Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

रामेश्वर धबधबा प्रवाहित; निसर्गप्रेमींनी घेतली गर्दी!

MMMahendrakumar Mudholkar
Aug 31, 2025 06:16:46
Beed, Maharashtra
बीड : सौताडा येथील रामेश्वर धबधबा प्रवाहित; निसर्गप्रेमींची मोठी गर्दी..! EXCLUSIVE Anc- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेला आणि ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखला जाणारा सौताडा येथील रामेश्वर धबधबा सततच्या दमदार पावसामुळे प्रवाहित झाला आहे. सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे विंचरणा तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून वाहू लागला असून, त्याचा पुरेसा विसर्ग होताच धबधबा दिमाखदार ताकदीने कोसळू लागला आहे. गत दोन वर्षांच्या काळानंतर धबधबा यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या क्षमतेने प्रवाहित झाला आहे. त्यामुळे परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले असून, धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. निसर्गाच्या या अद्भुत लीलेला डोळ्यांनी टिपण्यासाठी अनेकजण मोबाईल आणि कॅमेऱ्यात क्षण कैद करत आहेत. दरम्यान, पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. धबधब्याच्या वरील भागात पर्यटकांनी जाऊ नये, सुरक्षित अंतरावरूनच आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Sept 01, 2025 08:51:41
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_DOG_BYTE एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांच्या झुंडीमुळे वाहनधारकांमध्ये मोठी दहशत; सात महिन्यात तब्बल 15 हजारांवर नागरिकांना घेतला चावा अँकर :– अमरावती शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांच्या झुंडीमुळे वाहनधारकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून सात महिन्यात तब्बल 15 हजारांवर नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची आरोग्य विभागाची माहिती असून अमरावती शहरात चौका चौकात मोकाट श्वानांची दहशत पाहायला मिळत आहे. अनेक श्वान दुचाकी स्वारांवर झडप घेत असल्याचे प्रकार समोर महानगरपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 01, 2025 08:50:57
kolhapur, Maharashtra:
Ngp Mudhoji raje Byte live u ने फीड पाठवले ---------- नागपूर--- मुधोजीराजे भोसले बाईट Ngp Mudhojiraje byte (मुंबईत आंदोलन) --मोठ्या संख्येने आंदोलन आंदोलनासाठी गोळा झाले, तर ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे, त्या भागातील लोकांना काही त्रास होणे स्वाभाविक आहे.. त्यामुळे आंदोलनासंदर्भात लवकर तोडगा काढणे आवश्यक असते.. मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकाऊ असल पाहिजे.. कोणाकडून आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न देता, मराठ्यांसाठी विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण दिलं पाहिजे.. --आंदोलनात गेलेल्या तरुणांनी शांततेने आंदोलन केलं पाहिजे.. आंदोलनाची एकी कायम राहिली पाहिजे.. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण आजच्या स्थितीमध्ये तर शक्य नाही.. --आंदोलन पुढे वाढत जाताना मागण्यांमध्ये काहीच अंतर होत जातो.. ज्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दस्तावेज आहे, त्यांना सरकार ओबीसी मध्ये घेण्यास तयार आहे, त्यांना घेतलेच(गेले पाहिजे) पाहिजे.. मात्र ज्यांच्याकडे दस्तावेज नाही, त्यांना ओबीसी मध्ये घेणे शक्य नाही.. त्यामुळे मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण देणंच योग्य राहील.. आरक्षण संपलं तर सर्वांसाठी चांगलं होईल.. आज मराठा मागत आहे उद्या ब्राह्मण ही आरक्षणाची मागणी करतील.. मुळात आरक्षण दहा वर्षासाठी लागू झालं होतं.. फक्त राजकीय पुढाऱ्यांमुळे तो कायम राहिलं आहे.. आरक्षण सरसकट रद्द झालं, तर हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळेल, मग तो कुठल्याही समाजाचाच असो.. आरक्षणाची भानगड संपली पाहिजे असं मला वाटते...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 01, 2025 08:46:02
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव: DHARA_R2_HELP डीजेमुक्त गणेश मिरवणुकीचा संकल्प करत गणेश मंडळाकडून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मदत रवाना धाराशिच्या कळंब मधील मोहा येथील स्वराज गणेश मंडळाकडून मदत, सर्व जाती-धर्माच्या लोकांकडून वर्गणी मुंबईत ताज जेवण बनवून आंदोलकांना देणार, गावाकडून नेलेली भाजी भाकरी खराब होईल म्हणून निर्णय Anc: मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्व सुरू असलेल्या मराठा आंदोलकांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. धाराशिवच्या कळंब मधील मोहा गावातील स्वराज गणेश मंडळाने डीजे मुक्त मिरवणूक काढायचा संकल्प करत मदत मुंबईकडे रवाना केली. गावातील अठरापगड जातीतील लोकांनी मदतीचा हात दिला. राज्यभर अनेक गावातून भाकरी आणि भाजी बनवून मुंबईकडे रवाना होत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या भाकरी खराब होऊ शकतात म्हणून मुंबईतच जेवण बनवून देण्याचा निर्णय करत मोहा येथील तरुण मुंबईकडे रवाना झाले. Byt: मदत घेऊन गेलेलं तरुण
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 01, 2025 08:19:01
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_JALNA_OBC_UPOSHAN(6 FILES) जालना | ब्रेकिंग अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषणाला सुरुवात अंतरवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये ओबीसींचं उपोषण सुरु मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीविरोधात आंदोलन जरांगेंच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरु नये ओबीसी कार्यकर्ते बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ यांचं उपोषण सुरु अँकर : अंतरवाली सराटीत ओबीसींच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात झालीये.. अंतरवाली सराटीच्या सोनियानगरमध्ये हे आंदोलन सुरु झालंय..  ओबीसी कार्यकर्ते बाबासाहेब बटुळे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ उपोषणाला बसले आहेत.. मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारनं ओबीसींवर नांगर फिरु नये, वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावेत, त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवालही बोगस असून त्याचं पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांनी उपोषण सुरु केलंय.. बाईट- विठ्ठल तळेकर, ओबीसी आंदोलक बाईट- बाबासाहेब बटुळे, ओबीसी आंदोलक (टोपी घातलेले) बाईट- बाळासाहेब दखने, ओबीसी आंदोलक(हिरवा शर्ट असलेले)
1
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 01, 2025 08:05:49
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - वाशी रेल्वे स्थानक wkt वाशी रेल्वे स्टेशन पर मराठा आंदोलक FTP slug - nm vashi railway wkt byet- wkt shots - reporter- swati naik navi mumbai नवी मुंबई ब्रेकिंग मराठा आंदोलकांची वाशी रेल्वे स्थानकावर केली गर्दी. मराठा आंदोलकांची मुंबईकडे जाण्यासाठी मोठी गर्दी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईकडे करत आहेत कूच. रेल रोको आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस वाशी रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने तैनात. बाईट - wkt
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 01, 2025 08:05:36
kolhapur, Maharashtra:
Ngp Illusion ganesh live u ने फीड पाठवले --------- नागपूरात तर आभासी जग (illiusion )तयार करून त्याच्यात बाप्पा विराजमान झालेय... प्रताप नगर येथील बाल गणेशोत्सव मंडळाने इल्युजन(illusion) या थीमवर देखावा तयार केलाय.. या मंडाळाने केलेल्या संपूर्ण देखावा एक भ्रमजाळ असल्याची अनुभूती येतेय... महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देखावा स्वतः गणेश मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून साकारला आहे.... या आभासी जगतात बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर भक्तगणपण अचंबित होऊन जात आहे.. तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ----- बाईट ---सारंग कदम, बाल गणेशोत्सव मंडळ प्रताप नगर
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 01, 2025 07:49:55
kolhapur, Maharashtra:
Ngp Bjp congrss ( एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांसोबत बाईट ) Ngp Congres ( अभिजीत वंजारी आणि विकास ठाकरे यांचे बाईट) Ngp Khopade Vanjari ( भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांचे बाईट ) वरील slug ने सर्व फीड पाठवले आहे ----------------- ऐन गणेशोत्सवामध्ये आज भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले... पूर्व नागपूर भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्या निवासस्थानासमोर भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली... यावेळी पोलिसांचाही मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.. काल काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर फलकावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे फासल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.. तसेच निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, गिरीश पांडव यासह अनेक कार्यकर्ते कृष्णा खोपडे यांच्या निवासस्थाना जवळ येऊन आंदोलन करत घोषणाबाजी करू लागले ... त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी करत त्यांना उत्तर दिले त्यामुळे काही काळाकरता तणाव निर्माण झाला होता. दोन्ही कार्यकर्ते अन्य सामने येता-येता राहिले... पोलिसांनी परिस्थिती हाताळत दोन्ही कार्यकर्त्यांचा समजूत घालत परिस्थिती नियंत्रणात आणली अभिजित वंजारी हे विधान परिषदच्या नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार आहे. त्याचे नागपूरच्या वर्धमान नगर भागात 2020 पासून जनसंपर्क कार्यालय आहे.या कार्यालयाच्या पाटीवर आमदार अभिजित वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र असा उल्लेख आहे. त्याला भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप होता. त्यातून भाजप कार्यकर्त्यांनी काळ फसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. ----- बाईट --- आमचे प्रतिनिधी अमर करणे यांनी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करताय त्यावेळेचा wkt -----------* बाईट --- काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि आमदार अभिजीत वंजारी यांच्यासोबत चा वन टू वन ------ बाईट आमदार कृष्णा खोपडे, भाजपा नेते आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेस नेते
4
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 01, 2025 07:33:19
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - वाशी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी wkt FTP slug - nm traffic byet- wkt shots- reporter - swati naik navi mumbai नवी मुंबई ब्रेकिंग वाशी टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. मुंबईला जाणाऱ्या लेनवर झालेय वाहतूक कोंडी. वाशी टोल नाक्याजवळ दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका. वर्किंग डे असल्याने मोठ्यासंखेने वाहने मुंबईकडे निघाली. Wkt
1
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 01, 2025 07:33:06
Hingoli, Maharashtra:
अँकर - मनोज जरांगे पाटील मागील चार दिवसांपासून आझाद मैदानावर ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे यामागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत,त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत, त्यांना अन्न पाणी मिळत नसल्याने हिंगोलीच्या सेनगाव येथील मराठा बांधवांनी दहा क्विंटल पुरी ठेचा मुंबईकडे रवाना केलाय, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईत गेले आहेत. त्यांची गैरसोय होत असल्याने सेनगाव येथील मराठा बांधवांनी एकत्रित येत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणाची सोय केली आहे.
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 01, 2025 07:32:54
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0109ZT_CHP_SHIVBHOJAN ( single file sent on 2C)  टायटल:-- अखेर गरीबाच्या तोंडचा घास हिरावलाच, थकीत अनुदानाने त्रस्त शिवभोजन केंद्र संचालकांनी बंद केले केंद्र, चंद्रपूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या बसस्टँड समोरील मयूर स्नॅक्स केंद्र बंद     अँकर:-- राज्य सरकारच्या अनास्थेमुळे अखेर गरिबांच्या तोंडचा घास हिरावण्याची सुरुवात झालीच. राज्यातील दहा रुपयात पोटभर अन्न मिळणारी शिवभोजन योजना आता अखेरचा श्वास मोजत आहे. गेली काही महिने शिवभोजन केंद्रांचे अनुदान रखडले आहे. आताच नव्हे तर याआधीही अनेक वेळा शिवभोजन केंद्रांचे अनुदान रखडले होते. मात्र कच्चामाल आणण्यासाठी लागणारा पैसा भोजन केंद्र संचालक कसातरी ढकलून नेत होते. चंद्रपूरच्या वर्दळीच्या बस स्टॅन्ड चौकातील मयूर स्नॅक्स नावाच्या शिवभोजन केंद्र संचालकांनी मात्र आज पासून हे शिवभोजन केंद्र तात्पुरते बंद करत असल्याची सूचनाच लावली आहे. तशा आशयाचे स्व-शपथ पत्र त्यांनी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाला पाठविले आहे. सातत्याने होणारी आर्थिक कुचंबणा आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक अरिष्ट यावर मार्ग काढण्यासाठी सर्व उपाय खुंटल्याचे सांगत हे केंद्र बंद करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यामुळे शहरातील गरिबांच्या पोटाला मिळणारा घास बंद झालाय. लाभार्थ्यांनी ही योजना तातडीने सुरू व्हावी अशी मागणी केली असून केंद्र संचालकांनी मात्र आर्थिक बाबींविषयी हाताबलता व्यक्त केली आहे. बाईट १) त्रस्त लाभार्थी बाईट २) कैलास चव्हाण, केंद्र संचालक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 01, 2025 07:32:42
Kolhapur, Maharashtra:
Kop Maratha Andolan WT Feed:- Live U Anc:- मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना खाण्याची कमतरता भासू नये यासाठी कोल्हापुरातून देखील सर्व मराठा संघटनाच्या वतीने एकत्रित मुंबईला खाद्यपदार्थ पाठवले जात आहेत. कोल्हापुरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play WT
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 01, 2025 07:32:38
Beed, Maharashtra:
बीड: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; अहिल्यानगर/अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाकडून रास्ता रोको Anc: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहिल्यानगर/अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश येथे मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून रास्ता रोको करण्यात आला. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा. अशी प्रमुख मागणी या रास्ता रोकोतून करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक थांबवण्यात आली आहे. जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणी संदर्भात आंदोलन तीव्र करत असताना गावागावातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातो आहे. लिंबागणेश ग्रामस्थांसह परिसरातील मराठा समाज बांधवांनी या रास्ता रोको मध्ये सहभाग नोंदवत जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. वेळ पडल्यास मुंबईला जाण्याची तयारी या आंदोलकांनी केली आहे.
2
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 01, 2025 07:32:25
Manmad, Maharashtra:
अँकर फ्लॅश :- मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे -इंदूर महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच...... भरधाव वेगाने जाणारा कंटेनर शहरातील स्मशानभूमी जवळ पलटी.... .अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प...... कंटेनर पलटी झाला तेंव्हा स्मशानभूमीत अंत्यविधी सुरु होता मात्र कंटेनर स्मशानभूमीच्या अवघ्या काही फूट अंतरावर पलटी झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला..... अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल..... समोरून येणाऱ्या वाहनाने कट मारल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.....
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 01, 2025 07:32:16
Nashik, Maharashtra:
nsk_lovetemple feed by mojo anchor नाशिक इंदिरानगर मध्ये श्रीकृष्णाचे वृंदावन मथुरा येथील प्रेम मंदिर नाशिककरांसाठी विशेष आकर्षण ठरलेआहे. तसेच श्रीकृष्णाचे विविध रूपातील दर्शन हा देखावा इंदिरानगर येथील वडाळा पाथर्डी रोड लगत साकारण्यात आलाअसून सोबत दररोज गोसेवा व गोमातेचे पूजन करण्यात येत आहे. प्रेम मंदिर प्रतिकृती ८० फूट उंच असुन ८० ६० त्याची लांबी व रुंदी असणार आहे तसेच सोबत भव्य ४० फुटी महाप्रवेशद्वार साकारण्यात येणार आहे. सदरील प्रेम मंदिरची प्रतिकृती संपूर्णपणे पर्यावरण पूरक असुन मंदिराची प्रतिकृती 80 फूट उंच,60 फूट लांबी,40 फूट उंच असे आकर्षक महाप्रवेशद्वार साकारले आहे.यासाठी बांबू,बल्ली, बॉटम पट्टी,कपडा यांचा वापर केलाआहे. गल्यावर्षीच्या प्रतिसादाप्रमाणे यंदाही जल्लोषात,भव्य-दिव्य आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातआहे.नाशिक शहरासह जिल्ह्यातील भाविकांना मथुरेला जाता येत नाही ते या ठिकाणी प्रेम मंदिराला भेट देऊन समाधान व्यक्त करत आहे.
1
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 01, 2025 07:32:11
Kolhapur, Maharashtra:
Kop Hindutvawadi Feed :- Live U Anc:- अमेरिकेने भारतीय मालावर 50% कर लावल्यानंतर कोल्हापुरात याचा जाहीर निषेध करण्यात आला. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने mc Donald's समोर हा निषेध करण्यात येत आहे.. या आंदोलनाच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भारतीय कंपन्यांकडूनच वस्तू खरेदी करण्याचा आवाहन देखील या आंदोलनाच्या माध्यमातून केलं आहे. अमेरिकेने लादलेल्या करामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आली आहे... त्यामुळे अमेरिकेच्या वस्तूंवर देखील बहिष्कार घाला असा संदेश या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. Byte:- शिवानंद स्वामी, हिंदुत्ववादी
3
comment0
Report
Advertisement
Back to top