Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
अशोक सराफ को मिला केशवराव भोसले स्मृति पुरस्कार, चौंकाने वाला ऐलान
PNPratap Naik1
Sept 16, 2025 04:46:06
Kolhapur, Maharashtra
Kop Ashok Saraf File Anc:- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला. ४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता देवलक्लब मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्य परिषदेच्या वतीने केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या निमित्ताने संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार दिला जातो.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Sept 16, 2025 07:06:21
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- नुकसानग्रस्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे भेट फीड 2C Anc:- मागील दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याला जोरदार पावसाचा फटका बसला आहे विशेषतः पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात या पावसामुळे मोठं नुकसान झाल आहे.. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेल्या करंजी येथील नुकसानग्रस्त भागाचे पाहणी केली यावेळी त्यांनी नुकसान ग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे... करंजी गावातील मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झालं आहे ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले आहेत अशा घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा घर बांधण्यासाठी मदत देता येते का? या संदर्भात प्रशासकीय पातळीवर निर्देश दिले आहेत या बरोबरच संपूर्ण घराचं नुकसान झालेल्या ग्रामस्थांसाठी शाळेमध्ये व्यवस्था करून त्यांना फूड पॅकेट पुरवण्यासंबंधी प्रशासनाला सूचना केल्या असून काही सामाजिक संस्थांना देखील मदत करण्या चे आवाहन विखे यांनी केलं असल्याचं म्हटल आहे बाईट:- राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री अहिल्यानगर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 07:02:59
Kolhapur, Maharashtra:Kop Back Bench WT Feed:- Live U Anc:- शाळेत एका मागोमाग एक बसलेली विद्यार्थी हे चित्र कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदलले आहे. पाठीमागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नकारात्मकता वाढू नये त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यू आकारामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा पद्धतीची बैठक व्यवस्था करणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचा दावा केला जातोय. केरळच्या धर्तीवर राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होतय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play WT Byte:- विनोदकुमार चव्हाण, शिक्षक विद्या मंदिर रत्नाप्पा कुंभार नगर
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 16, 2025 07:01:00
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_VANCHIT_VIRODH सातारा : साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून पानिपतकार विश्वास पाटील यांच्या निवडीचा वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याने निषेध केला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना विश्वास पाटील यांनी जातीय भूमिका घेतल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात आला आहे.“विश्वास पाटील यांनी सामाजिक एकात्मतेऐवजी जातीय तणाव वाढवणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी बहुजन समाजाची माफी मागावी, अन्यथा साताऱ्यात त्यांना विरोध करण्यात येईल असं वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे यांनी सांगितले आहे. Byte - वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 16, 2025 07:00:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - धक्कादायक - विटा पोलीस ठाण्यातच संशयिताकडून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न अँकर - चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयिताने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.सांगलीच्या विटा पोलीस ठाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.प्रकाश चव्हाण वय,40 असे या संशयताचं नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे,प्रकाश चव्हाण याला एका चोरीच्या प्रकरणात विटा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. सोमवारी पोलिस ठाण्यातल्या एका खोलीमध्ये त्याची चौकशी सुरू असताना पोलिसांचे नजर चुकून या ठिकाणी असणाऱ्या विद्युत उपकरणाची वायर गळ्याला गुंडाळून चव्हाण याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच चव्हाण याला तातडीने विटा येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला आहे.मात्र पोलीस ठाण्यातच संशयितांकडून गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 06:48:23
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 16, 2025 06:48:13
Ratnagiri, Maharashtra:चिपळूणमध्ये वीज समस्यांबाबत आयोजित बैठकीत नागरिक, व्यापाऱ्यांनी महावितरणला घेतलं फैलावर व्यापाऱ्यांसह नागरिकांनी महावितरणच्या विरोधात व्यक्त केला संताप अखंडित वीजपुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा, आमदार शेखर निकम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना ______________ गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापा-यांच्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने नगर पालिकेसमोरील काणे सभागृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत व्यापा-यांसह नागरिकांनी महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. यावर अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार शेखर निकम यांनी यावेळी दिल्या. दरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी, शहरातील वीज पुरवठ्यावरील ताण, डीपी वाढवण्याची गरज, तसेच आवश्यक ते बदल यावर अभ्यास करुन व्यापाऱ्याऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळेल, असं आश्वासन दिलं. मुरादपूर येथील उपकेंद्राची जागा बदलण्याबाबत आपण पाहणी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तक्रारीसाठी आणखी एक दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 16, 2025 06:47:01
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG- 1609_WARDHA_PARISHAD - वर्ध्यात उद्याला होणार शेतकरी हक्क न्याय परिषद - देशभरातील शेतकरी नेते राकेश टिकेत, युद्धवीर सिंग, अशोक ढवळे, अनिल त्यागी, अजित नवले, बच्चू कडू, विजय जावंधीया होणार परिषदेत सहभागी - किसान अधिकार अभियानचा पुढाकार अँकर : वर्ध्यात उद्याला शेतकरी हक्क न्याय परिषद आयोजित करण्यात आली आहेय. दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात शेतकरी विरोधी काळे कायदे सरकारला मागे घ्यायला भाग पाडणारे नेते उपस्थित राहणार आहेत. राकेश टिकेत, युद्धवीर सिंग, अशोक ढवळे, अनिल त्यागी, अजित नवले, बच्चू कडू, विजय जावंधीया हे यात सहभागी होणार आहेय. सध्या देशात असलेली शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना एकत्र येत मोठा लढा देण्याची गरज आहे.  या शेतकरी हक्क परिषदेमध्ये विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. कापसावरील आयात बंदी उठविण्यात आल्याचा जाब यातून विचारला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत  यशवंत झाडे यांनी दिली आहेय. यादरम्यान शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटी दिल्या जाणार आहेय.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 16, 2025 06:45:38
Ratnagiri, Maharashtra: मोलमजुरी करणाऱ्या महिलेच्या नावावर दाखवली गाडी.. लाडक्या बहीण योजनेतून महिलेचा अर्ज बाद. घरात गाडी असल्याचे कारण देत लाडकी बहीण योजनेतून चिपळूण मधील मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा अर्ज बाद... कौंढर ताम्हाणे येथील धक्कादायक प्रकार. बारा वर्षापूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर तीन वर्षांच्या मुलीसोबत कच्च्या घरात राहणाऱ्या संगीता तावडे यांची प्रशासनाकडून चेष्टा.... ज्यांना गरज आहे त्यांना मदत द्या...गरजू महिलेची सरकारकला विनंती. माझी आणि माझ्या घराची अवस्था बघा... आमची एकवेळ पोट भरण्याची कसरत असताना गाडी कुठून आणू ? महिलेचा संतप्त सवाल. संगीत तावडे यांचा लाडकी बहीण योजनेसाठी भरलेला अर्ज बाद झाल्याचे पाहून व्यक्त केले जात आहे आश्चर्य. Byte संगीता तावडे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 06:35:28
kolhapur, Maharashtra:Ngp Wadetiwar byte live u ने फीड पाठवले -------------- नागपूर - बाईट - विजय वडेट्टीवार,काँग्रेस नेते - On राज्यावर कर्जाचा बोजा - सत्तेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात... हे आता महाराष्ट्र कर्जाच्या खाईत लोटल्यानंतर दिसायला लागल आहे. - लोकप्रिय घोषणा करत असताना आपल्या तिजोरीत काय आहे हे पाहून निर्णय घेण्याची आवश्यकता असते₹ - निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजना सुरू केल्या आणि राज्याला बरबाद केलं, कर्जाच्या खाईत लोटल, हे सत्ता आणण्यासाठी उद्या महाराष्ट्राला विकतील अशी स्थिती आणून ठेवली आहे. आज जे कर्ज दिसत आहे ते नऊ लाख कोटींचा घरात आहे आहे लोकांची देणे आहेत, ते पाहिलं तर दहा लाख कोटींचा कर्ज आहे. - *पुढील दोन-तीन वर्ष कर्जातून बाहेर काढणं कठीण आहे.* - आणि आता एकीकडे 20 टक्यांच्या त्या जवळपास कर्ज गेलाआहे, 50% कर्ज काढा पण आपली कुवत आहे का? - या योजना राबवत असताना मागासवर्गीय आदिवासींवर अन्याय होत आहे...त्यांचा योजनांना कात्री लावली आहे. निधी पडलेला आहे. - अशाप्रकारे राज्याला बरबाद करण्याचं काम सुरू झाला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर नावावर एखाद्या कामाचं एस्टिमेट वाढवून 400 कोटी केले. जातात आणि 200 कोटी आपल्या घशात घालत आहे. - राज्याची परिस्थिती फार वाईट होईल आणि याला जबाबदार हे महायुती सरकार असेल.... - आम्ही चौकशीची मागणी केली आहे...दरवेळी करतो आहे, सरकार तर बेशरमाचे झाड लावून बसले असेल तर त्याला काही इलाज नाही...ते काही जबाबदारी स्वीकारल्यास तयार नसतील. - *अनेक कामांचे एस्टिमेट वाढवून मार्जितल्या लोकांना काम दिले आहेत.* आज सगळे काम मॅनेज दिले जातात, सगळ्या कामात स्पर्धा होत नाही आहे. पंधरा आणि वीस टक्के वसुली केल्या जात आहे. On शेतकरी आत्महत्या * - शेतकऱ्यांप्रति उदासीन सरकार असं यापूर्वी कधीच आलं नाही. कर्जमाफी दिली नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि आता अस्मानी संकट. - *सोयाबीनचा तातडीने सर्वेक्षण करण्याची गरज आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे..नाहीतर आत्महत्या पुन्हा वाढतील* - *सरकारने तातडीने पंचनामे करून तो मदत दिली पाहिजे.* On ओबीसी आरक्षण कोर्ट याचिका - - *कागदपत्रांची जुळवाजुळव आम्ही करत आहो, त्यासाठी लवकरात लवकर पिटीशन दाखल करू.* On लाडकी बहीण - - *स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक झाल्यावर लाडकी बहीण जाणार, बहीण म्हणून तुम्हालाच लोटण्याचे काम सुरू होईल, आणि मतांचा वापर करून महागाईच्या लोटले जाईल, म्हणून सगळ्या बहिणींना विनंती आहे की ज्यांच्या ज्यांचे नाव यापूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना दिली आणि रद्द केली त्यांनी यांचा, एकेकाचा मोजून बदला घेण्याचे तयारी ठेवा तरच हे सुधारतील.* -
4
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 06:34:47
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1609ZT_JALNA_LOSS(6 FILES) जालना |मुसळधार पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान शेतातील फळबागांसह सोयाबीन  आणि कापसाच्या शेतात गुडघाभर पाणी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी जिल्ह्यातल्या काही महसूल मंडळात अतिवृष्टी अँकर- जालन्यात मुसळधार पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडलाय.. त्यामुळं अनेक महसूल मंडळातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.. एदलापूर शिवारातील फळबागांसह खरीप पिकातील सोयाबीन कापूस पिकांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं पिकांचे नुकसान झालंय.. त्यामुळं प्रशासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. बाईट- गजानन जाधव, शेतकरी
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 16, 2025 06:17:16
Mumbai, Maharashtra:संजय राऊत *ऑन राज्य सरकार कर्ज* * गेल्या तीन महिन्यातच जे राज्य 24 हजार कोटीचे कर्ज घेत आहे राज्य चालवायला त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळ सारखी झाली बेरोजगारी आहे विकासाची काम ठप्प आहेत फक्त मुख्यमंत्री यांच्या जवळच्या लोकांकडे एसआरएची काम सुरू आहेत त्यांना काम मिळत आहेत एफएसआय विकला जात आहे त्यातून पैसे मिळत आहेत कबुतरांना दाणे टाकण्याचे काम सुरू आहे नागरी वस्तीमध्ये या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही * जात विरुद्ध जात असे भांडण लावून लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणले जात आहे शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्राने या सरकारच्या काळात काय प्रगती केली हा विषय मुख्यमंत्री यांना एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे * इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटींचा वर कर्जाचा डोंगर झाला * राज्याचे आर्थिक दुरावस्था मी कधीच झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यांच्यावर ते काय भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक सृष्टीचे फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे मग *देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरे ते डाकू मानसिंग बसलेले आहेत अमित शहा यांच्या कृपेने हे डाकू मानसिंग ची स्टोरी आहे चंबळ खोऱ्यातून बहुतेक आले आहेत येथे महाराष्ट्र लुटायला* * काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्रातल्या पुढल्या पिढीचं नऊ लाख कोटीचा कर्ज कोणी केलं का झालं तुमच्या योजनांमुळे झालं चारही बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोरीत त्याला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जात आहे तीन-तीन हजार कोटीचे टेंडर करून हा पैसा लुटला जातो समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा अनेक योजनांची दोन लाख कोटींची काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली त्याचा कुठे आता नाही कागदावर आहे ठेकेदारांकडून कमिशन घेतलं 25% ही लूट आहे * एस आर ए मध्ये जाऊन बघा मुंबईच्या एस आर ए मध्ये महिंद्रा कल्याणकर नावाचे अधिकारी बसले आहेत त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते काय करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एस आर ए प्रकल्प कोणत्या पद्धतीने गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जात आहे कोणत्या राजकीय पक्षाकडे जात आहे कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जात आहे याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली * आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की यांना मिरच्या झोपतात मग ते आम्हाला माओवादी आणि नक्षलवादी शरदच नेपाळ असं लुटला राज्यकर्त्यांनी आणि त्यातून तो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होता मी त्याचा समर्थन करत नाही पण लोकांच्या संयमांचा बाण इथे तुटत आहे दहा लाख कोटींचं कर्ज या राज्यावर आणि या राज्याला तुम्ही प्रगती पथावरच राज्य म्हणतात अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या * अनेक योजना शेतकरी कर्जमाफी करा म्हणत आहोत पण हे करत नाही आहेत अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा दहा लाख कोटी कर्ज आहे मग ते 11 लाख कोटी करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्या वरती आत्महत्या होत आहेत मग हे कर्ज आहे दहा लाख कोटीचा कोणाच्या खिशात गेलं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही शेतकऱ्याला हमीभाव देत नाही शेतकरी नुकसान भरपाई देत नाही मग हे कर्ज झालं का कोणासाठी कर्ज घेतलं फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी कर्ज झाला असेल ते तुमच्या खिशातून द्या मग कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला लाखो असे खातेदार आहेत जे बेकायदेशीर आणि बोगस आहेत जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत हा सगळ्यात जास्त मोठा भ्रष्टाचार मंगल प्रभात लोढा यांच्या कौशल्य खात्याच्या विभागात होत आहे हे माहिती आहे का तुम्हाला बोगस नाव आहेत हजारो आणि लाखो त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत सी लिस्ट मी आजच पाठवली आहे लोढा कडे कोण आहेत आणि सगळ्यात जास्त ओरबाडंन नागपूर आणि विदर्भ मध्ये सुरू आहे आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना हे कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाने लाभ दिला जातो जसे तुम्ही बोगस स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन द्यायचे स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली तरी पेन्शन लाभ चालू आहे त्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना आणि तिसरी एस आर ए योजना याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे महाराष्ट्रावर दहा लाख कोटींचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग *ऑन नेपाळ शरद पवार विधान* * मी तेच सांगत आहे तुम्ही शरद पवार साहेबांना नक्षलवादी किंवा माओवादी ठरवाल का आम्ही जेव्हा असा इशारा देतो जेव्हा बाजूच्या देशात किंवा बाजूच्या राज्यात काय चाललं आहे ते पहा त्यांची लोक आमच्या वरती जाऊन गुन्हे दाखल करा असा आग्रह भारतात हे माओवादी विचारांचे आहेत नक्षलवादी विचारांची आहेत आम्ही कोणत्याही विचाराचे नाही आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे मराठी माणस आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही शिवसैनिक आहोत पण शरद पवार यांनी जो काही विचार मांडला तो आमचा विचार आहे बाजूला काय चाललं आहे ते पहा मग तुम्ही शरद पवार यांना माओवादी म्हणाल का किंवा नक्षलवादी सांगा ना * अत्यंत योग्य भूमिका पवार साहेबांची आहे जी आमची आहे महाराष्ट्राचा लुटला जात असेल अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्या आणि कष्टकरी यांची लूट होणार असेल सरकारी पेजवली लुटालाही शिल्लक नाही कर्ज काढले जातात ते ही लोकं जात आहे राज्य प्रगतीपथावर हे या राज्यात गुंतवणूक येत आहे कुठे आहे गुंतवणूक * उद्या नरेंद्र मोदी 75 वा वाढदिवस साजरा करत आहे कर्जाच्या पैशातून सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून काय गरज काय * देशभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज काय जनता साजरा करेल ना जनतेला हवा असेल तर पंडित नेहरूंचा वाढदिवस जनता साजरी करते महात्मा गांधींचा वाढदिवस जनता साजरी करते बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जनता साजरी करते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवस जनता साजरी करते मग नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सरकारने का साजरा करावा सरकारच्या पैशाने मोदींनी हे थांबवलं पाहिजे महाराष्ट्र कर्जबाजारी असताना हे करू नये कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापून हा आर्थिक अपराध आहे आर्थिक गुन्हा आहे *ऑन मोदी 75* * मोदींच्या अस्तित्वाची दखल सध्या देश घेत नाही आहे सुरुवातीला मोदी काहीतरी करतील किंवा मोदींच्या रूपाने आशाची किरण दिसले म्हणून लोकांनी मतदान केलं नंतर बोट चोरी करून निवडणुका जिंकला बसच्या मार्गाने जिंकल्या त्याच्यामुळे मोदी हे काय लोकांच्या मताने निवडून झालेल्या पंतप्रधान नाही मोदी हे लोकनेते नाही मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने फुगवलेल्या फुगा आहे अनेक नेते त्यांचे भाजपचे त्याच्यामुळे मोदी यांनी कोणती घोषणा केली मोदींनी घोषणा केली पाकिस्तान ताब्यात घेऊ घेतला का ट्रम्प देतो तरी मोदी बोलत नाही ट्रम्प रोज दम देतो असा पंतप्रधान या देशाला लाभला हे देशाचा दुर्भाग्य एवढेच मी सांगेन * 26 महिलांचा सिंदूर पुसला गेला आणि नरेंद्र मोदी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला लावतात आमच्या क्रिकेटपटूंना अशा पंतप्रधान विषयी आम्हाला असता का असावी आणि कोणालाही असू नये भारतीय जनता पक्षाचा हा एक व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे आणि त्या खेळातले सीओ हे नरेंद्र मोदी आहेत *ऑन भारत-पाक सामना* * एक लक्षात घ्या पाकिस्तानच्या कप्तान यांच्याबरोबर आमच्या लोकांनी हस्तालोंदन केलं नाही म्हणून पापक शालन होत नाही तुम्ही त्या मैदानावर खेळलात तुम्ही पाकिस्तानच्या इतर पदाधिकाऱ्यांची हात मिळवणे करताना आम्ही पाहिलं हे ढोंग कसली करत आहात मोदींसारखी हे ढोंग मोदींना शोभतात सूर्यकुमार यादव जो कोन कॅप्टन आहे तुम्ही म्हणताना खेळ आहे खेळण्यासारखा मग का खेळला नाही तुमच्यावर कोणता दबाव होता एक तर तुम्हाला खेळायचं नव्हतं तुम्ही मैदानातून बाहेर पडला पाहिजे होतं * तुमचे त्या सामन्याचे पैसे गेले असते भारतीय संघाच्या नोकरदार जय शहा यांचा नोकरदार संघ आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची थोडी तरी ठिणगी असती तर ते मैदानात गेले नसते हात नाही मिळाला मी पाहिलं नाही ही असे उदाहरण कारणे देऊ नका तुम्ही शेण खाल्ला आहे आणि तुमच्या तोंडाला शेणाचा वास येत आहे
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 16, 2025 06:17:07
Buldhana, Maharashtra:खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Anchor : बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्प १००% भरला आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने, प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडकपूर्णा धरणाची पाणी पातळी ५२०.५० मीटर असून, सध्या प्रकल्पाचा एकूण उपयुक्त साठा ९३.४०४ द.ल.घ.मी. इतका आहे. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आज ४२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ७४९ मि.मी. पाऊस झाला आहे. पाण्याची आवक लक्षात घेता, प्रकल्पाचे १९ वक्रद्वारे ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. यापैकी ६ वक्रद्वारे नव्याने उघडण्यात आले. सध्या ४६८५४.९६ घनफूट प्रतिसेकंद (cusecs) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणीही गुरेढोरे सोडू नयेत, मुलांना नदीपासून दूर ठेवावे आणि कोणीही मासेमारी किंवा वाहतुकीसाठी नदीपात्राचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने, विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा.
0
comment0
Report
Advertisement
Back to top