Back
पिंपरीतील हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा विरोधात आणखी बलात्काराचा गुन्हा!
KPKAILAS PURI
Aug 23, 2025 01:01:38
Pimpri-Chinchwad, Maharashtra
pimpri Lodha
kailas puri Pune 23-8
feed by 2c
Anchor - हनी ट्रॅप’सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात जु लै महिन्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी लोढा याला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
३६ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, २७ मे २०२५ रोजी बालेवाडीतील एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये प्रफुल्ल लोढानं पीडित महिलेला पतीस नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी महिलेनं बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी बावधन पोलिसांनी कोर्टातून लोढाच्या हस्तांतरणासाठी वॉरंट मिळवले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला ऑर्थर रोड जेलमधून शुक्रवारी ताब्यात घेतले आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowAug 23, 2025 03:46:23Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_R1_PATEL
शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा शेतकऱ्यांना सल्ला.
सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही ,हात झटकले.
अँकर
365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाचा ऱ्हास केल्याचे भूक आता भोगावे लागणार आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे. ते एवढ्यावर थांबले नाहीत तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत झटकले. धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे.
Byte पाशा पटेल
अध्यक्ष केंद्रीय कृषी मूल्य आयोग
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 23, 2025 03:32:16Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn tupe ubt av
Photo attached
माजी महापौर तथा उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी पक्षाला जय महाराष्ट्र केला. उद्धवसेनेला सोडचिठ्ठी देणारे तुपे हे शहरातील उद्धव सेनेचे सहावे माजी महापौर आहेत. सेनेत ३८ वर्षापासून असलेले तुपे यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांना पत्र पाठवून राजीनामा दिला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेणार असल्याचे तुपे यांनी सांगितले. दरम्यान, हे तुपे यांचे ठाकरे गटावर विशिष्ट पदासाठी दबाव तंत्र असल्याची चर्चा आहे.. तर त्र्यंबक तुपे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील याही चर्चांना उधाण आलय.. उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे नियोजन ठरल्याचे सूत्रांची माहिती आहे..
2
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 23, 2025 03:32:04Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Wagholi Fraud Gold
File:01
Rep: Hemant Chapude(Wagholi)
Anc: बनावट सोने खरे असल्याचे भासवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी रोहित गोरे, अजय पवार,ओम खरात या तीन आरोपींना अटक केली असून आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया वाघोली पुणे...
2
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 23, 2025 03:31:54Beed, Maharashtra:
बीड: ओबीसींच्या हक्कांसाठी आज बीडमध्ये लक्ष्मण हाकेंची महत्त्वाची बैठक;
तर उद्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची अंतिम इशारा बैठक
Anc:एकीकडे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्यासाठी बीड जिल्ह्यातून मोठी तयारी सुरू असताना त्याच बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आज ओबीसींच्या हक्कांसाठी तातडीने बैठक बोलावलीय. या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. दुपारी बारा वाजता बीडमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. 29 तारखेपूर्वीच ओबीसींकडून महत्त्वाची भूमिका घेतली जाणार आहे. दरम्यान आज ओबीसींच्या हक्कांसाठी बैठक असून उद्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मांजरसुंबा येथे अंतिम इशारा बैठक होणार आहे. या दोघांनीही बीडवर विशेष लक्ष केंद्रित केल आहे.
1
Report
PNPratap Naik1
FollowAug 23, 2025 03:31:41Kolhapur, Maharashtra:
Kop Dangal Overall Anc
Feed:- 2C
Anc:- कोल्हापुरातल्या सिद्धार्थ नगर कमानी समोर लावलेला फलक आणि झेंड्यावरून दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गट हत्यारांसह एकमेकांसमोर आले. यातून दंगल उसळली. दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीत आणि हल्ल्यात पोलिसांसह सात जण जखमी झालेत. धक्कादायक म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच पासून काही अंतरावर ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एका मंडळाने वर्धापनदिनानिमित्त फलक उभा केला होता व त्याचबरोबर साऊंड सिस्टिम आणि विद्युत रोषणाई देखील करण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शेजारीच सर्किट बेंच असल्याने हे साऊंड सिस्टिम लावू देणार नाही अशी भूमिका घेत साऊंड सिस्टिम जप्त केला. पण त्यानंतर देखील त्या ठिकाणी दोन गट आमने सामने उभा राहिला. त्यातूनच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांची छायाचित्र असलेला मोठा फलक सिद्धार्थ नगर कमानीजवळ उभा केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी संबंधित फलकाला हार घालून चेतावणी देण्याचा प्रयत्न सुरू केला. यातून दोन्ही बाजूने मोठा जमाव एकत्र आला. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने येऊन दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीला सुरुवात झाली. यावेळी काहींनी हातात काठ्या, शस्त्र घेऊन एकमेकांसमोर उभे राहून हल्ला केला. यावेळी जमावाने सिद्धार्थनगर कमान, राजे बागसवार दर्गा परिसरात उभा असणाऱ्या वाहनांची तोडफोड करून एका वाहनाला आग लावली. यावेळी पोलिसांनी तातडीने लाठीचार्ज करत दोन्ही गटांना पांगवले. पण तोपर्यंत पोलिसांसह सात जण जखमी झाले, पाच मोटारीसह एका रिक्षाची जमावाने तोडफोड केली. दरम्यान कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश्वर गुप्ता यांनी दोन गटात वाद झाला असून तो मिटला आहे, त्यामुळे कोणीही गैर समज निर्माण करू नये असे आवाहन केले आहे.
Byte:- योगेश्वर गुप्ता, पोलीस अधीक्षक कोल्हापूर
Anc/Tag :- सात वर्षांपूर्वी सिद्धार्थ नगर परिसरातच दोन समाजात झालेल्या दंगलीचे पडसाद उमटले होते. त्यावेळी देखील दगडफेकीसह एकमेकांवर चाल करून जाण्याचा प्रयत्न घडला होता. त्यावेळी तात्कालीन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेची आठवण या निमित्ताने झाली आहे.
3
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 23, 2025 03:31:16Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, माजी आ. राजेंद्र राऊत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट
- बार्शी तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला फटका, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी
- धाराशिव जिल्ह्यासह करमाळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले तुडुंब वाहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी
- माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तहसीलदार एफ आर शेख यांच्यासह तालुका कृषी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करत पंचनामाच्या दिल्या सूचना
- उत्तर बार्शीच्या भागातील कोरेगाव, चुंब, खडकोणी, बानसळे, आगळगाव या ठिकाणी करण्यात आली पाहणी
- बार्शी तालुक्यातील झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीना भेटून परिस्थिती सांगणार.
Byte :
राजेंद्र राऊत, माजी आमदार, बार्शी
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 23, 2025 03:30:10Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 281 मिलिमीटर पावसाची दमदार हजेरी, सरासरी पावसापेक्षा 105 पट पावसाची नोंद
- सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अपेक्षेपेक्षा 105 पट जास्त पावसाची नोंद, पावसाचा खरीप हंगामाला फटका
- जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 281 मिलिमीटर पावसाची दमदार हजेरी, सरासरी पावसापेक्षा 105 पट पावसाची नोंद
- मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चार लाख 37 हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी केली होती पूर्ण
- ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे 41 हजार हेक्टर पिकाचं नुकसान
- भीमा सीना आणि नदी नाले तलाव यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले.
- जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसानाची नोंद..
- जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश
Byte :
शुक्राचार्य भोसले, सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 23, 2025 03:19:17Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn suicide av
photo and police station feed attached
ANCHOR : ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे बुडाल्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या १७ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आली आहे. वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव येथील ही घटना आहे. राहत्या घरातील हॉलमध्ये त्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. घरच्यांना प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने घाटीत दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच रात्री ११.५० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत बेगमपुरा ठाण्यात एमएलसी अहवालावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, तो ऑनलाईन गेमिंगमध्ये गुंतलेला होता. त्यात आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
4
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 23, 2025 03:17:47Nashik, Maharashtra:
Nashik break
- *नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद*
- गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला दिली धडक
- धडक दिल्या नंतर या प्राप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप
- *मराठी लोगो की औकात क्या तुम मराठी लोक भंगार हो अशी मुजोरी केल्याचा आरोप*
- या नंतर या मराठी माणसाने स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना दिली घटनेची माहिती
- *मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय इसमाला समज देत असतानाही त्याने केली अरेरावी*
- *मराठी बोलण्यास नकार देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप*
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 23, 2025 03:17:31Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn uNivarsity av
Feed attached
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी प्रवेशासाठी घेतलेल्या 'पेट' परीक्षेला आता वर्ष होत आले आहे. 'आरआरसी' समोर सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात पात्र ठरलेल्या ३,८२५ विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य मात्र अद्याप सुरू झालेली नाही. संशोधन सुरू करण्यासाठी प्रोव्हिजनल लेटर अद्याप या विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे कोर्स वर्कही झालेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासही अडचणी येत आहेत. ही प्रक्रिया विलंबाने होत राहिल्यास संशोधन वेळेत कसे पूर्ण करणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय...
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 23, 2025 03:15:56Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Dysp First
File:05
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc: महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर दिवशीय कार्यालय सुधारणा विशेष मोहीम विभागीय स्तरावरती सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खेड विभाग यांचा प्रथम क्रमांक आला असून पहिल्या टप्प्यातही याच कार्यालयाचा प्रथम क्रमांक आला होता सलग दुसऱ्यांदा याच विभागाचा प्रथम क्रमांक आलाय,तर सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त लघु पशुसंवर्धन चिकित्सालय खेड यांचाही प्रथम क्रमांक आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे हा कार्यक्रम पार पडलाय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे..
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 23, 2025 03:15:44Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn jayakwadi update av
Feed attched
नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. सध्या धरणात ९६% पाणीसाठा असून धरण भरल्याने त्याचे १८ दरवाजे अडीच फुटांनी उघडून ४७ हजार १६० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागच्या महिन्यात झालेल्या पावसामुळे ३१ जुलै रोजी पहिल्यांदा जलपूजन करून धरणाचे १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी १८ दरवाजे अडीच फुटांनी उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक पैठणकडे येत आहेत आणि या पांढऱ्याशुभ्र पाण्याचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. जायकवाडी धरणाचा विसर्ग वाढवल्याने शेवगाव संभाजीनगरला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 23, 2025 03:02:25Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn cm inauguration av
Use cm shots
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारोळा येथील नव्या २६ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. मात्र हा दौरा पावसामुळे रद्द करण्यात झाला होता. आता या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल...
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम रखडल्यामुळे दोनदा मुदतवाढ देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कंत्राटदार एजन्सीने या योजनेचे काम अखेर पूर्ण केले. २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय...
3
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 23, 2025 03:01:02Raigad, Maharashtra:
स्लग - उड्डाण पुलांच्या अर्धवट कामांमुळे वाहतूक कोंडी ...... लोणेरे येथील उड्डाण पूल खुला होणार ? ..... चाकरमान्यांना मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा .......
अँकर - मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बायपासची कामं रखडली आहेत. त्याचबरोबर लोणेरे, कोलाड, नागोठणे येथील उड्डाण पुलांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत. दुसरीकडे सर्व्हिस रोडची दुरवस्था झालीय. या बाबी वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरताहेत. लोणेरे येथील उड्डाण पूल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीस खुला करण्याचा मनोदय महामार्ग प्राधिकरणाचा असून त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
वॉक थ्रू - प्रफुल्ल पवार
2
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 23, 2025 03:00:54Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- पोलीस अधिकारी व राष्ट्रवादी AP गटाचा कार्यकर्ता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
फीड 2C
Anc:-
दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक फौजदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याला अटक अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये नोंद असलेल्या गांजाच्या केसमधील आरोपीचे नाव वगळण्यासाठी सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेल्या अशोक गायकवाड यांच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर दीड लाख रुपये देण्याचे कबूल करण्यात आले मात्र पैशाची मागणी करणाऱ्यांची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दीड लाख रुपये स्वीकारत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले अशोक गायकवाड यांना रंग हात पकडलं. अशोक गायकवाड यांच्या माध्यमातून गर्गे यांनी पैशाची मागणी केली होती त्यामुळे अशोक गायकवाड आणि राजेंद्र गर्गे या दोघांवरही गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे
2
Report