Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

1 मिनिट में 1000 पेड़: अग्रण धुळगाव का हरित विश्वविक्रम!

SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 01:02:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - अग्रण धुळगावचा हरित विश्वविक्रम, आईच्या नावाने 1 मिनिटात 1000 वृक्षांची लागवड... अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रण धुळगाव येथे हरित विश्वविक्रम करण्यात आला आहे.एक झाड आईसाठी या उपक्रमांतर्गत अवघ्या एका मिनिटात 1 हजार वृक्षांचा लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर यावेळी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत एकूण पाच हजार झाडांचे वृक्षारोपण देखील करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये अग्रण धुळगाव मधील शालेय विद्यार्थी,महिलांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 22, 2025 03:01:26
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 03:00:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn manpa encroachment issue Feed attached छत्रपती संभाजी नगरच्या सातारा परिसरातील रस्ता रुंदीकरणामुळे याचिकाकर्त्याची मालमत्ता बाधित होत असल्याबाबत दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शनिवारी महापालिकेला नोटीस बजावण्याचा आदेश दिला. न्यायालयाने तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मनपाने कुठलीही नोटीस न बजावता, चौकशी न करता किंवा याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता अथवा भूसंपादनाची कारवाई न करता वरील कारवाई प्रस्तावित केली. त्यांच्या या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आली. तूर्तास मनपातर्फे सातारा परिसरात रस्ता रुंदीकरणाची कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही, मात्र शहरात सगीलकडेच महापालिका नोटीस न देता कारवाई करत असल्याचा आरोप असल्याने अतिक्रमण मोहीम थंडावली आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 22, 2025 02:31:35
Nashik, Maharashtra:nsk_ सप्तशृंगी Anchor साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. या उत्सवासाठी संपूर्ण गड परिसर सज्ज झाला आहे. या काळात सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक भाविक गडावर देवी दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. थोड्याच वेळात विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक निघेल. सोन्याचे मंगळसूत्र, कोयरीहार, वज्रटीक, बोरमाळ, नथ, कर्णफुले, पाऊल, गुलाबहार अशी मौल्यवान आभूषणे मंदिरात नेऊन पैठणी तथा शालू देवीला नेसवून साजशृंगारातपरिधान करण्यात येतील. भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टने मंदिर व संपूर्ण परिसरात स्वच्छतेची विशेष व्यवस्था केली आहे. प्रसादालयात महाप्रसादाची सोय, मोबाइल टॉयलेट, पुरेशी पाणीपुरवठा व्यवस्था तसेच सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सर्व तयारीमुळे २२ सप्टेंबरपासून सुरू होणारा श्री भगवती नवरात्रोत्सव पुन्हा एकदा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 22, 2025 02:30:25
Ambegaon, Maharashtra:Feed 2C Slug: Ambegaon Shevanti High Price File:01 Rep: Hemant Chapude(Ambegaon) Anc: आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होता असून नवरात्र उत्सवानिमित्त फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय, फुलांचे आगार असलेल्या आंबेगाव जुन्नर तालुक्यात शेवंतीचे मोठं उत्पन्न घेतलं जातं सध्या शेवंतीच्या फुलांना शंभर रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळत असल्याने शेवंतीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांना असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारंच समाधान पाहायला मिळतंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To शेतकरी प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 22, 2025 02:15:23
Kolhapur, Maharashtra:Story :- Mahalaxmi Ghatasthapana Anc Feed :- Live U ANC :- सगळीकडचं आज नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झालीय. साडेतीन शक्तीपिठापैकी महत्वाचे पिठ असणा-या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही तोच उत्साह पहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर उजळून निघायल. पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केले आहे. पहाटे देवीची विधीवत पुजा अर्चा करुन आरती करण्यात आलीय. सकाळी साडेआठ वाजता मंदिरात घटस्थापना केली जाणार आहेत. मंदिरात घटस्थापना होताच तोफेची सलामी देऊन करवीकरांना मंदिरात घट बसल्याची वर्दी दिली जाईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. तोफेच्या सलामीनंतर करवीरकर आपल्या घरातील घट बसवायला सुरुवात करतात. आधी आई अंबाबाईच्या मंदिरात घटस्थापना होते, आणि त्यानंतर घराघरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात केली जाते असे अनेक वर्षाची परंपरा.. दरम्यान नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर सुरक्षतेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सीसीटीव्ही देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 22, 2025 01:45:34
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत देवीचे आगमन जल्लोषात! ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाला रंगतदार सुरुवात महिलांचा लेझीम-नृत्य, फटाक्यांची आतषबाजी करत देवीचे आगमन Anc...कल्याण-डोंबिवलीत देवीचे आगमन उत्साहात पार पडलं.सार्वजनिक मंडळं आणि घरगुती उत्सवांमध्ये ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि महिलांच्या नृत्याच्या तालावर देवीचे स्वागत करण्यात आलं.मंडळांनी देवीच्या मूर्तींचं आगमन करताना फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा नाद आणि पारंपरिक पोशाखातील महिलांचा जल्लोष पाहायला मिळाला.तर युवक कार्यकर्त्यांनी डान्स आणि घोषणाबाजी करत देवीचं स्वागत केलं.कल्याण आणि डोंबिवलीत अनेक मंडळांकडून भव्य मिरवणुका, रोषणाई आणि आकर्षक सजावटीतून देवीचं आगमन झालं.यंदाच्या नवरात्रौत्सवात ढोल-ताशांच्या तालावर शहर दणाणून गेलं असून नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले.
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 01:02:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गोपीचंद पडळकरां विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आज सांगलीत उतरणार रस्त्यावर.. अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्याकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या टिकेच्या निषेधार्थ आणि अभियंता अवधूत वडर आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आज सांगलीमध्ये रस्त्यावर उतरणार आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा निघणार असून या मोर्चामध्ये खासदार निलेश लंके,खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार बजरंग सोनवणे,रोहित पवार,रोहित पाटील आदी प्रमुख,पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून दुपारी 1 वाजता शहरातल्या पुष्पराज चौक पासून या मोर्चाला सुरुवात होणार असून स्टेशन चौक येथील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे,त्यानंतर नेत्यांच्या भाषणांनी मोर्चाचा समारोप होणार आहे.
1
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 21, 2025 17:30:55
Mira Bhayandar, Maharashtra: Date-21sep2025 Rep-prathamesh tawade Loc-bhayander Slug-BHAYANDER BOY Feed send by 2c Type-AV Slug- भाईंदर मध्ये डिलिव्हरी बॉय चा अपघातात मृत्यू अँकर - भाईंदर पश्चिमेकडील उड्डाणपुलावर आज भीषण अपघात झाला आहे. झेपटो कंपनीत काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयचा डंपरखाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण डिलिव्हरी करत असताना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तोल जाऊन तो थेट डंपरच्या मागील टायरखाली आला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन सविच्छेदनासाठी पाठवला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहतुकीवरही काही काळ अडथळा निर्माण झाला होता.
14
comment0
Report
Advertisement
Back to top