Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701
शेतकऱ्याचा विजेच्या तारामुळे जागीच मृत्यू, परिसरात हळहळ!
ADANIRUDHA DAWALE
Aug 03, 2025 05:48:05
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_FARMER_DEATH पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 शेतात डवरणी करतांना विजेचा तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; दोन बैलाचाही मृत्यू, परिसरात हळहळ अँकर :– अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेसखेडा शेतशिवार डवरणी करत असतांना विजेचा तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेसखेडा शेतशिवार डवरणी करत असताना विजेचा तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा आणि दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीराम बळीराम घोरसे (वय 52) रा. बेसखेडा असं शेतकऱ्यांचं नाव असून वरुड तालुक्यात सध्या शेतात पिकांची आंतरमशागत डवरणी सुरू असताना जिवंत विजेचे तार शेतकऱ्यांच्या व बैलाच्या अंगावर पडल्याने हा अपघात झाला आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Aug 03, 2025 17:31:17
Yeola, Maharashtra:
अँकर :- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाचे निमंत्रण देण्यासाठी मनोज जरांगे हे स्वतः नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे या ठिकाणी आले होते. यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी मराठा समाजाला उद्देशून भावनिक आवाहन केले. आपल्याला मराठा आरक्षणाची लढाई आता जिंकायची आहे हे आंदोलन आता शेवटचे असून यानंतर आंदोलन करायचे नाही मुंबईतून आरक्षण घेऊनच वापस येईल मात्र त्यासाठी घराघरातून मराठा मुंबईत दाखल व्हायला हवा ... 75 वर्षाच्या आरक्षणाची लढाई मी एका वर्षात कडेला लावली आहे .त्यामुळे यावेळेस गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा माझा सरकारला इशारा आहे आमच्या नादी लागू नका नाहीतर मी बाजारात उठवतो मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने का होईना मुंबईत घुसायचं म्हणजे घुसायचं असे म्हणत जरांगे पाटील यांनी नाशिक जिल्ह्याला आवाहन केले दरम्यान या सभेच्या ठिकाणी हजारो मराठा बांधव उपस्थित होते या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता. टीप:- असाइन्मेंट नंबर वर मनोज जरांगे पाटलांचे भाषण पॉइंटर दिले आहेत
0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 03, 2025 17:02:41
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Shirur Women Gold Theft File:02 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: शिरूर शहरात गजबजलेल्या रामलिंग रोड परिसरात भरदिवसा आणि लोकवस्तीमध्ये चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने पाठलाग करत लिफ्टमध्ये जात असलेल्या महिलेला लक्ष्य करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. गर्दी असतानाही चोरटे कोणालाही भीक न घालता निर्भीडपणे चोरी करून पसार झाले. काल हि याच परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रकार घडला होता. दोन दिवसांत दोन महिला लुटल्या गेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी रोष आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे....
11
Report
SNSWATI NAIK
Aug 03, 2025 16:01:33
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये युवा सेने कडून आंदोलन नवी मुंबई युवा सेना आंदोलन FTP slug - nm yuva sena aandolan shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापलंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद असा शब्दप्रयोग केल्याने शिवसेना शिंदे गट आणि युवासेना प्रचंड आक्रमक झाली असून चव्हाणांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय. नवी मुंबईत देखील युवासेने तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला पेटवत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. gf
12
Report
SNSWATI NAIK
Aug 03, 2025 16:01:19
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: पतंजलीच्या बनावट वेबसाईटद्वारे उपचाराच्या बहाण्याने माजी आमदार पुत्राची लाखोंची फसवणूक. पतंजली के झूट वेबसाईटवर के द्वारा ठगा FTP slug - nm patanjali websied shots- माजी आमदार आणि मुलगा फोटो reporter- swati naik navi mumbai Anchor -: पतंजली या आयुर्वेदीक कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट बनवत माजी आमदार पुत्राची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. माजी आमदार रमेश पाटील यांच्या आजारपणाची माहिती त्यांचे सुपुत्र चेतन पाटील यांनी पतंजलीच्या या बनावट वेबसाईटवर भरली असता त्यांना एका इसमाचा फोन आला. यावेळी सदर व्यक्तीने विविध आजारांच्या वेगवेगळ्या पॅकेजची माहिती देत विश्वास संपादित करुन उपचारासाठी एकूण 7 लाख 25 हजार 330 रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही उपचार होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे चेतन पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बनावट पतंजलीचे वेबपेज चालक मिश्रा यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेय. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करील असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
13
Report
ABATISH BHOIR
Aug 03, 2025 16:00:11
Kalyan, Maharashtra:
कल्याण यूज फ्लॅश..अपडेट आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानका दरम्यान अतिशय धक्कादायक प्रकार मेल एक्सप्रेस चा दारावर उभा असलेल्या प्रवाशाला फटका मारून मोबाईल हिसकावला प्रवासी खाली पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत एक पाय गमावल्याची प्राथमिक माहिती चोरट्या एवढेच नाही थांबला जखमी अवस्थेत असलेल्या प्रवासाचे 20 हजार देखील लुटलं जखमीप्रवाशाचे नाव गौरच रामदास निकम कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात अल्पवयीन इराणी चोरट्याला केली अटक अल्पवयीन मुलाविरोधात या आधी देखील चार ते पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांची माहिती रेल्वे जीआरपी कडून तपास सुरू
14
Report
ABATISH BHOIR
Aug 03, 2025 15:17:30
Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यूज फ्लॅश.. आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानका दरम्यान अतिशय धक्कादायक प्रकार मेल एक्सप्रेस चा दारावर उभा असलेल्या प्रवाशाचा फटका मारून मोबाईल हिसकावला प्रवासी खाली पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत एक पाय गमावल्याची प्राथमिक माहिती चोरट्या एवढेच नाही थांबला जखमी अवस्थेत असलेल्या प्रवासाचे 20 हजार देखील लुटलं प्रवाशाचे नाव गौरच रामदास निकम रेल्वे जीआरपी कडून तपास सुरू
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 03, 2025 15:02:26
Vasai-Virar, Maharashtra:
Date-3aug2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI FRAUD Feed send by 2c Type-aVB Slug- वसईत बनावट मार्कशीट रॅकेटचा पर्दाफास मात्र पोलिस तपासात गडबड केवळ 65 हजार रुपयांमध्ये डिग्री मिळत असल्याचा आरोप खऱ्या तक्रारदाराला वगळून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ? पोलिसांची भूमिका संशयास्पद..? *तर, डिग्री च्या पडताळणीसाठी प्रयत्न केला असता एजंटने आणखी धक्कादायक खुलासे केल्याची Audio clip देखील आली समोर.* ANC: नालासोपारा येथील सनी रावल या सामाजिक कार्यकर्त्याने "बनावट मार्कशीट रॅकेटचा" पर्दाफाश केला आहे. 65 हजार रुपयांमध्ये केवळ तीन महिन्यात B COM ची डिग्री बनवणारी टोळी सक्रिय असल्याचा आरोप करण्यात येत आहे ...! विशेष म्हणजे हे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर 5 महिन्यांनी वसई च्या वालीव पोलीस ठाण्यातील एफआयआर दाखल करण्यात आला, मात्र प्रत्यक्ष आरोपींवर कारवाईसाठी 9 महिने लागले, ६ जणांना अटक झाली. मात्र यामधील मुख्य सूत्रधार मोकाट असून छोट्या माशांवर कारवाई केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे , या रॅकेटमध्ये शिक्षण माफिया, विद्यापीठे आणि काही शिक्षण संस्था सामील असल्याची शक्यता असून, या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील राणे यांची भूमिका संशयास्पदप्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सन्नी रावल यांनी केला आहे. याबाबतची एक Audio clip देखील समोर आली असून त्यात डिग्री च्या पडताळणीसाठी प्रयत्न केला असता एजंटने आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत.
14
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 03, 2025 13:47:04
Ratnagiri, Maharashtra:
विधानसभा निवडणूकीमध्ये गुहागर मतदार संघात माझ्या तीन सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव वीस हजार मतांनी उलटा पडला असता.....पण आमच्या एका माणसाला माझी सभा लावायला सांगितली तर तो माणूस हलायला तयार नाही. भावकीत कंदाल नको म्हणून मी नाव सांगत नाही : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे वक्तव्य गुहागर मतदार संघातील अनेक जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत आल्यामुळे तीस ते पस्तीस हजाराचे मतदान आपल्याकडे फिरले.... त्यामुळे मतदान पाहून विकास काम करणाऱ्या भास्कर जाधव यांच्याकडे आता काही काम राहिले नाही : रामदास कदम यांचा भास्कर जाधवांना टोला. योगेश कदम यांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठले...म्हणून राजीनामा मागत आहेत : रामदास कदम गुहागर विधानसभा मतदार संघातील उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात रामदास कदम यांची टीका
14
Report
SKSACHIN KASABE
Aug 03, 2025 13:40:14
Pandharpur, Maharashtra:
03082025 Slug - PPR_KARMALA_SOCIAL file 02 ------ Anchor - सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतील पहाट या पारधी समाजातील नागरिकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठीच्या उपक्रमाचा करमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत गावात पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला पहाट उपक्रमाच्या अंतर्गत पारधी समाजाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक सक्षमता वाढवणे. त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे तसेच उद्योगधंदे करण्यासाठी प्रवृत्त करणे अशी ही संकल्पना आहे. यासाठी करमाळा पोलिसांनी जिंती भगतवाडी या ठिकाणी पंचायत समिती समाज कल्याण विभाग, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पारधी समाजातील नागरिकांची बैठक घेऊन प्रबोधन केलं चोऱ्या ,लुटमार गुन्हेगारी या पासून दूर राहून मुलांना शिक्षण देणे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असणाऱ्या योजनांबद्दल शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींबद्दल पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मार्गदर्शन केले.
14
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 03, 2025 13:39:57
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0308ZT_JALNA_MURDER(3 FILES) जालना : किरकोळ कारणावरून एकाची हत्या 27 वर्षीय संभाजी उंडेची हत्या घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावात घडली घटना पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू अँकर : जालन्यात किरकोळ कारणावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. 27 वर्षीय संभाजी उंडे  असं मयताचं नाव आहे. ही धक्कादायक घटना जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावात घडली. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मधुकर उंडे हे त्यांच्या पत्नी-मुला सह दुचाकीवरून अंबडच्या दिशेने जात होते. यावेळी गावातील अर्जुन वाघमारे यांच्या घरासमोर आत्माराम मोरे,सचिन मोरे, सुशील मोरे, विशाल मोरे आणि अक्षय मोरे यांनी त्यांची दुचाकी अडवत "तू काल आम्हाला शिवीगाळ का केली?" असा जाब विचारून आत्माराम मोरे आणि इतरांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आत्माराम मोरे याने लोखंडी रॉडने संभाजीच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ मारहाण केली. तसेच सुशील आणि सचिन मोरे यांनी त्यांच्या जवळील चाकूने संभाजीच्या पोटात, डोक्यावर आणि पाठीवर वार केले.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला संभाजी बेशुद्ध पडला. त्यानंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यावेळी स्थानिकांनी तातडीने संभाजी याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. दरम्यान, या प्रकरणी मयत संभाजी याचे वडील मधुकर उंडे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
14
Report
AAASHISH AMBADE
Aug 03, 2025 13:19:55
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0308ZT_CHP_MANDAL_YATRA ( single file sent on 2C)  टायटल:-- मंडल जनगणना यात्रा पोचली चंद्रपुरात, नागपूरच्या संविधान चौकातून निघाली आहे यात्रा, ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी विदर्भात करणार आहे जनजागरण, ओबीसींच्या संख्येनुसार अंदाजपत्रकातील वाटा मिळावा अशी आहे मागणी, ओबीसी जनजागरण महत्वाचे असल्याची सहभागी ओबीसी बांधवांची भावना      अँकर:--मंडल जनगणना यात्रा आज चंद्रपुरात।पोचली.  नागपूरच्या संविधान चौकातून ही यात्रा निघाली आहे. यात्रेच्या माध्यमातून ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी विदर्भात जनजागरण केले जाणार आहे. ओबीसींच्या संख्येनुसार अंदाजपत्रकातील वाटा मिळावा अशी यात्रेची मागणी आहे. ओबीसी जनजागरण महत्वाचे असल्याची भावना सहभागी ओबीसी बांधवांनी याप्रसंगी व्यक्त केली. बाईट १) प्रा. अनिल डहाके, ओबीसी नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
Report
SKSACHIN KASABE
Aug 03, 2025 13:02:36
Pandharpur, Maharashtra:
03082025 slug - PPR_DISASTER_TRAINING file 01 ---- Anchor - सोलापूर जिल्ह्यातील अकलूज नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शोध आणि बचाव कार्याचं प्रशिक्षण रायगड येथे आपला मित्र / सखी प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या पथकाने नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांची मदत कशी करायची, त्यांना काय सूचना देऊन धीर द्यायचा याबाबत प्रशिक्षण दिले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच रेस्क्यूस कोड चे प्रशिक्षक अधिकारी यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण देण्यात आले
14
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 03, 2025 12:16:26
Ambernath, Maharashtra:
नालेसफाईची तक्रार केल्यानं भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरातील घटना मारहाणीचा व्हिडीओ देखील आला समोर Amb beating Anchor : नालेसफाईची तक्रार केल्याने भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. Vo : अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात आली होती. मात्र ही नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे अजूनही या नाल्यात कचरा असल्याची तक्रार भाजपाचे अंबरनाथ पश्चिम सचिव श्रीनिवास आदीमूलम यांनी अंबरनाथ नगरपालिकेत केली होती. तसंच या नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नाल्याची व्यवस्थित सफाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र याचा राग धरून स्वामीनगर परिसरातील दोन ते तीन जणांनी मिळून त्यांना रात्रीच्या सुमारास मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी श्रीनिवास आदीमुलम यांनी केली आहे. Byte चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
14
Report
MKManoj Kulkarni
Aug 03, 2025 12:03:46
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईत गणपती आगमन सोहळा धूम धडाका सुरू झाला आहे आज परळी येथील गणेश कार्यशाळेतून मोठ्या गणपतीच्या मूर्तीचे आगमन सोहळे पार पडत आहेत काळाचौकी येथील महागणपतीच्या आगमनाचा महासोहळा पार पडला ढोल ताशे पारंपारिक पद्धतीने पालखी यासह सोहळा पार पडला या गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी 70 वा वर्ष आहे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. महादेवाच्या रूपातील गणपती बाप्पाची जवळपास पंधरा फूट उंचीची गणपतीची मूर्ती आहे या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  १२१ मनोज कुळकर्णी  Feed send TVU ५० Slug -- Paral Ganapati
14
Report
MKManoj Kulkarni
Aug 03, 2025 12:03:39
Mumbai, Maharashtra:
अँकर -- आज काळात चुकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा दिमागदार थाटात पार पडला लालबागचा चौकात महागणपती आला असताना. माझगावच्या ताडवाडी गोविंदा पथकाने आठ थर लावून महागणपतीला सलामी दिली तर याच गणपतीत ऑपरेशन सिंदूर चा देखावा सुद्धा केला होता राफेल विमानाने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांवर केलेला हल्ला या देखाव्यामध्ये सादर केला याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt मनोज कुळकर्णी  Feed send TVU ५० Slug -- Parel Ganapati 
14
Report
Advertisement
Back to top