Back
Ulhासनगरात चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लुटली!
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 01:02:41
Ambernath, Maharashtra
चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लंपास
सीसीटीव्हीच्या आधारे लावला आरोपीचा शोध
Ulh threat
Anchor उल्हासनगरात एका व्यापाऱ्याला दुचाकीवरून लिप्ट मागण्याच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून सुमारे चार लाखाची रोकड लुटल्याची घटना घडलीय, या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीचे आधारे सराईत गुन्हेगार सुरज परगणे याला बेड्या ठोकल्या आहेत, तसेच या गुन्ह्यात वापरलेला चाकु, दुचाकी तसेच गुन्हा करताना परिधान केलेली हुडी आणि गुन्हयातील चोरी केलेल्या रक्कमेपैकी 21 हजार 500 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. त्याचा साथीदार अवि घोरपडे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
चंद्रशेखर भुयार उल्हासनगर
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 05:32:33Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0907ZT_WSM_NEW_ROAD_POTHOLES
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर :वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या रस्त्याचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून काम करण्यात आलं होतं मात्र आता या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत, तर काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलाय. यामुळं वाहनचालकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळं रस्ता कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, संबंधित विभागाकडून चौकशी करून रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 09, 2025 05:31:38Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी
SLUG- 0907_WARDHA_WKT
- वर्ध्यात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग
- जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर
- हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह,शिरसगाव, मनसावली गावात पूर परिस्थिती
- वर्धा-राळेगाव मार्ग पुराने बंद
अँकर- वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने बॅटिंग केली आहेय..वर्धा जिल्ह्याच्या आठही तालुक्यात दोन दिवसापासून पाऊस सुरू आहेय..हिंगणघाट तालुक्यातील मनसावळी,आमलडोह,शिरसगाव अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहेय..तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..
बाईट- Wkt, मिलिंद आंडे
3
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 09, 2025 05:31:08Ratnagiri, Maharashtra:
शासनाच्या वीज दरवाढीविरोधात जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक एकवटले असून याबाबत
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आलं. सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत. कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे. आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का, इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे, अशी व्यथा मांडत जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक या वाढीव वीज दरवाढीविरोधात एकवटले आहेत. चुकीच्या पद्धतीने होणारी ही वीज दरवाढ थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
1
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 05:31:00Yeola, Maharashtra:
अँकर:- येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा असून या शाळेमध्ये 88 विद्यार्थी शिक्षण घेत आहे मात्र 88 विद्यार्थ्यांमागे मुख्याध्यापकासह एकच शिक्षक असून या दोन शिक्षकांवर शाळेची भिस्त आहे. शिक्षक नसल्यामुळे पाचवी विद्यार्थ्यांनी यापूर्वीच शाळेतून आपले दाखले काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखील परिणाम होत असल्याने या शाळेला अतिरिक्त शिक्षक मिळावा याकरता शालेय शिक्षण समितीसह पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे शाळेला शिक्षक मिळत नसल्यामुळे अखेर पालकांनी शाळेला टाळे ठोकले आहे
याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील शिक्षक द्या शिक्षक द्या आमच्या शाळेला शिक्षक द्या अशी घोषणाबाजी केली तथा पालकांनी शाळेला टाळे ठोकत जोपर्यंत अधिकारी शिक्षक देत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा घेतला या संदर्भात या पालकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी..
*सोबत पालकांच्या व मुख्याध्यापकांच्या बाईट देखील वेगळ्या दिल्या आहेत*
1
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 09, 2025 05:13:08Ratnagiri, Maharashtra:
लांजा नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसह, शिवसेना उबाठा पक्षाकडून लांजा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आलं. मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह या उपोषणात सहभागी झाले होते..
डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात गेली चार वर्षे ग्रामस्थांनी नगरपंचायत, प्रांत कार्यालय यासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली होती. मात्र प्रशासनाकडून मिळणाऱ्या असकार्यावर व पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करून ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. कोत्रेवाडीच्या नागरिकांना न्याय मिळत नसल्याने अखेर शिवसेना उबाठा पक्षाने नागरिकांच्या बाजूने आवाज उठविला आहे.
या डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून पंधरा दिवसांपूर्वी उपोषण छेडण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं. त्यानुसार एक दिवशीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आलं.
9
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 05:12:48Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0907ZT_WSM_CRUSHED_DOG
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम
अँकर : वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात एक पिसाळलेला कुत्रा नागरिकांवर धावून जाऊन चावा घेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एका तासाच्या कालावधीत तब्बल १० जणांना चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.तर इतर किरकोळ जखमी झाले होते.जखमीवर मानोरा रुग्णालय उपचार सुरु आहेत.या पिसाळलेल्या
कुत्र्यामुळं परिसरात भीतीच वातावरण पसरले होते त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा हा हैदोस थांबवण्यासाठी नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
12
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 09, 2025 05:12:03Ratnagiri, Maharashtra:
दुकानात चार्जर राहिल्याचे सांगून दुकानातून सासूचा मोबाइल चोरून नेत त्याद्वारे खात्यातून २ लाख ५९ हजार ०७० रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार राजापूर तालुक्यातील ओणी-कोंडिवळे येथे घडला. याप्रकरणी जावयाविरोधात राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दानिश हेमंत काझी असं या जावयाचं नाव आहे. त्याच्याविरोधात सासू जायदा मुनीर काझी यांनी फिर्याद दिली आहे.
5
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 09, 2025 05:09:07Beed, Maharashtra:
बीड: आश्चर्य..! स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागले; नातेवाईकांनी थेट रुग्णालय गाठत सुरू केले उपचार..!
अद्याप कुटुंबाकडून रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार नाही
Anc- बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय. महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेले बाळ मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी केली परंतु ही तयारी सुरू असतानाच बाळ रडू लागल्याने नातेवाईक आश्चर्यचकित झाले.
नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत या बाळाला अति दक्षता कक्षात दाखल केले. केज तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबासोबत ही घटना घडली असून या कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही. घडलेला प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे की रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणा आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही...
9
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 09, 2025 05:03:20Pune, Maharashtra:
pimpri tadipar
kailas puri pune 9- 7- 25
feed by 2c
Anchor - पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातून 33 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय, ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर करण्यात आली, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मधून 15 आणि परिमंडळ 2 मधून 18 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलय, काही जणांवर एक वर्षांकरिता ही कारवाई करण्यात आली, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
7
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 09, 2025 05:02:38Beed, Maharashtra:
बीड: हे राम; बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? पुन्हा एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड, गुन्हा दाखल...
Anc- बीड जिल्ह्यात शाळकरी अल्पवयीन मुलींची छेडछाड काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. बीड शहरातील उमाकिरण या खासगी संस्थेतील शिक्षकांनी दोन अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याच्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर केज मध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीची छेड काढण्यात आली.. ही घटना ताजीच असताना पुन्हा एकदा केज तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीला भक्ष्य करण्यात आले आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला वर्षभर पाठलाग करून त्रास देत असल्याचा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोजच्याच छेडखानीला असाह्य झालेल्या मुलीने हा प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने थेट केज पोलिस ठाणे गाठून मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अखेर ऋषिकेश गलांडे या आरोपीविरुद्ध छेडखानी आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.. पोलिस आता आरोपीच्या शोधात आहेत.
दिवसेंदिवस मुलींच्या होत असलेल्या छेडखानी वरून बीड जिल्ह्यात दहशतीचे वातवरण पसरले असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
4
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 05:02:15Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_GAD_FLOOD
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, राष्ट्रीय महामार्गासह छोटे -मोठे 15 मार्ग बंद, पुराच्या पाण्यातून दोन बसेसची सुटका, जिल्हा व पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला पुराचा वेढा सुरू झाला आहे. गडचिरोली येथील गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी या दोन राष्ट्रीय महामार्गासह 15 जिल्हा मार्ग बंद असून ही पूर परिस्थिती गोसेखुर्दचे पाणी कमी न केल्यास सायंकाळपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्याने वाहनांच्या लांबाच लांब रांगा लागल्या आहेत.
पुरामुळे बंद असलेले मार्ग
1) गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 353 सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी)
2) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग 353 सी (गोविदपुर नाला)
3) कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका आरमोरी / कुरखेडा
4) मांगदा ते कलकुली प्रजिमा 50 तालुका आरमोरी
5)कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )
6) चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी
7) शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज
8) आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा 49 तालुका देसाईगंज
9) वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा 8 तालुका आरमोरी
10) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
11) अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा 47 तालुका देसाईगंज
12) भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा 17 (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
13) शिवणी चंदागड शिरपूर रस्ता प्रजिमा 35 तालुका कुरखेडा
14) अमिर्झा मौसिखांब रस्ता प्रजिमा 57 तालुका गडचिरोली
15) मौसिखांब वैरागड कोरेगाव रस्ता प्रजिमा 41 तालुका देसाईगंज
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
4
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 09, 2025 04:38:18Pune, Maharashtra:
pimpri river
kailas puri Pune 9-7-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी 1556 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पवना नदी सुधार प्रकल्पासाठी गेले कित्येक वर्ष प्रयत्न सुरू होता. अखेर राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडून एनवायरमेंटल क्लिअरन्स मिळाल्याने हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची माहिती या प्रकल्पाचा पाठपुरावा करणाऱ्या भाजपच्या संदीप वाघेरे यांनी दिली. या प्रकल्पामुळे महापालिकेला हजारो कोटींचा फायदा होणार असतानाच या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वाघेरे यांनी स्पष्ट केले.
Byte - संदीप वाघेरे, भाजप
14
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 09, 2025 04:37:32Nashik, Maharashtra:
nsk_gramsabha
feed by 2C
vidoe 5
anchor कळवण तालुक्यातील पुणेगाव मध्ये पेसा अध्यक्षांनीच ग्रामस्थांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांनी मीटिंग आयोजित केली तेव्हा गावकरी मंडळी, ग्रामसेवक सरपंच, सदस्य सर्व उपस्थित होते.यावेळी पेसा संदर्भात प्रश्न विचारत असल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत पेसा निधीवर राहणारा अध्यक्ष रामा येवाजी पवार तसेच त्यांचे भाऊ,गुलाब येवाजी पवार, रमेश येवाजी पवार यांनी ग्रामपंचायत सदस्य विश्वास गायकवाड यांना हाणमार केले. थोडा वेळ तणावाचे वातावरण असताना पोलिसांना फोन करून कळल्यानंतर घटनास्थळी पोलीस येऊन पूर्ण चौकशी करून गुन्हा दाखल केलाय. गावकऱ्यांना शांत राहण्याची आव्हान करण्यात आले आहे. गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर विकास कामामध्ये अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांनी कामाच्या दर्जावर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित ग्रामस्थांनी केले. तसेच सदस्य हे कामामध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायत सदस्य यांनी पेसा निधीतून गावाच्या विकासासाठी किती निधी खर्च केला याबाबत गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीचा गैरव्यवहार झाला आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.पुढील कार्यवाही प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
13
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 09, 2025 04:36:11Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DRON_SHORTS पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
टीप :– व्हिडिओ सौज्यन प्रतीक नरेटे नाव द्यावे
सततच्या पावसाने चिखलदऱ्यातील भीमकुंड धबधबा प्रवाहित; चिखलदऱ्यात पर्यटकांची तुफान गर्दी, पहा ड्रोन कॅमेरातून विहंगम दृश्य
अँकर :- गेल्या काही दिवसापासून चिखलदऱ्यात सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे चिखलदऱ्यातील भीम कुंड धबधबा हा प्रवाहित झाला असून ओसंडून वाहत आहे. सध्या संपूर्ण चिखलदऱ्यात अल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र धुके धुके पाहायला मिळत आहे त्यामुळे चिखलदऱ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. भीमकुंड धबधबा हा प्रवाहित झाल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात खुणावत असून धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असून अल्लाददायक वातावरणाचा आनंद घेत आहे. ३ हजार ५०० फुटांवरून वाहणारा भिमकुंड धबधबाही प्रवाहित झाला असून ही मनमोहक दृश्य टिपण्यासाठी पर्यटक भिमकुंड पॉईंटवर गर्दी करत आहे. दरम्यान या धबधब्याचा उल्लेख महाभारत काळात असून या ठिकाणी विराट राजाचे राज्य होते. ते अज्ञात वासात असताना पांडव वेशांतर करून विराट नगरीत राहायला आले. त्यानंतर महाबली भीमाने किचकाचा वध करून त्याचा मृतदेह खोल दरीत फेकला आणि भीमाने स्वतःचे रक्तरंजित हात आणि पूर्ण शरीर स्वच्छ करण्यासाठी ज्या कुंडामध्ये स्नान केले ते भीमकुंड नावाने ओळखले जाते अशी आख्यायिका देखील आहे. या भीमकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य आपल्या ड्रोन कॅमेरा टिपले झी 24 तासचे प्रेक्षक प्रतीक नरेटे यांनी
13
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 09, 2025 04:34:23Akola, Maharashtra:
Anchor : अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाच्या पथकांच्या नेतृत्वात अकोल्यातील अकोट येथे छापे टाकण्यात आले. या ठिकाणावरून दस्तावेज, कोरे धनादेश आदी जप्त करण्यात आले. अकोट शहरात विना अनुज्ञप्ती अवैध सावकारी करत असल्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात छापा टाकण्यात आला. अर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार गजानन लक्ष्मणराव माकोडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अंतर्गत धाड कार्यवाहीद्वारे शोध कार्य करण्यात आले.
12
Share
Report