Back
आशा सेविकांनी वाशिममध्ये मोर्चा काढला, मागण्या ऐकण्याची वेळ आली!
GMGANESH MOHALE
FollowJul 08, 2025 10:38:15
Washim, Maharashtra
वाशिम:
File:0807ZT_WSM_ASHASEVIKA_MORCHA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:आशा सेविकान व गट प्रवर्तक यांना मानधनात वाढ करण्यात यावे,आशा सेविकाना कायमस्वरूपी शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे,ऑनलाइन कामे देऊ नये,दिवाळीत एका महिन्याचे वेतन बोनस देण्यात यावा,जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकाचा मागील आठ महिन्याचा रखडलेला थकीत मोबदला देण्यात यावा, सहा महिन्याची प्रसुती पगारी रजा देण्यात यावी,दर महिन्याला वेळेवर दहा तारखेच्या आत मानधन देण्यात यावे, जन सुरक्षा कायदा मागे घ्यावा,या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यासाठी आज आशा सेविकांनी व गट प्रवर्तक यांनी आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य मोर्चा काढत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आशा सेविका व गटप्रवर्तक धडकल्या.मोर्चामध्ये वाशिम जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 13:32:36Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- धस अपघात
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नितीन शेळके असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने या दुचाकीस्वाराला धडक दिली. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान हा अपघात घडला असून या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आलाय. दुचाकीस्वार हा जातेगाव फाट्याकडून रास्ता ओलांडत असतांना सागर धस याच्या वाहनाने जोराची धडक यात या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
Wkt- लैलेश
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 08, 2025 13:10:12Navi Mumbai, Maharashtra:
story slug - शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण
रयत शिक्षण संस्था
ftp slug - nm shard pawar
byet- sound bhet
reporter - swati naik
navi mumbai
anchor - तळोजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या नावडे शाळेमध्ये स्व माजी आमदार दत्तूशेठ पाटील स्मारक व पूर्णकुर्ती पुतळा उभारण्यात आला या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले।यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी
आज शैक्षणिक क्षेत्रात होणारा बदल बाबत माहिती दिली, पूर्वी
प्राथमिक आणि माध्यमिक षिक्षण घेतल जात होत,नन्तरच्या काळात गुनवत्तेची चर्चा होउ लागली...
रयत शिक्षण संस्थे मध्ये संगणक च शिक्षण देण्यात आले
आणि आता काळ कृत्रिम बुद्धिमतेचा आहे
शिक्षण ते कृषि प्रत्येक क्षेत्रात ए आय चा वापर होत असल्याचे सांगितले।
साउंड बाईट - शरद पवार- आद्यक्ष एन सी पी
13
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 08, 2025 13:08:40Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0807ZT_GAD_THALI_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या मलेरिया प्रकोपाविरोधात काँग्रेसने केले टाळी-थाळी वाजवा आंदोलन, थाळ्या वाजवून कोरोना सारखाच मलेरिया पळून जाणार असल्याचा दावा
अँकर:--गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या मलेरिया प्रकोपाविरोधात जिल्हा काँग्रेसने आज अनोखे टाळी-थाळी वाजवा आंदोलन केले. थाळ्या वाजवून कोरोना सारखाच मलेरिया पळून जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केला. गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या एकाच महिन्यात हजारो मलेरिया रुग्णांची वाढ झाली आहे. काही रुग्ण उपचाराअभावी दगावले असून डॉक्टरांची रिक्त पदे, औषधांचा अपुरा साठा या परिस्थितीत भर घालत आहे. पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलेरियाचे वास्तव समजावे यासाठी भर पावसात जिल्हा परिषदेवर हा मोर्चा काढण्यात आला.
बाईट १) महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
14
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 08, 2025 13:05:13Raigad, Maharashtra:
स्लग – मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न ....... अलिबागच्या व्यापारयाची सोशल मिडियावर पोस्ट ....... मनसैनिकांनी हिसका दाखवताच व्यापारयाची माफी
अँकर – मुंबईत मराठी विरूदध अन्य भाषिकांमध्ये वाद सुरू असतानाच त्याचे पडसाद रायगडमध्येही उमटले. अलिबागमध्ये एका मारवाडी व्यापारयाने सोशल मिडियावर मराठी माणसाविरोधात स्टेटस ठेवत मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला मनसैनिकांनी चांगलाच हिसका दाखवला. मनसैननिकांनी या व्यापारयाच्या दुकानात जावून त्याला याबाबतचा जाब विचारला . त्यानंतर या व्यापारयाने माफी मागत सोशल मिडियावरील स्टेटस डिलीट केलं.
बाईट – सिदधू म्हात्रे , मनसे अलिबाग तालुका प्रमुख
साउंड बाईट - व्यापारी
14
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 08, 2025 12:34:57Kalyan, Maharashtra:
भाजप नगरसेवकाच्या मनधरणीला मुख्यमंत्र्यांना यश.
विकास म्हात्रे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट
Anc..भाजपा चे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्याची माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपा पदाचा राजीनामा दिला होता निधी मिळत नसल्याने आणि पक्षात मानसन्मान मिळत नसल्याने कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या कडे राजीनामा दिल्या नंतर विकास म्हात्रे यांचा पोलीस संवरक्षण काढुन घेतला होता अखेर मुख्यमंत्री यांची भेट घेऊन नाराजगी दूर झाली असल्याचे विकास म्हात्रे कुठेही गेले नाही ते भाजपातच आहेत -जिल्हा प्रमुख नंदू परब यांची माहिती सांगितले.
Byte :- नंदू परब ( जिल्हाध्यक्ष भाजप )
14
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 08, 2025 12:32:47Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_FrodCase
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - शासनाची अन्न धान्य योजना असल्याचा बनाव करून एका बंटी आणि बबलीने आपल्या साथीदारांसोबत मिळून हजारो गोरगरिबांना गंडा घातला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षांपासून हे बंटी बबली फरार होते अखेर त्यांना नांदेड पोलिसांनी अटक केली.
Vo - महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र या आणि अशा शासनामान्य योजना असल्याचा बनाव करून गोरगरिबांची फसवणूक करण्यात आली. केवळ अकराशे ते बाराशे रुपयात भरघोस अन्नधान्य, शिलाई मशीन, विधवाना वर्षभर 10 हजार रुपये प्रतिमाहीना पेन्शन, 30 हजार रुपयात इलेक्ट्रिक स्कुटी असे अमिष दाखवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात या ठगानी दुकाने थाटली. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नेमून गरिबांना जाळ्यात ओढले. शासनाची योजना असल्याचा समज झाल्याने हजारोच्या संख्येने गोरगरीबानी पैसे दिले.
ग्राफिक्स
:: 1100 रुपयांच्या मोबदल्यात 30 किलो गहू, 25 किलो तांदूळ, 10 किलो साखर, 10 किलो पोहा
:: 1200 रुपयात 60 किलो गहू, 25 किलो तांदूळ
:: 2200 रुपयात शिलाई मशीन
:: 1200 रुपये भरल्यानंतर विधवा महिलांना एक वर्ष प्रतिमाहीना 10 हजार रुपये
:: 30 हजार रुपयात इलेक्ट्रिक स्कुटी
असे अमिष दाखवण्यात आले.
Vo - पैसे दिल्यानंतर तीन महिन्यांनी लाभ मिळणार असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात मोबदला देण्याची वेळ आली तेव्हा सुतारे आणि त्याचे सहकारी गायब झाले. या सर्व रॅकेट चा सूत्रधार आहे बाबासाहेब सुतारे. गुन्हा दाखल झाल्यावर दोन वर्षांपासून सुतारे त्याची पत्नी सोनालीला घेऊन फरार होता. स्वतःची ओळख लपवून नाव बदलून हे बंटी बबली लातूरमध्ये राहत होते. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना लातूरमधून अटक केली.
Byte - उदय खंडेराय - पोलीस निरीक्षक, एलसीबी. (सिव्हिल ड्रेस वर असलेला byte)
Vo - पैसे देऊन तीन महिने उलटूनही अन्न धान्य मिळत नसल्याने तक्रारी वाढल्या. हजारो लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. गोरगरिबांची फसवणूक झाल्याने काही संघटनानी मोर्चेही काढले. अखेर या प्रकरणी जून 2023 मध्ये वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 1 कोटी 85 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली. प्रत्यक्षात चौदा हजार लोकांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गोरगरिबांना ठगनाऱ्या बाबासाहेब सुतारे आणि त्याची पत्नी सोनाली या बंटी बबली पोलिसांनी अटक केलीये. त्यांची मलमत्ता आणि बँक अकाउंट सील करून पैसे वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
Byte - अबिनाशकुमार - पोलीस अधीक्षक,नांदेड. (युनिफॉर्म वरील byte)
Vo - शासनाची कुठलीही योजना असेल तर त्याची प्रसिद्धी शासन अधिकृत वर्तमाणपत्र अधिकृत माध्यमाद्वारे करते. महसूल यंत्रणा योजना राबवते. त्यामुळे कोणत्याही योजनेला बळी पडण्यापूर्वी नागरिकांनी खात्री करून घेणे आवश्यक आहे. नाहीतर असे बंटी आणि बबली गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेत राहतील.
सतीश मोहिते
झी 24 तास, नांदेड.
-------------------------
टीप - पती पत्नीचा फोटो टाकला आहे. महिला असल्याने पत्नीचा फोटो ब्लर करायचा का ठरवावे. ही फसवणूक ज्यावेळी झाली त्यावेळचे फाईल फुटेज 2 फाईल टाकल्या आहेत. त्याला फाईल वापरावे.
14
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 08, 2025 12:31:44Navi Mumbai, Maharashtra:
Story slug - नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती साठी पर्यायी जागेचा शोध ? assin by desk
FTP slug - nm apmc market shift story
Byet- apmc sachin, traders
Shots - apmc
Reporter- swati naik
Navi mumbai
Anchor - चाळीस वर्षांपूर्वी मुंबई मधून नवी मुंबई मद्ये स्थलांतरीत करण्यात आलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबई शहरा बाहेर स्थलांतरीत होईल का याचा आढावा घेण्यात आहे , तशा सूचना सिडको, नवी मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत
यामुळे पुन्हा बाजार समिती स्थलांतरीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।
Vo1- मुंबई मधून 80 ते 90 च्या दशकत
नवी मुंबई मद्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पाचही बाजारपेठा स्थलांतरीत करण्यात आल्या, यासाठी माथाडी आणि व्यापारी साठी एक लाख हुन जास्त घरे शासनाने कमी किमती मद्ये उपलब्ध करून दिले, परंतु आता पुन्हा नवी मुंबई मधून ही बाजार समिती देखेले बाहेर नेण्यासाठी आढावा घेतला जात आहे ,तशा सूचना शासनाच्या नवी मुंबई म्हापलेलीक दिल्या आहेत ,यात
,100 एकर चा भूखंड या मार्केट साठी शोधण्याचे सूचना शासनाने दिल्या आहेत,
यासंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सचिव बरोबर बेथक घेतली ,यात त्यांना जागा देखील सुचवण्यात आलाय यात नवी मुंबई महानगर पालिकेच्या ह्दडीत समाविष्ट झालेली 14 गावांची जमीन महापालिकेने सुचवली आहे ,बाजार समिती प्रशासनांने जागेबाबत व्यापारी आणि इतर घटकांचं आढावा घेण्याची सूचना दिल्या आहेत।
बाईट - पी. ऐल .खंडागळे- सचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
Vo2- तर बाजार समिती एकीकडे रिडेव्हलपमेंट साठी निवडा मागवत आहे, असं असताना नवी मुंबई बाहेर मार्केट हलवल्यास व्यापाऱ्यांचा याला तीव्र विरोध असणार असल्यासागे एपीएमसी तीळ व्यापाऱ्यांनी सगीतेल आहे ।
बाईट - अशोक वाळुंज एपीएमसी व्यापारी
Vo3 - नवी मुंबई शहराच्या मद्यभागी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असल्या कारणाने या जमिनी वर सहविकास करण्याचा प्रस्ताव आहे , त्यात बाजार समिती हलवण्यासाठी देखील प्रयत्न सुरह आहेत ,यासाठी विमानतळ जवळील उलवा , आणि पालघर मद्ये देखील जागा बघण्यात येत आहेत पण जागा नवी मुंबई बाहेर असल्यास व्यापारी आणि माथाडी यांचा विरोध याला असणार असून, बाजार समिती स्थलांतरित केल्यास तेचढा कामगार वर्ग आणि व्यापारी वर्ग साठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे लागणार आहे,
बाईट - क्लोजिंग wkt
------------
14
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 08, 2025 11:36:46Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Ubt Agit
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुर्याजी पिसाळ यांच्याशी तुलना करत एकेरी उल्लेख करून महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक आणि मराठी माणसांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिरूर तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात करत आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यावेळेस आंदोलकांनी आमदार पडळकर यांच्या फोटोलाही काळ फासलं
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
14
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 08, 2025 11:36:38Pandharpur, Maharashtra:
08072025
Slug - PPR_NO_SHKATIPITH
feed on 2c
file 01
-------
Anchor - शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला पंढरपूर तालुक्यातून विरोध होण्यास सुरुवात झालेली आहे आज विटे गावात मोजणी सुरू असताना ज्या शेतकऱ्यांच्या गटातून हा महामार्ग जात आहे तेथील जवळपास 50 शेतकऱ्यांनी एकत्र येत ही मोजणी करण्यास विरोध केलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना नकोसा झालेला आहे. जर जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न झालास तर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
14
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 08, 2025 11:36:22Pandharpur, Maharashtra:
08072025
slug - PPR_SAVATA_MAHARAJ
feed on 2c
file 02
------
Anchor - पांडुरंग आणि संत सावता महाराज भेटीचा पालखी सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आयोजित करण्याची संत सावता भक्त परिवाराची शासनाकडे मागणी
आषाढीला सर्व संतांच्या पालख्या पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूर मध्ये येतात. मात्र संत सावता माळी येत नाहीत. त्यामुळे वारीनंतर संत सावता महाराज भेटीला पांडुरंगाची पालखी घेऊन पंढरपूर मधील काही वारकरी मंडळी अरण गावी निघतात. संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि सावता महाराज भक्त परिवार यांनी आज एक बैठक घेऊन पांडुरंग आणि संत सावता महाराज भेटीचा सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. रथ पादुका बैलजोडी आणि जाण्या येण्याच्या मार्गातील सर्व व्यवस्था समितीने करावी अशी मागणी संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आली.
-------
Byte - प्रभू महाराज , संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट
15
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 08, 2025 11:12:28Dhule, Maharashtra:
Anchor -७ महिन्यापूर्वी घरफोडी करणाऱ्या दिपक कोळी या संशयिताला शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आले आहे. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे सात महिन्यापू्वी घरफोडीची घटना घडली होती.त्या घटनेनंतर संशयिताचा शोध सुरु असतांना संशयित दिपक टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांनी अन्य ठिकाणी कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.
Byte सुरेश सिरसाठ पोलीस उपनिरीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 08, 2025 11:11:13Dhule, Maharashtra:
anchor - राज्यातील प्रस्तावित वीज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक, व्यापारी, नवीकरणीय ऊर्जा आणि ग्राहक संघटनांच्या वतीने धुळ्यात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना संयुक्त निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी यांच्याकडून MERC (महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग) येथे दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. MERC ने पारित केलेला मूळ आदेश सर्व ग्राहक वर्गांनी स्वागतार्ह मानला होता. मात्र, केवळ काही दिवसांतच MSEDCL ने पुनर्विचार याचिका दाखल करून, त्यात आर्थिक आकड्यांत बदल करत टॅरिफ पुन्हा वाढवण्याचा प्रस्ताव दिला. दुर्दैवाने MERC ने कोणतीही जनसुनावणी न घेता टॅरिफमध्ये अचानक बदल करत नविन आदेश जारी केला. यांला सर्व स्तरातून विरोध केला जात आहे. या नविन आदेशामुळे प्रत्येक ग्राहक वर्गावर आर्थिक बोजा वाढला असून वीज दर देशातील सर्वात जास्त दरांपैकी ठरले आहेत. सरकारकडून उत्पादन खर्च कमी करण्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ दिसून येत आहे.
byte - नितीन बंग, व्यापारी
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 11:10:58Pune, Maharashtra:
अहिल्यानगर
नगर पुणे महामार्गावर अपघात एक दुचाकी स्वार ठार...
नितीन शेळके असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वराचे नाव..
रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडला अपघात..
आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने दिली धडक...
दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस याने दिली मागून जोराची धडक..
सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल...
14
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 08, 2025 11:09:34Dhule, Maharashtra:
Anchor :- नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील दापूर धबधबा प्रवाहित झाला असून, या धबधबाच्या आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक पाहण्यात अडकले, अडकलेल्या पर्यटकांना स्थानिकाकडून मदत केली जात आहे. अचानक दापूर धबधब्यात पाणी वाढल्याने पर्यटक अडकले नवापूर तालुक्यातील काकड पाडा येथील पर्यटक होते सध्या नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटक धबधब्याच्या आनंद घेण्यासाठी जात आहेत. परंतु काही अति उत्साहिक पर्यटक पाण्याच्या प्रवाहात जाताना देखील दिसून येत आहेत. दापूर धबधब्यात अडकलेल्या पर्यटकांचे स्थानिकांकडून मदत करून वाचावंन्यात आले.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 11:03:47Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- बनावट शासन निर्णय
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट शासन निर्णय तयार करून करोडो रुपयांची कामे केल्याचा समोर आला आहे विशेष म्हणजे या कामाच्या निविदा आणि कार्यारंभ आदेश देखील प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले आहेत राज्य सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदा आणि नेवासा या चार तालुक्यातील तब्बल ४५ विकासकामांचे हे बनावट शासन निर्णय उजेडात आले आहेत. या बनावट शासन निर्णयांच्या आधारे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहिल्यानगर या यंत्रणेमार्फत बहुतांश विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांना पैसे देण्याच्या टप्प्यावर हे शासन निर्णयच बोगस असल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारही हवालदिल झाले आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोलण्यास नकार देत आहेत तर ज्या गावात ही कामे झाली आहेत त्या गावातील ग्रामस्थ मात्र या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ आहेत नगर शहरापासून जवळच असलेल्या देऊळगाव सिद्धी येथे अशा बनावट जीआर च्या माध्यमातून रस्त्याची काही कामे झाले आहेत मात्र ग्रामस्थांना प्रकाराबद्दल काही सांगता येत नाही आपल्या गावात रस्त्याची कामे झाले याचाच समाधान आहे
बाईट:- संजय वाघमोडे, काम झालेल्या गावातील ग्रामस्थ
14
Share
Report