Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
मुख्यमंत्री फडणवीस आज जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करणार!
VKVISHAL KAROLE
Aug 23, 2025 03:02:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn cm inauguration av Use cm shots चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारोळा येथील नव्या २६ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. मात्र हा दौरा पावसामुळे रद्द करण्यात झाला होता. आता या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल... जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम रखडल्यामुळे दोनदा मुदतवाढ देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कंत्राटदार एजन्सीने या योजनेचे काम अखेर पूर्ण केले. २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय...  
10
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Aug 23, 2025 05:01:25
Navi Mumbai, Maharashtra:
Story slug - म्हाडा कॉलनी मधील घरांना गळती  म्हाडा कॉलनी के घर मे लिकेज FTP slug - nm mhada home  Shots- video and photo  Reporter- swati naik Navi mumbai  Anchor -  शीळफाटा येथील भंडार्ली गोटेघर येथे नवीन   म्हाडा   वसाहत  बनवली आहे , या वसाहती मद्ये पहिल्याच पावसात घरांना गळती लागली आहे , पाच हजार घरांची कॉलनी असून येथे सुखसुविधा चा अभाव असून नवीन घरांना गळती लागल्याने सदनिका  धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून,  बि जी शिर्के कंपनी ने हे  बांधकाम केले असून ,घरांची दुरुस्ती करून देण्याची मागणी राहिवाशियानी केली आहे।   Gf-  ===========
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 23, 2025 04:46:23
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या दिग्रस शहरातील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी आणि अर्धवट सोडलेल्या कामामुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. दिग्रस आर्णी ह्या मार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, शालेय विद्यार्थी, पादचारी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. गेल्या चार महिन्यांपासून येथील काम ठप्प आहे. संबंधित यंत्रणा, प्रशासन आणि कंत्राटदार जबाबदारीपासून हात झटकत आहेत. सहा महिन्यांपूर्वी मानोरा चौक ते आर्णी बायपास मार्गाचे कामाला सुरुवात झाली, त्यानंतर तीन महिन्यांपासून काम ठप्प आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचा हा मतदारसंघ असून त्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावी अशी मागणी दिग्रस करांनी केली आहे.
4
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 23, 2025 04:35:00
Ambegaon, Maharashtra:
Feed 2C Slug: Ambegaon Dimbhe Dam Nature File:02 Rep:Hemant Chapude(Ambegaon) Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डिंभे धरण परिसरातील निसर्ग वैभव बहरलं असून उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे ,डिंभे धरणाचा हिरवागार निसर्गमय परिसर मन प्रसन्न करून टाकतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 23, 2025 04:34:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
feed attached *पोळ्यानिमित्त अनोखी परंपरा,एक एक बोटाने उचलला तब्बल 100 किलोचा दगड, राज्यभरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पोळा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पोळा सणानिमित्त एक घर पाडळी येथील बुरा दिन बाबा यांच्या प्रसिद्ध दर्ग्यासमोर 100 किलो वजनाचा दगड आहे. हा दगड बारा जणांनी एक एक बोट लावून उचलत पोळा सण साजरा केला. अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेतील वैशिष्ट्य म्हणजे बारापेक्षा एक व्यक्ति देखील अधिक झाला तर दगड उचलला जात नाही असे या गावचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थांनी दगड उचलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 23, 2025 04:32:04
Nashik, Maharashtra:
nsk_uposhan Anc:- नाशिकच्या बागलाणमधील हरणबारी - तळवाडे भामेर या 27 किलोमीटरच्या एक्सप्रेस कालव्याचे काम गेल्या 45 वर्षांपासून अपूर्ण असल्याने शेती सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला.कालव्याचे काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी. तळवाडे भामेर परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.महिलाही आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.उलट कालव्यासाठी मंजूर निधीमध्येही गैरव्यवहार केला त्यामुळे कालव्याचे काम अपूर्ण राहिल्याचा आरोप आंदोलकानी केला.काम पूर्ण न झाल्याने शेती नापिकी होऊन शेतकऱ्यांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला.
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 23, 2025 04:15:44
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागरचना अखेर निश्चित करण्यात आलीय. प्रारूप प्रभागरचनेवर आलेले 11 आक्षेप विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी फेटाळल्यामुळे कोणताही बदल न करता तीच रचना अंतिम करण्यात आलीय. जिल्हाधिकारी कार्यालयाने 14 जुलै रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली होती. यावर 21 जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परभणी तालुक्यातील दैठणा, पोखर्णी, उमरी आणि जांब गणाबाबत 5, जिंतूर तालुक्यातील बोरी गटाबाबत 2, सेलू येथील वालूर गटाबाबत 1, मानवत तालुक्यातील कोल्हा आणि ताडबोरगाव गटाबाबत 1, पाथरीतील लिंबा गटाबाबत 1 तसेच गंगाखेड तालुक्यातील खंडाळी आणि गुंजेगाव गटाबाबत 1 असे एकूण 11 आक्षेप नोंदविण्यात आले होते. सदर आक्षेपांवर विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणी झाली, ज्यामध्ये सर्व आक्षेप फेटाळण्यात आले. परिणामी प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकार्यांनी जशी जाहीर केली होती, तशीच अंतिम घोषित करण्यात आलीय. अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये,जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलीय...
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 23, 2025 04:01:50
Beed, Maharashtra:
बीड: आश्चर्य.. बंद पडलेल्या हात पंपातून अचानक उसळतय पाणी..! Anc: गत आठवड्यात बीड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने नदी, नाले आणि तलाव तुडुंब भरले असताना हातपंपातून पाणी ओसंडून वाहत आहे. बीडच्या कोरडेवाडी गावात हे चित्र समाधानकारक म्हणाव लागेल. 200 फूट उंच हातपंपातून पाणी खळखळून वाहतय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान आहे. एका डोंगर माथ्यावर कोरडेवाडी हे गाव वसलेलं आहे. असं असताना देखील जवळपास दोनशे फूट उंच यातून पाणी वाहत आहे.
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 23, 2025 04:01:36
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - उजनी, वीर धरणातील पाण्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र राज्याचा संपर्क तुटला, 150 हेक्टर वरील पिके पुराच्या पाण्यात - उजनी, वीर धरणातील पाण्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक राज्याचा संपर्क तुटला - अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधारा पाण्याखाली गेल्याने अक्कलकोट मार्गे कर्नाटकात होणारी वाहतूक ठप्प - हिळ्ळी बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने 150 हेक्टर वरील पिके पुराच्या पाण्यात - उजनी धरणातून भीमा नदीत 1 लाख 51 हजार 600 क्युसेस पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती - कोर्सगांव, कलकर्जाळ , शेगाव, धारसंग, आळगी, खानापुर, म्हैसलगी , अंदेवाडी, देविकवठा अशा अनेक गावातील खरिपाची पिके पाण्यात - लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
8
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 23, 2025 03:46:23
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_R1_PATEL शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा शेतकऱ्यांना सल्ला. सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही ,हात झटकले. अँकर 365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाचा ऱ्हास केल्याचे भूक आता भोगावे लागणार आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे. ते एवढ्यावर थांबले नाहीत तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत झटकले. धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे. Byte पाशा पटेल अध्यक्ष केंद्रीय कृषी मूल्य आयोग
8
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 23, 2025 03:32:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn tupe ubt av Photo attached माजी महापौर तथा उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी पक्षाला जय महाराष्ट्र केला. उद्धवसेनेला सोडचिठ्ठी देणारे तुपे हे शहरातील उद्धव सेनेचे सहावे माजी महापौर आहेत. सेनेत ३८ वर्षापासून असलेले तुपे यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांना पत्र पाठवून राजीनामा दिला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेणार असल्याचे तुपे यांनी सांगितले. दरम्यान, हे तुपे यांचे ठाकरे गटावर विशिष्ट पदासाठी दबाव तंत्र असल्याची चर्चा आहे.. तर त्र्यंबक तुपे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील याही चर्चांना उधाण आलय.. उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे नियोजन ठरल्याचे सूत्रांची माहिती आहे..
5
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 23, 2025 03:32:04
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Wagholi Fraud Gold File:01 Rep: Hemant Chapude(Wagholi) Anc: बनावट सोने खरे असल्याचे भासवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी रोहित गोरे, अजय पवार,ओम खरात या तीन आरोपींना अटक केली असून आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया वाघोली पुणे...
6
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 23, 2025 03:31:54
Beed, Maharashtra:
बीड: ओबीसींच्या हक्कांसाठी आज बीडमध्ये लक्ष्मण हाकेंची महत्त्वाची बैठक; तर उद्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची अंतिम इशारा बैठक Anc:एकीकडे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्यासाठी बीड जिल्ह्यातून मोठी तयारी सुरू असताना त्याच बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आज ओबीसींच्या हक्कांसाठी तातडीने बैठक बोलावलीय. या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. दुपारी बारा वाजता बीडमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. 29 तारखेपूर्वीच ओबीसींकडून महत्त्वाची भूमिका घेतली जाणार आहे. दरम्यान आज ओबीसींच्या हक्कांसाठी बैठक असून उद्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मांजरसुंबा येथे अंतिम इशारा बैठक होणार आहे. या दोघांनीही बीडवर विशेष लक्ष केंद्रित केल आहे.
3
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 23, 2025 03:31:41
Kolhapur, Maharashtra:
Kop Dangal Overall Anc Feed:- 2C Anc:- कोल्हापुरातल्या सिद्धार्थ नगर कमानी समोर लावलेला फलक आणि झेंड्यावरून दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गट हत्यारांसह एकमेकांसमोर आले. यातून दंगल उसळली. दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीत आणि हल्ल्यात पोलिसांसह सात जण जखमी झालेत. धक्कादायक म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच पासून काही अंतरावर ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एका मंडळाने वर्धापनदिनानिमित्त फलक उभा केला होता व त्याचबरोबर साऊंड सिस्टिम आणि विद्युत रोषणाई देखील करण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शेजारीच सर्किट बेंच असल्याने हे साऊंड सिस्टिम लावू देणार नाही अशी भूमिका घेत साऊंड सिस्टिम जप्त केला. पण त्यानंतर देखील त्या ठिकाणी दोन गट आमने सामने उभा राहिला. त्यातूनच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांची छायाचित्र असलेला मोठा फलक सिद्धार्थ नगर कमानीजवळ उभा केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी संबंधित फलकाला हार घालून चेतावणी देण्याचा प्रयत्न सुरू केला. यातून दोन्ही बाजूने मोठा जमाव एकत्र आला. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने येऊन दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीला सुरुवात झाली. यावेळी काहींनी हातात काठ्या, शस्त्र घेऊन एकमेकांसमोर उभे राहून हल्ला केला. यावेळी जमावाने सिद्धार्थनगर कमान, राजे बागसवार दर्गा परिसरात उभा असणाऱ्या वाहनांची तोडफोड करून एका वाहनाला आग लावली. यावेळी पोलिसांनी तातडीने लाठीचार्ज करत दोन्ही गटांना पांगवले. पण तोपर्यंत पोलिसांसह सात जण जखमी झाले, पाच मोटारीसह एका रिक्षाची जमावाने तोडफोड केली. दरम्यान कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश्वर गुप्ता यांनी दोन गटात वाद झाला असून तो मिटला आहे, त्यामुळे कोणीही गैर समज निर्माण करू नये असे आवाहन केले आहे. Byte:- योगेश्वर गुप्ता, पोलीस अधीक्षक कोल्हापूर Anc/Tag :- सात वर्षांपूर्वी सिद्धार्थ नगर परिसरातच दोन समाजात झालेल्या दंगलीचे पडसाद उमटले होते. त्यावेळी देखील दगडफेकीसह एकमेकांवर चाल करून जाण्याचा प्रयत्न घडला होता. त्यावेळी तात्कालीन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेची आठवण या निमित्ताने झाली आहे.
11
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 23, 2025 03:31:16
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, माजी आ. राजेंद्र राऊत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट - बार्शी तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला फटका, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी - धाराशिव जिल्ह्यासह करमाळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले तुडुंब वाहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी - माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तहसीलदार एफ आर शेख यांच्यासह तालुका कृषी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करत पंचनामाच्या दिल्या सूचना - उत्तर बार्शीच्या भागातील कोरेगाव, चुंब, खडकोणी, बानसळे, आगळगाव या ठिकाणी करण्यात आली पाहणी - बार्शी तालुक्यातील झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीना भेटून परिस्थिती सांगणार. Byte : राजेंद्र राऊत, माजी आमदार, बार्शी
6
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 23, 2025 03:30:10
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 281 मिलिमीटर पावसाची दमदार हजेरी, सरासरी पावसापेक्षा 105 पट पावसाची नोंद - सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अपेक्षेपेक्षा 105 पट जास्त पावसाची नोंद, पावसाचा खरीप हंगामाला फटका - जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 281 मिलिमीटर पावसाची दमदार हजेरी, सरासरी पावसापेक्षा 105 पट पावसाची नोंद - मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चार लाख 37 हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी केली होती पूर्ण - ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे 41 हजार हेक्टर पिकाचं नुकसान - भीमा सीना आणि नदी नाले तलाव यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. - जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसानाची नोंद.. - जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश Byte : शुक्राचार्य भोसले, सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी
8
comment0
Report
Advertisement
Back to top