Back
बीडमध्ये त्रिकोणी प्रेमाचा खून; मैत्रिणीनेच संपवला मित्राचा प्रेमप्रकरण!
MMMahendrakumar Mudholkar
Aug 22, 2025 11:20:48
Beed, Maharashtra
बीड:जिवलग मैत्रिणीच्या प्रियकरावर जडलं प्रेम; सख्या मैत्रिणीनेच मैत्रिणीला संपवले.. बीड मधल्या त्रिकोणी प्रेमाचा करून अंत..!!
Anc:रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नातं सर्वश्रेष्ठ असते.. हे अनेक काव्यपंक्तीतून समोर आले. मात्र मैत्रीचं नातं बीडमध्ये कलंकित झाले आहे. प्रियकरावर डोळा ठेवल्याने मैत्रिणीने मैत्रीणचा गळा दाबून खून केलाय. एखाद्या चित्रपटातील कथानकालाही मागे टाकेल अशा क्रूर घटनेने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. पाहूयात बीड मधील त्रिकोणी प्रेमाची क्रूर कहानी...
बीड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपी महिलेकडे जरा नीट पहा... तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिने केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप दिसून येणार नाही... माझ्या प्रियकरावर का प्रेम केलंस? म्हणून सख्ख्या मैत्रिणीचा तिने गळा दाबून खून केलाय.. सिनेमातल्या कथानकाला देखील मागे पाडेल अशी क्रूर घटना या आरोपी महिलेने केलीय.. बीडच्या अंबिका चौक परिसरात वृंदावनी फरताळे या आरोपी महिलेचे घर आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात होमगार्ड पदावर असलेल्या आयोध्या व्हरकडे आणि वृंदावनी फरताळे या दोघींची मैत्री जमली. दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले.... मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती... आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची केली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला.. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घुण हत्या केली.
बाईट:गजानन क्षीरसागर - सहाय्यक पोलीस निरीक्षक
आयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आयोध्या पोलीस दलातील होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. त्यांना पोलीस दलात जायचं होते. त्यासाठी बीडमध्ये त्या सराव करत होत्या. मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला. आणि नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली. कुठेही आयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. काल सायंकाळी आयोध्या यांच्या मृतदेचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र अद्याप त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ अहवाल मिळवून घटनेची शहानिशा करून यात किती आरोपी आहेत? याचा उलघडा करावा अशी मागणी मयत होमगार्ड महिलेच्या नातेवाईकांनी केलीय.
बाईट: आयोध्या यांचे नातेवाईक
मैत्रीचं गाणं गाताना,
शब्द माझे अडखळले.
तुझ्यासोबत असताना,
मन माझं मोहरले.
तुझा हात हातात होता,
अन् विश्वास डोळ्यांत.
कधीच वाटलं नव्हतं,
फसवशील एका क्षणात.
आज ती गाथा विसरली,
ज्याला 'मैत्री' म्हटलं.
अश्रूंनी डोळे भरले,
जेव्हा तुझं रूप कळलं.
या काव्यपंक्तीतले हे शब्द ऐकून तुमच्या अंगावर शहारा आला असेल.. मृत्यूनंतर मात्र आयोध्या यांच्या आत्म्याने कदाचित हेच बोल पुटपुटले असतील... त्यामुळे मित्रत्व करत असताना चाहू बाजूने विचार केला पाहिजे... मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करणं एवढं महागात पडेल अस आयोध्याला कधीच वाटलं नव्हतं. प्रेमाच्या या गणिती काटकोन त्रिकोणातील प्रेमाचा अंत एवढा भयान आणि भीषण होईल.. याचा स्वप्नात विचार देखील केला नाही. आणि याच घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे...
MY END PTC
MAHENDRAKUMAR MUDHOLKAR BEED
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowAug 22, 2025 13:17:27Yeola, Maharashtra:
अँकर :-
येवला तालुक्यातील अंदरसुल येथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांची पुजा करून त्यांना सजवून गावातून मिरवणूक काढण्यात आली.
या दिवशी सकाळपासूनच गावामध्ये उत्सवाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी आपले बैल तेल-उटणं घालून, रंगीबेरंगी शाली, झुल, घंटा व मोरपीसाने सजवले होते. सायंकाळी बैलांची गावातील प्रमुख रस्त्यांवरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 22, 2025 13:16:59Baramati, Maharashtra:
JAVED MUALNI
SLUG 2208ZT_INDAPURINCROCHMENT
FILE 5
इंदापूर नगर परिषदेची केवळ एकाच अनधिकृत टपरीवर कारवाई.... इतर अतिक्रमण आहे असं ठेवल्याने नागरिकांकडून कारभारावर नाराजी व्यक्त....
Anchor _ इंदापूर नगर परिषदेने न्यायालयासमोर असणाऱ्या अनधिकृत चहाच्या टपरीवर कारवाई केली आहे. मात्र इतर ठिकाणची अतिक्रमण आहे अशी ठेवल्याने इंदापूर नगर परिषदेच्या कामकाजावर नागरिकांमधून नाराज व्यक्त केली जातेय. त्यामुळे अतिक्रमण विरोधी करण्यात आलेली ही कारवाई पुढे सुरू राहणार की इंदापूरकरांचा गुदमरलेला श्वास असाच कायम राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 22, 2025 13:16:50Parbhani, Maharashtra:
अँकर- शेतकऱ्यांच्या सर्जा राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज बैलपोळा हा सण आहे. मोठ्या उत्साहात शेतकरी आपल्या बैलांना एकत्र मारोती मंदिरासमोर जमवून त्यांचं लग्न लावून बैलपोळा सण साजरा करीत असतात. पण परभणी जिल्ह्यात लम्पिचा संसर्ग असल्याने काही गावातील शेतकऱ्यांनी एकत्र बैल न जमवता आपआपल्या घरीच बैलांची पूजा करून बैल पोळा सण साजरा केलाय. पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील शेतकर्यांनी लम्पिचा वाढता धोका बघता घरीच बैलांची पूजा करून आपल्या सर्जा राजा प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
0
Report
KJKunal Jamdade
FollowAug 22, 2025 13:05:30Shirdi, Maharashtra:
Newasa News Flash
*अहिल्यानगर जिह्यात आणखी एका शेतकऱ्याने संपले जीवन...*
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल...
*नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथील नानासाहेब केशव ठोबळ या 45 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या...*
विषारी औषध पिऊन केली आत्महत्या...
*कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खते, औषधे घ्यायला पैसे नसल्याने टोकाचे पाऊल...*
*अहिल्यानगर जिह्यात गेल्या आठ दिवसात दुसरी शेतकरी आत्महत्या...*
17 ऑगस्ट रोजी नेवासाच्या वडूले गावातील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याची आत्महत्या...
तर काल 21 ऑगस्ट रोजी नानासाहेब ठोबळ या शेतकऱ्याने संपवले जीवन...
ठोबळ यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार...
*ठोबळ यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने ग्रामस्थांनी केली वर्गणी...*
प्रहार संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग औताडे यांची माहिती...
*या आत्महत्या नाही तर सरकारी धोरणाने घेतलेले बळी...*
प्रहार संघटनेचा आरोप...
Byte - सुरेखा नानासाहेब ठोबल, पत्नी
Byte - दत्तात्रेय खाटीक, ग्रामस्थ
Byte - पांडुरंग औताडे, युवक जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 22, 2025 12:48:12Akola, Maharashtra:
Anchor : वर्षभर शेतकऱ्यासोबत राब-राब राबत रक्ताचे पाणी करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच पोळा... महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पोळा म्हणजे अनेक परंपरांनी समृद्ध झालेला..अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये मात्र चक्क गाढवांचा पोळा भरला होताय. सजून-धजून आलेली गाढवं अन लोकांनी केलेल्या गर्दीमूळं अकोटमधील हा पोळा हटके ठरलाय.चला पाहूयात अकोटमधील हा हटके पोळा....
Vo 1 : गाढव... नेहमीच सर्वांच्या तिरस्काराचा विषय... परंतू हीच गाढवं सुंदर असतात काय?, असं तूम्हाला कुणी विचारलं तर याचं उत्तर 'होय' असं आहेय. कारण, अकोटमधील ही द्रूष्य तूमचं असं मत बनविण्यासाठी पूरेसी आहेयेत. बरं पोळा म्हटलं की बैलच आपल्या डोळ्यासमोर येतील.. पण अकोटमध्ये आज चक्क गाढवांचा पोळा भरलाय. आज अकोटमधील रामटेकपूरा येथे गाढवांचा पोळा भरला होताय. पोळ्याच्या दिवशी आणि दुसर्या दिवशी सुद्धा हा पोळा भरतोय.या गावातील भोई समाजानं गेल्या ५० वर्षांपासून ही परंपरा जपलीये...अकोट शहरातील अनेक कुटूंबांचा उदरनिर्वाह गाढवांवर चालतोय. वर्षभर या गाढवांवर माती, दगड, वाळू आणि लाकडं वाहण्याचं काम हे लोक करतात.
Byte : श्रीराम कंडाळे, गाढव मालक..
Vo 2 : गाढवावर सुरू असलेल्या या समाजाचा व्यवसाय आता शेवटचे घटक मोजत आहेत आणि त्यामुळे भविष्यात हा गाढवाचा पोळा भरणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Byte : दीपाली कंडाळे
Final Vo : आपल्या भारतीय संस्क्रूतीनं नेहमीच श्रमाला प्रतिष्ठा दिलीय. अकोटमधील गाढवांचा हा पोळा नेमका याच संस्कृतीला उजाळा देणारा आहेय, असं म्हणता येईल...
जयेश जगड,
झी मिडिया,
अकोला.
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 22, 2025 12:47:28kolhapur, Maharashtra:
Ngp Qr Map marbat
live u ने फीड पाठव
-------------
नागपूर
मारबत- बडग्या उत्सव परंपरेने नागपूरला जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून दिलीय... देशा विदेशातून अनेक जण हा मारबतोत्सव आणि त्यासोबत निघणारे प्रतिकात्मक बडगे पाहण्याकरता नागपुरात पोहोचत असतात.... मात्र दाटी-वटीची वस्ती असलेला महाल, इतवारी, मस्कासाथ परीसर तिथल्या निमुळत्या गल्ल्या यामध्ये तिथे असलेले बडग्या, मारबत हे पाहण्यासाठी परिसराची जाण नसलेल्या बाहेरील लोकांना अनेकदा बराच त्रास होतो.... हेच लक्षात घेऊन
नागपूरातील मारबत व बडग्याची ठिकाणे आणि बदललेला मिरवणुकीचा मार्ग नागरिकांना सोप्या पद्धतीने समजावा यासाठी तरुण युवाकांकडून QR लोकेशन गाईड तयार करण्यात आलेय.
नागरिकांनी फक्त Google Lens ने QR कोड स्कॅन करावा आणि नकाशावर थेट मार्ग व ठिकाणे पाहता येतील. कोणत्याही बडग्या उत्सव मंडळ व मारबत उत्सवाच्या ठिकाणी गेल्यानंतर हे Qr मॅप लोकेशन त्यांना उपलब्ध होईल.तसेच,मारबत-बडग्या उत्सवाला अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये (Unesco Intangible Cultural Heritage) आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी यासाठी तरुण युवक यांच्या पुढाकारातून मोहीम सुरु आहे. या मोहिमेत प्रत्येक मारबत व बडग्या समितीकडून जनजागृती अभियान व ठराव (Resolution) पारित केला जात आहे. या पारंपारिक उत्सवाला तरुणाईने दिलेली टेक्नॉलॉजी ची साथ नक्कीच उल्लेखनीय आहे... याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
-------
बाईट
श्रेयश सोमकुंवर
स्वराज अंबुलकर
आभा पांडे, काळी मारबत उत्सव समिती
4
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 22, 2025 12:46:44Chakan, Maharashtra:
Feed 2C
Slug: Chakan Accident
File:02
Rep: Hemant Chapude(Chakan)
ब्रेकिंग – चाकण, पुणे
Anc :- पुणे-नाशिक महामार्गावर चाकण चौकात प्रवासी रिक्षाचा अपघात झालाय
Vo :- पुणे नाशिक महामार्गालगत चाकण चौकात साचलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रिक्षा थेट पाण्यात घसरली. या रिक्षामध्ये प्रवासी असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी प्रवाशांच्या जिवाशी सरळसरळ खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
महामार्गावर साचलेले पाणी, खड्डे आणि वाहतूककोंडी यामुळे अपघातांची मालिका सुरू असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया चाकण पुणे...
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 22, 2025 12:35:55Parbhani, Maharashtra:
अँकर- श्रावण महिन्यात महादेवाची मोठ्या प्रमाणात भक्ती
केली जाते आणि महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्येला महादेवाचे वाहन असलेल्या नंदीची पूजा केली जाते. याच पिठोरी अमावस्येला शेतकरी ज्यांच्या जीवावर शेती कसतो त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा करतात.बैलांना धुवून,शिंगाला रंग लावून आकर्षक झुली,गोंडे रंगीबेरंगी सजावट करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. परभणी जिल्ह्यात येथे मोठ्या बैल पोळा साजरा करण्यात आला. बैलपोळा साजरा करून शेतकरी बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत असतात.
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 12:35:26Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_POLA
धाराशिव जिल्ह्यातील बैलपोळा सणावर मनोज जरांगे पाटलांची छाप
बैलाच्या पाठीवर मनोज जरांगे पाटलांच चित्र रेखाटले , बैलाच्या मिरवणुकीत मनोज जरांगे यांच्या समर्थनाची वाजली गाणी
एक मराठा लाख मराठा घोषणा बैलांच्या पाठीवर लिहिली
मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला येण्याची बैलपोळा सणातून शेतकऱ्याकडून साद
धाराशिव जिल्ह्यातील भाटशिरपुरा येथील शेतकऱ्याकडून अनोख्या पद्धतीने पोळा सण साजरा
यापूर्वीही आकाशकंदीलावर झळकले होते मनोज जरांगे पाटलांचे फोटो
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 22, 2025 12:30:32Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2208_BHA_NANA_POLA
FILE - 8 VIDEO
भंडाऱ्यात नाना पटोले यांची बैलपोळ्यात हजेरी....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकळी येथे काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी आपल्या मूळ गावी बैलपोळा साजरा केला. मुसळधार पावसातही त्यांनी गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून सणाचा आनंद लुटला. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उत्सवाच्या निमित्ताने गावात आनंदाचे वातावरण होते. पोळ्याच्या दिवशी गावकऱ्यांसोबत राहण्याचा आनंद व्यक्त करत पटोले यांनी परंपरेचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
...
BYTE :- नाना पटोले
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 22, 2025 12:06:36Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरच्या फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालयपर्यंत रस्त्याची दुरावस्था,
नागरिकांचा संताप ,ड्रोनच्या माध्यमातून टिपले दृश्य
Ulh potholes
Anchor रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते; अशी परिस्थिती सद्या उल्हासनगर शहरात निर्माण झालीय,सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,विशेष म्हणजे फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालयपर्यंत रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झालीय,गणपती बाप्पा आगमनापूर्वी शहरातील खड्डे बुजवले जातील असा दावा महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी केलंय परंतु आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असून रस्त्यांची अवस्था जैशे थेच असल्याने नागरीक अक्षरशः जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहे,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
2
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 12:06:22Beed, Maharashtra:
बीड: सरकारी वकिल आत्महत्या प्रकरण: अखेर न्यायाधीशासह अन्य एकावर गुन्हा दाखल.. न्यायालयीन क्षेत्रात खळबळ..!
Anc: आरोपींना कटघेऱ्यात उभे राहण्याचे आदेश देऊन शिक्षा सुनावणाऱ्या एका न्यायाधीशावरच आरोपीच्या कटघेऱ्यात उभा टाकण्याची वेळ आली आहे. बीडच्या वडवणी न्यायालयातील सरकारी वकिलाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात न्यायाधीशासह अन्य एकावर अखेर गुन्हा दाखल झालाय. दोन दिवसांपूर्वी वडवणी न्यायालयातील विनायक चंदेल या सरकारी वकिलाने न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोट्सच्या आधारे आणि कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख आणि अन्य एकावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेलाय.
आज चंदेल कुटुंबाने वडवणी पोलिसांची भेट घेतली विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल याच्या फिर्यादीवरून सदरील गुन्हा नोंदविला गेलाय. न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडून विनायक यांना वारंवार त्रास दिला जात होता. आणि त्यामुळेच त्यांनी याला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी चंदेल कुटुंबाने केली आहे. एका न्यायाधीशावर गुन्हा दाखल होण्याची कदाचित ही पहिली वेळ असेल.. दरम्यान घटना घडल्यानंतर न्यायाधीशाने पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. पोलिस आता आरोपी न्यायाधीशाचा शोध घेत आहेत.
बाईट: लिंबाजी चंदेल - मयत सरकारी वकिलाचे वडील
1
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 22, 2025 12:05:00Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_JAIL_POLA दहा फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंद्यांनी साजरा केला बैलपोळा; कारागृहातही निनादू लागल्या झडत्या
अँकर :- अमरावती मध्यवर्ती कारागृहात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा साजरा केल्याचा साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बंद्यांनी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला असून सकाळपासूनच बंद्यांनी पोळ्याची लगबग सुरू केली होती सकाळपासून बंद्यांनी बैलांना शाम्पूने अंघोळ घातली व त्यानंतर बैलांना सजवून सायंकाळी अमरावतीच्या कारागृहात बैलांचा पोळा भरवत एकमेकांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बंद्यांनी कारागृहात झडत्या म्हणून एकमेकांचा मनोरंजन केल्याचा पाहायला मिळाला.
बाईट :– कारागृहातील, बंदी
1
Report
AKAMAR KANE
FollowAug 22, 2025 11:48:42kolhapur, Maharashtra:
नागपुरातील रवी भवन येथीलराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्यालयाकडून भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार करण्यात आली होती.... याबाबत अशी जयस्वाल यांची प्रतिक्रिया
( याबाबत आपण सकाळी बातमी दाखवली होती )
----
बाईट- आशिष जयस्वाल
नागपूर
बाईट- आशिष जयस्वाल,राज्यमंत्री
प्रत्येक राज्यात काही निर्बंध असतात वन्यप्रेमी जनता देखील ते सुद्धा राज्याची जनता आहे मोकाट कुत्रा एखाद्याला चावला त्यामुळे नागरिकांना त्रास होतो, रेबीज होऊ शकतो योग्य ते बंदोबस्त सर्वांच्या संबंधितांच्या भावना लक्षात घेऊन झाला पाहिजे. न्यायालयाने वेळोवेळी काय निर्णय दिले त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे प्रश्न उद्भवला असेल तर त्यावर उत्तर शोधले पाहिजे.
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 11:48:29Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_R1_PATEL
निवडणूक मॅनेज करायची ताकत आमच्यात असती तर धाराशिवचे खासदारही निवडून येऊ दिले नसते
पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणण्याची सवयच आहे
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील बोगस मतदार प्रकरणावरून आरोप केल्यानंतर भाजप नेते पाशा पटेल यांचा पलटवार
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6000 बोगस मतदार नोंदवण्यात प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत घेतली होती पत्रकार परिषद
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा केला होता आरोप
बोगस मतदार प्रकरणात निवडणूक आयोगाने अर्ज बाद केलेत, याप्रकरणी पोलिसांकडून तपास न झाल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आहे आरोप
भाजप नेते पाशा पटेल यांनी दिले आरोपांना उत्तर
Byt: पाशा पटेल, भाजप नेते
3
Report