Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 11:41:33
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 20, 2025 03:46:21
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात निचांकी तापमान 6.5° C नोंदवलं गेले आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 6.5 अंशाच्या खाली आहे. सतत वाढणारी थंडी जनजीवन विस्कळीत करणारी ठरत आहे. राज्यातील थंड हवेच्या ठिकाण महाबळेश्वर आणि तोरणमाळ पेक्षा कमी तापमान धुळ्यामध्ये नोंदवल जात आहे. सायंकाळी आठ वाजेनंतर गार बोचरे वारे वाहत असल्यामुळे थंडीचे प्रमाण अधिकच वाढलेल आहे. अशा या काळाच्या थंडीमध्ये घराबाहेर पडणं कठीण बनलं आहे.या थंडीच्या लाट्यामुळे उबदार कपड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे, तर सुकामेवा, चहा याचीही विक्री प्रचंड वाढण्याच दिसून येत आहे. शाळांचे वेळ मात्र अद्याप प्रशासनाने बदलले नाही. तापमान कमी होत असताना शाळांची वेळ बदलावी अशी मागणी पालकांची आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 03:38:49
90
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 20, 2025 03:30:45
Palghar, Maharashtra:पालघर जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाच्या भीतीने विद्यार्थी शाळेत न जाता जंगलात लपून राहण्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे पालकांमध्ये लोकनाथ जाधव या शिक्षकाबाबत संतापाची लाट पसरली आहे. पालकांसोबतच येथील उपसरपंच सुभाष भोरे आक्रमक झाले असून त्यांनी गट विकास तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. जाधव यांनी काही विद्यार्थ्यांना १ किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले, दूर अंतर असल्याने ह्या विद्यार्थ्यांना पाणी आणण्यात उशीर झाला, तेव्हा शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थी आता शाळेत जायला घाबरत आहेत.
20
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 03:19:28
Ratnagiri, Maharashtra:सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्तींना टार्गेट करत होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीचा फटका आता जिल्ह्यातील दोन सेवानिवृत्त शिक्षकांना बसला आहे. जयगड-संदखोल येथील एका शिक्षकाने व्हॉट्सअॅपवर आलेली बनावट बँक पीडीएफ फाईल उघडताच अज्ञात हॅकरने त्यांच्या बँक खात्याचा अॅक्सेस मिळवून त्यांच्यासह अन्य एका शिक्षकाच्या खात्यातून तब्बल ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची रक्कम लंपास केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ८५ हजार ५१४ आणि दुसऱ्या शिक्षकाच्या खात्यातून ७१ हजार अशी एकूण ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची मोठी रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जयगड येथील अकबर मोहल्ला परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक नासिर अब्दुल्ला बावडे यांनी या फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. ही घटना १६ व १७ ऑक्टोबर दरम्यान घडली.
131
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 20, 2025 03:17:38
Beed, Maharashtra:मागील अनेक वर्षात बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू होता. याची तक्रार देखील करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत बीड जिल्ह्यातील दोन शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांचा निलंबनात समावेश आहे. नागनाथ शिंदे हे सध्या लातूरचे शिक्षणाधिकारी आहेत. बीड जिल्ह्यात या दोघांविरोधात गंभीर तक्रारी होत्या. निलंबनाच्या काळात त्यांच्यावर चौकशी देखील लादण्यात आली असून या दरम्यान जिल्हा न सोडण्याचे सक्तीचे आदेश आहेत. दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.
85
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 03:16:20
157
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 03:04:23
Kolhapur, Maharashtra:कागल मध्ये मंत्री मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे एकत्र आल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक ॲक्शन मोडवर. कागल नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विरोधी उमेदवाराला नेले अज्ञातवासात नगराध्यक्ष पदाच्या रिंगणातील उमेदवारावर राजकीय दबाव वाढत चालल्याच्या कारणावरून विरोधी उमेदवारांना नेते अज्ञातवासात माघारीची मुदت संपल्यानंतर विरोधी उमेदवारांना कागल मध्ये आणले जाईल. कोणत्याही परिस्थितीत कागल नगरपालिका निवडणुकीतन माघार घ्यायची नाही प्राध्यापक संजय मंडलिक यांची भूमिका. कागल मध्ये हसन मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे यांच्या विरोधात संजय मंडलिक आक्रमक संजय मंडलिक यांनी भाजप नेते संजय घाटगे यांची देखील घेतली भेट.
150
comment0
Report
Advertisement
Back to top