Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ के वणी में अविश्वास प्रस्ताव: आशिष खुलसंगे पर कांग्रेस की राजनीतिक चाल

SRSHRIKANT RAUT
Nov 11, 2025 11:18:12
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वणी येथील दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. वसंत जिनिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा अपहार झाला नसून काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना झालेल्या गैरसमजातून ही राजकीय खेळी करण्यात आली आहे. वणी उपविभागात आधीच काँग्रेस ला प्रतिनिधित्व नाही. त्यात निवडणुकीच्या तोंडावर अविश्वास ठराव आणणे म्हणजे नेत्यांकडूनच पक्ष खिळखिळा करण्याचा प्रकार असल्याचे मत आशिष खुळसंगे यांनी व्यक्त केले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 11, 2025 12:58:32
Ambernath, Maharashtra:उल्लासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर! उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची आरक्षण सोडत आज पार पडली. या वेळी उल्हासनगरमधील इच्छुक उमेदवार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 20 प्रभाग असून, त्यामधून 78 नगरसेवक निवडून येणार आहेत. यापैकी दोन प्रभागात तीन नगरसेवक, तर उर्वरित प्रभागांत चार नगरसेवकांची निवड होणार आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत सर्व प्रभागांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले. या अंतर्गत – सर्वसाधारण जागा : 43 त्यापैकी 20 सर्वसाधारण महिला जागा मागासवर्गीय जागा : 21 त्यापैकी 11 महिला जागा अनुसूचित जाती जागा : 13 त्यापैकी 7 महिला जागा अनुसूचित जमाती : 1 जागा (महिला राखीव) अशा प्रकारे, आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत एकूण 78 नगरसेवकांची निवड होणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 11, 2025 12:46:14
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Nov 11, 2025 12:45:31
Thane, Maharashtra:भिवंडी महानगरपालिकेची अनाधिकृत बांधकामे धडक कारवाई... कासार अली रोडवरील कोमल पाडा येथे केली कारवाई.. भिवंडी महानगरपालिके कडून अनाधिकृत बांधकामांवर कारवाईच सत्र सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर विभाग समिती क्रमांक ५ अधिकारी सय्यद चिवणे, बीट निरीक्षक हनुमान म्हात्रे आणि त्यांच्या पथकाने आज कासार अली रोडवरील कोमल पाडा आणि घर क्रमांक ३५७ येथे बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध तोडफोड मोहिम राबवली. कडक सुरक्षेत महानगरपालिका प्रशासनाने हातोड्याने अनेक बेकायदेशीर बांधकामे पाडली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या सूत्रांनुसार, सध्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये अंदाजे ३६ इमारती आहेत ज्यांवर पुढील कारवाई प्रलंबित आहे. निरीक्षक हनुमान म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पथक पाडण्याच्या कारवाईदरम्यान उपस्थित होते. विभाग अधिकारी म्हणाले, "शहरातील बेकायदेशीर बांधकामे हटवण्याची ही मोहीम आता वेगाने सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली जाईल."
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 11, 2025 12:24:34
Nanded, Maharashtra:रेल्वेमध्ये पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या एका युवकाचा खूण केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी नांदेडमध्ये घडली. उमरी ते धर्माबाद मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेमध्ये हा थरार घडला. या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत आतिश हायबते याचा एका प्रवश्याशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. समोरील व्यक्तीने आतिषच्या पोटात चाकू खुपसला. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या आतिषचा मृत्यू झाला. खूण करणाऱ्या आरोपीचा प्रवश्यानी व्हिडीओ केलाय. आरोपी खूण करून पसार झाला. रेल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केलीये.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 11, 2025 12:12:27
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 11, 2025 12:11:39
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील 13 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची घोषणा झाली. काँग्रेसच्या नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुख अहमद यांच्यासह इतर पदाधिकारीांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा केली. जागांचे वाटप झाले नसतानाही समभावाने जागा देण्याच्या संमतीवर आघाडी केल्याचे दोन्ही पक्षाकडून सांगण्यात आले. धर्मनिरपेक्ष मतं एकत्र राहावीत यासाठी आघाडी केल्याचेही सांगण्यात आले. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतही काँग्रेस आणि वंचित आघाडी कायम राहील असा विश्वास व्यक्त झाला. या बैठकीत महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटातील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 12:08:27
Nashik, Maharashtra:आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर जाने के लिए भाविकों को प्राण जोखिम में डालकर रास्ते पार करने पड़ते हैं, क्योंकि नाशिक त्र्यंबकेश्वर रास्ता अक्सर खड्डों से भरा है। सार्वजनिक निर्माण विभाग इसके बड़े खड्डों की तरफ से अनदेखी कर रहा है और लोगों की जीवन सुरक्षा के बजाय अन्य तात्कालिक प्रबंधों पर जोर दे रहा है। इस situation में एक रिक्षा चालक ने खुद खड्डों में पत्थर डालकर लोगों की सुरक्षा करने की पहल की है; खड्डे इतने गहरे हैं कि कोई भी नई गाड़ी डाइवर्ड से टकरा सकती है। उसने अपने आस-पास के इलाके से पत्थर जुटाकर खड्डे भरने का कार्य शुरू कर दिया है। हादसे के बाद चालक ने एक पैर भी गंवाया है, फिर भी वह रस्ते की मरम्मत में जुटा है ताकि लोग सुरक्षित यात्रा कर सकें। प्रशासन कह रहा है कि कुंभ मेले के लिए बड़े बड़े सड़क निर्माण की तैयारी चल रही है, परंतु स्थानीय प्रशासन को तुरंत खड्डों की सुध लेते हुए मार्ग सुरक्षित बनाना चाहिए। त्र्यंबकेश्वर में सुबह-सुबह दर्शन के लिए बहुत से तीर्थ यात्री पहुँचते हैं, पर पिछले चार से पांच महीनों में कई लोगों को गंभीर चोटें आई हैं, जो इसकी जटिलताओं को उजागर करते हैं।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 11, 2025 12:04:06
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या शिरला... या बिबट्याने दोघाजणांच्यावर हल्ला केला. त्यानंतर तब्बल साडेतीन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून वनविभागाने बिबट्याला जेरबंद केलं. असं असलं तरी शहराच्या मध्यवर्ती भागात पूर्ण वाढ झालेला बिबट्या आला कसा याची चर्चा संपूर्ण कोल्हापूर शहरभर सुरू झाली आहे. कोल्हापुर शहरातील मध्यवर्ती भागात शिरला बिबट्या... बिबट्याला पाहून ताराबाई पार्क मध्ये घबराहट... मध्यरात्रीपासून ताराबाई पार्क परिसरातच होता बिबट्याचा मुक्काम... रेस्क्यू ऑपरेशन तब्बल साडेतीन तासाहून अधिक काळ रेस्क्यू... बिबट्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी... पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानंतर हा बिबट्या महावितरण कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या चेंबर मध्ये लपून बसला. त्यानंतर सुरू झाली बिबट्याला पकडण्याची मोहीम. चेंबर मध्ये असरा घेतला त्यामुळे वनविभागाने परिसराला जाळी लावली... पाच कर्मचाऱ्यांनी चेंबरकडे पोहोचले... चेंबरवर जाळी टाकली... बिबट्याला झडप मारली... ट्रॅक्युलर गन शूट... बिबट्याला बेशुद्ध होईपर्यंत पकड ढिल्ली सोडली नाही... अवघ्या काही काळात बिबट्या बेशुद्ध झाला... मोहीम फत्ते झाली. कोल्हापुर शहरातील मध्यवर्ती भागात बिबट्या येण्याची ही पहिली वेळ नाही, 2015 साली रुईकर कॉलनीमध्ये बिबट्या आला होता. त्यावेळी मोहीम राबवत जेरबंद झाला होता, परंतु काही तासातच मृत्यू झाला. ताराबाई पार्क मधील उच्चभ्रू वस्तीत पुन्हा बिबट्याचा शिरकाव झाल्याने मध्यवर्ती भागात प्रश्न उठतो.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 11, 2025 11:46:01
Yavatmal, Maharashtra:(बाईट मधील महिला कर्मचारी चा चेहरा ब्लर करणे.) यवतमाळच्या दारव्हा येथील राज्य परिवहन विभागाचे आगार प्रमुख नितीन उजवणे यांच्या वर महिला कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्सर त्रास दिल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर. स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने विभागीय नियंत्रकाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. आगार प्रमुख उजवणे विरोधात महिला कर्मचाऱ्यांनी अनेक तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने आगार प्रमुखाचे मनोबल वाढल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे. उजवणे विरुद्ध आधीच कारवाई केली असती तर विनयभंगाचा प्रकार घडला नसता, महिलांनी सामूहिक तक्रारी करूनही त्याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने केलेले दुर्लक्ष गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बाईट : महिला लिपिक
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 11, 2025 11:40:03
Shirdi, Maharashtra:शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची चिन्हे असतानाच आता नवीन ट्विस्ट बघायला मिळतोय.. विखे पाटलांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या RSS आणि भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतलाय.. संघाचे जेष्ठ कार्यकर्ते बाबुजी पुरोहित आणि संघ प्रचारक मुलगा विराट पुरोहित यांच्या नेतृत्वात निष्ठावान कार्यकर्त्यांची मोट बांधली जात आहे.. इथल्या नेतृत्वाने शिर्डीची बाजारपेठ उध्वस्त करत सामान्य माणसावर बेरोजगारीची वेळ आणली आहे.. इथून निवडून जातात मात्र त्यांना शिर्डी गावाची काळजी नाही.. शिर्डीची घडी पुन्हा बसवण्यासाठी निष्ठावंतांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याचे पुरोहित पिता पुत्रांनी म्हटलंय.. अटल बिहार वाजपेयी यांच्या " बुझी ہوئی बाती सुलगाएं.. आओ फिर से दिया जलाएं " या कवितेचा संदर्भ देत पुरोहित यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.. RSS आणि भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे..
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 11, 2025 11:17:50
Navi Mumbai, Maharashtra:निवडणूक याचिकेला उत्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भाजप मंत्री गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसात उत्तर देण्यास आदेश दिले आहेत. मंत्री गणेश नाईक यांना याचिकेवर उत्तर सादर करायला वेळ नाही हा न्यायालयाचा अनादर असल्याचे सुनावत पुढील दोन दिवसात प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ऐरोली विधानसभा मतदार संघातून भाजपच्या गणेश नाईक यांनी सत्तेच्या बळावर, भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार एमके मढवी यांनी गणेश नाईक यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिले होते. याप्रकरणी आता 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Nov 11, 2025 11:09:31
Karjat, Maharashtra:रायगड ब्रेकिंग आभ्यास: आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का बसण्याची शक्यता थोरवेंचा विश्वासू सहकारी पंकज पाटीलांनी घेतली सुनील तटकरेची भेट सुधाकर घारे यांचा नवा राजकीय डाव आमदार थोरवे यांना धक्का देणारा Anchor - कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पंकज पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलय. पंकज पाटील यांनी सलग दोन टर्म निवडून आलेले महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना मोठे मताधिक्य दिले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक दरम्यान पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची घेतलेली भेट. आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का देण्यास कारणीभूत ठरू शकते. पंकज पाटील यांनी काही महिन्यांपासून नाराज असून ते आमदार थोरवे यांच्याबरोबर कार्यक्रमस्थळी देखील दिसत नव्हते. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पंकज पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार थोरवेंना जोरदार धक्का देत थोरवेंचा जिवाभावाचा सहकारी फोडल्याने चर्चा सुरू आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 11, 2025 11:05:05
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक 2025-2026 साठी 122 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर रोजी हरकती सूचना.. 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025-2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण सोडत आज कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडली. एकूण 122 सदस्यीय प्रभागांसाठी ही सोडत काढण्यात आली असून, विविध प्रवर्गांनुसार आरक्षणाचे वाटप करण्यात आले आहे. या सोडतीनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. विविध पक्षांचे स्थानिक नेते आणि संभाव्य उमेदवार आता आपापल्या प्रभागांच्या आरक्षणानुसार तयारीला लागले आहेत. नगरपालिका निवडणुका 2025-26 साठी ही आरक्षण सोडत निर्णायक मानली जात असून, महिला उमेदवारांसाठी यावेळी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाल्या आहेत. आचार्य अत्रे नाट्यगृहात झालेल्या या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संभाव्य उमेदवार आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. *या सोडतीदरम्यान चार सदस्यीय 29 प्रभाग आणि तीन सदस्यीय 2 प्रभाग अशा एकूण 31 प्रभागांमध्ये आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवर्गानुसार आरक्षण अनुसूचित जाती (SC): 12 प्रभाग त्यापैकी 6 प्रभाग महिलांसाठी आरक्षित; अनुसूचित जमाती (ST): 3 प्रभाग त्यापैकी 2 प्रभाग महिलांसाठी आरक्षित; इतर मागासवर्गीय (OBC): 38 प्रभाग त्यापैकी 16 प्रभाग महिलांसाठी आरक्षित; सर्वसाधारण प्रवर्ग: 75 प्रभाग त्यापैकी 38 प्रभाग महिलांसाठी राखीव
0
comment0
Report
Advertisement
Back to top