Back

किरीट सोमय्या यांची दारव्हा भेट
Darwha, Maharashtra:
दारव्हा तहसील कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अवैध जन्म प्रमाणपत्र प्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे. २०२४ मध्ये दाखल झालेल्या १८०० जन्म दाखल्यांपैकी तब्बल ७०० अर्ज अवैध असल्याचं प्राथमिक तपासणीत समोर आलं. तहसीलदारांनी तपासलेल्या १५० अर्जांपैकी २५ अर्ज अवैध असल्याचं स्पष्ट झालं आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, दहा दिवसांत सर्व अपात्र अर्ज मागे घेऊन कारवाई केली जाईल, असं तहसीलदारांनी आश्वासन दिलं आहे."
16
Report