला.. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घुण हत्या केली.
बाईट:गजानन क्षीरसागर - सहाय्यक पोलीस निरीक्षक
आयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आयोध्या पोलीस दलातील होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. त्यांना पोलीस दलात जायचं होते. त्यासाठी बीडमध्ये त्या सराव करत होत्या. मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला. आणि नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली. कुठेही आयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. काल सायंकाळी आयोध्या यांच्या मृतदेचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र अद्याप त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ अहवाल मिळवून घटनेची शहानिशा करून यात किती आरोपी आहेत? याचा उलघडा करावा अशी मागणी मयत होमगार्ड महिलेच्या नातेवाईकांनी केलीय.
बाईट: आयोध्या यांचे नातेवाईक
मैत्रीचं गाणं गाताना,
शब्द माझे अडखळले.
तुझ्यासोबत असताना,
मन माझं मोहरले.
तुझा हात हातात होता,
अन् विश्वास डोळ्यांत.
कधीच वाटलं नव्हतं,
फसवशील एका क्षणात.
आज ती गाथा विसरली,
ज्याला 'मैत्री' म्हटलं.
अश्रूंनी डोळे भरले,
जेव्हा तुझं रूप कळलं.
या काव्यपंक्तीतले हे शब्द ऐकून तुमच्या अंगावर शहारा आला असेल.. मृत्यूनंतर मात्र आयोध्या यांच्या आत्म्याने कदाचित हेच बोल पुटपुटले असतील... त्यामुळे मित्रत्व करत असताना चाहू बाजूने विचार केला पाहिजे... मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करणं एवढं महागात पडेल अस आयोध्याला कधीच वाटलं नव्हतं. प्रेमाच्या या गणिती काटकोन त्रिकोणातील प्रेमाचा अंत एवढा भयान आणि भीषण होईल.. याचा स्वप्नात विचार देखील केला नाही. आणि याच घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे...
MY END PTC
MAHENDRAKUMAR MUDHOLKAR BEED
0
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 22, 2025 11:19:53Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_DanveByte
Feed on - 2C
-------------------------
Anchor - ढगफुटी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. कोल्हापुरमध्ये सरकारने पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी ज्या प्रमाणे विशेष पॅकेज दिले होते त्याप्रमाणे सरकारणे नांदेडसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. दानवे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ढगफुटी आणि पुरामुळे मुखेड तालुक्यात 9 जणांचा मृत्यू झालाय. तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो जाणवरांचाही मृत्यू झालाय. त्यामुळे सरकारने विशेष पॅकेज देऊन मदत करावी अशी मागणी दानवे यांनी केली.
Byte - अंबादास दानवे - विरोधी पक्षनेता
------------------------------------
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 22, 2025 11:01:19Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ च्या पोस्टल ग्राउंड वर नगर परिषदेने भरविलेल्या बैल पोळ्यात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी बैलांची पूजा करून पोळा फोडला. शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाचा सण असलेल्या 'पोळा' निमित्त यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. पोळ्याला बैलांचा थाट असतो. त्यांचाकडून कोणत्याच प्रकारची कामं करून घेतली जात नाहीत. त्यानुसार गावागावात पारंपारिक पद्धतीने पोळा भरला. यवतमाळ मध्ये 'एक नमन गौरा पार्वती, हर बोला, हर हर महादेव' चा गजर करीत शेतकऱ्यांनी झडत्या म्हटल्या, शेतकऱ्यांनी रमी खेळणारे मंत्री व लाडकी बहीण अशा मुद्द्यांवर झडत्या म्हणून सरकारवर ताशेरे ओढले, त्यानंतर उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिस वितरित करण्यात आले.
झडत्या : नितीन कोल्हे : शेतकरी
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 22, 2025 10:47:40Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2208ZT_JALNA_FARMER_DMND(10 FILES)
जालना | बैलांच्या पाठीवर कर्जमाफीची घोषवाक्ये
बैलपोळ्यानिमित्त सरकारला दिली कर्जमाफीची आठवण
सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्याची अनोख्या पद्धतीने मागणी
अँकर| जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील सोयंजना गावात एका शेतकऱ्याने बैलांच्या पाठीवर कर्जमाफीचे घोषवाक्ये लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून दिलीये.. सोयंजना गावातील वैजनाथ ढवळे यांची ही बैलजोड असून ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत.. सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतही सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्ये बैलांच्या पाठीवर लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून देत अनोख्या पद्धतीने कर्जमाफीची मागणी केली आहे.
बाईट- श्रावणी वैजनाथ ढवळे, शेतकरी कन्या
5
Report
JMJAVED MULANI
FollowAug 22, 2025 10:36:34Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2208ZT_DAUNDUPRASHTPTI
BYTE 1
दौंड तालुक्यातील तरुणाने भरला थेट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज
अँकर:- भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील सहजपुर गावच्या उमेश म्हेत्रे या तरुणाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नवी दिल्ली मधील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी.मोदी व गिरीमा जैन याच्याकडे उमेदवारी अर्ज आणि 15000 रुपयांचे डिपॉझिट जमा करून अर्ज दाखल केला. त्यांच्या या कृतीने सर्वजण आश्चर्यचकित झाले असून थेट भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये मी अनेकांचे सेवा करीत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बाईट : उमेश म्हेत्रे,
उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला तरुण...
1
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 22, 2025 10:03:27Pune, Maharashtra:
रिपोर्टर लैलेश बारगजे
स्लग:- बैलपोळा
फीड 2C
Anc:-
राज्यात सर्वत्र बैलपोळा मोठ्या उत्साह साजरा केला जातो या बैलपोळ्याच्या सणासाठी अहिल्यानगरच्या सातपुते कुटुंबाने खास बैल जोडी विकत घेतली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बैलपोळ्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शेतीच्या कामात वाढते यांत्रिकीकरण, वाढती महागाई आणि सततची दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणे अलिकडच्या काळात आर्थिकदृष्ट्या न परवडणारे बनले आहे. यामुळे बैलांची संख्या गावोगावी मोठ्या प्रमाणात घटत आहे. मात्र, केडगाव मध्ये सातपुते कुटुंबाला तीन पिढ्यांपासून बैलांचा लळा आहे. प्रत्येक पोळ्याला तीन ते चार लाखांची नवीन बैलजोडी घेऊन त्यांना कुटुंबाप्रमाणे जीव लावतात. दिवाळीपेक्षाही बैलपोळ्याच्या सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. अशा भावना कुटुंबातील महिलांनी व्यक्त केले आहे. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी महिला पोळ्याला बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. या बैलपोळा सणाची मोठ्या उत्सुकतेने संपूर्ण कुटुंब वाट पाहत असतं.
बाईट:-सागर सातपुते
बाईट:- मेघा सातपुते
3
Report
MNMAYUR NIKAM
FollowAug 22, 2025 10:03:17Buldhana, Maharashtra:
बुलढाणा जिल्हा परिषदेतील 199 महिला कर्मचारी 'लाडकी बहीण' योजनेसाठी अपात्र; शासनाच्या आदेशानुसार होणार कारवाई
Anchor : : शासनाची 'लाडकी बहीण' योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, बुलढाणा जिल्हा परिषदेतील 199 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या तपासणीत या महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या असून, आता त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
शासनाने 'लाडकी बहीण' योजनेसाठी काही पात्रता निकष ठरवले आहेत. यानुसार, शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. असे असूनही बुलढाणा जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या 199 महिलांनी योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतला.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत शासनाने या सर्व महिलांना अपात्र घोषित केले आहे. या संदर्भात, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी सांगितले की, "या महिलांची यादी संबंधित विभागांकडून मागवण्यात येत आहे. यादी प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल."
Byte - आशिष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि प बुलढाणा
7
Report
AKAMAR KANE
FollowAug 22, 2025 09:46:54kolhapur, Maharashtra:
नागपूर
संघाच्या शताब्दी वर्षातील ऐतिहासिक विजयादशमी उत्सवाचे 2 ऑक्टोबर रोजी नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या सार्वजनिक कार्यक्रमात येणारे ते दुसरे माजी राष्ट्रपती ठरणार आहेत. याअगोदर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपप्रसंगी 2018 साली नागपुरात संघस्थानी पोहोचले होते.
1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमीच्या दिवशीच सुरुवात झाली होती. यंदा संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे देशभरात संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाच्या विजयादशमी उत्सवाला मुख्य अतिथी कोण राहणार याबाबत स्वयंसेवकांसोबतच राजकीय व सामाजिक वर्तुळातदेखील उत्सुकता होती. संघाने दीड महिना अगोदरच याची घोषणा केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी असतील. याशिवाय संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे स्वयंसेवकांना उद्बोधन करतील. 2018 साली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित झाले होते.
8
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 22, 2025 09:46:29Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
byte attached
संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया...
जिल्हा नियोजन बैठक
- पावसामुळे किती नुकसान झाले यावर आढावा बैठक घेतली,सर्व अधिकाऱ्यांना सांगितले की स्पॉट वर जाऊन भेट देऊन पंचनामे करा.शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे काम करत जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर टाकायला हवे.त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात त्या करण्यासाठी कलेक्टर ला सूचना दिल्या.
आयुष्यमान भारत योजना
- आयुष्यमान भारत योजना कार्ड असताना इतर कागदपत्र मागणे चुकीचे असून हे डॉक्टर मागतात,आता देवदूत कडून तपासणी केली जाणार असून प्रत्येक हॉस्पिटल बाहेर मोफत सेवेचे बोर्ड लावले जाणार.बाहेरून येणाऱ्या लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश.
ऑनलाइन गेम वर बंद
- हा अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे.या गेमिंग आणि जुगार अड्डा मुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्या अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले.याचे पैसे आणि फायदा परदेशात जातो आणि तिथ गुंतवणूक केली जाते.यात विद्यार्थी बरबाद झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्राचे अभिनंदन करतो हा चांगला निर्णय.
संजय राऊत
- तुम्ही बाकी अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, लाचारांनो तुम्हाला मतासाठी काय काय करावे लागेल याची जाणीव आम्हाला आहे,तुम्ही पाकिस्तानचे झेंडा घेऊन नाचणारे आम्हाला शिकवू नका.तुम्ही तुमची कबर स्वतः खोदलेली आहे.
- तू महिलांच्या सिन्दुर वर चर्चा कर, ऑपरेशन वर चर्चा कर,यांची भारताला सहकार्य करण्याची भूमिका नाही.यांना देशाशी प्रेम नसून हे पाकिस्तान धार्जिणी आहे. यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे.
भरत गोगावले
- मला याबद्दल माहिती नाही,त्यामुळे भाष्य करणार नाही
मनपा अतिक्रमण हटाव कारवाई
- छोटी असो वा मोठी कोणतेही कारवाई मनपा थांबवणार नाही, मनपाने भेदभाव केला तर त्याच्यावर मी दखल मी स्वतः घेईल. गरिबांच्या घरावर बुलडोझर आणि मोठ्यांना संरक्षण असं मी होऊ देणार नाही.
लाडकी बहीण
- लाडकी बहीण योजना ही महिला भगिनींसाठी होती, ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती, जे फोर व्हीलर मध्ये फिरतात त्यांनी सुद्धा याचा फायदा घ्यावा, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा हे चुकीचे असून शासनाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी..
9
Report
KJKunal Jamdade
FollowAug 22, 2025 09:33:36Shirdi, Maharashtra:
Kopargaon News Flash
कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात राहत्या घरात पती-पत्नीचे आढळले संशयास्पद मृतदेह...
पतीने पत्नीचा खून करून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती...
मृत दिलीप शंकर मूजगुळे व स्वाती मूजगुळे यांचे आढळले संशयास्पद मृतदेह..
शिर्डीचे डिवायएसपी अमोल भारती, पोलीस निरीक्षक संदीप कोळी घटनास्थळी दाखल....
शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवले , कोपरगाव पोलिसांचा अधिक तपास सुरू...
Bite - अमोल भारती , DYSP
6
Report
KJKunal Jamdade
FollowAug 22, 2025 09:31:51Shirdi, Maharashtra:
Anc_ शिर्डीचे साईबाबांना कर्नाटक येथील साईभक्त व्यंकप्पा घोडके यांनी 56 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे अर्पण केले आहे.. अतीशय सुंदर कलाकुसर असलेल्या या सुवर्ण कड्याची किंमत जवळपास पाच लाख रूपये आहे.. व्यकंप्पा घोडके यांनी साईसमाधीचे दर्शन घेत हे सोन्याचे कडे अर्पण केले . साईबाबा संस्थानकडून देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला..
6
Report