Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445202

सतत पावसामुळे गोपाल नगर संकटात

Sept 27, 2025 17:18:50
Darwha, Maharashtra
“गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोपाल नगर परिसरातील नाल्याला पूर आला. हा पूर थेट नागरिकांच्या घरात घुसल्याने भिंती, छत आणि घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले. काहींना तर घराबाहेर पडावे लागले. रहिवाशांचे म्हणणे आहे की, पावसाळा सुरू होण्याआधी नगरपरिषदेकडून नाल्याचे खोलीकरण व साफसफाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून घरातच दमछाक होत असून नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते पवनभाऊ शेबे यांच्याशी संपर्क साधला आहे. प्रशा
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Sept 27, 2025 17:46:06
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 27, 2025 17:31:54
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदुरबार शहरात मुसळधार पावसात संघाचे पथसंचल पार पडले. शताब्दी वर्षानिमित्ताने आज आरएसएस च्या पथ संचलनाला जोरदार पाऊसही रोखू शकलेला नसल्याचे दिसून आले आहे. आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान शताब्दी वर्षानिमित्ताने आरएसएसच्या पथ संचलनाला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर परिसरापासून सुरवात झाली. मात्र अवघ्या पाच ते दहा मिनिटात नंदुरबार मध्ये दमदार पावसाने हजेरी लावली, वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने सर्वत्र धावपळ उडाली मात्र आरएसएस ने आपले पथ संचलन या मुसळधार पावसातही सुरुच ठेवल्याचे दिसून आले. शहरातील नगरपालीका चौकात गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढत संघ कार्यकर्त्यांनी संचलन न थांबवता सुरु ठेवल्याने पावसातही आरएसएसचे पथ संचलन सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरत असल्याचे दिसून आले. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाही, स्वयंसेवकांनी आपली शिस्त, गणवेशाची नीटनेटकेपणा आणि पावलांचा ताल जराही बिघडू दिला नाही. पाऊस सुरू झाल्यावरही संचलनाच्या मार्गात कोणताही खंड पडला नाही. अनेक नागरिक आणि प्रेक्षक हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. या प्रसंगाने संघाच्या स्वयंसेवकांची निश्चित ध्येय आणि मूल्यांप्रती असलेली दुर्दम्य निष्ठा सिद्ध झाली. विपरीत परिस्थितीतही आपले कार्य आणि शिस्त कायम राखण्याच्या त्यांच्या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. संघ शताब्दी वर्षाच्या या पथसंचलनाने केवळ नंदुरबारवासियांचेच नव्हे, तर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आणि स्वयंसेवकांच्या अटल निश्चयाचा संदेश दिला. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 17:31:43
Washim, Maharashtra:वाशिम: File:2709ZT_WSM_STUDENT_RESCUE रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर :वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत.मानोरा येथील शाळेत शिकणारे आसोला गावातील काही विद्यार्थी शाळा सुटल्यावर परतत असताना आसोला–मानोरा मार्गावरील नाल्याला अचानक पूर आल्याने अडकून पडले.या प्रसंगी गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य करुन ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्सी बांधून दोन ते तीन विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला नेण्यात आले. थोडा जरी पाऊस झाला तर या पुलावरून पाणी येतं असल्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली जातं आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 27, 2025 17:16:31
Kalyan, Maharashtra:सुसंस्कृत, सुशिक्षित डोंबिवलीत रात्रीच्या वेळेस पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ.. दारुड्या लोकांकडून कर्मचार्याना त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याचे कारण देण्यात आले आहे.रात्रीच्या वेळेस पेट्रोल पंप बंद.. Anc.. डोंबिवली शहराची ओळख सुसंस्कृत शहर म्हूणन ओळख आहे मात्र या शहरात गुन्हेगारी वाढत चाली आहे.शहरात डोंबिवलीतील राजू नगर येथील एक पेट्रोल पंपावर लागलेल्या बॅनर मुळे समोर आला आहे. पेट्रोल पंप रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत बंद करावा लागत आहे. रात्री या पेट्रोल पंपावर येणारे तरुण येथे काम करणाऱ्या कर्मचार्यांना शिवीगाळ करणे, त्रास देणे मारणे असे प्रकार घडत असतात. या सर्व प्रकाराला कंटाळून चक्क पेट्रोल पंप चालकाने हा पेट्रोल पंप रात्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रात्री अपरात्री गाडीत पेट्रोल डीझेल टाकायला येणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय होत आहे. परंतु पेट्रोल पंप चालकाने आपली हि व्यथा बँनर लावून मांडली आहे. पंपावर लावलेले हे बनार चर्चेचा विषय ठरत आहेत.
2
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 27, 2025 17:01:16
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 6 FILES SLUG NAME -SAT_MASHAL_MAHOTSAV सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा मावळ्याचा पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला 366 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला . या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सवात या किल्ल्यावर मशाली पेटवल्या जाऊ लागल्या आणि 2010 साला पासून हि परंपरा अखंड सरू आहे . सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला प्रतापगड किल्ला कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदी मध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना 1661 मध्ये प्रतापगडावर केली या घटनेला 2010 मध्ये 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर 350 मशाली पेटविण्यात आल्या.. आता प्रत्येक वर्षी या मशाली मध्ये 1 मशालीची वाढ होते आहे .या वर्षी 366 मशालिनी किल्ला तेजोमय झाला ढोल ताशाच्या गजरात गडाच्या पूर्ण तटाच्या बाजूला मशाली पेटवल्या हा क्षण प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो... बाईट: आप्पा उत्तेकर (आयोजक)
1
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 27, 2025 15:30:13
Buldhana, Maharashtra:सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टी, जांभोरा आणि सोनोशीचा संपर्क तुटला अँकर - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. सर्वात गंभीर परिस्थिती राहेरी-शेवली रोडवर पाहायला मिळत आहे. या मार्गावरील जांभोरा आणि सोनोशी या गावांदरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. या घटनेमुळे अनेक नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूंना अडकून पडले आहेत. यामध्ये नोकरदार वर्ग, दवाखान्यात गेलेले नागरिक आणि इतर प्रवासी यांचा समावेश आहे. रात्रीची वेळ असल्याने अडकलेल्या नागरिकांची गैरसोय वाढली असून, पाण्याच्या पातळीत घट होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 27, 2025 15:18:03
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महापुरामुळे सोलापुरातील अनेक भागात आढळतायत साप अँकर :- सोलापुरात मागील काही दिवसापासून पूरपरिस्थिती आहे. अनेक गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिलाय. या पुराच्या पाण्यात अनेकांच्या घरात साप येतं असल्याचे दिसून येतं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर प्राणी आढळूबा आला. पाण्याच्या भीतीने साळींदर रस्त्यावर आला होता. त्याला वन्यजीवप्रेमीनी सुरक्षित रेस्क्यू केलं. दरम्यान शुक्रवारी सर्प दंशाने सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालंय. गावात पाण्याचा वेढा वाढल्याने नदीत असलेले साप तर वाहून येतायत मात्र विषारी साप देखील सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात लोकांच्या घरात घुसतायत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.
2
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 27, 2025 14:45:52
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिग्रस च्या अरुणावती प्रकल्पात जलसाठा वाढला असून, अरुणावती धरणाचे सर्व अकराही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे अरुणावती नदीला पूर आला असून, आर्णी दिग्रस मार्गावरील पूल पाण्याखाली आला आहे. त्यामुळे या पुलावरून माहूर आणि दिग्रस करणे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. धरणातून 940.50 घनमीटर प्रति सेकंद इतकं पाणी अरुणावती नदीपात्रात सोडण्यात येतं आहे, या विसर्गामुळे अरुणावती नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालाय, दरम्यान प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, पुराचे पाणी आणि शहरातील काही भागांमध्ये देखील शिरले आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top