Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

डॉ. ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न: विद्यापीठातील अधिकारी दोषी?

VKVISHAL KAROLE
Jul 09, 2025 14:34:52
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn university issue avb feed attached विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न... औषधी गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्या... मुलाने वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने वाचला जीव, मात्र अजूनही ठाकरे शुद्धीत नाही... संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुल सचिव पदावर ठाकरे या कार्यरत.. काही दिवसापूर्वीच विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर ठाकरे यांनी गंभीर आरोप केला होता. त्यांच्या खोलीत आढळली सुसाईड नोट, सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांचे नाव... बदली झाल्यावर शिपाई दिला नसल्याने फाईलचे भले मोठे गठ्ठे डोक्यावर घेऊन नवीन कार्यालयात जात असल्याचा ठाकूर यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता *सुसाईड नोटमध्ये काय लिहले आहे...* मला संसार करताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास ऑफिसमध्ये होत आहे. ऑफिसमधील अधिकारी मुद्दामहून मला त्रास देत आहे. त्यांच्या या सततच्या त्रासामुळे माझी जगण्याची इच्छा संपली आहे. कुलगुरू विजय फुलारी आणि प्राध्यापक प्रशांत अमृतकर दोघे मिळून गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास देत आहे. आई मला सांगायची कितीही त्रास झाला तर सहन करायचं. तुमच्या या संस्कारामुळे माझे हात बांधले होते. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून ऑफिसचे साहित्य चोर म्हणून माझ्यावर पोलीस ठाण्यात केस केली. ते माझ्या मनाला खूप लागला आहे आई... माझ्यावर घेतलेला हा आळा घेऊन पुढे मी जगू शकणार नाही. ऑफिसमध्ये मी खूप प्रामाणिकपणे काम केलं मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जोडीदाराशिवाय मी एकट जीवन जगत आहे, हे ऑफिसमधल्या लोकांना माहीत होतं. वरच्या अधिकाऱ्यांकडे मी या दोघांविरोधात तक्रारी केल्या होत्या. पण फुलारी यांचे पोलीस दलात मोठ्या पदावर नातेवाईक नोकरीला आहे. त्यांचे सगळ्या ऑफिसमध्ये आणि मंत्रालयात मित्र व नातेवाईक आहे. ते मला कधीच मदत करणार नाही. प्रशांत अमृतकरचे पण आहेत. त्यामुळे त्यांचे कुणीही काहीही करू शकत नाही. माझ्या तक्रारीची दखल ना पोलिसांनी घेतली, ना विद्यापीठातील मोठ्या अधिकाऱ्यांनी घेतली. यापुढे मला ते खूप त्रास द्यायला सुरुवात करतील. मग आता जगून काय करू, यांना देव कधीच माफ करणार नाही. ते मला नोटीस यासाठी देतात की मी विद्यापीठ सोडावा किंवा जीव, अशी परिस्थिती निर्माण करतात. मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे....
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top