Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

परभणीतील विहिरींची चोरी: शेतकऱ्यांचा आवाज उचला!

GDGAJANAN DESHMUKH
Jul 09, 2025 18:02:19
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणीच्या साबळे भोगाव येथे मकरंद अनासपुरेंच्या यांच्या जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाप्रमाणे एका महिला शेतकर्याची विहीर चोरीला गेलीय,अश्या अनेक विहिरी चोरीला गेल्याचा आरोप शेतकरी नेत्यांमधून केला जतोय,बघुयात एक विशेष रिपोर्ट व्हीओ- राज्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ मिटून शेतात सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी राज्यशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मागेल त्याला विहीर ही सिंचन विहिरींची योजना सुरू केली. पण परभणी जिल्ह्यात अनेक विहरी कागदावरच उभारल्या जात असून शासनाच्या निधीचा अपहार सरकारी बाबूच करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. परभणी जिल्ह्यात 10 हजार पेक्षा अधिक सिंचन विहिरिंना मंजुरी देण्यात आली आहे. सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाप्रमाणे परभणीच्या भोगाव साबळे येथिल संजीवनीबाई जीवनराव साबळे यांच्या गट नंबर 99 मधील शेतात केलेली विहिरी हरवली आहे. याबाबतची तक्रार त्यांचा संजीवनी साबळे यांचा मुलगा गोपाळ साबळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली,गोपाळ साबळे यांना आपल्या आईच्या नावावर असलेल्या गट नंबर 99 मधील शेतात विहिरीचा पहिला हप्ता म्हणून 58 हजार 960 रुपये रोजगाराच्या खात्यावर पाठवून उचलल्याचे समजले, गोपाळ यांनी आपल्या शेतात विहिरी मिळावी म्हणून केवळ अर्ज केला होता, पण गावातील विहिरीचे चार चार वर्षांपासून बिल निघत नसल्याने त्यांनी विहिरीचा नाद सोडला होता, पण दोन वर्षांनी त्यांनी चौकशी केली असता आपली विहीर मंजूर झाली असून आपण विहिरीचे खोदकाम केले नसतांना आपल्या परस्पर शासनाने रोजगाराच्या नावावर पैसे वर्ग केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तक्रार केली, बाईट- गोपाळ साबळे- शेतकरी महिलेचा मुलगा मिड पिटीसी- गजानन देशमुख व्हीओ- याबाबत आम्ही पंचायत विभाग गाठून उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोणसीकर यांना या प्रकाराबाबत विचारले असता याबाबत आम्ही चौकशी केली असून भोगाव साबळे येथील ग्रामरोजगार सेवक आणि अभियंता यांनी लाभार्थ्याला अपरोक्ष लाभार्थ्याला मंजूर असलेली विहीर दुसरीकडून दाखवून प्रत्यक्ष काम न करताच मंजुरांच्या खात्यात निधी वर्ग केल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामरोजगार आणि अभियंता यांच्यावर कारवाई प्रस्तावित केल्याचे सांगितले,शिवाय जिल्ह्यत ईतर ठिकाणावरून अश्याच स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले, बाईट- डॉ. संदीप घोंसीकर- उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पंचायत विभाग,परभणी व्हीओ- भोगाव साबळे या गावातील हे एकमेव उदाहरण आहे असे नसून परभणी जिल्ह्यतील अनेक तालुक्यात अधिकार्यांच्या हातावर चिरीमिरी दिली की कागदावरच विहिरी काढल्या जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षाने केलाय,याच नवल वाटायला नको,पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे,त्जे सत्ताधारी आहेत, त्या भाजप पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने जिल्हाधिधिकाची भेट घेऊन जिल्ह्यातील नऊ च्या नऊ गटविकास अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कोणतच काम करीत नसल्याची लेखी तक्रार केलीय, बाईट- किशोर ढगे- जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना,परभणी बाईट- सुरेश भुमरे- भाजपा जिल्हाध्यक्ष,परभणी एन्ड व्हीओ- मंडळी ज्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे,त्या सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्षानेच जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बीडीओ शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन लूट करीत असल्याचा आरोप केला असेल तर परभणीत सर्व काही आलबेल सुरू आहे हे समजून घ्यायच का,आपल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षानेच भ्रष्ट कारभाराला वाचा फोडल्यावर तरी मुख्यमंत्री फडणवीस याकडे जिल्ह्याकडे लक्ष घालतील का हे बघण महत्वाचं ठरणार आहे... गजानन देशमुख, झी मीडिया परभणी
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top