Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याणमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत उत्तर भारतीयांची 'जंबो भरती'!

ABATISH BHOIR
Jul 09, 2025 12:37:44
Kalyan, Maharashtra
मराठी आणि हिंदीचा वाद सुरू असतानाच कल्याण मध्ये शेकडो उत्तर भारतीयांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश काँग्रेस पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात, जय भारत" या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः मराठी अस्मितेवरून ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात मराठी भाषेच्या अवमानावरून शिंदे यांच्यावर जोरदार टीका झाली.मात्र दुसरीकडे, शिंदे गट मात्र आपली राजकीय गणितं नव्याने आखताना दिसतो आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शहाड परिसरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात काँग्रेसला मोठा झटका देत उत्तर भारतीय समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत सामील करून घेतले. या पक्षप्रवेशामुळे कल्याणच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.मराठी-हिंदी भाषेच्या संघर्षाचा वाद अजूनही तापलेला असतानाच, कल्याणमधील ‘उत्तर भारतीय जंबो भरती’मुळे शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ही भरती केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर राज्यभरात राजकीय दृष्टिकोनातून चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर भारतीय मतदारांच्या उपस्थितीमुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा ‘हिंदी पट्टा’ अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. Byte :- विश्वनाथ भोईर (. शिवसेना शिंदे गट कल्याण पश्चिम आमदार )
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top