431213
जालना महापालिका: 65 सीटों में 33 महिलाओं के लिए आरक्षण
Jalna, Maharashtra:जालना : महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर 16 प्रभागातील 65 जागांसाठी सोडत जाहीर 33 जागा महिलांसाठी आरक्षित SC 8 पैकी 4 जागा महिलांसाठी राखीव ST एकमेव जागा महिलांसाठी राखीव ओबीसींच्या 17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव सर्वसाधारण 39 पैकी 19 जागा महिलांसाठी राखीव 16 ते 24 नोव्हेंबरपर्यत हरकती आणि सूचना करता येणार0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
समीर भुजबळ की मौजूदगी में अमोल शिंदे ने राष्ट्रवादी में प्रवेश किया
Yeola, Maharashtra:येवला नगरपालिकेचे गटनेते गणेश शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू अमोल शिंदे यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला यापूर्वी अमोल शिंदे हे युवा सेनेचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते मात्र त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र दिले नाही असे शिवसेनेच्या वतीने जाहीर केल्याने शिंदे हे शिवसेनेत नाराज होते दरम्यान काही दिवसांपूर्वी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना नगरसेवकांचा एक गट समीर भुजबळांच्या भेटीला गेला होता मात्र राज्यात सत्तेत असलेले सेना-भाजप राष्ट्रवादी यांच्या फॉर्मुल्यानुसार निवडून आलेल्या सदस्यांना प्रवेश येता येणार नसल्यामुळे केवळ अमोल शिंदे यांनाच सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष तथा येवला लासलगाव मतदार संघ प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली.राम गीत लॉन्स या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ,गटनेते गणेश शिंदे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
सोलापुर में पति ने पत्नी लौटाने के लिए गाढवीनी से प्रतिकात्मक विवाह किया
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग : सोलापुरात बायको परत नांदायला यावी म्हणून एका व्यक्तीने चक्क 'गाढवीनी' सोबत प्रतिकात्मक लग्न केले - सोलापुरात बायको परत नांदायला यावी म्हणून एका व्यक्तीने चक्क 'गाढवीनी' सोबत प्रतिकात्मक लग्न केले - 16 वर्षांचा संसार तुटल्याने वैफल्यग्रस्त पिडीत पुरुषाने चक्क गाढवीनी सोबत प्रतिकात्मकरित्या विवाह केला असल्याचा दावा केला आहे. - दिपक सूर्यवंशी असं या व्यक्तीचे नाव असून आपल्या पत्नीने कुठलीही पूर्वकल्पना न देता सोडून गेली असल्याचा दावा केला आहे. - दिपक सूर्यवंशी यांचे मेव्हणे गणेश साळुंखे आणि मंगळवेढ्यातील माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी आपल्या बायकोला दूर केल्याचा आरोप केला आहे. - मागील 15 दिवसांपासून दिपक सूर्यवंशी हे आपली बायको पूजा सूर्यवंशी ही परत यावी म्हणून प्रयत्न करत आहेत. - त्यासाठी अखेर त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद गेट समोर लक्षवेधी धरणे आंदोलन केलेय. - मात्र याची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने त्यांनी आज थेट गाढवीनी सोबत प्रतिकात्मक लग्न करून आगळे वेगळे आंदोलन केलेय. - या आंदोलनाच्या ठिकाणी दिपक सूर्यवंशीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ही छायाचित्र ठेवले आहे. - दरम्यान रीतसर मंगलाष्टक पार पडून गाढवीनीच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करून दिपक सूर्यवंशीने हा प्रतिकात्मक विवाह केला आहे.0
0
Report
बुलढाणा: दो गुटों के संघर्ष में नगरसेवक सहित एक अन्य कार्यकर्ता की मौत
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये शिंदेसेनेचा एक विद्यमान नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण रक्तरंजित संघर्ष थेट देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच घडला. दोन्ही बाजूंनी तलवारी आणि धारदार शस्त्रांनी एकमेकांवर सपासप वार केल्याने या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल देऊळगाव राजा शहरात एका कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून लहान मुलांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, या क्षुल्लक वादाचे पर्यावसान आज मोठ्यांच्या हाणामारीत आणि दोन गटांमधील रक्तरंजित संघर्षात झाले. तक्रार देण्यासाठी किंवा वादाच्या संदर्भात दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहोचले असतानाच ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच दोन्ही गट पुन्हा एकमेकांसमोर आले. पोलीस ठाण्याच्या दारातच वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूंच्या लोकांनी थेट तलवारी आणि इतर धारदार शस्त्रे उपसून एकमेकांवर प्राणघातक हल्ले चढवले. झालेल्या या हल्ल्यात शिंदेसेनेचे नगरसेवक शेख अन्वर अली आणि राष्ट्रवादीच्या आरिफ पठाण या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात सात जण गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी व शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
अकोला: अंतरराज्यीय घरफोडी गैंग का पर्दाफाश, 12 लाख रुपए का माल बरामद
Akola, Maharashtra:Anchor : अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज્યीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या तब्बल १० घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ८ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे.अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणचे तब्बल १८५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यासोबतच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील विविध भागात आरोपींचा शोध घेतला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी बुलडाणा, जळगाव खानदेश, बुऱ्हाणपूर आणि इंदूर असा तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास केला.या तपासातून आंतरराज्यीय टोळीतील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यांशी संबंधित १२ लाख ८ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
देऊळगाव राजा में दो गुटों के बीच खूनी संघर्ष, 2 की मौत, 7 घायल
Buldhana, Maharashtra:देऊळगाव राजा शहरात एकाच समाजाच्या दोन गटात तुफान राडा. दोन्ही बाजूंनी तलवारी व इतर धारदार शस्त्रांनी वार. दोन जण जागीच ठार, तर सात जण जखमी. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आला रवाना. काल देऊळगाव राजा शहरात एका परिसरात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात बसण्याच्या वादावरून लहान मुलांमध्ये वाद निर्माण झाला होता. वादाचं पर्यावरण आज मोठ्यांच्या हाणामारीत व दोन गटात झालं. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या अगदी गेटवर झाला राडा. मृतकात शिंदेच्या शिवसेनेचा विद्यमान नगरसेवक आहे तर दुसरा मृतक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती.0
0
Report
कल्याण के सहजानन्द चौक पर तेज कार ने दो-तीन वाहन फोड़े, चालक गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या सहजानंद चौक परिसरात भरधाव कारचा थरार दोन - तीन वाहनांना धडक, रिक्षाचालकाच्या अंगावरूनही कार गेल्याची घटना, संतप्त नागरिकांकडून गाडीची तोडफोड कल्याणच्या सहजानंद परिसरात भरधाव कार चालकाने दोन - तीन वाहनांना धडक दिल्याने एकच गोंधळ उडाला. धडकेनंतर एक रिक्षाचालक खाली पडला आणि त्याच्या अंगावरूनही कार गेल्याची घटना घडली. अपघातात दोन जण जखमी झाले असून दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडत गाडीची तोडफोड केली. रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कार चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला0
0
Report
Advertisement
अंधेरी में शिंदे गट के नेता शिवम दुबे उर्फ चोंग्या गिरफ्तार: विवाह के बहाने बलात्कार
Mumbai, Maharashtra:अंधेरीत शिंदे गटाच्या युवा नेत्याला बलात्काराच्या गुन्हा मध्ये एमआयडीसी पोलिसांनी केली अटक शिंदे यांच्या युवा नेता कडून एका तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे अटक आरोपीचा नाव शिवम दुबे उर्फ चोंग्या असून एमआयडीसी महाकाली परिसरात राहणार आहे अटक आरोपी हा पीडित तरुणी कडून लाखो रुपये आणि महागणी कार घेतल्याच्या देखील माहिती लग्नाच्या आमिष देऊन तीन वर्ष पीडित तरुणी सोबत लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी हा उत्तर प्रदेश मध्ये लग्नासाठी मुलगी पाहत होता उत्तर प्रदेश मध्ये दुसरी मुली सोबत लग्न करत असल्याच्या माहिती मिळताच पीडित तरुणी अंधेरी पूर्वत एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये घेतली धाव मुलीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिवम दुबे उर्फ चोंग्याला केली अटक आरोपी हा शिंदे गटातील माजी नगरसेवक कमलेश राय आणि नगरसेवक रितेश राय यांच्या जवळचा आणि विश्वासू युवा नेता यापूर्वीही आरोपीविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती ,२०२३ मध्ये आरोपीवर तडीपारीची कारवाई; नंतर राजकीय दबाव आणून तडीपारी रद्द झाल्याचा दावा तरुणीने तक्रार करू नये म्हणून कमलेश राय आणि रितेश राय यांनी दबाव टाकल्याचा पीडित तरुणीचा आरोप दबावाला न जुमानता पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली सध्या आरोपी शिवम दुबे उर्फ चोंग्या हा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून या आरोपीने अजून काही मुलींना अशा पद्धतीने फसवणूक केल्या आहे का या संदर्भात एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
नितेश राणे का रोहित पवार को मंत्रिमंडल में जगह मिलने का दावा
Washim, Maharashtra:अँकर :राजकारणातून या क्षणाची मोठी बातमी..वाशिम दौऱ्यावर असलेले बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठा दावा केलाय. रोहित पवार लवकरच सत्ताधाऱ्यांसोबत येतील आणि मंत्रिमंडळात दिसतील, असा दावा राणेंनी केलाय.रोहित पवारांना मंत्रिमंडळात कोणतं खातं हवंय, यावरच सगळं अडकलं असून त्यांना कृषी की सहकार खातं,यावर चर्चा सुरू असल्याचं राणे म्हणाले. रोहित पवारांना प्रवेशाची तारीख आणि दिवसही माहिती असल्याचा दावा करत,त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा, असा सवालही राणेंनी उपस्थित केलाय.नितेश राणेंच्या या दाव्यानंतर आता रोहित पवार आणि शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.0
0
Report
नेवासा में शंकरराव गडाख की बिनविरोध नियुक्ति: एक अर्ज से जीत की राह साफ
Ahilyanagar, Maharashtra:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा... उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा.... नेवासा तालुक्यातील सुमारे १३० सेवा सोसायटी मतदार असलेल्या या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते..... जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना नेवासा तालुक्यात मात्र माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा..0
0
Report
Advertisement
अकोला कांग्रेस कार्यक्रम में भाषण के लिए बहस के बाद दो कार्यकर्ताओं की हाथापाई वीडियो वायरल
Akola, Maharashtra:अकोल्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात माईकवरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. माईकवर बोलण्यासाठी संधी न दिल्याच्या कारणावरून एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर नाराजी व्यक्त करत "मला का डावलले, मला का बोलू दिले नाही?" असा सवाल केला. यानंतर दोघांमध्ये वाद वाढला. यादरम्यान, काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतील तश्वर पटेल यांनी रहमान बाबू यांना सुरुवातीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद वाढल्यानंतर तश्वर पटेल यांनी रहमान बाबूंवर हात उगारल्याचा व्हिडिओमध्ये आरोप आहे. या घटनेत दोघांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, माईकवरून झालेल्या या वादामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमातील कार्यकर्त्यांच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.0
0
Report
नवी मुंबई अस्पताल में प्रसूति के बाद नवजात की मौत, लापरवाही का आरोप
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा अस्पताल में प्रसूति के बाद नवजात बाळ के जन्म के साथ ही संबंधी गड़बड़ का मामला सामने आया. लक्ष्मी मिलन दास के पहले प्रसूति के दौरान असफल शल्य चिकित्सा के कारण बच्चे की मौत का आरोप परिवार ने लगाया. प्रसूति वेदना शुरू होने के बाद लक्ष्मी को 1 अक्टूबर को अस्पताल में दाखिल किया गया था. 4 अक्टूबर को डॉक्टरों ने पहले सामान्य प्रसूति का प्रयास किया लेकिन कई प्रयासों के बाद भी प्रसूति सफल नहीं हुई, जिसके चलते शल्य चिकित्सा करनी पड़ी. शल्यक्रिया के पश्चात बच्चा पैदा हुआ, परंतु वह मृत पाया गया. इसके बाद परिवार ने चिकित्सकीय लापरवाही के आरोप लगाते हुए अस्पताल के बाहर हंगामा किया और कुछ समय के लिए तनावपूर्ण वातावरण रहा. डॉक्टरों की लापरवाही के कारण बच्चे की मौत हुई, परिवार ने दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की. गर्भावस्था के दौरान ही दुर्भाग्यपूर्ण मृत्यु हो जाने की बात भी सामने आई जिसमें डॉक्टर मरीज के साथ थे और कहीं भी भागे नहीं.0
0
Report
इंदापूर टोल पर लापरवाही से 75 वर्षीय लालाबाई काळे की मौत, टोल बंद-रस्ता रोक आंदोलन
Rui, Maharashtra:पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाका व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ७५ वर्षीय लालाबाई सोपान काळे यांचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालक, टोल कर्मचारी व व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे सरडेवाडी टोलनाक्यावर 'टोल बंद' आणि 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगत रास्ता रोको करू नका, असे म्हणत आंदोलकांना रोखले. आंदोलकांनी टोलनाक्यावर ठिय्या देत महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्ता मोकळा करण्यावरून पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. इंदापूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.0
0
Report
Advertisement
दौंड में 41 किलोग्राम गांजे के साथ कार पकड़ी, NDPS के तहत मामला दर्ज
Rui, Maharashtra:दौंडाच्या बोरीपारधी परिसरात 41 किलो गांजा जप्त. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दौंड तालुक्यातील बोरीपार्धी परिसरात कारवाई करत 41 किलो 18 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची अंदाजे किंमत 20 लाख 50 हजार 900 रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कारही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी हर्षवर्धन अशोक बरडे आणि कुशाल दत्तात्रय बिनवडे या दोघांविरोधात यवत पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
शेरेवाड़ी में दो वृद्ध महिलाओं की हत्या: रिश्तेदार आरोपी गिरफ्तार, कर्ज के कारण हत्या
Rui, Maharashtra:शेरेवाड़ी में दो वृद्ध महिलाओं की हत्या का खुलासा: आरोपी उनके रिश्तेदार गजाआड arrested; विकास उर्फ आप्पा लडकत नामक व्यक्ति को गिरफ्तार किया गया है. घटना में मृत दोनों वृद्ध महिलाओं के गले काट दिए गए थे. पुलिस ने बताया कि आरोपी को कर्जबाजारीपणा और जुए के नशे ने प्रेरित किया था. आयी जानकारी के मुताबिक, 20० से अधिक सीसीटीवी फुटेज और २०० से अधिक रिकॉर्ड वाले अपराधों की जानकारी के आधार पर आरोपी तक पहुँचा गया. गिरफ्तारी के बाद आरोपी ने अपना जुर्म कबूल किया है. रात 1 बजे के करीब हुई इस घटना की पुष्टि पुणे ग्रामीण के पुलिस अधीक्षक संदीपसिंह गिल ने दी.0
0
Report
यवतमाल में मंत्री के काफिले पर फेंकी गई मुर्गियाँ, शिवसेना का विरोध प्रदर्शन
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मंत्री नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या. ठाकारेंच्या शिवसैनिकांचे आंदोलन. दारव्हा तालुक्यातील कुंभारकिंन्ही तलाव पाहणी आणि मच्छीमारांसोबत संवाद साधण्यासाठी मंत्री नितेश राणे दौऱ्यावर आले होते. शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी केली घोषणाबाजी. मुर्गी चोर, मुर्गी आई दुष्काळी दाना चुनने, वोट चोर असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेऊन घोषणाबाजी. मच्छीमारांबाबत सहानुभूती असेल तर मच्छीरांना मदत जाहिर करा, अशी मागणी ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.0
0
Report
Advertisement
