Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gadchiroli442605

गडचिरोली: पुरात अडकलेल्या 80 प्रवाशांची सुरक्षित मदत!

AAASHISH AMBADE
Jul 08, 2025 17:33:06
Gadchiroli, Maharashtra
Feed slug :--- 0807ZT_GAD_BUS_FLOOD_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी रस्त्यावर एक एसटी आणि एक लक्झरी बस पुराच्या पाण्यात अडकली , गाढवी नदीचे पाणी वाढल्याने ठाणेगाव या गावाच्या आधी दोन्ही बसमधील सुमारे 80 प्रवासी अडकले, प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचत दिल्ली मदत, सर्व प्रवासी सुरक्षित     अँकर:-- एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत होत आहे. यामुळे खालच्या भागात गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या सर्वच नद्यांना पूर आलाय. पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या एक एसटी आणि एक लक्झरी अशा 2 बस पाणी पातळी वाढल्याची माहिती नसल्याने ठाणेगाव येथे पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. गाढवी नदीचे पाणी वाढल्याने या दोन्ही बसेस ठाणेगाव परिसरात अडकल्या आहेत. हा गडचिरोलीला येणारा मुख्य महामार्ग आहे. दरम्यान याची माहिती मिळाल्यानंतर आरमोरी येथून पोलीस निरीक्षक स्वतः हायवा वाहनात बसून प्रवाशांपर्यंत पोहोचले आहेत. ठाणेगाव येथे नागरिकांच्या निवास भोजनाची व्यवस्था प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे. सर्वच प्रवासी सुरक्षित असून पाण्याचा प्रवाह वाहता नसला तरी रात्रीची वेळ असल्याने प्रशासनाने सर्वच खबरदारी घेत प्रवाशांना मदत पोहोचविली आहे. बाईट १) उषा चौधरी, तहसीलदात, आरमोरी आशीष अम्बाडे झी मीडिया  गडचिरोली
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Aug 31, 2025 04:33:16
kolhapur, Maharashtra:
Ngp Dakshinamurti Ganesh live u ने फीड पाठवले --------------- नागपूर -- तामिळनाडू मधील तंजावर जिल्ह्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक बृहदेश्वर शिव मंदिराचे दर्शन तुम्हाला नागपूरात घ्यायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल महाल भागातील दक्षिणामुर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळात... नागपुरातील सगळ्यात जुन्या गणेशोत्सव मंडळा असलेल्या दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळ यंदा 106 व वर्ष साजर करत असून अगदी कमी जागेत भव्य मंदिर इथं साकारला आहे, बृहदेश्वर शिव मंदिरात असलेल्या 13 फूट उंचीच्या शिव लिंगाची प्रतिकृती इथं साकारली असून 14 फूट उंचीवर बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे, बाप्पांची मूर्ती देखील विलक्षण असून 14 फूट उंचीवरून 11 फुटाचा बाप्पा जणू आकाशातून आपल्याला आशीर्वाद देतोय असा भास होतो.. या देखाव्याचा आढावा घेत मंडळाचा वैशिष्ट्य पाहुयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्यासोबत.. ------- बाईट -- विवेक धाकरस, कोषाध्यक्ष, दक्षिणामुर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 31, 2025 04:20:09
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील शास्त्रीनगरातील गणेशोत्सवात सामाजिक संदेशाचा देखावा तयार करण्यात आला आहे. शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या नीता शर्मा दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या घरी समाजप्रबोधन करणारे देखावे साकारत असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांची उत्सुकता कायम असते. यंदा नीता शर्मा यांनी "सात्विक जीवन विरुद्ध जंक फूड" हा विषय निवडून एक आगळावेगळा देखावा सादर केला आहे.या देखाव्यात जुन्या काळातील पारंपरिक स्वयंपाकघरातील भांडी, साहित्य, आरोग्यदायी पदार्थ यांचे चित्रण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला आधुनिक मॉड्युलर किचनमधून मिळणारे जंक फूड दाखवण्यात आले आहे. सात्विक आहाराच्या तुलनेत जंक फूडमुळे होणारे दुष्परिणाम अधोरेखित करत नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही या सामाजिक संदेशाने सजवलेल्या देखाव्याला मोठी गर्दी होत असून, प्रेक्षकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
2
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 31, 2025 04:19:39
Bhandara, Maharashtra:
गोंदिया जिल्ह्यातील बटाना येथील रहांगडाले परिवाराचे तीन घर जळून खाक... काल 8 रात्रीच्या सुमारास लागली भीषण आग.. आगीत धनधान्य, रोकड, आणि सोन्याची आभूषणे असे एकूण 25 लाख रुपयांचा माल जळून खाक .. Anchor : काल रात्रीच्या सुमारास पंकज रहांगडाले आणि त्यांच्या परिवारातील सदस्य त्यांचे भाऊ इतर सदस्य बाजूला गणपतीच्या आरती करीता गेले असता घराला भीषण आग लागली, ही आग शॉर्टसर्किटमुळे मुळे लागल्या असल्याची शक्यता वर्तवली जात असून याआगीत रहांगडाले परिवाराचे जे होते ते नव्हतं केलं. घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले, लहान मुलांचे कपडे पुस्तके, इलेक्ट्रॉनिक सामान, सोबतच अलमारी ठेवलेले रोकड आणि सोन्याची आभूषणे सुद्धा या आगीत भस्मसात झाली, या आगीमुळे या तिन्ही भावांचे घर जवळपास 25 लाख रुपयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,
8
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 31, 2025 04:19:31
Latur, Maharashtra:
*लातूर ब्रेकिंग.* स्किप्ट ::- लातूर मधून मराठा आंदोलकांना भाजी भाकरीची व्यवस्था, 20हजार भाकरी आणि शेंगा चटणी मुंबईकडे रवाना... AC::- मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजाचा पाठिंबा मिळतो आहे. आंदोलनकर्त्यांच्या रोजच्या भोजनाची सोय विविध जिल्ह्यांतून होत आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातून तब्बल वीस हजार भाकरी आणि 200 किलो शेंगदाण्याची चटणी मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. लातूरकरांनी दिलेल्या या मदतीमुळे उपोषणकर्त्यांच्या अन्न पुरवठ्याची मोठी व्यवस्था झाली आहे.
5
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 31, 2025 04:19:22
Kalyan, Maharashtra:
कल्याण पश्चिम गांधारी परिसरातील रॉयस गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट कोसळली सहाव्या मजल्यावरून कोसळून लिफ्ट कोसळून अपघात. लिफ्टमध्ये आठ जण होते यातील चार जणांना गंभीर दुखापत कल्याण चया खाजगी रुग्णालयात दाखल.. रॉईस इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अंकित मेस्त्री या मित्राच्या घरी गणेश दर्शनासाठी गेले असताना झाला हा अपघात गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्ट मेंटेनेस नसल्याचा इमारतीतील रहिवाशांचे म्हणणे इमारतीला दोन लिफ्ट आहेत मग नादुरुस्त लिफ्ट चालू ठेवून रहिवाशांच्या जीवाशी खेळ का केला असा प्रश्न उपस्थित होत आहे राईस इमारत आठ मजल्याची असून अपघातानंतर इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर वाईट :- हेमंत कुंभार. पीडित
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 31, 2025 04:03:15
Washim, Maharashtra:
वाशिम: File:3108ZT_WSM_OPERATION_SINDOOR_SCENE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम. अँकर: विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवानिमित्त वाशीमच्या मंगरुळपीर येथील अर्चना वाढणकर आणी वाढणकर कुटुंबियांनी सामाजिक जाणीव व देशभक्तीचा संदेश देणारा देखावा साकारला आहे.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे शत्रूचा बदला घेतल्याचे या देखाव्यात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. मोठ्या संकटसमयी सरकारने दाखवलेले धैर्य, संकटहरणासाठी दिलेला आधार आणि राष्ट्ररक्षणाची बांधिलकी यांचे दर्शन या देखाव्यात घडते.हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.वाढणकर परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, गणेशोत्सवाला देशभक्तीची जोड मिळाल्याने वातावरणात विशेष उत्साह संचारला आहे. बाईट : अर्चना वाढणकर,मंगरूळपीर
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 31, 2025 04:02:37
Akola, Maharashtra:
Anchor: अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील मन नदीत दुर्दैवी घटना घडली आहे. तीन युवक पोहण्यासाठी नदीत उतरले असता, अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तिघांपैकी करण वानखडे हा युवक वाहून गेला आहे.पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण प्रवाहात अडकले. त्यापैकी दोघांनी संघर्ष करून आपले जीव वाचवले, मात्र करण वानखडे पाण्याबाहेर येऊ शकला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, प्रशासनाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले असून, शोध पथक नदीपात्रात पाहणी करत आहे. अद्याप बेपत्ता युवकाचा शोध लागलेला नाही.नदीकाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी झाली आहे.
3
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 31, 2025 04:02:32
Pandharpur, Maharashtra:
31082025 Slug - PPR_PATIL_POLITICAL file 01 ---- Anchor - मनोज जरांगे यांची ही सगळी धडपड राजकीय आरक्षणासाठी, आम्हाला गावचे सरपंच पद हवं आहे यासाठी सुरू असल्याचा आरोप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ओबीसी दाखल्याद्वारे निवडणुका लढवता येणार नाहीत ते फसव समाधान आहे. फसव समाधान हवा असेल तर घ्या. दाखला मिळाला म्हणून निवडणूक लढवता येणार नाही. त्यासाठी पडताळणी लागते 10 टक्के एस ई बी सी आणि ई डब्ल्यू एस आरक्षण मध्ये सगळं होतं. त्यात काय नव्हतं त्यात फक्त राजकीय आरक्षण नव्हतं आता सगळी चाललेली धडपड ही फक्त राजकीय आरक्षणासाठी सुरू आहे. आम्हाला गावचे सरपंच पद पाहिजे यासाठी सुरू आहे. असा थेट आरोपच चंद्रकांत पाटलांनी केला आहे --- बाईट चंद्रकांत पाटील
2
comment0
Report
CFChandrakant Funde
Aug 31, 2025 03:48:09
Pune, Maharashtra:
Feed by tvu Ncp meeting ftg Ncp patil pkg ptc & shots पुणे मनपात भाजपने अजून स्वबळाचा जाहिर नारा दिला नसला तरी प्रभाग रचतेतून अशी काही तोडफोड केली की आज अखेर अजित पवारांना स्वबळाचा नारा देणं भाग पडलंय...पाहुयात पुणे मनपाच्या राजकारणातली ही मोठी घडामोड.... Play pkg Last line Mini montage पुणे मनपात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार अजित पवारांचे बैठकीत नगरसेवकांना स्पष्ट संकेत पुणे मनपात महायुतीतच उभी फाईट रंगणार!!! व्हीओ...गेल्या टर्मला पुणे मनपात भाजपची स्वबळावर सत्ता आलेली असल्याने यावेळीही भाजपला पालिकेची निवडणूक स्वबळावरच लढवायचीय...हे एक उघड गुपित हे...पण हेच कटुसत्य आपल्या नव्या मिञ पक्षाला थेट तोंडावर कसं सांगायचं ? असा प्रश्न भाजप धुरिणांना नक्कीच पडला असणार कदाचित म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या नगर विकास खात्याने प्रभाग रचनाच अशी काही तोडफोड केली की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय वर्चस्व उपनगरांमधून गेल्यावेळी निवडून आलेले सगळेच नगरसेवक अस्वस्थ होऊन गेले...म्हणूनच अजित पवारांनी या सगळ्या नाराज नगरसेवकांची बैठक लावून त्यांना सरळ स्वबळाचाच नारा देऊन टाकला... Mid ptc चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी, पुणे व्हीओ...वडगावशेरी, हडपसर, कोंढवा, धनकवडी या भागात एनसीपीच्या प्रभागांची मोठी तोडफोड केली गेलीय...म्हणून अजित पवारांनी या सर्वांना स्वबळाचा कानमंञ दिल्याचं पक्ष पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर येताच पालिकेवर थेट राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार असल्याची वल्गना करून टाकली बाईट...रुपाली पाटील ठोंबरे, कार्याध्यक्ष, एनसीपी व्हीओ...पुणे मनपात गेल्या टर्म ला 98 तर राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक होते, त्यामुळे पुणे मनपात यावेळीही हे दोनच पक्ष समोरासमोर येणार हे उघड उघड दिसत होतं पण मध्यंतरी अजित पवारच सत्तेसाठी महायुतीत सामिल झाल्याने मनपा निवडणुकीत महायुतीचं कसं होणार? याचा प्रश्न अनेकांना पडला होता...पण आता अजित पवारांनीच राजकीय अपहार्यता म्हणून पक्ष बैठकीत स्वबळाचा नारा दिल्याने पुणे मनपा निवडणुकीचं चिञ आता बऱ्यापैकी सुस्पष्ट झालंय... कँमेरामन विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे
5
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 31, 2025 03:33:48
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DAM_WKT दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अखेर अप्पर वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; सात दरवाजे उघडले, धरण परिसरात पर्यटकांची गर्दी अँकर :– पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे अखेर 7 दरवाजे उघडण्यात आले आहे. 13 पैकी 7 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले असून वर्धा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मध्य प्रदेश आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तीन दिवसापासून अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे सुरूच असून यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अप्पर वर्धा धरणात 92 टक्के इतका जलसाठा आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. WKT
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 31, 2025 03:32:31
Nashik, Maharashtra:
nsk_japti feed by mojo ब्रेकिंग न्यूज सिन्नर वळण रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर कारवाई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला न दिल्याने मुख्य अभियंता आणि लिपिक यांची खुर्ची ताब्यात महामार्ग विभागाच्या कार्यालयात संगणक, प्रिंटर सुद्धा करण्यात आले जप्त न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकऱ्यांची थेट कारवाई माजी सरपंच बाजूनाथ शिरसाठ यांच्यासह 12 15 शेतकऱ्यांनी केलेल्या याचिकी नंतर न्यायालयाच्या नोटिशीवर कारवाई अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून नाशिकमध्ये महामार्ग विभागा ला तीन वेळेस देण्यात आली होती मुदत शेतकऱ्यांनी मिळवलेल्या नऊ जप्ती आदेशापैकी केवळ झाली दोन आदेशांची अंमलबजावणी अद्याप सात आदेशांची अंमलबजावणी बाकी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भूसंपादनातील घोळ समोर
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 31, 2025 03:32:19
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - इतक्या दिवस जरांगे पाटील लढले, त्यांच्या हाडाचे पार सापड झाली आहेत - रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकर, माजी आमदार ऑन जरांगे पाटील उपोषण.. - मी आमदार होतो त्यावेळी ही माझी बाजू मांडली - सर्वसामान्य लोकांना शिक्षण आणि नोकरीच्या प्रॉब्लेम आहेत - सर्वांना न्याय आणि भाकरीही मिळाली पाहिजे - जरांगे पाटील यांचे आरक्षणाबाबत माफक अपेक्षा आहे - मराठा समाजातील नागरिक श्रीमंत नाही, मराठवाड्यातील भाग हा रांजलेला गाजलेला आहे. - पण मराठा मराठा जे म्हणतो, ती परिस्थिती आज नाही - *मराठा समाजाची एक स्त्री आली होती मी स्वतः त्यांची फी दिली.* - जरांगे पाटलांची मागणी सरकारने सोडवली पाहिजे - *मागील नेत्यांनी आश्वासन दिली होती, आता ते सर्व सत्तेत आले आहेत* - नेत्यांनी दहा वर्षांपूर्वी जे भाषणातून बोलले होते ते आता द्यायचा आहे - धनगर समाजालाही देतो, म्हणले होते ते दिले का नाही माहित नाही मला - *रवींद्र धंगेकर यांचा सरकारला घरचा आहेर* - मुस्लिम समाजालाही देतो म्हणले होते, दिले का माहित नाही - क्रांती करायला निघालेले ते लोक आहेत. त्यांना काय मिळू.. नाही मिळू... मात्र ते घेऊन येणार - इतक्या दिवस जरांगे पाटील लढले, त्यांच्या हाडाचे पार सापड झाली आहेत *ऑन राज ठाकरे विधान* - राज ठाकरे बद्दल मी काय बोलणार, त्यांना जे माहिती आहे मला माहिती नाही - एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचा चेहरा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली - त्यांना बघून मतदान केलं आणि निवडून येताना त्यांचे मोठे योगदान - राज ठाकरेंना वाटत असेल हे एकनाथ शिंदे सोडू शकत असतील मात्र ते त्यांचे मत आहे - कुणी का होईना मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे *ऑन पुणे महानगरपालिका..* - आम्ही लढणारी लोक आहोत, जो मुंबईत होईल - शिंदे साहेबांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी आपली यंत्रणा सुरू करायची - पुणे असेल सोलापूर असेल कार्यकर्ते तयार आहेत Byte : रवींद्र धंगेकर, माजी आमदार
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 31, 2025 03:17:32
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अखेर सोलापूरकरांच्या लढ्याला मिळाले यश, डीजे लेझरवर गणेशोत्सव काळात दहा दिवस बंदीचे निघाले लेखी आदेश - सोलापूरकरांच्या डॉल्बीमुक्ती लढ्याला अखेर मिळाले यश - गणेशोत्सव काळात दहा दिवस डॉल्बी लेझरवर घालण्यात आली बंदी - महाराष्ट्रातील फक्त एकमेव सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी फर्मान - जिल्हा प्रशासनाच्या कठोर निर्णयाचे सोलापूरकरांकडून स्वागत - शहर डॉल्बीमुक्त झाले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची करण्यात आली होती आंदोलन - अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आला लेखी आदेश
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 31, 2025 03:16:48
Nashik, Maharashtra:
ब्रेकिंग न्यूज – शरद पवारांचा नाशिक दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फुंकणार रणशिंग १४ व १५ सप्टेंबर दोन दिवस शरद पवारांचा नाशिक जिल्हा दौरा १४ सप्टेंबरला दिंडोरी येथे कार्यकर्त्यांचे शिबिर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखली जाणार १५ सप्टेंबरला नाशिक शहरात भव्य शेतकरी मोर्चा कर्जमाफी, हमीभाव, विमा आदी मागण्यांवर होणार आवाज दौऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार
3
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 31, 2025 03:16:43
kolhapur, Maharashtra:
नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे... ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरता मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे... तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात संविधान चौकात हे साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी साखळी उपोषणाला पहिल्या दिवशी प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांनी उपस्थिती लावली... भाजपाचे आमदार आशिष देशमुख, आमदार परिणय फुके, काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी,खासदार नामदेव किरसान या सह अनेक आजी-माजी आमदार तसेच काही नेत्यांनी उपस्थिती लावत या आंदोलनाला पाठिंबा दिला
5
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top