Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

चैत्र Elli Raajapurkar की रिपोर्ट: मावल के कार्ला गड पर नवरात्र तैयारी तेज

CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 21, 2025 02:02:00
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2109ZT_MAVAL_NAVRATRI Total files : 01 Headline:लोणावळा कार्ला गडावर शारदीय नवरात्र उत्सवाला 22 सप्टेंबरपासून होणार सुरुवात -आई एकविरा दर्शनासाठी ट्रस्टची सर्व तयारी पूर्ण Anchor : महाराष्ट्रातील जागृत देवस्थानांपैकी एक आणि कोळी-आगरी समाजाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार असून, नऊ दिवस आईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. राज्यभरातून तसेच परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने आईच्या दर्शनासाठी कार्ला गडावर दाखल होत असतात. भाविकांच्या या प्रचंड गर्दीला सुसूत्रता आणण्यासाठी आणि दर्शन व्यवस्थित, सुरळीत पार पाडण्यासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज झाला आहे.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Sept 21, 2025 04:19:53
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 5 FILES SLUG NAME -SAT_NAMO_MARATHON सातारा - साताऱ्यात आयोजित नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत फ्लॅग ऑफ करून या स्पर्धेला सुरुवात झाली.पोलिस कवायत मैदानापासून राजवाडा आणि पुन्हा कवायत मैदान असा पाच किलोमीटरचा मॅरेथॉनचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातून दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उत्साहपूर्ण वातावरणात ही मॅरेथॉन यशस्वीरीत्या संपन्न झाली. बाईट - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले बाईट - मंत्री जयकुमार गोरे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 21, 2025 04:18:29
Washim, Maharashtra:वाशिम: File:2109ZT_WSM_DURGA_DEVI रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर:शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला असताना वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील मूर्तिकार दुर्गादेवीच्या विविध रूपांच्या मूर्तींना अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहेत.रुद्रान्स मूर्ती कार्यशाळेत माहूरची रेणुका, कोल्हापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी,महिषासुर मर्दिनी आणि जगदंबा या देवींच्या देखण्या व सुबक मूर्ती साकारण्यात येत आहेत.यंदा सततच्या मुसळधार पावसामुळे मूर्ती रंगवण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी जाणवत असल्या तरी मूर्तिकार मात्र संपूर्ण उत्साहाने काम पूर्ण करण्यासाठी झटत आहेत.या कलाकृतींचं आकर्षण केवळ वाशीम जिल्ह्यात मर्यादित न राहता शेजारील जिल्ह्यांतील भाविकांनाही भुरळ घालत आहे.यंदा पावसामुळं कमी मुर्त्या घडल्या आहेत तर दुसरीकडे मागणी जास्त आहे त्यामुळे यंदा मुर्त्यांची कमतरता भाजण्याची शक्यता असून दरही वाढलेले राहणार आहेत.अनेकांन दुर्गा मंडळानी तर आगाऊ बुकिंग करून मूर्ती आरक्षित केल्याची माहिती मूर्तिकारांकडून देण्यात आली. बाईट:अनिकेत राऊत, मूर्तिकार
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 21, 2025 04:03:11
Beed, Maharashtra:बीड : नमो युवा रन, नशामुक्ती भारत मॅरेथॉनचे बीडमध्ये आयोजन, मंत्री पंकजा मुंडेंनी दाखवला हिरवा झेंडा तरुणाईला नशामुक्तीचा संदेश देणाऱ्या मॅरेथॉनला बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Anc : राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आयोजित नमो युवा रन नशा मुक्त भारत मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी हजारो युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. “व्यसनमुक्त भारत निरोगी भारत” अशी घोषणा देत धावपटूंनी परिसर दणाणून टाकला. या धावेतून नशामुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश पोहोचवण्यात आला. पंकजा मुंडे यांनीही तरुणाईला व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले आहे. बाईट: पंकजा मुंडे, मंत्री
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 21, 2025 04:02:32
Amravati, Maharashtra:Feed slug :– AMT_JITEDRANATH एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131916 शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सर म्हणण्या ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी; स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांचं वक्तव्य अँकर :– शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सर म्हणण्या ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असे वक्तव्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केले आहे. त्यामुळे सर म्हणणे योग्य की आचार्य म्हणणे योग्य हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठी विद्यापीठांमध्ये जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा करावी. शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा. सर म्हणजे मान्यवर मात्र शिक्षक म्हणजे माय, शिक्षक म्हणजे बाप शिक्षक हा गुरु आहे. असे म्हणत श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी ही मागणी केली आहे. साऊंड बाईट :– जितेंद्रनाथ महाराज, पीठाधीश्वर देवनाथमठ
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 21, 2025 04:02:08
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बदली होऊन जात असताना विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा - उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली होऊन जात असताना विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा - आपले शिक्षक हे बदली होऊन जात असल्याचे पाहून विद्यार्थ्यांना आपले अश्रू अनावर - आपल्या लाडक्या शिक्षकांना अक्षरशः घेराव घालत विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अफजल शेख, सोमनाथ गुंजोटे, स्नेहलता क्षीरसागर या तीन शिक्षकांचा लळा लागलेले विद्यार्थी झाले भावनिक - गुरु आणि शिष्याचं नातं हे किती घट्ट आणि भावनिक, प्रेमळ असतं हे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर - 2008 पासून कार्यरत असणारे शिक्षक आपल्याला सोडून जात आहेत हे समजल्यानंतर विद्यार्थ्यांवर पसरली शोककळा - बाणेगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थ देखील भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं - आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी देखील नतमस्तक होत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या मुलांना निरोप दिला - या निमित्ताने पुन्हा एकदा आता जिल्हा परिषदेची शाळा जिल्ह्यात चांगलीच चर्चेत आलीय
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 21, 2025 04:01:47
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 21, 2025 03:48:14
Lasalgaon, Maharashtra: अँकर :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी हिताच्या उपाययोजना करण्याची मागणी कृषी मूल्य आयोग आणि केंद्रीय समितीकडे करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या धर्तीवर कांद्याला सबसिडी देण्यात यावी, तसेच अमेरिका व युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या पांढऱ्या गोड चवीच्या कांद्याचे बीज शेतकऱ्यांना मोफत वाटावे, अशी सूचना समितीकडून करण्यात आली आहे. या बीजामुळे कृषी पॅटर्न बदलण्यास मदत होईल आणि निर्यातीतही शेतकऱ्यांना नवे मार्ग खुला होतील दरम्यान, निर्यात होणारा कांदा ५० टक्के दैनंदिन जीवनात वापरात आला असून शेतकरी, व्यापारी व सरकारकडे मोठा साठा अद्यापही शिल्लक आहे. त्यातच नवीन कांद्याचे आगमन सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी धोरणात तातडीने बदल करण्याची गरज असल्याचे बाजार समितीच्या माजी सभापती व विद्यमान संचालक सुवर्णा जगताप यांनी सांगितले आहे बाईट :- सुवर्णा जगताप (माजी सभापती व विद्यमान संचालक, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 21, 2025 03:46:24
Yeola, Maharashtra: अँकर :-दिनांक 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे नाशिकच्या येवल्यातील साडेतीन शक्तीपीठांचा दर्जा असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून प्रशासन देखील यात्रा उत्सवासाठी सज्ज झाले आहे खेळण्याची दुकाने, हॉटेल, पाळणे, यांच्यासाठी जागा निश्चित करून, घटी बसणाऱ्या भाविकांसाठी व दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, देवस्थानच्या स्वयंसेवकां बरोबर पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे नऊ दिवसांच्या या यात्रा काळात नाशिक ,छत्रपतीसंभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, धुळे ,या सह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत असतात दरम्यान यावर्षी कोटमगाव येथील यात्रा उत्सवाची नेमकी काय तयारी झाली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 21, 2025 03:45:29
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कामठवाडा कुऱ्हाड शेतशिवारात नाल्याला पुन्हा पूर आल्याने लगतच्या शेतातील होते नव्हते पीक वाहून गेले आहे. शेत जमिनीतील सुपीक माती देखील खरडून गेल्याने आता पुढे शेती करायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यंदा पावसाने उसंत घेतली नसल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन कापूस तूर आदी पिके उध्वस्त झाली आहेत. त्यात नदी नाल्याच्या काठावरील शेती जलमय झाली असून, शेतामध्ये दगड धोंडे जमा झाले आहेत. एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे पिकांचे नुकसान, अशा दुहेरी संकटात शेतकरी कुटुंबे सापडली आहेत. महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. अशी मागणी होत आहे. बाईट : आशिष राठोड, नुकसानग्रस्त शेतकरी
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 21, 2025 03:32:32
Chandwad, Maharashtra: अँकर :- साडेतीन खंडपीठांपैकी अर्ध खंडपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील स्वयंभू राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव यात्रेला २२ सप्टेंबर सोमवारपासून सुरुवात होत आहे येथे यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे येथे इ.स. १७३५ ते १७९५ या काळात पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. त्यांच्या काळापासून सुरू झालेली परंपरा आजही कायम असून यात्रेदरम्यान दररोज चांदवड येथील रंगमहालातून रेणुका मातोश्रींची पालखी मिरवणूक काढली जाते या नवरात्रोत्सवात दररोज ४० ते ५० हजार भाविक दर्शनासाठी येतात. मोठ्या गर्दीचा विचार करून १५ हजार स्क्वेअर फुट वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी ४८ सीसीटीव्ही कॅमेरे, डॉक्टरांची पथके आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे याशिवाय, यात्रेत भाविकांना केंद्रबिंदू मानून सुलभ दर्शनाची ही योजना आखण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे सह मॅनेजर सुभाष पवार यांनी दिली बाईट:- सुभाष पवार ( सह मॅनेजर, श्री रेणुका देवी माता मंदिर)
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 21, 2025 03:17:07
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 21, 2025 03:16:23
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस, अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर तीन फुटापर्यंत पाणी - अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस, अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर तीन फुटापर्यंत पाणी - अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी ओव्हर फ्लो झाल्यामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर आलं पाणी. - अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे गावाजवळील महामार्गावरील पूल गेला पाण्याखाली. - अक्कलकोट वरून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची गैरसोय - अक्कलकोट तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक पूल, बंधारे पाण्याखाली - अक्कलकोट - बोरी उमरगे पुलावरून - दूधनी - गाणगापूर मुख्य रस्ता पुलाची उंची वाढविण्याची मागणी
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 21, 2025 03:16:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn manpa tax av feed attached मनपाच्या तिजोरीत १६४ कोटी जमा ANC : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केलेल्या शास्तीसे आजादी या उपक्रमाला मालमत्ता धारकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमात अनुक्रमे ९५ आणि ७५ टक्क्यांपर्यंत थकीत शास्तीवर सूट दिली.मात्र ७५ टक्केकडे दुर्लक्ष करीत थकबाकीदारांनी ९५ टक्केच्या सवलतीलाच प्रतिसाद दिला.त्यामुळे पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत १६४ कोटींचा महसूल जमा झाला. आता मोहिमेला गती देण्यासाठी लोकअदालतीच्या नोटीस दिलेल्या ८ हजार जणांच्या मालमत्तांवर थकीत कराचा बोजा चढवण्यात येणार आहे, असे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 21, 2025 03:15:10
0
comment0
Report
Advertisement
Back to top