Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

बारामती शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, प्रशासनाची दिरंगाई!

JMJAVED MULANI
Jul 09, 2025 18:02:07
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 0907ZT_BARAMATIPKG BYTE 3 बारामती उपविभागातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही... काटेवाडी परिसरात शेतकरी नुकसान भरपाई पासून... अजित पवार यांनी आदेश देऊनही प्रशासन हालेना... Anchor:- मे महिन्यामध्ये राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली यात पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड ,पुरंदर ,इंदापूरच्या पट्ट्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले. बारामती तालुक्यातील काटेवाडी ढेकळवाडी,काटेवाडीसह ,ढेकळवाडी लिमटेक ,खताळपटटा या गावातही अतिवृष्टी झाली सलग चार ते पाच दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र नुकसान भरपाई आद्यप मिळाली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेशही दिले तरीही प्रशासन मात्र हालेना अशी स्थिती सध्या आहे. २१ ते २५ मे दरम्यान अतिवृष्टीचा पाऊस जास्तीचा झाल्यानंतर २६ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट बारामती गाठत या ठिकाणी फुटलेला निरा डावा कालवा आणि अतिवृष्टीचा दौरा केला.. बांधा बांधावरती जाऊन त्यांनी पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले काही ठिकाणी पंचनामे झाले मात्र आतापर्यंत नुकसान भरपाईचा तपास नाही.. अतुष्टीच्या पाण्याने ओढ्याना महापूराची परिस्थिती आली यात शेतात पाणीच पाणी झाले पुराच्या पाण्यामुळे शेतांचे बांध फुटले शेतातील सुपीक माती खरडून गेली दगड गोटे वाहून आले त्यामुळे मोठे नुकसान झाले ऊस लागवडीसाठी केलेली मशागत वाया गेली पुन्हा दुबारमशागत करावी लागल्याने शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. बाईट:_ आप्पासाहेब ठोंबरे,शेतकरी बाईट:_ आबा टकले, शेतकरी सदर सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे संयुक्तकरित्या केल्या असून त्याचा अहवाल शासन दरबारी पाठवण्यात आला आहे लवकरच नुकसान भरपाई मिळेल असे कृषी विभागाचे बारामती उपविभागाचे कृषी अधिकारी टी.के. चौधरी यांनी सांगितलेय.. बाईट _ टी. के.चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती उपविभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या भागातही पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले तरीही शासनाकडून दिरंगाई होत असल्याने लवकरात लवकर या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी हीच अपेक्षा व्यक्त होत आहे. जावेद मुलाणी, झी 24 तास , बारामती
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top