431213
जालना: किरकोळ कारणावरून 27 वर्षीय संभाजी उंडेची हत्या!
Jalna, Maharashtra: FEED NAME : 0308ZT_JALNA_MURDER(3 FILES) जालना : किरकोळ कारणावरून एकाची हत्या 27 वर्षीय संभाजी उंडेची हत्या घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावात घडली घटना पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू अँकर : जालन्यात किरकोळ कारणावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. 27 वर्षीय संभाजी उंडे असं मयताचं नाव आहे. ही धक्कादायक घटना जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावात घडली. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मधुकर उंडे हे त्यांच्या पत्नी-मुला सह दुचाकीवरून अंबडच्या दिशेने जात होते. यावेळी गावातील अर्जुन वाघमारे यांच्या घरासमोर आत्माराम मोरे,सचिन मोरे, सुशील मोरे, विशाल मोरे आणि अक्षय मोरे यांनी त्यांची दुचाकी अडवत "तू काल आम्हाला शिवीगाळ का केली?" असा जाब विचारून आत्माराम मोरे आणि इतरांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आत्माराम मोरे याने लोखंडी रॉडने संभाजीच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ मारहाण केली. तसेच सुशील आणि सचिन मोरे यांनी त्यांच्या जवळील चाकूने संभाजीच्या पोटात, डोक्यावर आणि पाठीवर वार केले.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला संभाजी बेशुद्ध पडला. त्यानंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यावेळी स्थानिकांनी तातडीने संभाजी याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. दरम्यान, या प्रकरणी मयत संभाजी याचे वडील मधुकर उंडे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सातारा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गांव पहुंचेंगे; चुनाव प्रभाव पर चर्चा
Satara, Maharashtra:सातारा - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ दरे गावी मुक्कामी येणार आहे.रात्री उशिरा ते पुणे विमानतळावरून निघणार असून ते दरे गावी पोहचणार आहेत.मात्र ते किती दिवस ते त्यांच्या दरे गावी मुक्कामी असणार आहेत हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.होऊ घातलेल्या सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
चंद्रपूर में अवैध शराब अड्डे पर छापा, 11 ग्राहक व मैनेजर के खिलाफ मामला
Chandrapur, Maharashtra:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री करून ग्राहकांना मद्यपान व खाद्यपदार्थाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान 11 ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळले. चुन्नू विजयपालसिंग परमार (मॅनेजर) हा ग्राहकांना मद्द्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान एकूण 11 ग्राहकांची वैद्यकीय तपासणी झाली असून, अहवालानुसार त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कायदेशीर कार्यवाही होणार आहे. दारू अड्ड्याचा मालक आशिष चांदेकर हा फरार झाला असून शोध सुरू आहे.0
0
Report
बोदलकशा जलाशय में नाव पलटने से दो की मौत, नौ युवक बच गए
Bhandara, Maharashtra:बोदलकशा जलाशयात नाव उलटून दोघांचा मृत्यू.... 7 तरुण बचावले... गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे.. नाव उलटून दोघांचा मृत्यू झाला आहे... तिरोडा तालुक्यात बोदलकसा जलाशय आहे. हा जलाशय पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. आज देखील बहुतांश पर्यटक जलाशयावर आले होते. तर नऊ तरुणांचा ग्रुप देखील फिरायला आला होता. तलावातील नावेदबसून फिरत असताना अचानक पलटी झालं यात इतर 7 तरुण बचावले पण दोघांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला आहे. आता घटनास्थळी पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल होय मृतकाचे मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे...0
0
Report
Advertisement
FDA की दबिश: नालासोपारा में गुटखा विक्रेताओं के खिलाफ कार्रवाई, 4–5 दुकानों को सील
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाऱ्यात FDA ची गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई; ४ ते ५ दुकाने सील अँकर- नालासोपाऱ्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गुटखा आणि सुगंधित सुपारीजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्या व दुकानांवर FDA च्या पथकांनी छापे टाकले. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. वसई तालुक्यात FDA ची सात ते आठ पथके तैनात करण्यात आली असून, गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत. कारवाईदरम्यान चार ते पाच दुकानांमध्ये गुटखा आढळून आला. संबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने सील करण्यात आली आहेत. दरम्यान, गुजरातमधून होणाऱ्या गुटख्याच्या संभाव्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी टोलनाक्यांवर विशेष पथके तैनात करण्यात आल्याची माहिती FDA अधिकाऱ्यांनी दिली आहे.0
0
Report
यवला तालुक्य के वाघाळे खेत तालाब में विवाहित महिला का शव, पति- सासुर गिरफ्तार
Yeola, Maharashtra:येवला तालुक्य के वाघाळे खेत तालाब में विवाहित महिला का शव, पति- सासुर गिरफ्तार वैशाली नामदेव नवले मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून येवला तालुकা पोलीसात पती सासरा व सासू विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चार वर्षांपूर्वी येवला तालुक्यातील वाघाळे येथे नामदेव नवले या व्यक्ती सोबत वैशाली निकुले हिचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता मात्र तेव्हापासून आपल्या मुलीला हुंड्यासाठी मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप विवाहितेच्या वडिलांनी केला आहे याप्रकरणी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत0
0
Report
संजय गायकवाड के तेवर: 100 करोड़ के नोटिस पर ED-CID का जवाब देंगे
Washim, Maharashtra:संजय गायकवाड बाईट्स पॉईंटर शिंदे च्या आमदारांनी मातोश्री वर यावं आणि पश्चाताप करावा यावर संजय गायकवाड म्हणाले की मला वाटतं हे अडीच वर्षापूर्वी सांभाळले असते तर हे घडलेच नसतं मला नाही वाटत आता कोणी परतीच्या मार्गावर असेल म्हणून... ऑपरेशन टायगर बद्दल एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर बद्दल मास्टर आहेत आणि हे फक्त शिंदे साहेबांनीच करावं आणि म्हणूनच लवकरच उभाठाच्या सात खासदारासह काही आमदार बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत येणार राजकारण आहे काही सांगता येत नाही आमदार पण येऊ शकतात आमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणं आहे की भाजपाने मित्र पक्षासोबत चांगले वागावे कारण बुलढाण्यात भाजपाने अशा माणसाला पदाधिकारी केलच कसं जो पक्ष वाचू शकत नाही है शिवसेना ज्या गोष्टी केल्या त्यामुळे भाजपाला सत्तेत येता आल म्हणून भाजपाने मित्र पक्षासोबत चांगला वागाव हीच आमदाराची अपेक्षा आहे.. शंभर कोटीच्या नोटीस बद्दल आम्ही जेव्हा याला उत्तर देऊ तेव्हा त्यांचा हा दाव फळ ठरेल कारण शंभर कोटी ही रक्कम जर माझं घरदार विकलं तरी मी भरू शकत नाही त्यांच्या आणि त्यांच्या वकिलाच्या बुद्धीची कीव येते की एवढा मोठा दावा त्यांनी केला ज्या पद्धतीने मला नोटीस पाठवली यामुळे मलाही आता ईडी आणि सीआयडी कडे त्यांच्या विरोधात तक्रारीत करावी लागेल मी जे आरोप केले ते शंभर टक्के खरे होते याची चौकशी मी संबंधितामार्फत करण्यास सांगितली आहे.. बाईट: संजय गायकवाड,आमदार0
0
Report
Advertisement
पत्नी के साथ औताला जोतते किसान को मिली मदद, Zee 24 Taas ने किया असर
Latur, Maharashtra:पत्नीला औताला जुंपून शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची व्यथा जेव्हा झी 24 तासच्या माध्यमातून राज्यासमोर आली, तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले. निसर्गाच्या एका आघाताने बैल गमावलेल्या आणि आर्थिक अडचणींमुळे हतबल झालेल्या काशिनाथ गायकवाड यांच्या संघर्षाने सर्वसामान्यांपासून ते शासनापर्यंत अनेकांना विचार करायला भाग पाडले. एका बातमीने संघर्ष करणाऱ्या कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण कसा निर्माण केला पाहूयात ZEE 24 TAAS च्या या स्पेशल रिपोर्ट मधून. देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर निसर्गाने मोठा आघात केला. शेतात वीज कोसळून त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला आणि पेरणीच्या तोंडावर त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले. नवीन बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने स्वतःच औताला जुंपून शेतीची मशागत सुरू केली. पत्नीला औताला जुंपून शेत नांगरतानाची बातमी ZEE 24 TAAS ने दाखवली त्यानंतर राज्यभर चर्चेचा विषय ठरली. शेतकऱ्याच्या संघर्षाची ही कहाणी अनेकांच्या मनाला भिडली. सामाजिक माध्यमांवरही या घटनेची मोठी चर्चा झाली आणि मदतीची मागणी जोर धरू लागली. दरम्यान ZEE 24 TAAS ने केलेल्या या बातमीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी प्रशासनाला तत्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महसूल आणि स्थानिक प्रशासनाने हालचाली सुरू करत शेतकरी कुटुंबाशी संपर्क साधला. प्रशासनाच्या पुढाकारातून काशिनाथ गायकवाड यांच्या कुटुंबाला मदत म्हणून एक बैल उपलब्ध करून देण्यात आला. अचानक आलेल्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता शेतीची कामे पुन्हा सुरळीत करण्याचा विश्वास कुटुंबाने व्यक्त केला आहे. या बातमी नंतर शेतकरी संघटना आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने झी 24 तासच्या या बातमीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर, प्रशासनाने वेळेत या शेतकऱ्याची दखल घेतली असती तर हा प्रश्न इतका वाढला नसता आणि मुख्यमंत्र्यांना स्वतः हस्तक्षेप करण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या बातमीची दखल घेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने मदतीच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर मदतीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. शेतकरी संघटनेच्या दृष्टिकोनातूनही ही स्थिती उचित काळात हाताळली जावी ही भावना व्यक्त झाली. शेतीच्या संकटाचा हा एक वेगवान संदर्भ आहे, ज्यातून मदत आणि संवेदना यांचा संदेश राज्यभर पोहोचला.0
0
Report
खेड में जगबुडी नदी के डोह में तीन युवकों की डूबने से मौत, सनसनी
Ratnagiri, Maharashtra:खेड ब्रेकिंग - खेड मधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाले. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू. विचित्र घटनेने खेड मध्ये खळबळ. खेड आणि भोस्टे गावच्या दरम्यान जगबुडी नदीच्या डोहात पहायला गेले असताना घडली दुर्घटना. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाल्याची माहिती. खेड पोलिस घटस्थळी रवाना.0
0
Report
उरी सेक्टर में हैंड গ্রेनेड विस्फोट: अर्जुन जाधव शहीद
Satara, Maharashtra:सातारा - कराड तालुक्यातील शहापूर गावातील जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. हँड ग्रेनेडच्या स्फोटात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहापूर गावासह संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जवान अर्जुन राजेंद्र जाधव हे भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये कार्यरत होते. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे 8 आरआर (राष्ट्र रायफल्स) मध्ये कर्तव्य बजावत होते. दरम्यान, हँड ग्रेनेडच्या स्फोटात त्यांना वीरमरण आले. अर्जुन जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. येत्या 25 जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी ते 15 जून रोजी सुट्टीवर घरी येणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या वीरमरणाची दुःखद बातमी कुटुंबीयांना मिळाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद अर्जुन जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी शहापूर येथे आणण्यात येणार असून, शुक्रवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने शहापूर गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
परभणी के जिलाधिकारी कार्यालय के पास मछुआरों ने पेट्रोल डालकर आत्मदहन करने का प्रयास
Parbhani, Maharashtra:परभणी ब्रेकिंग परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात मच्छीमारी करणाऱ्या तरुणांचा अंगावर डिझेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न. येलदरी धरणातून मच्छीमारी केली जाऊ देत नसल्याचा आंदोलन कर्त्यांचा आरोप. शासनाकडे वेळोवेळी दाद मागूनही दखल घेतली जात नसल्याचा आंदोलन कर्त्यांचा आरोप. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना घेतले ताब्यात.. सहा ते सात आंदोलन कर्त्यांकडून अंगावर पेट्रोल घेत आत्महत्येचा प्रयत्न...0
0
Report
नाना पटोले ने खुद आम खरीदे, महिला फलों के व्यवसाय की समस्याओं पर चर्चा
Bhandara, Maharashtra:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे थांबून एका फळविक्री दुकानातून स्वतः आंब्यांची खरेदी केली. यावेळी त्यांनी फळविक्री करणाऱ्या महिलेशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायासंदर्भातील अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. वाढती महागाई, बाजारपेठेतील स्पर्धा तसेच रोजच्या उत्पन्नावर होणारा परिणाम याबाबत महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाना पटोले यांनी त्यांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या साध्या व लोकाभिमुख भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.0
0
Report
तन्वी रेडीज को विश्व योगासन स्पर्धा में स्वर्ण मिला, चिपळुण में ढोल-ताश के साथ स्वागत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी सुवर्णपदक विजेत्या तन्वी रेडीजचे चिपळुणात जल्लोषात स्वागत; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक भारताच्या नावाने सुवर्णपदक पटकावलेल्या तन्वी रेडीज हिने गोष्टींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. ५५ हून अधिक देश सहभागी झालेल्या या स्पर्धेत तन्वीने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत भारताची मान उंचावली. स्पर्धेनंतर रेल्वेने चिपळुणात आगमन होताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तन्वीची महाविद्यालयाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य माधव बापट, प्रशिक्षक रणवीर सावंत, तन्वीचे कुटुंबीय, शिक्षक, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तन्वीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.0
0
Report
Advertisement
मोदी जी के 12 साल पूरे, 2029 तक बाकी; गोरे बोले विकसित भारत का सपना
Pandharpur, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष पूर्ण झालीच आहेत. पण अजून 2029 चा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ राहण्याचा त्यांचा विक्रम होईल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी असे म्हटले. बारा वर्षांचं एक ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. भारताला सर्वच क्षेत्रात वेगाने मजबूत करण्याचे काम झालेले आहे. सोबत सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पुढे नेण्याचे काम झाले आहे. 2029 मध्ये 3 वर्ष बाकी आहेत. 2034 मध्ये पाच वर्षं आहेत. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न त्यांनी पाहिलें आहे. जय कुमार गोरे0
0
Report
शिर्डी पेढ़ो में मिलावट: FDA ने सैंपल लिए, नगर निगम ने जांच का फैसला किया
Shirdi, Maharashtra:झी 24 तास वृत्तवाहिनीचे कौतुक , शिर्डीतील पेढ्याबाबत धक्कादायक प्रकार समोर आणला... बातमी आल्यानंतर FDA ने कारवाई करत सॅम्पलही घेतले आहेत.. अनेक गोष्टी आहेत ज्या दुर्देवाने घडतायत , नगरपरिषदेच्या वतीने आणि पालकमंत्री यांच्या नेतृत्वात शिर्डीतील प्रत्येक हॉटेल , रेस्टॉरंटच्या किचनची पाहणी करण्याचा निर्णय घेतला... पाहणी करून अहवाल FDA ला आम्ही देणार आहोत... हि आजची घटना नाही , एक महिन्यापासून काम सूरू... ज्या ठिकाणी नियम फॉलो होत नाहीत , काही भेसळ होत असेल तर नगरपरिषदे मार्फत कारवाई करणार आहोत...पुर्वीच हि कारवाई सुरू केलीय.. पेढ्याचा विषय समोर आला , कर्मचारी सोसायटी मार्फत जे चांगल्या दर्जाचे पेढे विक्री होते तेच घ्यावेत अस मी भाविकांचा झी 24 तासच्या माध्यमातून आवाहन करतो... FDA विभागाकडे मनुष्यबळ हे कमी आहे , फक्त मिठाई नाही तर दूधभेसळ , औषधे अशा अनेक विषय आहेत त्याबाबत नविन अधिकारी अधिक सक्षमपणे कारवाई करतील.. अहिल्यानगरचे माजी खा.सुजय विखेंची झी 24 तास सोबत बोलतांना प्रतिक्रिया...0
0
Report
नौकरी छोड़ने के क्रोध में कर्मी पर जानलेवा हमला, CCTV में कैद
Ambernath, Maharashtra:काम सोडल्याच्या रागातून कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरा झाली कैद Anchor उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ येथील नेताजी चौक परिसरातील चहा विक्रीच्या दुकानातील कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साई आर्केड इमारतीत विनय रावतानी यांचे "करक चाय" हे दुकान असून, विशाल कश्यप हा तरुण त्या दुकानात काम करतो. मध्यरात्रीच्या सुमारास विशाल दुकानासमोर साफसफाई करत असताना प्रितम विनायक चव्हाण आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हल्लेखोर प्रितम चव्हाण हा परिसरात "महाराजा चहा"ची शाखा चालवत असल्याची माहिती आहे. विशाल कश्यप हा यापूर्वी प्रितम चव्हाणकडे काम करत होता. मात्र काही काळापूर्वी त्याने ते काम सोडून दुसरीकडे नोकरी सुरू केली. याच कारणातून आपल्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप विशालने केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. आरोपींविरोधात कोणती कारवाई होते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
