Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक म्हसरूळ में गाड़ियों जलाने वाले आरोपी की गिरफ्तारी

YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 03:00:51
Nashik, Maharashtra
नाशिक * म्हसरूळ परिसरात गाड्यांची जाळपोळ करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.. * 2 महिन्यांपूर्वी नाशिक म्हसरूळ परिसरात जाळल्या होत्या गाड्या * अनेक दिवसांपासून पोलिस होते मागावर * नाशिकच्या खंडणी विरोधी पथकाने केली अटक * दिंडोरी, म्हसरूळ पोलिस स्टेशन मध्ये आरोपी विरोधात गुन्हे दाखल * म्हसरूळधे पसरवत होता दहशत..
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Sept 16, 2025 05:49:54
kolhapur, Maharashtra:Ngp Taywade Byte live u ने फीड पाठवले ------------ नागपूर बाईट - बबनराव तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ - मराठा समजतील मृतकाच कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.. यात भरत कराडच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, ओबीसी समाजतील लोकांनी धीर ठेवावा... आत्महत्या कोणीच करू नये... On गैरसमज आत्महत्या - महाराष्ट्र मध्ये चुकीचा संदेश जात आहे, ओबीसीच आरक्षण संपलं, जवाबदारी पूर्वक वक्तव्य केले आहे.. दोन तारखेला जीआर काढला, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, - मराठा समाजात दोन गट पडले आहे, एक गट म्हणतो यात कुणबी नोंद नसणाऱ्या कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, - ओबीसीच आरक्षण संपलं म्हणणाऱ्या लोकाचा नेत्यावर विश्वास असतो, त्यामुळे आता लोकांमध्ये समज पसरत आहे.. नेत्यांनी सांगावे घाबरू नये, आम्ही लढा देत आहे.. On भुजबळ मेळावा - ज्यांना वाटत आपापल्या पद्धतीने समोर येत आहे.. मेळाव्याचे स्वागत करेल..पण मनोधैर्य वाढावे असे मार्गदर्शन करावे.. - नेत्याचं काम समाजाचे मनोधैर्य वाढवण्याचे आहे, माही आरक्षण रक्षण करण्यासाठी सक्षम आहि, पाठीशी आहे... On वडेट्टीवार मेळावा- कोर्टात जाणार - सगळ्याच भूमिकेचं स्वागत आहे, संविधान आरक्षण रक्षण करण्यासाठी जे पाऊल वाटते ते उचलावे, पण मनोधैर्य वाढवावे.. - 14 मागण्या घेऊन आंदोलन केले...मागण्या शिष्ट मंडळापुढे मागण्या मांडल्या, बैठक झाली, विषय मार्गी लागले.. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली.. निधी कसा मंजूर करायचा, *On लसीकरण जात नोंद* - *1967 पूर्वी जी नोंद असले ते ग्राह्य धरली जाईल, ज्या नोंदी असेल 1967 पूर्वी महाराष्ट्रमध्ये असेल तर फायदा होईल, इतर राज्यात असल्यास फायदा होणार नाही.* - राजकारणी लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते, मी समाजकारनी आहे, आम्ही सामाजिक विषय घेऊन धरणे देतो विषय मांडत असतो, - संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी सांगितलं, केवळ 8 हजार लोकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेत..ते खरे कुणबी आहे..
2
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 16, 2025 05:46:58
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_MAHA_ANDOLAN सातारा - महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवरून नगरपरिषदेला तब्बल ४ कोटी १५ लाखांचं उत्पन्न मिळते मात्र गेल्या वीस वर्षांपासून या ठिकाणी काम करणारे ५३ बोटमन कामगार आजही कायमस्वरूपी नेमणुकीपासून वंचित आहेत.या अन्यायाविरोधात आजपासून या कामगारांनी नगरपरिषदेच्या दारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे .PF कपात होते,ओळखपत्रं मिळतात. पण कामगारांचे नियमितीकरण होत नाही. फक्त चार जणांचीच कायम नेमणूक केली आहे बाकी सर्वजण तात्पुरत्या तत्त्वावर आहेत.भाजप कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली बोटमन कामगारांचं हे उपोषण सुरू असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे कामगारांनी सांगितलं आहे
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 16, 2025 05:39:41
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location ; Maval File name : 1609ZT_MAVAL_PIKPANI Total files : 04 Headline: धामणे येथे भात करपा रोगाची पाहणी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना सल्ला Anchor: मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक असून, सध्या पवनमावळ भागात करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालाय…या पार्श्वभूमीवर धामणे येथे कृषी अधिकारी विकास गोसावी आणि अश्विनी खंडागळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपा बाधित भातपीकाची पाहणी केली आणि करपा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीसह आवश्यक उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कृषी विभाग व्हॉट्सअॅप, वार्ताफलक आणि गावसभां मधून सातत्याने जनजागृती करून शेतकऱ्यांना मदत करत असल्याची माहिती दिली जातेय… बाईट : अश्विनी खंडागळे, कृषी अधिकारी (file no.03) बाईट : भात उत्पादक शेतकरी (file no.04)
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 05:34:46
Beed, Maharashtra:बीड: माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर, तर सांडस चिंचोली गावाला पुराचा वेढा; पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास..! Anc- गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा येथील सरस्वती नदीला पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तरीही काही नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याचा अनाठायी धाडस सुरू आहे. तर माजलगाव तालुक्यातून गोदावरी नदी वाहते, आणि सांडस चिंचोली गावाला याच गोदावरी नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे या गावाचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून परिस्थिती पूर्वरत होईल अशी शक्यता आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 16, 2025 05:18:26
Kalyan, Maharashtra:ठाण्यातील बंटी-बबली दाम्पत्याचा कल्याणमध्ये कारनामा. ! ५० खाटांच्या हॉस्पिटलचं आमिष दाखवत डॉक्टरांना घातला ७० लाखांचा गंडा. डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांनी फार्मासिस्ट व डॉक्टरकडून उकळले ७० लाख आरोपी दाम्पत्य फरार पोलिसांकडून शोधमोहीम सुरू Anc..कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये ५० बेडचा हॉस्पिटल सुरू करण्याचं आमिष दाखवून ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी मे २०२४ मध्ये आरोपी दाम्पत्याने “हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी” असा सांगून मेडिकल स्टोअर सुरू करण्याचं आश्वासन दिलं. या बहाण्याने त्यांनी ८० लाख मागितले होते, मात्र दोघांनी मिळून ७० लाख रुपयांची रक्कम चेकद्वारे दिली.साळी दाम्पत्याने तीन महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचं वचन दिलं होतं. मात्र एक वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू झालं नाही आणि पैसेही परत केले नाहीत. याबाबत प्रज्ञा कांबळे आणि डॉ. दुबे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात लेखी करार व कागदोपत्री पुरावे दाखल करत तक्रार नोंदवली.या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.दरम्यान, फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे Byte :- डॉ. राहुल दुबे Byte:- प्रज्ञा कांबळे
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 16, 2025 05:15:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील नाल्यातून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा अद्याप शोध नाही सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील नाल्यातून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा अद्याप शोध नाही रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास रिक्षाचालक सतीश शिंदे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले जवळपास 56 तास उलटून गेले असले तरी सतीश शिंदे अद्याप ही बेपत्ता आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने बोटच्या साहाय्याने देखील सतीश शिंदे यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप सतीश शिंदे यांचा कोणतंही तपास लागलेला नाही दरम्यान सतीश शिंदे वाहून गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक ते मडकी वस्ती रोडवरील जुना दगडी पूल बंद करण्यात आलाय प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत काही संघटनांच्या वतीने आज मोर्चा काढण्याचा इशारा
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 16, 2025 05:15:34
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_River Feed on - 2C -------------------------- Anchor - विष्णुपुरी प्रकल्पाचे तेरा दरवाजे उघडण्यात आल्याने नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आलाय. गोदावरी नदीला पुर आल्याने नांदेड शहरातील मुख्य स्मशानाभूमी असलेली गोवर्धन येथील शांतिधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. परभणी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तसेच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. सर्व छोटे मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. विष्णुपुरी प्रकल्पातही पाण्याची आवक सुरु असल्याने तेरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीकाठी असलेली शांतिधाम स्मशाननभूमी पूर्ण पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावेत अशी सूचना महापालीकेने केली आहे. -------------------
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 05:15:11
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 16, 2025 04:47:31
Yavatmal, Maharashtra:WKT Anchor : यवतमाळ जिल्ह्यात झालेला अति पाऊस आणि पुरामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ऊस अशी प्रमुख पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्याने ही पिके सडली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या काड्या दिसत असून शेतशिवारांची अवस्था अतिशय भयानक झाल्याचे दृश्य आहे. मोठे परिश्रम करून आणि खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केलेली आणि आता हातातोंडाशी आलेली ही पिके मातीत गेल्याने तसेच शेतजमिनी ही खरडून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 04:47:11
2
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 04:46:14
kolhapur, Maharashtra:Ngp Bawankule B live u ने फीड पाठवले -------- नागपूर बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री. On ओबीसी उपसमिती बैठक - - आज ओबीसी उपसमितीच्या बैठकीत येणाऱ्या अर्थसंकल्पात पुरवणी मागण्या येतील, जे ओबीसीचे जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये विविध योजनांचे अर्थ विभागाकडे या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या मागणीबद्दल चर्चा होणार आहे, सोबतच काही निवेदन महाराष्ट्राच्या ओबीसीच्या विविध घटकांसाठी उपसमितीला दिल्या त्यावरील चर्चा होणार आहे. - ओबीसी समाजाच्या काही संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे, त्याबद्दलही चर्चा होणार आहे, एकंदरीत केंद्र आणि राज्य सरकारच्या ओबीसी समाजाकरिता ज्या योजना ओबीसी मंत्रालय राबवता त्या माध्यमातून चालतात त्यांना पुढे नेण्याचं काम आणि त्याचा आढावा करण्यासाठी ही बैठक आहे. On शेतीनुकसान - - आज मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालाय, सोयाबीनचे नुकसान झालाय, त्यामुळे लवकरच त्याच्या पंचनामे करून लवकरच मदत होईल. -
3
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 04:46:06
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 04:45:56
kolhapur, Maharashtra:Ngp Ashish Jaiswal byte live u ने फीड पाठवले --------------- नागपूर आशिष जयस्वाल, राज्यमंत्री. - शेतकरी आत्महत्याचे संकट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे... तो आकडा शून्यावर नेण्यासाठी मागील दोन-तीन वर्षात अनेक योजना राबवल्या जात आहे. - नुकसान भरपाईसाठी प्रचलित पद्धतीने नुसार जे काही शेतकऱ्यांचा नुकसान होतं, एसडीआरएफ एनडीआरएफ नुकसान होतं, त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाते... शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये... यासाठी युद्ध स्तरावर शासनाचे प्रयत्न सुरू आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे... भविष्यात आत्महत्येचा आकडा कमी झाला तरी शून्य होण्यासाठी भविष्यात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत... On ऍलो मोज्याक - विभागाला अलर्ट मोडवर ठेवलेला आहे. यामध्ये संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत आहे. त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला सूचना केल्या आहे. On चित्रपट नगरी रामटेक - महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि कोल्हापूरला चित्रनगरी आहे. प्रत्येक राज्याचे चित्रनगरी असते. विदर्भात जे काही कलाकार आहे. ज्यांना संगीत क्षेत्र टेलिफिल्म डॉक्युमेंटरी चित्रपट वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे क्षेत्र आहे. त्यासाठी रामटेक मध्ये व्हावे यासाठी प्रयत्न होता.. त्याचा जीआर देखील काढलेला होता...फिल्म सिटी सोबत एंटरटेनमेंट सिटी सुद्धा कशा पद्धतीने करता येईल. त्यातून व्हायबल कसे करता येईल, सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी पाहणी केलेली आहे....
1
comment0
Report
Advertisement
Back to top