Back
गणेश खिंड: पावसाळ्यातील निसर्गाची अद्भुत सौंदर्य!
Junnar, Maharashtra
Feed 2C
Slug: Junnar Ganesh Khind
File:02
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: सध्या पावसाळा सुरू झाला असून पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्यातील गणेश खिंड परिसरातील निसर्ग वैभव बहरलंय उंचकड्याच्या डोंगरावरती टेकलेले ढग हिरवागार निसर्ग सोसाट्याचा वारा कोसळणारा मुसळधार पाऊस हे सार निसर्ग वैभव मन प्रसन्न करून टाकतय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Parbhani, Maharashtra:
अँकर- शक्तीपीठ महामार्गाला सर्वत्र विरोध होत असून परभणी जिल्ह्यात ही आज तीन ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन मोजणी करण्यापासून अधिकार्यांना शेतकर्यानी रोखलय,परभणी तालुक्यातील पिंगळी,आंबेटाकळी आणि सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथे शेतकर्यांनी अधिकर्यांना शेतात पाय टाकु दिला नाहीये, दिवसेंदिवस शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होतोय.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास कल्याण डोंबिवलीत सत्तांतर होणार ?? की शिवसेना शिंदे गट आणि भाजपा पुन्हा बाजी मारणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून रंगली होती . महिनाभरापूर्वी राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले . त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला .त्यानंतर या चर्चेला आणखीनच बळ मिळालं . दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा आता दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उघडपणे करू लागलेत
Vis
मनसे पक्ष स्थापनेनंतर महापालिका निवडणुकीत मनसेची घोडदौड
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 2009 मध्ये मनसेने जोरदार मुसंडी मारत दोन आमदार निवडून आणले होते त्या पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल 29 नगरसेवक निवडून आणले होते मात्र त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली 2015 च्या निवडणुकीत मनसेला अनेक नेत्यांनी सोडचिट्टी दिली परिणामी मनसेला अवघ्या नऊ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं .
Vis मनसे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची घोडदौड सुरूच होती 2010 च्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले असले तरी शिवसेनेच्या महापौर बसला होता त्यानंतर झालेल्या 2015 च्या निवडणुकीत देखील शिवसेनेने बाजी मारत तब्बल 53 नगरसेवक निवडून आणले आणि भाजप सोबत युती करत भाजपमहापौर पद काबीज केलं होतं
Vis
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची पीछेहाट
एकंदरीतच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे असे दोन गट पडले त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचा वर्चस्व पाहता कल्याण डोंबिवली महापालिका महापालिकेच्या तब्बल 47 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.. मातब्बर पदाधिकारी देखील शिंदेंच्या गटात गेले. त्यामुळे ठाकरे गटाकडे अवघे आठ नगरसेवक आहेत. महाविका स आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद फारशी नाही त्यामुळे या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटासमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे आहे
Vis..
गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा श्रीकांत शिंदे यांनी पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार पराभूत करण्यात शिंदेंना यश आले. दुसरीकडे भाजपाला लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कल्याण पूर्व आणि डोंबिवली या दोन जागा राखत आपला करिष्मा कायम ठेवला. सध्या कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना शिंदे गट भाजप अजित पवार राष्ट्रवादी गटाचे पारडे निश्चितच जड आहे ..
Vis महायुती
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता तर विधानसभा निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले
एकंदरीतच लोकसभा विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारी पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र आल्यास विरोधकांना कडवं आवाहन उभे राहू शकतं असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय
दरम्यान या दोघांची युती झाल्यास येत्या महापालिका निवडणुकांमध्ये त्याचे काय परिणाम होतील याबाबत राजकीय जाणकारांनी विविध मत व्यक्त केली आहेत .
Byte :- राजकीय विश्लेषक
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित सूर आवळल्यानंतर मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला त्यानंतर येत्या पाच तारखेला दोघांचे एकत्रित जाहीर सभा होणार आहे . अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर असल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते दोघांचे युती होणार का? दोघं काय निर्णय घेतात ? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे
byte.. विजय राऊत
राजकीय विश्लेषक
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे पदाधिकाऱ्यांची उद्याच्या जल्लोष मेळाव्याची तयारी..
उद्या मुंबई वरली डोम येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजय मेळाव्यासाठी कल्याण मधील उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिक हे दोघे एकत्र येत शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये उद्याच्या जल्लोष मेळाव्याची तयारी करताना नियोजन व तयारी सुरू असताना दोन्ही पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
चौपाल..मनसे, शिवसेना उद्धव ठाकरे गट..
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग -पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातल्या डॉक्टर महिलेची हाताच्या नसा कापून आत्महत्या.
अँकर - सांगलीच्या इस्लामपूर नजीक पुण्यातील एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.शुभांगी वानखडे,वय 44 असे या डॉक्टर महिलेचे नाव असून स्वतःच्या गाडीत ब्लेडने हाताचे नस कापून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.पुणे-बंगळुरू महामार्गावरील विठ्ठलवाडी येथे शुभांगी वानखडे,या गाडीच्या शेजारी मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत या प्रकरणी तपास सुरू केला होता.
ज्यामध्ये शुभांगी वानखडे यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगितलं आहे.शुभांगी वानखडे,या पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करत होत्या,घटनेच्या दिवशी त्या पुण्यातून हॉस्पिटलला जाण्यासाठी घरातून निघाल्या,यानंतर त्या थेट कोल्हापूरच्या निपाणी पर्यंत आल्या,त्यानंतर पुन्हा पुण्याकडे जात असताना,त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी येथे पुणे बंगळूर महामार्गावर त्यांनी आपल्या गाडीत स्वतःच्या हाताच्या नसा ब्लेडने कापून आणि मानेवर वार करून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांनी सांगितला आहे.
बाईट - संजय हरुगडे - पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे,इस्लामपूर.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर-परभणीच्या जिंतूर तालुक्यातील उखळी - झरी रस्त्याचे मजबुतीकरणाच काम सुरू आहे. पण पक्क काम अद्याप झाले नसल्याने या रस्त्यावर मोठा चिखल झालाय, या चिखलात परभणी उखळी ही बस रुतल्याने प्रवाश्यांना तास भर ताटकळत पडावे लागले होते. या मार्गावर अनेक गाव आहेत, हा मार्ग हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ गावाकडे ही जात असतो. त्यामुळे यामार्गावर चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची सतत वर्दळ असते. या चिखलात महामंडळाची बस फसली होती,सदर बसला ट्रॅक्टरव्दारे ओढून काढण्याची वेळ आली होती,
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0407ZT_WSM_DAM_WALL_TREE
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कुकसा लघु सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे प्रकल्पाच्या भिंतीला धोका निर्माण झाला असून, भिंतीला तडा गेल्यास कुकसा, जोगेश्वरी, अंचळ, तपोवन, जायखेडा आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशा सनाला वारंवार निवेदने देऊनही भिंतीवरील झाडे काढण्यात आले नसल्यानं याकडे सिंचन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी केला आहे.गेल्या पाच वर्षांत कुकसा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला,मात्र प्रकल्पाच्या भिंतीवर झाडे आणि झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे प्रकल्पात आधीच पाण्याचा साठा जास्त आहे.अशा परिस्थितीत भिंत फुटल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, त्यामुळे ग्रामस्थांकडून यासंदर्भात वाशिम जिल्हाधिकारी,लघु सिंचन विभाग व पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले असून अनदोलनाचा इशारा दिला आहे.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- एकीकडे राज्यांमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब होत आहे कांद्यावर जाहीर झालेले अनुदान अद्याप मिळालेले नसताना कांदा दरात देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे या संदर्भात नाफेड मार्फत कांदा खरेदी न करता भावंतर योजना राबवावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तहसील कार्यालय येवला येथे निवेदन देण्यात आले याप्रसंगी येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. प्रसंगी येवला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
Share
Report
Beed, Maharashtra:
FEED : Cow's life saved 01,02
बीड : तहसील आवारात गायीची तडफड... तलाठ्यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी
Anc : पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. व्यायामासाठी बाहेर पडलेल्या तलाठी मित्रांनी आवारात एका गाईला अर्धमरणावस्थेत पाहिलं… आणि चालत पुढे न जाता थांबले. तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. काही वेळातच गायीची प्रकृती सुधारली. ही केवळ मदत नव्हती, तर सामाजिक जाणीव आणि माणुसकीचं जिवंत उदाहरण होतं. आज एक गाय वाचली... आणि समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
उद्धवराज एकत्रित येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष....
बुलढाण्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना
अँकर - अनेक वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित येत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. ठाकरे एकत्रित यावेत हीच जनमानसाची भावना आहे असा मानस बाळगून कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करीत आहेत... दरम्यान मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या भावना जाणून घेतले आहेत आमची प्रतिनिधी मयूर निकम यांनी.....
Wkt - मयूर निकम, प्रतिनिधी
कार्यकर्ते
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0407ZT_JALNA_MARHAN(1 FILE)
जालना | मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण,चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल,2 संशयीतांना अटक
अँकर: जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडीलाला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून याप्रकरणी जालन्यातील चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.
0
Share
Report