Back
बारिश के बीच RSS पथ संचलन: नंदुरबार में भीगी भीड़ का दिल जीत लिया
PPPRASHANT PARDESHI
Sept 27, 2025 17:31:54
Dhule, Maharashtra
ANCHOR - नंदुरबार शहरात मुसळधार पावसात संघाचे पथसंचल पार पडले. शताब्दी वर्षानिमित्ताने आज आरएसएस च्या पथ संचलनाला जोरदार पाऊसही रोखू शकलेला नसल्याचे दिसून आले आहे. आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान शताब्दी वर्षानिमित्ताने आरएसएसच्या पथ संचलनाला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर परिसरापासून सुरवात झाली. मात्र अवघ्या पाच ते दहा मिनिटात नंदुरबार मध्ये दमदार पावसाने हजेरी लावली, वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने सर्वत्र धावपळ उडाली मात्र आरएसएस ने आपले पथ संचलन या मुसळधार पावसातही सुरुच ठेवल्याचे दिसून आले. शहरातील नगरपालीका चौकात गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढत संघ कार्यकर्त्यांनी संचलन न थांबवता सुरु ठेवल्याने पावसातही आरएसएसचे पथ संचलन सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरत असल्याचे दिसून आले. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाही, स्वयंसेवकांनी आपली शिस्त, गणवेशाची नीटनेटकेपणा आणि पावलांचा ताल जराही बिघडू दिला नाही. पाऊस सुरू झाल्यावरही संचलनाच्या मार्गात कोणताही खंड पडला नाही. अनेक नागरिक आणि प्रेक्षक हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. या प्रसंगाने संघाच्या स्वयंसेवकांची निश्चित ध्येय आणि मूल्यांप्रती असलेली दुर्दम्य निष्ठा सिद्ध झाली. विपरीत परिस्थितीतही आपले कार्य आणि शिस्त कायम राखण्याच्या त्यांच्या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. संघ शताब्दी वर्षाच्या या पथसंचलनाने केवळ नंदुरबारवासियांचेच नव्हे, तर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आणि स्वयंसेवकांच्या अटल निश्चयाचा संदेश दिला.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 17:46:060
Report
KJKunal Jamdade
FollowSept 27, 2025 17:32:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 17:31:430
Report
5
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 17:16:312
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 17:15:541
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 17:01:161
Report
KJKunal Jamdade
FollowSept 27, 2025 16:02:340
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 27, 2025 15:34:502
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 27, 2025 15:30:130
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 15:18:032
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 15:00:250
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 14:45:520
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 14:45:380
Report