Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या प्रसिद्ध गणेश हॉटेलला आग, लाखो रुपयांचे नुकसान!

SRSHRIKANT RAUT
Aug 15, 2025 01:30:28
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या पांढरकवडा येथील हैदराबाद हायवेवर असलेल्या नामवंत तृप्ती फॅमिली रेस्टॉरंट, गणेश हॉटेलला रात्रीचे सुमारास आग लागली. किचन मधून आगीची ठिणगी चिमणीतून बाहेर पडली व वरच्या मजल्यावर असलेल्या बांबू ने क्षणार्धात पेट घेतला. याठिकाणी बाबू चा उपयोग करून सौंदर्यीकरण केले होते. जे आगीच्या विळख्यात आले. आग लागल्याची बाब तेथे जेवण करत असलेल्या ग्राहकाला लक्षात येतात त्यांनी तात्काळ याची सूचना हॉटेल मालकास दिली, त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत संपूर्ण बांबू चे काम असलेला मजला आगीमुळे भस्मसात झाला. यात हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Aug 15, 2025 04:01:12
Nashik, Maharashtra:
Nsk_tribalflaghosting Feed by live u 51 Anchor आदिवासी विकास आयुक्तालय समोर आंदोलन करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना आज स्वातंत्र्य दिन आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर साजरा करावा लागला.. यावेळी या सर्वांना पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर उभे करण्यात आलं होतं. ध्वजाचा दर्शनही त्यांना होत नव्हतं. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनातील रोजंदारी कर्मचारी आपल्या ला कायमसवेत घेण्याची मागणी करत आहे मात्र आदिवासी विभाग खाजगी टेंडर काढून इतर लोकांना सेवेत घेण्याची तयारी करत आहे. त्यामुळे गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून सातत्याने शाळेवर स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या या शिक्षक शिक्षिकांना डोळ्यात पाणी आलं होतं. Byte आंदोलक रोजंदारी शिक्षिका आणि शिक्षक
0
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 15, 2025 04:01:07
Nagpur, Maharashtra:
Ngp Rss Flag Hosting live u ने फीड पाठवले ------------------- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय महाल येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.... महानगर संघचालक राजेश लोया यांनी यांनी ध्वजारोहण केले.... स्वयंसेवक व सुरक्षाकर्मी उपस्थित होते... यावेळी संघ मुख्यालय मधून भाषण देताना राजेश लोहया यांनी स्वचा वापर करताना स्वदेशी व आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याच्या संदेश दिला ----- बाईट-- राजेश लोया,महानगर संघचालक, ------------ नागपूर राजेश लोय, महानगर संघचालक, (भाषण) -- आज संकल्प करायचा आहे ज्याने आपल्या देशावर वक्रदृष्टी ठेवली त्यांना सैन्याने चोख उत्तर दिले -- शत्रूना सडेतोड उत्तर दिले आहे -- आपले स्वाभिमान दिसून आले -- आता स्व चे जागरण होतेय --- स्वदेशीचा वापर वाढवा -= स्व चा बोध परिवार, नागरिकांमध्ये करावा --- भाषा स्वयंम की मातृभाषा हो.... सर्वत्र वापरणारी भाषा हिंदी.. जिथे राहतो त्या भाषेचा आदर करा.. परकीय भाषा नको -- स्व परिधान असो.. प्रदेशनुसार --युवामध्ये ते कमी दिसते.. त्यांना --उपासना पद्धती नियमित घरी वापर करावा.भजन करावे.. समूह भजन केल्याने चांगले विचार पोहचतात.. संस्कृती तिथून पोहचते -- त्यामुळे कोणी मतांतर करू शकणार नाही -- जिथे राहतो तिथे(घरी) आपल्या संस्कृती, व प्रेरणा देणाऱ्या गोष्टी ठेवाव्या (फोटो -- स्वातंत्र्यवीर, महापुरुष ) --तुळसी असावी -- भ्रमण परदेशात करता मात्र... आपले तीर्थस्थळ, किल्ले, येथे जावे -- अतिशय जाण्याचा फल जास्ती आहे तो कमी करून भारतात जास्त भ्रमण करावे ( पर्यटन) --
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Aug 15, 2025 03:45:21
Shirdi, Maharashtra:
Nashik News Flash आदिवासी आयुक्तालयातील आंदोलक आक्रमक.. स्वतंत्र दिवस साजरा करण्यासाठी कार्यालयात न घेतल्याने आक्रमक.. राज्यगीत सुरू असताना आदिवासी आयुक्तालयातील तीन अधिकाऱ्यांनी अवमान केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी... त्या अधिकाऱ्यांना शोधून चपलीने मारण्याचा अधिकार आम्हाला आहे... - आंदोलकांचा इशारा
8
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 03:45:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi av Feed attached स्वातंत्र्य दिनानिमित्त संभाजी नगरच्या  जायकवाडी धरणाला भारताच्या ध्वजाची रोशनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे धरण अधिकच खुलून दिसतंय. जायकवाडी धरणावर छत्रपती संभाजीनगर जालना यासह 300 पेक्षा अधिक खेड्याची तहान अवलंबून आहे .आणि यावर्षी आनंदाची बातमी  म्हणजे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे..
5
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 15, 2025 03:30:11
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - दक्षिण सोलापूर तालुक्यात कालपासून पावसाचा जोर ओसरला मात्र शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी - दक्षिण सोलापूर तालुक्यात कालपासून पावसाचा जोर वसरला, शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी. - दक्षिण सोलापूर तालुक्यात जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या बांधावर येऊन अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे शेतकऱ्यांची अपेक्षा - दक्षिण सोलापूर तालुक्यात चार-पाच दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक नदी - नाले ओसंडून भरून वहायला सुरवात - त्यामुळे अनेक गावातील खरीप हंगामाच्या पिकांना बसला होता फटका. - तूर मूग उडीद सोयाबीन कांदा पिकांचे जोरदार पावसामुळे झालं होतं नुकसान. - तालुका प्रशासनाकडून पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. Byte : ग्रामस्थ
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 15, 2025 03:16:32
Pandharpur, Maharashtra:
15082025 slug - PPR_TRICOLOUR_WKT file 01 --- Anchor भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिरंगी फुलांमध्ये सजून गेला आहे. विठुरायाचा गाभारा चौखांबी सोळखांबी या ठिकाणी सुंदर फुलांचा वापर करून ही तिरंगा पद्धतीची सजावट केलेली आहे तिरंगी ध्वज प्रमाणे सजावट करण्यात आलेली आहे. विठुरायाच्या पोशाखामध्ये सुद्धा भारतीय ध्वजातील तीन रंग असणारा असलेला परिधान करण्यात आलेला आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे
9
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 15, 2025 03:16:06
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश Anchor - अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरामणी, वडजी, कासेगाव, वरळेगाव, बक्षीहिप्परगे या गावांमधील शेतीच्या नुकसानीची पाहणी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या नैसर्गिक संकटाच्या काळात शासनस्तरावर योग्य ती मदत मिळावी, तसेच झालेल्या नुकसानीचे लवकर पंचनामे करून सदर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने जाहीर करण्याचे निर्देश आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
7
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 03:01:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn mahapalika av Feed attached शहराला पाणी पुरवठा करण्याची  १५ ऑगस्टची दिलेली डेडलाइन पुन्हा एकदा प्रशासनाला पाळता आली नसल्याचे समोर आले आहे. तेव्हा संभाजीनगरकरवासीयांना आहे त्या पाण्यावरच समाधानी राहावे लागणार आहे.  गेल्या तीन  वर्षांपासून संभाजी नगर  शहरवासीयांना वाढीव पाणी देण्याचे आश्वासन प्रशासन देत आहे. मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाने दिलेली डेडलाइन हुकते आणि प्रशासन तोंडावर पडते. नवीन पाणीपुरवठा योजना होईपर्यंत १९३ कोटी रुपये खर्च करून ९०० मिमीची जलवाहिनी टाकण्यात आली. या माध्यमातून ७५ एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन होते. तीन वर्षांत हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे वाढीव पाणी मिळाले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा ६ ते ८ दिवसांआड कायम आहे.
6
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 15, 2025 03:00:59
Beed, Maharashtra:
बीड: बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप बीड : बीड जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र ओलावा निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात सलग रिपरिप सुरू असल्याने वातावरण आनंदी व गारठलेले आहे. पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आठ दिवसांनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसामुळे सकाळपासून जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरुच आहे.
8
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 03:00:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn collector ofc av Feed attached चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा नियोजन समितीला अखेर पहिल्या टप्प्यात ३० टक्के म्हणजेच २२० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी मिळाल्याने अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांना चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या निधीपैकी २१० कोटी रुपयांचे दायित्व आधीच असल्याने प्रत्यक्षात नवीन कामांसाठी किती रक्कम उपलब्ध राहील हे पाहावे लागणार आहे. २०२५-२६ या वर्षासाठी डीपीसीला सर्वसाधारण योजनेसाठी ७३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत ७५ कोटींनी जास्त आहे.
9
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 02:47:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn rain av Feed attached मध्यरात्रीपासून छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार  पावसाने हजेरी लावली आहे,  यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस  पडलाय त्यामुळं माना टाकलेल्या पिकांना या पावसामुळे  जीवनदान मिळाले आहे.. मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अनेक शेतांमधून  पाणी वाहू लागलाय,  जिल्ह्यात आजही चांगला पावसाची अपेक्षा आहे..
9
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 02:45:45
Raigad, Maharashtra:
स्लग - साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांचे आंदोलन स्थगित ....... मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन ....... दरड ग्रस्तांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा ...... अँकर - रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या आश्वासनानंतर पोलादपूरच्या साखर सुतारवाडीतील दरडग्रस्त कुटुंबांनी आजचे आत्मदहन आंदोलन स्थगित केले आहे. दरड ग्रस्तांना घरे बांधण्यासाठी सरकारने देऊ केलेले 2 लाख 30 हजार रुपये अधिक 10 लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिलं. दरड दुर्घटनेला 4 वर्ष उलटून देखील आपलं पुनर्वसन होत असल्याने ग्रामस्थानी गावातच सरण रचून स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. बाईट - भरत गोगावले, मंत्री
14
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 02:31:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn high court munde av Feed attached धनंजय मुंडे यांना औरंगाबाद खंडपीठाने दहा हजार रुपयाची कॉस्ट लावली आहे , निवडणुकी याचिके सुनावणी वेळी वारंवार वेळ लागूनही लेखी उत्तर सादर केलं नाही त्यामुळे कोर्टाने मुंडे यांना ही कॉस्ट लावली आहे मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे आणि राजाभाऊ फड यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे त्यात निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे याबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे, याबाबत आता पुढील सुनावणी 19 ऑगस्ट रोजी होणार आहे..
9
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 15, 2025 02:30:54
Kalyan, Maharashtra:
कल्याण-डोंबिवली मनपा मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त; चिकन-मटण विक्री विरोधात आंदोलनाचा इशारा ​अँकर: आज, १५ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने चिकन-मटण विक्री संदर्भात घेतलेल्या निर्णयाला विरोध करत खाटीक समाज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्याने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ​कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळपासूनच पालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस आणि सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत. १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहणासाठी पालिका आयुक्त येथे येणार आहेत. याचवेळी आंदोलक एकत्र येण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ​पालिकेच्या या निर्णयामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी असून, याविरोधात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी Wkt... आतिश भोईर कल्याण
9
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 15, 2025 02:30:44
Pandharpur, Maharashtra:
15082025 Slug - PPR_MANDIR_INDEPENDENCE file 01 --- Anchor - भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त. , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर फुलांच्या सजावटीने सजले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडू, गुलाब, शेवंती, ऑर्केट, ब्लुडीजी, जिप्सो इत्यादी फुलांचा वापर करून आकर्षक व नवीन रम्य सजावट करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलाचा वापर केला असून, सदरची सजावट पुण्यातील भाविक सचिनअण्णा चव्हाण श्रीमंत मोरया प्रतिष्ठान, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.
10
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top