Back
वसईत बनावट मार्कशीट रॅकेट: 65 हजारात मिळणार डिग्री!
PTPRATHAMESH TAWADE
Aug 03, 2025 15:02:26
Vasai-Virar, Maharashtra
Date-3aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI FRAUD
Feed send by 2c
Type-aVB
Slug- वसईत बनावट मार्कशीट रॅकेटचा पर्दाफास
मात्र पोलिस तपासात गडबड
केवळ 65 हजार रुपयांमध्ये डिग्री मिळत असल्याचा आरोप
खऱ्या तक्रारदाराला वगळून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?
पोलिसांची भूमिका संशयास्पद..?
*तर, डिग्री च्या पडताळणीसाठी प्रयत्न केला असता एजंटने आणखी धक्कादायक खुलासे केल्याची Audio clip देखील आली समोर.*
ANC: नालासोपारा येथील सनी रावल या सामाजिक कार्यकर्त्याने "बनावट मार्कशीट रॅकेटचा" पर्दाफाश केला आहे. 65 हजार रुपयांमध्ये केवळ तीन महिन्यात B COM ची डिग्री बनवणारी टोळी सक्रिय असल्याचा आरोप करण्यात येत आहे ...! विशेष म्हणजे हे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर 5 महिन्यांनी वसई च्या वालीव पोलीस ठाण्यातील एफआयआर दाखल करण्यात आला, मात्र प्रत्यक्ष आरोपींवर कारवाईसाठी 9 महिने लागले, ६ जणांना अटक झाली. मात्र यामधील मुख्य सूत्रधार मोकाट असून छोट्या माशांवर कारवाई केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे , या रॅकेटमध्ये शिक्षण माफिया, विद्यापीठे आणि काही शिक्षण संस्था सामील असल्याची शक्यता असून, या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील राणे यांची भूमिका संशयास्पदप्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सन्नी रावल यांनी केला आहे. याबाबतची एक Audio clip देखील समोर आली असून त्यात डिग्री च्या पडताळणीसाठी प्रयत्न केला असता एजंटने आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowAug 04, 2025 00:46:57Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चौथ्या दिवशी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन सुरूच, जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांनी आंदोलकांची भेट घेत प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन.
अँकर - सांगली मध्ये गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नाथ्यांचा बेमुदत आंदोलन सुरू आहे.तुकाराम बाबा महाराजांकडून अन्न त्याग करत चौथ्या दिवशीही उपोषण सुरू आहे.या आंदोलनाची जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दखल घेण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी शहरातील स्टेशन चौक ते सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढण्याची मागणी करणार असल्याचं स्पष्ट करत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्यांच्या बाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी समित कदम यांनी दिले आहे.
बाईट - समित कदम - प्रदेशाध्यक्ष - जनसुराज्य शक्ती पक्ष .
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 04, 2025 00:46:50Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात रंगल्या होड्यांच्या शर्यती..
अँकर - सांगलीच्या पोषण अधिपत्रामध्ये श्रावण मास निमित्ताने होड्यांचा शर्यती पार पडल्या. संकल्प फाउंडेशन कडून आयोजित करण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये कृष्णा व वारणा नदीकाठच्या 11 संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीने आणि थरारक अशा पार पडलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला तर कसबे डिग्रजच्या बोट क्लबने दुसरा क्रमांक पटकावला. दरवर्षी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये श्रावण महिन्यानिमित्ताने होड्यांच्या शर्यती घेण्याची परंपरा आहे.कृष्णा नदी पात्रामध्ये रंगलेल्या या होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांनी कृष्णा नदीकाठावर गर्दी केली होती.
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 04, 2025 00:46:37Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील बाराज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथांच्या दर्शनासाठी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविक येथे अनवाणी पायाने दाखल झाले होते. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपतराव राहिरे यांनी प्रभू नागनाथाची सपत्नीक महापूजा केली व दुग्धाभिषेक केला. मध्यरात्रीनंतर दोनला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.अनेक भाविक अनवाणी पायाने मंदिरात दाखल झाले होते. दिंड्या, कावड यात्राही आल्या आहेत. 'हरहर महादेव', 'बम बम भोले', 'नागनाथ महाराज की जय'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलाय. भाविकांची गर्दी लक्षात घेता नागनाथ मंदिरासह परिसरात पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दुसऱ्या श्रावण सोमवारी औंढा नागनाथला तीळाची शिवामूठ वाहिली जाते...
.....
बाईट - तुळजादास भोपी (पुजारी)
बाईट- पद्मजा दीक्षित (भाविक )
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 04, 2025 00:46:28Ambernath, Maharashtra:
रस्ता आहे की वाहनतळ ?
उल्हासनगररच्या कैलास कॉलनी रस्यावर खाजगी वाहनांच पार्किंग
Ulh parking
Anchor उल्हासनगर शहरातील कॅप नंबर पाच भागातील कैलास कॉलनी रस्ता हे वाहनतळ आहे की रस्ता असा प्रश्न विचारायची वेळ आलीआहे. कारण या रस्त्याच्या कडेला अवजड वाहन खाजगी बसेस ,टेम्पो राजरोसपणे उभे केलेले असतात , त्यामुळे हा रस्ता वाहनांना जाण्या येण्यासाठी आहे की पार्किंग साठी असा सवाल नागरिक विचारत आहेत. या रस्त्याला स्मशानभूमी असून येथे अंतयात्रे साठी आलेल्या नागरिकांना वाहन उभी करण्यासाठी जागाही नसते, त्यामुळे पालिकेने हे अनधिकृत वाहन उभी करण्यास बंद करावीत अशी मागणी नागरिक करत आहेत .
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 04, 2025 00:46:20Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे ,वाहन चालकांचे हाल
Ulh potholes
Anchor उल्हासनगर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालय, या खड्ड्यातून वाहन कशी चालवावी असा प्रश्न वाहन चालकांना पडलाय , नुकतेच महापालिकेने या पुलावरील खड्डे बुजवले होते मात्र पुन्हा या पुलावर खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. फक्त उड्डाणपूलावरच नाही तर शहरातील अनेक रस्त्यांचे अशीच अवस्था असल्याने पाठीच्या आजार होत असल्याचे वाहन चालकांनी सांगितलं,
Byte वाहनचाकल
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 04, 2025 00:46:05Ambernath, Maharashtra:
मुरबाडमधील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’च्या 20व्या हप्त्याचं वितरण
Anchor - मुरबाड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा नुकताच नागावमधील कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रम पार पडला. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आलं , तालुक्यातील शेतात नवं नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र तसंच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20व्या हफ्त्याचं वितरणही या वेळी करण्यात आलं. तसच शासनाच्या विविध योजनांसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्रंही देण्यात आलीय.
Byte किसन कथोरे आमदार
Byte रामेश्वर पाचे,जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी
चंद्रशेखर भुयार , मुरबाड
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 04, 2025 00:45:55Ambernath, Maharashtra:
बदलापुरात पाणी कपात लागू
आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
जीवन प्राधिकरणाचा निर्णय , अनियमत विद्युत पुरवठा आणि गढूळ पाण्यामुळे घेतला निर्णय
Bdl water crises
Anchor महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बदलापूर शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बदलापूरकरांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे
Vo महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बॅरेज धरणातील जलशुद्धीकरण केंद्रात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, तसेच पावसामुळा येणाऱ्या गढुळ पाण्यामुळे जलशूद्धोकरण केंद्रात गाळण व्यवस्था वारंवार बंद पडून जलशुद्धीकरण केंद्र दररोज १५ ते २० % कमी क्षमतेने चालत आहेत. तसेच जलवाहीन्यांची गळती , तसेच दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा वारंवार बंद ठेवावा लागत असल्याने त्यासाठी आठवड्यातुन एक दिवस पाणी कपात प्रस्तावित करण्यात येत असून नागरीकांनी पुढील काही दिवस सहकार्य करावे असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कडून सांगण्यात आलंय,
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 03, 2025 17:31:17Yeola, Maharashtra:
अँकर :- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाचे निमंत्रण देण्यासाठी मनोज जरांगे हे स्वतः नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे या ठिकाणी आले होते. यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी मराठा समाजाला उद्देशून भावनिक आवाहन केले. आपल्याला मराठा आरक्षणाची लढाई आता जिंकायची आहे हे आंदोलन आता शेवटचे असून यानंतर आंदोलन करायचे नाही मुंबईतून आरक्षण घेऊनच वापस येईल मात्र त्यासाठी घराघरातून मराठा मुंबईत दाखल व्हायला हवा ...
75 वर्षाच्या आरक्षणाची लढाई मी एका वर्षात कडेला लावली आहे .त्यामुळे यावेळेस गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा माझा सरकारला इशारा आहे आमच्या नादी लागू नका नाहीतर मी बाजारात उठवतो मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने का होईना मुंबईत घुसायचं म्हणजे घुसायचं असे म्हणत जरांगे पाटील यांनी नाशिक जिल्ह्याला आवाहन केले
दरम्यान या सभेच्या ठिकाणी हजारो मराठा बांधव उपस्थित होते या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता.
टीप:- असाइन्मेंट नंबर वर मनोज जरांगे पाटलांचे भाषण पॉइंटर दिले आहेत
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 03, 2025 17:02:41Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Women Gold Theft
File:02
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: शिरूर शहरात गजबजलेल्या रामलिंग रोड परिसरात भरदिवसा आणि लोकवस्तीमध्ये चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने पाठलाग करत लिफ्टमध्ये जात असलेल्या महिलेला लक्ष्य करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. गर्दी असतानाही चोरटे कोणालाही भीक न घालता निर्भीडपणे चोरी करून पसार झाले.
काल हि याच परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रकार घडला होता. दोन दिवसांत दोन महिला लुटल्या गेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी रोष आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे....
14
Report
SNSWATI NAIK
FollowAug 03, 2025 16:01:33Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये युवा सेने कडून आंदोलन
नवी मुंबई युवा सेना आंदोलन
FTP slug - nm yuva sena aandolan
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापलंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद असा शब्दप्रयोग केल्याने शिवसेना शिंदे गट आणि युवासेना प्रचंड आक्रमक झाली असून चव्हाणांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय. नवी मुंबईत देखील युवासेने तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला पेटवत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
gf
14
Report
SNSWATI NAIK
FollowAug 03, 2025 16:01:19Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: पतंजलीच्या बनावट वेबसाईटद्वारे उपचाराच्या बहाण्याने माजी आमदार पुत्राची लाखोंची फसवणूक.
पतंजली के झूट वेबसाईटवर के द्वारा ठगा
FTP slug - nm patanjali websied
shots- माजी आमदार आणि मुलगा फोटो
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: पतंजली या आयुर्वेदीक कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट बनवत माजी आमदार पुत्राची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. माजी आमदार रमेश पाटील यांच्या आजारपणाची माहिती त्यांचे सुपुत्र चेतन पाटील यांनी पतंजलीच्या या बनावट वेबसाईटवर भरली असता त्यांना एका इसमाचा फोन आला. यावेळी सदर व्यक्तीने विविध आजारांच्या वेगवेगळ्या पॅकेजची माहिती देत विश्वास संपादित करुन उपचारासाठी एकूण 7 लाख 25 हजार 330 रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही उपचार होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे चेतन पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बनावट पतंजलीचे वेबपेज चालक मिश्रा यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेय. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करील असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 03, 2025 16:00:11Kalyan, Maharashtra:
कल्याण यूज फ्लॅश..अपडेट
आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानका दरम्यान अतिशय धक्कादायक प्रकार
मेल एक्सप्रेस चा दारावर उभा असलेल्या प्रवाशाला फटका मारून मोबाईल हिसकावला
प्रवासी खाली पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत एक पाय गमावल्याची प्राथमिक माहिती
चोरट्या एवढेच नाही थांबला जखमी अवस्थेत असलेल्या प्रवासाचे 20 हजार देखील लुटलं
जखमीप्रवाशाचे नाव गौरच रामदास निकम
कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात अल्पवयीन इराणी चोरट्याला केली अटक
अल्पवयीन मुलाविरोधात या आधी देखील चार ते पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांची माहिती
रेल्वे जीआरपी कडून तपास सुरू
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 03, 2025 15:17:30Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यूज फ्लॅश..
आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानका दरम्यान अतिशय धक्कादायक प्रकार
मेल एक्सप्रेस चा दारावर उभा असलेल्या प्रवाशाचा फटका मारून मोबाईल हिसकावला
प्रवासी खाली पडल्याने त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत एक पाय गमावल्याची प्राथमिक माहिती
चोरट्या एवढेच नाही थांबला जखमी अवस्थेत असलेल्या प्रवासाचे 20 हजार देखील लुटलं
प्रवाशाचे नाव गौरच रामदास निकम
रेल्वे जीआरपी कडून तपास सुरू
14
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 03, 2025 13:47:04Ratnagiri, Maharashtra:
विधानसभा निवडणूकीमध्ये गुहागर मतदार संघात माझ्या तीन सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव वीस हजार मतांनी उलटा पडला असता.....पण आमच्या एका माणसाला माझी सभा लावायला सांगितली तर तो माणूस हलायला तयार नाही.
भावकीत कंदाल नको म्हणून मी नाव सांगत नाही : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे वक्तव्य
गुहागर मतदार संघातील अनेक जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत आल्यामुळे तीस ते पस्तीस हजाराचे मतदान आपल्याकडे फिरले.... त्यामुळे मतदान पाहून विकास काम करणाऱ्या भास्कर जाधव यांच्याकडे आता काही काम राहिले नाही : रामदास कदम यांचा भास्कर जाधवांना टोला.
योगेश कदम यांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठले...म्हणून राजीनामा मागत आहेत : रामदास कदम
गुहागर विधानसभा मतदार संघातील उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात रामदास कदम यांची टीका
14
Report