Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 16, 2025 05:07:25
Nagpur, Maharashtra:સોલાર एक्स्प्लोसिव्ह या नागपुरातील नावाजलेल्या आणि अतिसंवेदनशील स्फोटक निर्माण करणाऱ्या कंपनी च्या परिसरात एका संशयास्पद ड्रोन ने टेहळणी केल्याच्या संशयातून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे... 9 डिसेंबरच्या संध्याकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे... विशेष म्हणजे सोलार एक्सप्लोजिव्ह भारतीय सैन्यासाठी विविध शस्त्र और स्फोटकांची निर्मिती करते... त्यामुळे या घटनेची गांभीर्य वाढले आहे... नऊ तारखेला संध्याकाळी एक अज्ञात ड्रोन सोलार एक्स्प्लोसिव्ह च्या परिसराजवळ उडत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली... पोलिसांनी त्यानुसार आजूबाजूच्या गावांमध्ये हे ड्रोन कोणी उडवले याची माहिती घेतली.. मात्र हे ड्रोन आजूबाजूच्या कुठल्याही गावातून उडवण्यात आलेले नाही असे माहित पडल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे... प्रत्यक्षदर्शीनुसार मलकापूर आणि सावंगा गावाच्या हद्दीत हे ड्रोन दिसून आले होते... सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी ही हे ड्रोन बघितले. त्यानंतर स्थानिक कोढाळी पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात सर्च करत कॉम्बिंग ऑपरेशन राबविले.. मात्र, अनेक दिवस शोध घेऊनही ड्रोन कोणी उडवले याची स्पष्टता आली नसल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 16, 2025 04:50:49
Khed, Maharashtra:पुण्याच्या राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्याने रस्त्यालगत जोरदार पाण्याचे फवारे उडू लागले. यावेळी मात्र या पाण्याच्या अपव्ययाकडे लक्ष देण्याऐवजी काही नागरिकांनी याच फवाऱ्यांचा वापर करत आपली वाहने धुण्याची हटके शक्कल लावली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी थेट पाण्याच्या फवाऱ्यातून जात ‘फ्री कार-वॉश’चा अनुभव घेतला. पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असतानाही हे दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. एकीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असताना, दुसरीकडे नागरिकांची ही अनोखी आणि चर्चेचा विषय ठरणारी शक्कल राजगुरुनगरमध्ये पाहायला मिळाली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 16, 2025 04:49:30
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 16, 2025 04:47:52
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यांमध्ये सध्या युरिया खताची मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाली आहे. मात्र उपलब्ध साठा अपुरा पडत असल्याने शेतकऱ्यांना युरिया खत वेळेत मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.रब्बी हंगामातील पिकांच्या योग्य वाढीसाठी युरिया खत अत्यावश्यक असताना अनेक शेतकरी खतासाठी वणवण फिरत आहेत.चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात सुमारे ३ हजार ९०० मेट्रिक टन युरिया खताचा साठा दाखल झाला, मात्र वाढलेली मागणी आणि अपुरे नियोजन यामुळे हा साठा अपुरा ठरला.परिणामी अनेक शेतकऱ्यांना खत न मिळाल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागले.यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून,युरिया खताची वाढती मागणी लक्षात घेता तातडीने अतिरिक्त पुरवठा करावा तसेच योग्य आणि नियोजित पद्धतीने वितरण करावे, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 16, 2025 04:30:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि भाजपाचा जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिरजेतील माजी महापौर सह 12 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाट धरली आहे.मिरजेतील काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट, जनसुराज्य व भाजपच्या माजी नगरसेवकांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे.यावेळी पक्षप्रवेशावर चर्चा झाली असून लवकरच मिरजेत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे.काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार,करण जामदार,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान आरिफ चौधरी,चंद्रकांत हुलवान,नर्गिस सय्यद,आजम काजी, भाजपाचे शिवाजी दुर्वे यांच्यासह जनसुराज्यशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून 19 डिसेंबर रोजी या सर्वांचा मिरजेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजपा व जनसुराज्य शक्ती पक्षाला निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 16, 2025 04:16:53
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या सेलू येथे भरधाव कारची शाळकरी विद्यार्थ्यांना धडक 6 शाळकरी विद्यार्थी जखमी. शिकवणी वर्गातून घरी परत असतांना सेलू येथील पोलीस स्टेशन रोडवर घडली घटना घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद सेलू पोलिसात घटनेची नोंद. अँकर : वर्ध्याच्या सेलू येथे शिकवणी वर्गातून घरी परत जात असतांना एका भरधाव कारने सहा विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली,यामध्ये विद्यार्थी जखमी झाले असून संपूर्ण घटना cctv कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे..तेथील उपस्थितानी असलेल्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.कार चालकासह चारचाकी वाहन जप्त केले आहेय..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 16, 2025 04:16:26
Shirdi, Maharashtra:Akole News Flash अकोलेकरांचा रेल्वे मार्गासाठी एल्गार , अकोले बंदची हाक.. अकोले तालुक्यातील हजारो नागरीकांचा आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा ... नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले - संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा... नाशिक - शिर्डी शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मुख्य मागण्या... मागण्यासाठी अकोले बंदला उस्फुर्त प्रतिसाद... या मोर्चात आमदार डॉ.किरण लहामटे , आमदार सत्यजित तांबे , खासदार भाऊसाहेब वाकचौरे , माजी आमदार वैभव पिचड , माजी आमदार सुधीर तांबे यासह सर्व पक्षातील पदाधिकारी होणार सहभागी... नेत्यांसह हजारो नागरिकांचा मोर्चात असणार सहभाग.... अकोले बंदचा आढावा घेत अकोलेकरांशी मोर्चा बद्दल बातचीत के लिये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 16, 2025 04:04:07
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 16, 2025 03:51:04
Nagpur, Maharashtra:वाहनाच्या धडके बिबट्या गंभीर जखमी; उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44वरील कांद्री माईन रेल्वे लाईन परिसरात काल सकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने नर बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रस्ता ओलांडत असताना अचानक वाहनासमोर बिबट्या आल्याने ही धडक बसल्याचे सांगण्यात येते. देवलापारकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बिबट्या रस्त्यालगत कोसळला असून त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच मनसरचे क्षेत्रसहाय्यकानी त घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जखमी बिबट्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविले. सध्या बिबट्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 16, 2025 03:47:33
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 16, 2025 03:45:56
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - महापालिका निवडणुकांसाठी माकपचा 20 जागांचा महाविकास आघाडीकडे प्रस्ताव तर पाच वर्षात पाच महापौर देण्याची केली मागणी - सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील माकप कडून महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला - सोलापूर महानगरपालिका के महापौर पदासाठी पाच वर्षात पाच महापौर देण्याची माकपची मागणी - महानगरपालिकेत अडीच वर्षाची महापौरची मुदत एका वर्षासाठी करावी, पाच वर्षात पाच महापौर करावेत - माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पाच वर्षात एकदा माकपला संधी मिळेल अशी अपेक्षा माकपने व्यक्त केली अपेक्षा - सोलापूर महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीत माकप कडून वीस जागांचा प्रस्ताव - महाविकास आघाडीतील नेते एकत्र बसून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवणार
0
comment0
Report
Advertisement
Back to top