Back
शरद पवार का आरक्षण मुद्द्यावर चौकशी, तमिळनाडू पर टीका!
SKSACHIN KASABE
Aug 31, 2025 04:46:08
Pandharpur, Maharashtra
31082025
Slug - PPR_PATIL_PRESS
file 02
----
Anchor - शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यानी का तमिळनाडू धर्तीवर आरक्षण दिले नाही. आता ते शहाणपणा शिकवतं आहेत. त्यांचे राजकारण वेगळे आहे. अशी टीका पवारांनी तमिळनाडू धर्तीवर आरक्षण देण्याच्या मागणीवर टीका केली आहे.
मनोज जरांगे यांना आवाहन आहे. त्यांनी आपली मागणी मान्य व्हावी या मागण्या मान्य करताना दुसऱ्यांची आडवणूक का केली जाते सामान्य मुंबईकरांना भेटीस का धरता तुमचे भांडण जर सरकारचे असेल तर जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जायचे काय कारण आहे. अशी टीका मुंबई मध्ये आंदोलन करण्यावरुन झाली आहे.
--
Byte - चंद्रकांत पाटील
15
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 01, 2025 06:49:36Washim, Maharashtra:
वाशीम:
File:0109ZT_WSM_FLOWER_PRICE_INCREASE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : गणरायांचे आगमन आणि गौरी सणामुळे शहरातील फुलांच्या बाजारात मोठी मागणी वाढली आहे.त्यामुळे फुलांच्या किमतीत तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून ग्राहकांना चांगलाच भुर्दंड बसत आहे.गेल्या काही दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे फुलांचा पुरवठा घटला आहे.दुसरीकडे, झेंडू, गुलाब, कुंदा, मोगरा, शेवंती या फुलांची मागणी सणासुदीमुळे प्रचंड वाढली आहे.झेंडूची फुले किलोला १२० ते १४० रुपये, गुलाब ४०० ते ४५० रुपये, शेवंती ३२५ ते ३५० रुपये, तर कुंदा तब्बल १३०० रुपये किलो दराने विकला जात आहे. हारांच्या किमतीतही विक्रमी वाढ झाली असून एक जोडी हार २५० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत विकला जात आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 06:49:15Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0109ZT_JALNA_OBC_ANDOLAN(3 FILES)
जालना | ब्रेकिंग |अंतरवाली सराटीत आज ओबीसींचं आंदोलन
आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पोलिसांचा फौजफाटा तैनात
ओबीसीचे बाबासाहेब बटुळे आणि बाळासाहेब दखने करणार आमरण उपोषण
अँकर- अंतरवाली सराटीत आज ओबीसी आंदोलक आंदोलन करणार आहेत.. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे.. मात्र तरिही आंदोलनाचा अधिकार असल्याचा आक्रमक पवित्रा घेत ओबीसींचे बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने हे अंतवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये आमरण उपोषण करणार आहेत.. त्यामुळं आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.. त्यामुळं याठिकाणी आता आंदोलक कशा पद्धतीनं उपोषणाला बसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे..
0
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 01, 2025 06:48:02Pandharpur, Maharashtra:
01092025
Slug - PPR_BULLET_GAURI
file 01
-----
Anchor - गौरी गणपती चक्क बुलेट वर झाल्या स्वार, सध्या महाराष्ट्रभर गौरी गणपतीच्या उत्सवाची धामधुम सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी गावातील सौ. रत्नमाला कदम यांनी गौराई समोर देखावा केला आहे. या मध्ये गौराईना बुलेट वर बसवले आहे. यामुळे गौराई सुद्धा मॉडर्न झालेल्या देखाव्यातून दिसत आहे.
0
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 01, 2025 06:47:54Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0109ZT_CHP_TRIBAL_DEMAND
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नव्या विश्रामगृहाच्या भिंतीवर साकारण्यात आलेल्या आदिवासी प्रतिकाविषयी समाजाचा आक्षेप, चांदा प्रांताततील ऐतिहासिक गोंड राजांच्या प्रतिकचिन्हाचे आले विकृतीकरण, आदिवासी संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा
अँकर:-- मदमस्त हत्तीचे गंडस्थळ फोडणारा सिंह, असे चांदा प्रांतातील ऐतिहासिक गोंड साम्राज्याचे राजचिन्ह आहे. शहर आणि जिल्ह्यातील विविध पुरातन वास्तूंवर हेच चिन्ह कोरलेले आहे. एका अर्थाने सन्मानाचे राजचिन्ह असलेल्या या प्रतिकाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. शहरात मोक्याच्या जागी नव्यानेच बांधण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या भिंतीवर हेच चिन्ह विकृत रुपात साकारण्यात आल्याचा आरोप होत आहे. नवे विश्रामगृह गोंड शैलीतील पुरातन वास्तूंच्या थीमवर उभारण्यात आले आहे. आता या इमारतीवर राजचिन्हाचा अपमान झाल्याचा आरोप करत आदिवासी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.
बाईट १) अशोक तुमराम, आदिवासी कार्यकर्ते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 01, 2025 06:47:34Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ च्या उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे मराठा समाजाच्या युवकांनी आरक्षणाची मागणी करीत भाजप आमदार किसन वानखेडे यांना घेराव घातला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विधीमंडळात आवाज उठवावा, अशी मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 01, 2025 06:47:22Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ranjangaon Jarange Maratha Aarti
File:02
Rep: Hemant Chapude(Ranjangaon)
Anc :- मनोज जरांगेपाटील मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना त्यांच्या आंदोलनाला बळ मिळुन प्रकृती स्थिर रहावी यासाठी रांजणगाव महागणपतीला महाआरती करण्यात आली
शिरुर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनाला पाठिंबा देत आरक्षणाच्या लढा यशस्वी व्हावा असं साकडंही रांजणगाव महागणपती ला घालण्यात आलं
Byte :- शेखर पाचुनकर सन्मवयक सकल मराठा समाज
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 01, 2025 06:47:05Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_SHINDE_JARANGE
सातारा: शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी जरांगे पाटील आंदोलनात शरद पवारांचा हात असल्याचा विधानावर ते सिद्ध करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले आहे. डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे शरद पवार यांचा हात आहे तर त्यांनी सिद्ध करून दाखवाव. पवारसाहेब बोलले नाही तर बोलतात पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी, अन् साहेब नाही बोलले तर म्हणतात त्यांचा अदृश्य हात आहे. आता यांच्या मागे नक्की कोणाचा हात आहे की मराठे स्वयंस्फूर्तीने आलेत, की जरांगे पाटील स्वयंस्फूर्तीने आलेत ते सरकारने बघावं. लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करायचं बंद करावं. माझी सरकारला विनंती आहे, कोणी काय कोणाची भूमिका न बघता ही आंदोलन गांभीर्याने घ्यावे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्या समितीच्या अहवालाची वाट न बघता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावे अशी माझी मागणी आहे...
*बाईट : शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी श. गट)*
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 01, 2025 06:32:03Raigad, Maharashtra:
स्लग - महाडच्या बाळ मित्र मंडळाचा प्रबोधनपर देखावा ...... मोबाईलचे दुष्परिणाम आणि फायदे मांडण्याचा प्रयत्न ........ मंडळाने यंदाही जपली परंपरा .......
अँकर - महाड बाजारपेठेतील बाल मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक प्रबोधनपर देखावा उभारला आहे. मोबाईलचे दुष्परिणाम आणि फायदे सांगणारा जिवंत देखावा मंडळाचे कार्यकर्ते सादर करीत असून नवीन पिढीला मोबाइलच्या विळख्यातून बाहेर काढा असा संदेश देण्यात आलाय. यावर्षीची सजावट देखील पर्यावरण पुरक असून गणरायाची मूर्ती कागदी लगद्यापासून साकारण्यात आली आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
वॉक थ्रू - प्रफुल्ल पवार
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 01, 2025 06:31:45Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0109ZT_WSM_GAVALI_GANPATI
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी या सण-उत्सव, शेतकऱ्यांच्या समस्या किंवा नागरिकांवर आलेल्या संकटाच्या वेळी तत्पर धावून येणाऱ्या लोकाभिमुख आमदार म्हणून ओळखल्या जातात.सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त आमदार गवळी यांनी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहराला भेट दिली.यावेळी त्यांनी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे पूजन केले व आरतीत सहभाग घेतला. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आमदार गवळी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच शहरातील विविध मंडळांनी राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 01, 2025 06:30:53Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0109ZT_WSM_TRANSFORMER_FELL
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात खडकी सदार येथे शेतकरी शंकर मारोती सदार यांच्या शेतातील विद्युत रोहित्र अतिवृष्टीमुळे कोसळले.सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्याने हे रोहित्र स्वतःच्या खर्चाने गेल्या वर्षीच बसवले होते.सलग पावसामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे महावितरणने तातडीने नवीन रोहित्र व खांब बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
0
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 01, 2025 06:30:40Nashik, Maharashtra:
nsk_savarakar
feed by mojo
anchor इंदिरानगर येथील अभ्यंकर कुटुंबियांनी साकारलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्म स्थळी भगूर येथील वाड्याची घरगुती गणेश सजावट सादरी करणामुळे विशेष दाद मिळवत आहे. ही सजावट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना अर्पण करण्यात आली .या सजावटीची खासियत म्हणजे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.शाडू मातीचीमूर्ती आणि सजावटीसाठी वापरलेले साधे पण कल्पक साहित्य ६ बाय ४ आकाराचे २१ पुढे, चार्ट पेपर्स/बाउंड पेपर्स २०, अॅक्रेलिक रंग व ग्लूगनयांच्या सहाय्याने ही आकर्षक सजावट उभारली आहे. अभ्यंकर कुटुंबियांच्या मते, ही सजावट ही केवळ गणरायाला अर्पण नसून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अदम्य राष्ट्रभक्ती,त्याग आणि विचारांचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे.
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 01, 2025 06:30:35Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_MARATHA_SHIDORI
साताऱ्याच्या फलटण मध्ये मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाच्या वतीने ५० हजार लाडू चिवड्याची पाकिटे बनवण्यात आली असून फलटण तालुक्यातील जिंती, साखरवाडी, पिंपळवाडी, गारपिडवाडी, होळ फडतरवाडी या गावांमधून शिदोऱ्या तयार करण्यात आहेत. मराठा आंदोलनासाठी गेलेल्या मुंबईतील बांधवांना कोणतीही जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी नाष्टा आणि जेवणाच्या बनवलेल्या शिदोऱ्या मुंबईला पाठवण्यात आले आहेत. सध्या मुंबई येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत यासाठी लाखो मराठा बांधव राजधानी मुंबईमध्ये दाखल आहेत विशेष म्हणजे फलटण तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून चिवडा-लाडू तयार करण्यासाठी मोफत सहकार्य करून या आरक्षणाला मुस्लिम समाजाने सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 01, 2025 06:02:18Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 0109_GON_RESCUE
FILE - 1 VIDEO 1 IMAGE
पिकअप वाहनासह दोघे नाल्याच्या पुरात वाहून गेले.... पिकअप वाहन दगडाला अडकल्याने लोकांनी दोराच्या मदतीने वाचवले दोघांचे प्राण.... गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील जांभळी गावाजवळील घटना....
Anchor : सालेकसा तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस पडला असून, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बेवारटोला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील कुआढास नाल्याला मोठा पूर आला. या पुरात जांभळी गावाजवळील पुलावरून जात असलेली पिकअप गाडी अचानक वाहून गेली. मात्र, ती दगडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून गाडीत असलेल्या दोन युवकांना सुखरूप बाहेर काढले. नाल्याच्या दोन्ही काठावरून दोरी टाकून शर्थीने बचावकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले....
3
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 01, 2025 06:02:11Beed, Maharashtra:
बीड: राजुरीजवळ विटा वाहतूक करणारा टेंपो पलटला, चार मजूर गंभीर
Anc- रस्त्यावरील खड्डा चुकविताना विट वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला. घटना पाटोदा तालुक्यातील राजुरी परिसरात घडली आहे. या भीषण अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले आहे. टेम्पो पलटी झाल्यानंतर चालक अडकला होता. त्याला जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. त्याच रस्त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जात होते, पदाधिकाऱ्यांनी प्रसंगाधावून मदत केल्याने मजुरांचे प्राण वाचले. राजुरी परिसरात रस्त्यावरच अनेक खड्डे पडल्याने असे अनेक अपघात पाहायला मिळतात. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
0
Report
MAMILIND ANDE
FollowSept 01, 2025 06:01:57Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG-0109_WARDHA_EX_MP_TADAS
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांची भूमिका
निवडणुका आल्या की आरक्षणाचे आंदोलन सुरू होते
शरद पवार हे आंदोलनाला खतपाणी घालत असल्याची रामदास तडस यांची टीका
ओबीसीचे बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावे
अँकर : मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी मांडली आहेय. मराठा समाजाने मुंबईत आंदोलन सुरू केले. ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्या त्या वेळी हे आंदोलन केलं जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तसेच देशात ओबीसी समाजाची संख्या अधिक आहे. त्यामुळे जनगणनेवर आधारित आरक्षण दिले गेले पाहिजे. महाराष्ट्र ज्यावेळी स्थिर राहते त्यावेळी जाती जातीत झगडे लावण्याचे काम पवार साहेब करतात. पवार साहेबांची आता सत्ता नाही आणि येणारही नाही. जेव्हा निवडणुका येते तेव्हा आंदोलन केले जाते असा आरोप देखील रामदास तडस यांनी केला आहे. वर्ध्यात माध्यमाना प्रतिक्रिया देताना रामदास तडस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहेय.
विवो : त्यांना वेगळे आरक्षण द्यावे, पण ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, सरकारने जे काही धोरण करायचे असेल ते वेगळे आरक्षण धोरण करावे.. पण ओबीसीच्या ताटातून देणे संयुक्तिक नाही. कारण या देशात ओबीसी समाज सत्तर टक्के आहे आणि 352 जाती आहे. त्यामुळे ओबीसीला आणखी बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल. पवार साहेबांनी काल असे म्हटलं होतं की तामिळनाडू मध्ये आरक्षण दिलं गेलं आणि कोर्टात ते टिकलं. महाराष्ट्र सरकारला केंद्राची मान्यता घ्यावी लागते. मी तर त्याहीपलीकडे जाऊन सांगतो की जातीय जनगणनेच्या आधारावर आरक्षण द्यावं. आम्हाला आताच तर कमी आरक्षण आहे ओबीसीला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसी मधून देऊ नये. जर तसे झाले तर ओबीसी समाजाचा लढा मोठा राहिल. नागपूर येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्याला माझा पाठिंबा आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी होती की, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याला सुरुवात झाली आहे. कोणाची संख्या किती हे लवकरच कळणार आहे. कोणाला कीती आरक्षण दिले गेले पाहिजे हे देखील त्यातून कळणार आहे. असे यावेळी माजी खासदार तडस यांनी म्हटले आहेय.
बाईट : रामदास तडस, अध्यक्ष,प्रांतिक तैलिक महासभा तथा माजी खासदार
0
Report