Back
बैलपोळा: सातपुते कुटुंबाने खास बैल जोडी विकत घेतली!
LBLAILESH BARGAJE
Aug 22, 2025 10:03:27
Pune, Maharashtra
रिपोर्टर लैलेश बारगजे
स्लग:- बैलपोळा
फीड 2C
Anc:-
राज्यात सर्वत्र बैलपोळा मोठ्या उत्साह साजरा केला जातो या बैलपोळ्याच्या सणासाठी अहिल्यानगरच्या सातपुते कुटुंबाने खास बैल जोडी विकत घेतली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बैलपोळ्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शेतीच्या कामात वाढते यांत्रिकीकरण, वाढती महागाई आणि सततची दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणे अलिकडच्या काळात आर्थिकदृष्ट्या न परवडणारे बनले आहे. यामुळे बैलांची संख्या गावोगावी मोठ्या प्रमाणात घटत आहे. मात्र, केडगाव मध्ये सातपुते कुटुंबाला तीन पिढ्यांपासून बैलांचा लळा आहे. प्रत्येक पोळ्याला तीन ते चार लाखांची नवीन बैलजोडी घेऊन त्यांना कुटुंबाप्रमाणे जीव लावतात. दिवाळीपेक्षाही बैलपोळ्याच्या सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. अशा भावना कुटुंबातील महिलांनी व्यक्त केले आहे. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी महिला पोळ्याला बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. या बैलपोळा सणाची मोठ्या उत्सुकतेने संपूर्ण कुटुंब वाट पाहत असतं.
बाईट:-सागर सातपुते
बाईट:- मेघा सातपुते
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 22, 2025 12:30:32Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2208_BHA_NANA_POLA
FILE - 8 VIDEO
भंडाऱ्यात नाना पटोले यांची बैलपोळ्यात हजेरी....
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकळी येथे काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी आपल्या मूळ गावी बैलपोळा साजरा केला. मुसळधार पावसातही त्यांनी गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून सणाचा आनंद लुटला. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उत्सवाच्या निमित्ताने गावात आनंदाचे वातावरण होते. पोळ्याच्या दिवशी गावकऱ्यांसोबत राहण्याचा आनंद व्यक्त करत पटोले यांनी परंपरेचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
...
BYTE :- नाना पटोले
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 22, 2025 12:06:36Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरच्या फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालयपर्यंत रस्त्याची दुरावस्था,
नागरिकांचा संताप ,ड्रोनच्या माध्यमातून टिपले दृश्य
Ulh potholes
Anchor रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते; अशी परिस्थिती सद्या उल्हासनगर शहरात निर्माण झालीय,सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,विशेष म्हणजे फार्व्हर लाईन ते मध्यवर्ती रुग्णालयपर्यंत रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झालीय,गणपती बाप्पा आगमनापूर्वी शहरातील खड्डे बुजवले जातील असा दावा महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी केलंय परंतु आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असून रस्त्यांची अवस्था जैशे थेच असल्याने नागरीक अक्षरशः जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहे,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
2
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 12:06:22Beed, Maharashtra:
बीड: सरकारी वकिल आत्महत्या प्रकरण: अखेर न्यायाधीशासह अन्य एकावर गुन्हा दाखल.. न्यायालयीन क्षेत्रात खळबळ..!
Anc: आरोपींना कटघेऱ्यात उभे राहण्याचे आदेश देऊन शिक्षा सुनावणाऱ्या एका न्यायाधीशावरच आरोपीच्या कटघेऱ्यात उभा टाकण्याची वेळ आली आहे. बीडच्या वडवणी न्यायालयातील सरकारी वकिलाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात न्यायाधीशासह अन्य एकावर अखेर गुन्हा दाखल झालाय. दोन दिवसांपूर्वी वडवणी न्यायालयातील विनायक चंदेल या सरकारी वकिलाने न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोट्सच्या आधारे आणि कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफिक शेख आणि अन्य एकावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेलाय.
आज चंदेल कुटुंबाने वडवणी पोलिसांची भेट घेतली विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल याच्या फिर्यादीवरून सदरील गुन्हा नोंदविला गेलाय. न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडून विनायक यांना वारंवार त्रास दिला जात होता. आणि त्यामुळेच त्यांनी याला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी चंदेल कुटुंबाने केली आहे. एका न्यायाधीशावर गुन्हा दाखल होण्याची कदाचित ही पहिली वेळ असेल.. दरम्यान घटना घडल्यानंतर न्यायाधीशाने पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. पोलिस आता आरोपी न्यायाधीशाचा शोध घेत आहेत.
बाईट: लिंबाजी चंदेल - मयत सरकारी वकिलाचे वडील
1
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 22, 2025 12:05:00Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_JAIL_POLA दहा फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंद्यांनी साजरा केला बैलपोळा; कारागृहातही निनादू लागल्या झडत्या
अँकर :- अमरावती मध्यवर्ती कारागृहात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा साजरा केल्याचा साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बंद्यांनी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला असून सकाळपासूनच बंद्यांनी पोळ्याची लगबग सुरू केली होती सकाळपासून बंद्यांनी बैलांना शाम्पूने अंघोळ घातली व त्यानंतर बैलांना सजवून सायंकाळी अमरावतीच्या कारागृहात बैलांचा पोळा भरवत एकमेकांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बंद्यांनी कारागृहात झडत्या म्हणून एकमेकांचा मनोरंजन केल्याचा पाहायला मिळाला.
बाईट :– कारागृहातील, बंदी
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 22, 2025 11:48:42kolhapur, Maharashtra:
नागपुरातील रवी भवन येथीलराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्यालयाकडून भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार करण्यात आली होती.... याबाबत अशी जयस्वाल यांची प्रतिक्रिया
( याबाबत आपण सकाळी बातमी दाखवली होती )
----
बाईट- आशिष जयस्वाल
नागपूर
बाईट- आशिष जयस्वाल,राज्यमंत्री
प्रत्येक राज्यात काही निर्बंध असतात वन्यप्रेमी जनता देखील ते सुद्धा राज्याची जनता आहे मोकाट कुत्रा एखाद्याला चावला त्यामुळे नागरिकांना त्रास होतो, रेबीज होऊ शकतो योग्य ते बंदोबस्त सर्वांच्या संबंधितांच्या भावना लक्षात घेऊन झाला पाहिजे. न्यायालयाने वेळोवेळी काय निर्णय दिले त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे प्रश्न उद्भवला असेल तर त्यावर उत्तर शोधले पाहिजे.
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 11:48:29Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_R1_PATEL
निवडणूक मॅनेज करायची ताकत आमच्यात असती तर धाराशिवचे खासदारही निवडून येऊ दिले नसते
पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणण्याची सवयच आहे
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील बोगस मतदार प्रकरणावरून आरोप केल्यानंतर भाजप नेते पाशा पटेल यांचा पलटवार
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6000 बोगस मतदार नोंदवण्यात प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत घेतली होती पत्रकार परिषद
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा केला होता आरोप
बोगस मतदार प्रकरणात निवडणूक आयोगाने अर्ज बाद केलेत, याप्रकरणी पोलिसांकडून तपास न झाल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आहे आरोप
भाजप नेते पाशा पटेल यांनी दिले आरोपांना उत्तर
Byt: पाशा पटेल, भाजप नेते
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 22, 2025 11:48:20Bhandara, Maharashtra:
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करणे सोडा...आणि राहुल गांधी यांची मागे लागणे भाजपने सोडावे...लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप करते आहे.;- नाना पटोले
Anchor ;- देवेंद्र फडणवीस आपल्याला विनंती आहे की निवडणूक आयोगाची वकिली का करत आहात पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिवारातील चार लोकांची नाव डबल टिबल आली असेल याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे म्हणून आम्ही वारंवार सांगतोय की निवडणूक आयोग या प्रकारची गडबड चालू आहे ही निवडणूक आयोगाने थांबवली पाहिजे अतिरिक्त मत येतात कसे राजीव गांधींनी डिजिटल व्यवस्था निर्माण करून दिली आहे त्याची आपण वापर करत आहोत पण निवडणूक आयोग असे चार चार नाव ठिकाणी येणे हे चुकीचे आहे म्हणून आमचे नेते राहुल गांधी निवडणूक आयोगाला म्हणतात की पारदर्शकतांना आणा तुम्ही येऊन जाऊन राहुल गांधी यांच्याच मागे लागतात असा सल्ला आपल्याला आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या यांच्या घरातील मत जास्त आले असतील तर आमच्या काही समर्थन राहू शकत नाही म्हणून सर्व सिस्टीम दुरुस्त झाली पाहिजे आणि लोकशाहीची हत्या निवडणूक आयोगाने माध्यमातून भाजप करते आहे हे तुम्ही सांगा आणि त्यांची वकिली करणे सोडा..
BYTE :- नाना पटोले
ANCHOR :- महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार कसं महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लुटत आहे यातूनही स्पष्ट होते......
सरकार एकीकडे अदानी अंबानींना पैसे देण्यासाठी लागली आहे आणि गोरगरिबांना लुटायचं काम करत आहे. मी विधानसभेत जेव्हा प्रश्न उपस्थित केला की पोलिसांना कारवाईची टार्गेट देऊन सरकारची तिजोरी भरली जाते. तेव्हा राज्याच्या सरकार विधानसभेत सांगतो की आम्ही कुठलं टार्गेट दिलं नाही. पण माझ्याजवळ पोलिसांचा व्हाट्सअप ग्रुप वरचा डिस्कर्शन आहे. यात वरिष्ठांनी त्यांना इतक्या कारवाईच्या सूचना केल्याचे ते सांगतात. आणि हा टार्गेट दिल्याचं इथून दिसत आहे. माझ्या सरकारला सवाल आहे की गोरगरिबाला लुटायचा आहे. लाडक्या बहिणींना लुटायचा आहे? ते सरकारने तात्काळ थांबवलं पाहिजे. नाहीतर विधानसभेत सरकारने खोटी माहिती दिल्याबद्दल सरकारवर अविश्वास आणावा लागेल. गोरगरिबांची लूट बरोबर नाही फडणवीसांनी स्वतः यावर लक्ष दिले पाहिजे अशी आमची त्यांना विनंती.....((भंडारा जिल्ह्यात वाहतूक पोलिसांना कारवाईचा टार्गेट दिल्याचे व्हाट्सअप स्क्रीन शॉट समोर आले त्यावर ते बोलत होते))
BYTE 01 :- नाना पटोले (1:31)
....
....
....
ANCHOR:- माझी फडणवीसन नाही इतकीच विनंती आहे की तुम्ही निवडणूक आयोगाची वकिली करू नका. सिरीयल एडवोकेट म्हणजे वकिली आपण जे करत आहात तो एक प्रकारे निवडणूक आयोग जे चुकीचे कार्य करत आहे. त्यांची वकिली फडणवीसांनी करू नये कारण एखाद्याची दोन-तीन नाव कशी आली आहे तपासणीचं काम निवडणूक आयोगाचा आहे आमची भूमिका तीच आहे. राहुल गांधी ही तेच म्हणत आहेत. पण मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांनाही आमची विनंती आहे निवडणूक आयोगाच्या चुकीवर तुम्ही बोट ठेवा, आणि तुमची नेते मोदी त्यांनाही सांगा निवडणूक आयोगाचे पाप थांबवा... देवेंद्र फडणवीसजी आपण खोटी वकिली करू नका....
BYTE 02 :- नाना पटोले (1:21)
....
....
....
ANCHOR :- सहा महिन्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्रात ज्या संजीव कुमार वर गुन्हे दाखल केले ते कोणी करवले.?? तर तुमच्या तलाठ्याने केले. मग त्याला सांगितलं तुला जेलमध्ये टाकतो त्या धाकाने त्याने माफी मागितली. माझा एक मुद्दा आहे त्याने आकडे बरोबर दिले नाही. खोटी माहिती दिली संस्थेच्या विरोधात जर गैरसमज केला. संस्थेने पुढे यावं. त्याचे जे मुख्य सीआय आहे ते काय सांगतात पाच वाजताच्या नंतरचे जे मतदान झाले त्या मतदानाला आम्ही दाखवलं तर महिलांचा अपमान होईल. त्यात त्यांचा अपमान काय होणार? जे पोरकट वक्तव्य निवडणूक आयोग देतयं म्हणजे तुम्ही काहीतरी लपवल्याचं लक्षात येतं. आणि लोकांचा संशय पुन्हा वाढवता. का नाही तुम्ही फोटेजेस दाखवत?? तुम्ही देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले ते वोटचोरीने आले का?? निवडणूक आयोगाच्या वोटचोरी मध्ये तुम्ही सामील आहात का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाची वकिली करू नका आणि सिरीयल लायर बनू नका.
BYTE 03 :- नाना पटोले (1:41)
....
....
....
ANCHOR:- बिलकुल राहिलेच नाही. अटल बिहारी वाजपेयींचा विचार भाजपने संपवलाय. आता जी विचारसरणी आहे अमित शहा मोदींची ही विचारसरणी भारतासाठी घातक आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा विचार देशाप्रती होता म्हणून ते विरोधी पक्षात असताना सुद्धा जागतिक पातळीवर जेव्हा दोन देशांच्या समेट घडवायचे असेल तर त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांना काँग्रेस पाठवायची. ही या पद्धतीची भूमिका होती आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची तुलना नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोबत होऊ शकत नाही. हे देशासाठी विघागातक आहेत..... चायनाला समर्पित आहेत चायना जे सांगेल ते करण्याचं काम अमित शहा आणि मोदी या देशात करतात.....
BYTE 04 :- नाना पटोले (0:56)
....
....
....
ANCHOR:- मला कोणाबद्दल ची प्रतिक्रिया देण्याचा कारण नाही पण महाराष्ट्राचा सरकार आणि केंद्राच सरकार हे सातत्याने ओबीसी वर अन्याय करत आहे. हे स्पष्ट होत आहे. पोरांच्या स्कॉलरशिप सुद्धा मिळत नाही शिष्यवृत्ती दिल्या जात नाही होस्टेल त्यांना दिले असं सरकार विधानसभेत सांगत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी हॉस्टेल सुद्धा तयार झाले नाही किरायाच्या घरामध्ये भरवले आहे अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी पोरांच्या शिक्षणाच्या व्यवस्था नाहीत. अशा या परिस्थितीमध्ये ओबीसी विरोधी धोरण जे भाजपचा आहे. त्या भाजपच्या विरोधात सर्व ओबीसींनी एकत्रित यावं असं माझं आवाहन करणार आहे. कारण जातीजातीमध्ये तुकडे करण्याचे जि भूमिका भाजपने व्यक्त केली होती तिला कोणीही चालना देऊ नये एवढेच आमचं सगळ्यांना विनंती आहे......(( ओबीसी समाजाचे नेतृत्व धनगर समाजाकडे गेल्याने माळी समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखतो असे वक्तव्य हाके यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर ते बोलत होते))
BYTE 05 :- नाना पटोले (3:18)
....
....
....
ANCHOR:- परवा लोकसभेत अमित शहा ने घटना दुरुस्तीचे प्रस्ताव आणला, 30 दिवस मुख्यमंत्री असो किंवा मंत्री, पंतप्रधानही असो कोणीही 30 दिवस जरी जेलमध्ये राहिला तर त्यांना त्या पदावरून मुक्त करण्याच अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राहील असा कायदा आणला. खरंतर या पद्धतीचा एक भीती निर्माण करून खोट्या केसेस मध्ये ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ईडीला फटकारलं, की तुमच्या आहे एकही केसेस अप्रू होत नाही. तुम्ही निर्दोष लोकांवर या पद्धतीची कारवाई करता... यावरून आपल्याला हे पाहायला मिळतं की खोट्या केसेस या मोठ्या प्रमाणात झाले आहेत आणि म्हणून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करणे हा अमित शहा आणि मोदी दोन्ही प्रमाणीकपणे करत आहेत. असं पाहायला मिळतं म्हणून सामन्यामध्ये जी टीका पहायला मिळाली ती लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाबद्दल बोलतो तर फडणवीस वकिली करतात निवडणूक आयोगाची. आजही ते बोलत होते की पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडची दोन -दोन तीन लोकांची मत आहेत. तर निवडणूक आयोगात वर आमचा तोच प्रश्न आहे. निवडणूक आयोग काय झोपला होता का? आम्ही विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर न देता आता भाजप काँग्रेस वरच आरोप करत आहे. निवडणूक आयोगाने याची स्पष्ट करावी आणि लोकांच्या मताच्या संरक्षण करावं ही भूमिका आमची आहे. सध्या बिहारमध्ये त्यांची यात्रा सुरू आहे आणि लोकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून फडणवीसांनी वकिली थांबवावी.
((सामनातून अमित शहा वर टीका करण्यात आली होती...... त्यावर नाना पटोले बोलत होते))
BYTE 06 :- नाना पटोले (3:18)
....
....
....
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 22, 2025 11:47:37Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_PASHA_PTEL
निवडणूक मॅनेज करायची ताकत आमच्यात असती तर धाराशिवचे खासदारही निवडून येऊ दिले नसते
पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणण्याची सवयच आहे
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापुरातील बोगस मतदार प्रकरणावरून आरोप केल्यानंतर भाजप नेते पाशा पटेल यांचा पलटवार
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6000 बोगस मतदार नोंदवण्यात प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत घेतली होती पत्रकार परिषद
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा केला होता आरोप
बोगस मतदार प्रकरणात निवडणूक आयोगाने अर्ज बाद केलेत, याप्रकरणी पोलिसांकडून तपास न झाल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आहे आरोप
भाजप नेते पाशा पटेल यांनी दिले आरोपांना उत्तर
Byt: पाशा पटेल, भाजप नेते
3
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 22, 2025 11:47:16Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात 32 लाखांची एमडी अंमली पदार्थ हस्तगत
उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई
Ulh drugs seized
Anchor उल्हासनगर गुन्हे शाखेने
32 लाखाची एमडी पावडर हस्तगत केली असून एका आरोपीला अटक केली आहे ,
Anchor अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव दर्गा परिसरात एक व्यक्ती एम डी पावडर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे यांनी सापळा रचून पोलीस पथकाने छापा टाकून फरहान हबीब चौधरी याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 161 ग्रॅम एमडी, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 32 लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उल्हासनगर गुन्हे शाखा करीत आहे.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
2
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 11:46:24Beed, Maharashtra:
बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; लाभ घेतलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार..!
anc- शासकीय सेवेत असणाऱ्या राज्यातील ११८३ महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या १४५ शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आढळून आला आहे. आणि याच महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे.
राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अमलात आणली. राज्यातील लाखो महिलांना याचा मोठा फायदा झाल्याच देखील समोर आले.. आर्थिक निकषावर आणि अटीवर महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो.. परंतु शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी देखील प्रशासनाची दिशाभूल करत या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल आहे.
याबाबतचे पत्र बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले असून त्यानुसार संबंधित महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावून कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सिओंनी दिली आहे..
बाईट: जितिन रहमान - बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 22, 2025 11:45:45Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - आ. सदाभाऊ खोत यांना लाथ घालून त्यांची हकालपट्टी करा, सोलापुरात गोरक्षक आक्रमक ( 1 to 1 )
((( सदरच्या 1 to 1 मध्ये गोरक्षकांनी अपशब्दाचा वापर केला आहे त्या ठिकाणी बीप टाकावे विनंती )))
- रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांच्या विरोधात सोलापुरातील गोरक्षक आक्रमक..
- आ. सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबाबत सांगोल्यात केलेल्या विधानाचा व्यक्त केला तीव्र निषेध..
- आमदार सदाभाऊ खोत यांना सोलापुरात आल्यानंतर काळे फासण्याचा इशारा
- आ. सदाभाऊ खोत यांच्या गा××× लाथ मारून हकालपट्टी करण्याची मागणी
- गोरक्षक जर पैसा घेत असते तर सदाभाऊ सारखे श्रीमंत झाले असते, आमदार झाले असते
याविषयी गोरक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( 1 to 1 )
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 11:33:14Beed, Maharashtra:
बीड: वडवणीतील सरकारी वकील आत्महत्या प्रकरण, न्यायाधीशावर गुन्हा दाखल करण्यासाठी वकील संघ आक्रमक, पोलिस अधीक्षकांची घेतली भेट
Anc: बीडच्या वडवणी येथील न्यायालयात एका सरकारी वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी मयत वकिलाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये न्यायाधीश आणि कारकून यांचे नाव असल्याचे समजते. मात्र चिठ्ठी अद्याप समोर आलेली नाही. याच अनुषंगाने बीड जिल्हा वकील संघ कारवाईसाठी आक्रमक झाले आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे जो कोणी आरोपी असेल त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र घटना घडवून तीन दिवस उरले असले तरी अद्याप याप्रकरणी कसलाही गुन्हा दाखल झाला नाही. संबंधित आरोपींवर चौकशी करून गुन्हा दाखल करावी या मागणीसाठी बीडच्या वकील संघाने आज पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. कारवाई तात्काळ करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा वकील संघाने दिला आहे.
बाईट: भीमराव चव्हाण - वरिष्ठ ॲड
0
Report
KPKAILAS PURI
FollowAug 22, 2025 11:33:05Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri mask man
kailas puri Pune 22-8-25
feed by 2c
Anchor : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी मध्ये हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या मास्क मॅन चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.... त्याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हातात धारदार चाकू घेऊन फिरणारा मास्क मॅन हा मनोरुग्ण भंगार वेचक असल्याच पुढ आलंय...! मच्छिंद्र नारायण नवघिरे वय 68 वर्ष अस मास्क मॅन व्यक्तीच नाव आहे. मच्छिंद्र नारायण नवघिरे हा कचरा आणि भांगर वेचक असून तो निगडी मध्ये कचरा आणि भांगर वेचकाच काम करून उदरनिर्वाह करतो...! मच्छिंद्र नारायण नवघिरे याच वागणं हे दहशत निर्माण करणार असल्याने निगडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला समज पत्र दिल आहे.
byte - भोजराज मिसाळ , पोलीस निरीक्षक निगडी पोलीस स्टेशन
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 22, 2025 11:23:33Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2208ZT_WSM_MAHILA_POLA
रिपोर्टर : गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा गावात मागील ८ वर्षांपासून महिलांना बैलपोळा साजरा करण्याचा मान दिला जात आहे.पारंपरिकरीत्या शेतकरी पुरुषांचा सण मानला जाणारा पोळा येथे महिलांनी उत्साहात साजरा केला. सकाळपासूनच महिलांनी बैल सजवून, पूजा करून व कासरे हाती घेऊन मोठ्या थाटामाटात सण साजरा केला.पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना स्थान मिळावे यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 22, 2025 11:20:48Beed, Maharashtra:
बीड:जिवलग मैत्रिणीच्या प्रियकरावर जडलं प्रेम; सख्या मैत्रिणीनेच मैत्रिणीला संपवले.. बीड मधल्या त्रिकोणी प्रेमाचा करून अंत..!!
Anc:रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नातं सर्वश्रेष्ठ असते.. हे अनेक काव्यपंक्तीतून समोर आले. मात्र मैत्रीचं नातं बीडमध्ये कलंकित झाले आहे. प्रियकरावर डोळा ठेवल्याने मैत्रिणीने मैत्रीणचा गळा दाबून खून केलाय. एखाद्या चित्रपटातील कथानकालाही मागे टाकेल अशा क्रूर घटनेने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. पाहूयात बीड मधील त्रिकोणी प्रेमाची क्रूर कहानी...
बीड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपी महिलेकडे जरा नीट पहा... तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिने केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप दिसून येणार नाही... माझ्या प्रियकरावर का प्रेम केलंस? म्हणून सख्ख्या मैत्रिणीचा तिने गळा दाबून खून केलाय.. सिनेमातल्या कथानकाला देखील मागे पाडेल अशी क्रूर घटना या आरोपी महिलेने केलीय.. बीडच्या अंबिका चौक परिसरात वृंदावनी फरताळे या आरोपी महिलेचे घर आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात होमगार्ड पदावर असलेल्या आयोध्या व्हरकडे आणि वृंदावनी फरताळे या दोघींची मैत्री जमली. दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले.... मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती... आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची केली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला.. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घुण हत्या केली.
बाईट:गजानन क्षीरसागर - सहाय्यक पोलीस निरीक्षक
आयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आयोध्या पोलीस दलातील होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. त्यांना पोलीस दलात जायचं होते. त्यासाठी बीडमध्ये त्या सराव करत होत्या. मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला. आणि नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली. कुठेही आयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. काल सायंकाळी आयोध्या यांच्या मृतदेचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र अद्याप त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ अहवाल मिळवून घटनेची शहानिशा करून यात किती आरोपी आहेत? याचा उलघडा करावा अशी मागणी मयत होमगार्ड महिलेच्या नातेवाईकांनी केलीय.
बाईट: आयोध्या यांचे नातेवाईक
मैत्रीचं गाणं गाताना,
शब्द माझे अडखळले.
तुझ्यासोबत असताना,
मन माझं मोहरले.
तुझा हात हातात होता,
अन् विश्वास डोळ्यांत.
कधीच वाटलं नव्हतं,
फसवशील एका क्षणात.
आज ती गाथा विसरली,
ज्याला 'मैत्री' म्हटलं.
अश्रूंनी डोळे भरले,
जेव्हा तुझं रूप कळलं.
या काव्यपंक्तीतले हे शब्द ऐकून तुमच्या अंगावर शहारा आला असेल.. मृत्यूनंतर मात्र आयोध्या यांच्या आत्म्याने कदाचित हेच बोल पुटपुटले असतील... त्यामुळे मित्रत्व करत असताना चाहू बाजूने विचार केला पाहिजे... मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करणं एवढं महागात पडेल अस आयोध्याला कधीच वाटलं नव्हतं. प्रेमाच्या या गणिती काटकोन त्रिकोणातील प्रेमाचा अंत एवढा भयान आणि भीषण होईल.. याचा स्वप्नात विचार देखील केला नाही. आणि याच घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे...
MY END PTC
MAHENDRAKUMAR MUDHOLKAR BEED
3
Report