Back
जरांगे पाटील यांच्या लढ्यात हाडाचे पार सापडले - रवींद्र धंगेकर
AAABHISHEK ADEPPA
Aug 31, 2025 03:32:19
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - इतक्या दिवस जरांगे पाटील लढले, त्यांच्या हाडाचे पार सापड झाली आहेत - रवींद्र धंगेकर
रवींद्र धंगेकर, माजी आमदार
ऑन जरांगे पाटील उपोषण..
- मी आमदार होतो त्यावेळी ही माझी बाजू मांडली
- सर्वसामान्य लोकांना शिक्षण आणि नोकरीच्या प्रॉब्लेम आहेत
- सर्वांना न्याय आणि भाकरीही मिळाली पाहिजे
- जरांगे पाटील यांचे आरक्षणाबाबत माफक अपेक्षा आहे
- मराठा समाजातील नागरिक श्रीमंत नाही, मराठवाड्यातील भाग हा रांजलेला गाजलेला आहे.
- पण मराठा मराठा जे म्हणतो, ती परिस्थिती आज नाही
- *मराठा समाजाची एक स्त्री आली होती मी स्वतः त्यांची फी दिली.*
- जरांगे पाटलांची मागणी सरकारने सोडवली पाहिजे
- *मागील नेत्यांनी आश्वासन दिली होती, आता ते सर्व सत्तेत आले आहेत*
- नेत्यांनी दहा वर्षांपूर्वी जे भाषणातून बोलले होते ते आता द्यायचा आहे
- धनगर समाजालाही देतो, म्हणले होते ते दिले का नाही माहित नाही मला
- *रवींद्र धंगेकर यांचा सरकारला घरचा आहेर*
- मुस्लिम समाजालाही देतो म्हणले होते, दिले का माहित नाही
- क्रांती करायला निघालेले ते लोक आहेत. त्यांना काय मिळू.. नाही मिळू... मात्र ते घेऊन येणार
- इतक्या दिवस जरांगे पाटील लढले, त्यांच्या हाडाचे पार सापड झाली आहेत
*ऑन राज ठाकरे विधान*
- राज ठाकरे बद्दल मी काय बोलणार, त्यांना जे माहिती आहे मला माहिती नाही
- एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचा चेहरा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली
- त्यांना बघून मतदान केलं आणि निवडून येताना त्यांचे मोठे योगदान
- राज ठाकरेंना वाटत असेल हे एकनाथ शिंदे सोडू शकत असतील मात्र ते त्यांचे मत आहे
- कुणी का होईना मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे
*ऑन पुणे महानगरपालिका..*
- आम्ही लढणारी लोक आहोत, जो मुंबईत होईल
- शिंदे साहेबांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी आपली यंत्रणा सुरू करायची
- पुणे असेल सोलापूर असेल कार्यकर्ते तयार आहेत
Byte : रवींद्र धंगेकर, माजी आमदार
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 01, 2025 03:00:12Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 0109ZT_MAVAL_DEKHAVA
Total files : 05
Headline : मावळ मधील वाळुंज कुटुंबाने लाडक्या बाप्पाजवळ साकारला ऑपरेशन सिंदूर चा देखावा
Anchor :
मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे आगमन घरोघरी झाले आहे. त्यासाठी घरोघरी विविध संकल्पना राबवत लाडक्या बाप्पा समोर डेकोरेशन केले जाते. मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील महेंद्र वाळुंज यांच्या घरी या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले आहे. दरवर्षी वेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावे सादर करणारे वाळुंज यावर्षी समाजासमोर देशभक्ती जागवणारा एक अनोखा संदेश घेऊन आले आहेत. पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय जवानांनी केलेले “ऑपरेशन सिंदूर” यावर आधारित प्रभावी देखावा त्यांनी आपल्या घरी साकारला आहे. या देखाव्यात भारतीय जवानांची शौर्यगाथा, सीमेवरील परिस्थिती आणि दहशतवाद्यांचा केलेला प्रतिकार याचे हृदयाला भिडणारे चित्रण पाहायला मिळते. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा कागदी पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंमधून साकारण्यात आला आहे. पर्यावरणाचा विचार करून, कमी खर्च आणि मर्यादित वेळेत, अवघ्या दहा दिवसांत उभारलेला हा देखावा आकर्षक ठरला आहे. यात पत्नी, मुले आणि आई यांनी महेंद्र वाळुंज यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. विशेष म्हणजे हा देखावा भारतीय जवानांना समर्पित करण्यात आला आहे.आजच्या पिढीला पहलगामसारख्या हल्ल्यांची भीषणता आणि त्याला उत्तर देणाऱ्या जवानांचे शौर्य जवळून दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यातुन साकार केला गेला आहे. बाप्पाच्या दरबारात भक्तीबरोबरच देशभक्तीची जाज्वल्य भावना जागृत व्हावी, समाजाने जवानांविषयी कृतज्ञता बाळगावी आणि तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हा यामागचा वाळुंज कुटुंबाचा उद्देश आहे. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt Chaitralli (file.no.04)
बाईट : महेंद्र वाळुंज (file no.05)
0
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 01, 2025 02:46:42Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nmc_tax
घरपट्टीसाठी तीन महिने आत भरात तर मनपा करणार ९५ टक्क्यांपर्यंत दंडमाफी....
अँकर
नाशिक महानगरपालिकेकडून मागच्या वर्षी शास्तीवर तब्बल ९५ टक्के माफी देऊन अभय योजना महापालिकेकडून राबविण्यात आली होती, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे नियमित करदात्यांसाठी मनपाकडून १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ९५ टक्के दंड माफ, तर १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ८५ टक्के दंड माफ करण्यात येणार आहे...मालमत्ताधारकांनी त्याचा लाभ घेत कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा महापालिकेने रेकॉर्डब्रेक २५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला. त्यात सवलत योजना महत्त्वपूर्ण होती. नियमित करदात्यांना प्रोत्साहन म्हणून महापालिका करसंकलन विभाग सवलत योजना राबवते. मालमत्ताधारकांनी सवलतीच्या कालावधीत कर भरणा केल्यास त्यांना एकूण बील रकमेवर आठ टक्के सूट दिली जाते. हाच कर भरणा ऑनलाइन अदा केल्यास दहा टक्के सूट मिळते. आर्थिक सवलत मिळत असल्याने मालमत्ताधारकही त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. मागील वर्षी या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११० कोटींचा मालमत्ता कर भरणा झाला होता.....
0
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 01, 2025 02:45:51Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_visrjan
पाचव्या दिवशी सुमारे ४० हजार मूर्तीचे संकलन
अँकर
नाशिक महापालिकेच्यावतीने विसर्जनाच्या पाचव्या दिवशी सुमारे ४० हजार मूर्तीचे संकलन करण्यात आले आहे.... पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाकडून श्रीगणेश विसर्जनासाठी २९ नैसर्गिक, तर जलप्रदूषण टाळण्यासाठी ५६ कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले होते. ज्या भाविकांकडे पी.ओ.पी.च्या मूर्ती होत्या, त्या विसर्जनासाठी महापालिकेने विनामूल्य अमोनियम बायकार्बोनेट पावडरची व्यवस्था केली होती. या पावडरमुळे पी.ओ.पी.च्या मूर्ती सहजपणे विरघळतात आणि प्रदूषण टाळले जाते. जीवरक्षक दलांची नेमणूक केली होती... भक्ती भावाने पाचव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आलाय...
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 02:01:59Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_CSN_RATION(1 FILE)
छत्रपती संभाजीनगर :रेशन दुकानावरून धान्याऐवजी थेट अनुदान,जानेवारी 2025 चे अनुदान रखडले, अनुदान देण्याची मागणी
अँकर : राज्य सरकारने रेशन दुकानातून गोरगरीब शेतकरी कुटुंबाना अन्न धान्या ऐवजी थेट रोख अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी 2025 पासून लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही.राज्य सरकारने जिल्ह्यासाठी तब्बल 15 कोटी रुपयांचा अनुदान मंजूर केले मात्र हे अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळालेलं नाही.थकीत अनुदान देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 01, 2025 02:01:49Bhandara, Maharashtra:
गणेशपूर येथे ८५ फूट उंचीच्या स्वर्णद्वारी पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान...
Anchor : - भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून लोकमान्य टिळकांनी रुजविलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेला मागील अडीच दशकांहून अधिक काळ गावकऱ्यांनी सातत्याने उजाळा दिला आहे. यंदाच्या मंडपाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तिरुअनंतपुरम येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची साकारलेली भव्य प्रतिकृती सन्मित्र गणेश मंडळातर्फे उभारण्यात आलेला हा देखावा मंदिरातील सहा सुवर्णद्वारांची कलात्मक रचना, प्राचीन शिल्पकलेचा राजेशाही ठसा आणि शेषनागावरील प्रभू विष्णूची देखणी मूर्ती भाविकांना विशेष भावते
BYTE :- राधे भोंगाडे,
BYTE :- भाविक
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 01, 2025 02:01:25Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0109_BHA_BUFFALO_RESCUE
FILE - 5 VIDEO
सरपंचांने दिले म्हशी ला जीवदान
Anchor - लाखनी शहरातील लहान पुलावर नॅशनल महामार्गाने नाला तयार केला होता. मात्र त्या नाल्यावर मोठे पॅच होते तिथून म्हशी चा झुडं जात असताना त्या पॅच मध्ये ऐक म्हश त्या मध्ये अडकल्याची माहिती मुरमाडी चे सरपंच शेषराव वंजारी यांना कळताच जेसीबी बोलावून त्या म्हशी ला तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आले असून सरपंच वंजारी यांचं गावात कौतुक होत आहे.
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 01:46:53Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_CSN_AGRI_STACK(3 FILES)
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पावणे दोन लाख शेतकरी अँग्री स्टॅकपासून दूर
अँकर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावणे दोन लाख शेतकरी अँग्री स्टॅक नोंदणी पासून दूर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना आता अँग्रिस्टॅकची नोंदणी करून फार्मर आयडी क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांनाच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी अँग्रिस्टॅकची नोंदणी करणे अनिवार्य असताना जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार 222 शेतकरी यापासून दूर असल्याची माहिती समोर आलीय.
7
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 01, 2025 01:46:43Bhandara, Maharashtra:
चित्रा वैद्य यांनी रांगोळीतून साकारली 3D गणरायाची प्रतिकृती.
Anchor : भंडारा येथील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी दोन दिवस मेहनत घेत ४/३ फुटांची गणरायांचे बालस्वरूप दाखविणारे ३D रांगोळी चित्र काढले आहे. ही रांगोळी चित्र हुबेहूब मूर्तीचे स्वरूप दिसत असून भक्तांसाठी दर्शनाचे मध्यम ठरत आहे.रांगोळी कलेतून गणपती बाप्पा बद्दल असलेली भक्ती रेखाटल्याचे रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी सांगितले आहे.
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 01:46:22Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_CSN_CORPORATION(1 FILE)
छत्रपती संभाजीनगर : 44 टक्के अधिकारी, कर्मचारी ई-ऑफिसचा वापर करत नसल्याने कारवाईचे प्रशासकांचे आदेश
अँकर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा संपूर्ण कारभार अलीकडेच प्रशासक जी. श्रीकांत यांनी ऑनलाइन केला. प्रत्येक विभागाला फाइल आता ऑनलाइनच सादर करावी लागते. प्रशासकापर्यंत फाइल ऑनलाइनच मंजूर केली जाते. मात्र, अजूनही 44 टक्के अधिकारी-कर्मचारी ई-ऑफिसचा वापर करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासकांनी दिलेत.
6
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 01, 2025 01:45:29Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_WORKER_NIVEDAN
सातारा - पाचगणी नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी त्याचा 18 महिन्यापासून थकलेल्या पगाराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दरे गावात जाऊन निवेदन दिलं आहे.तब्बल 90 कंत्राटी सफाई कामगार यांचे 18 महिन्यांपासून निधी अभावी पगारच झालेले नाहीत त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.यावेळी नगर रचना विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार लवकरात लवकर करण्याचे आश्वासन शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे.
3
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 01, 2025 01:00:25Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून मुंबईत दंगली घडवण्याचा आमदार रोहित पवारांचा कट - भाजपा किसान सेल प्रदेशाध्यक्ष संदीप-गिड्डे पाटील.
अँकर - आरक्षणाचा पोपट आता मेला आहे,आरक्षण हा विषय संपला असून केवळ ओबीसीतून आरक्षण हा विषय राहिला आहे.असं विधान मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक व भाजपाचे किसान सेल प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे- पाटील यांनी केले आहे.मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात आता काही असुरी शक्ती राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने शिरल्या असून मुंबईमध्ये दंगली घडवण्याचा त्यांचा कट असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून हा कट करण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील संदीप गिड्डे पाटील यांनी केला आहे.
बाईट - संदीप गिड्डे-पाटील - मराठा क्रांती ठोक मोर्चा,राज्य समन्वयक .
11
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 01, 2025 01:00:10Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - राज्य सरकारने मागच्या वेळी मनोज जरांगे-पाटलांना जे सांगितले, ते तरी किमान द्यावे - खासदार शाहू महाराज.
अँकर - राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांना मागच्या वेळी जे सांगितलं होतं,ते तरी कमीन दिले पाहिजे,असं मत खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले आहे.
ते सांगलीच्या मिरजेमध्ये बोलत होते.मिरज या ठिकाणाहून मुंबईमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलनातील मराठा मावळ्यांना खाण्यापिण्याची रसद पाठवण्यात आली. छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये ही रसद मुंबईकडे रवाना करण्यात आली. वरती ट्रक भरून खाण्यापिण्याचे साहित्य मराठा समाजासह इतर समाजाने पाठवली. या कार्यक्रमाला कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी उपस्थिती लावली होती.
बाईट - छत्रपती शाहू महाराज - खासदार- कोल्हापूर.
4
Report
Waghapur, Maharashtra:
लोही (प्रतिनिधी): लोही (रामनगर) येथील प्रतिष्ठित नागरिक आणि सध्या मुंबई मंत्रालयात स्वीय सहायक म्हणून कार्यरत असलेले राजू काळे यांच्या घरी गेल्या 20 वर्षांपासून महालक्ष्मीची स्थापना केली जात आहे.
ही परंपरा त्यांच्या आई अंजनाबाई काळे यांनी सुरू केली होती. आज ती परंपरा राजू काळे यांच्या पत्नी वंदना काळे श्रद्धा आणि उत्साहाने पुढे नेत आहेत. मुंबई आणि अमरावतीसारख्या मोठ्या शहरात वास्तव्यास असूनही काळे कुटुंबाचे गावाशी असलेले नाते अधिक दृढ आहे. लोही (रामनगर) येथील ग्रामस्थ दरवर्षी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 31, 2025 17:46:14Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या प्रफुल डेहनकर कुटुंबीयांकडे झुल्यावर झुलवून गौराई महालक्ष्मी चं आगळं वेगळं स्वागत केल्या जातं. सोनियांच्या पावलांनी येणाऱ्या महालक्ष्मीसाठी स्टीलच्या साखळ्यांनी बांधलेली खास लाकडी बंगळी डेहनकर कुटुंब उभारते. ४७ वर्षांपासूनची ही पारंपारिक बंगळी असून त्यावर जेष्ठा व कनिष्ठा गौरींसोबतच त्यांच्या पुढं झोलबा ची स्थापना होते. विदर्भात गौरीला महालक्ष्मी म्हणतात. दिवंगत प्रभाकर डेहनकर यांनी १९७७ ला महालक्ष्मी घरी आणल्या. माहेरवाशिणी घरी येण्याचा आनंद म्हणून त्यांनी बंगळीवर त्यांची स्थापना केली. त्यांना भक्त झोका देतात. अनुराधा, जेष्ठा व मूळ नक्षत्रावर अडीच दिवस महालक्ष्म्या माहेरवाशीण असतात.
14
Report
AKAMAR KANE
FollowAug 31, 2025 16:30:13kolhapur, Maharashtra:
Ngp Londhe mahalkshmi
फिड live u ने पाठवले आहे
------------------
सर्वत्र गणेशोत्सव आनंदाने साजरा होत आहे आणि आज घरोघरी गौरींचे आगमन ही थाटात झाले आहे.. विदर्भात हा महालक्ष्मीचा उत्सव म्हणून ओळखला जातो... विदर्भात अनेक घरांमध्ये आज गौरी म्हणजेच महालक्ष्मी चे आगमन झाले असून विधीवत पूजन करून प्रत्येक कुटुंब आपला परंपरेने चालत आलेला कुळाचार पूर्ण करतोय...
*काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या कुटुंबियांकडे महालक्ष्मीची 250 वर्षांपेक्षा जास्त काळापासून परंपरा आहे..दरवर्षी मोठ्या भक्ती भावाने लोंढे कुटुंब महालक्ष्मीची स्थापना आणि पूजा करतात*...
पहिल्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना केल्यानंतर *खास काकडीचे थालीपीठाचे नैवेद्य अर्पण* केले जाते तर दुसऱ्या दिवशी *सोळा भाज्यांचा आणि पंच पक्वनांचा खास नैवैद्य* महालक्ष्मीला अर्पण केला जातो...लोंढे कुटुंबाशी सवांद साधला आमचे प्रतिनिधी आमचे अमर काणे यांनी
-------------------
बाईट --अतुल लोंढे, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते
--प्राची लोंढे
14
Report