Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
YavatmalYavatmal

यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत

Aug 31, 2024 17:32:53
Chinchbardi, Maharashtra

यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 13, 2025 03:18:09
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग มाजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना आज अखेरचा निरोप.... सकाळी साडे नऊ वाजता देवघरहून अंत्ययात्रा, ११ वाजता वरवंटी येथे अंत्यसंस्कार.... लातूरमध्ये आज राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती... लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे राहणार उपस्थित.... लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर नेते हे येणार आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने देशाने एक अनुभवी, संयमी नेतृत्व गमावले आहे. अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 03:01:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरात आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू राहणार नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामे रखडण्याची भीती व्यक्त केली जातेय, आचारसंहितेपूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली वाढल्या आहेत.या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांना शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या फायलींना प्राधान्य देत त्या तातडीने टेंडर स्तरापर्यंत नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी मिळावी, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे चित्र आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 13, 2025 03:00:58
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 03:00:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नळ पाणीपुरवठा योजनांच्या ७३ कामांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. याबाबत संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला आहे, खुलासा प्राप्त होताच पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. २५ योजनांची प्राथमिक चौकशी करण्याची कार्यवाही सुरू आहे, या प्रकरणात जिल्ह्यातील आमदार प्रशांत बंब, विलास भुमरे, संजना जाधव यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेशी निगडित कार्यकारी अभियंता, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन समिती, त्रयस्थ तपासणी संस्था व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करीत संगनमताने निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करीत चुकीची मोजमापे नोंदवून मोठा गैरव्यवहार केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. हा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता. विधिमंडळात चर्चा झाल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे. यावर आता सखोल चौकशी होऊन कारवाईची अपेक्षा आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 02:48:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नायलॉन मांजावर छत्रपती संभाजीनगर पोलिसांची आकाशातून नजर... ड्रोन पेट्रोलिंगद्वारे नजर ठेवून लक्ष ठेवणार, नागरिकांना आवाहन करणार... ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात नायलॉन मांजामुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसानी आक्रमक भूमिका घेतली आहे. धाडसत्र राबवत शहराच्या हद्दीत पोलिसांची कारवाई सुरू आहे त्यात आता आकाशातून ही पतंग बाजांवर पोलीस लक्ष ठेवणार आहे... पोलिस आयुक्तांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन पेट्रोलिंगचे आदेश दिले. 4 k स्पष्टतेने व्हीडिओ करणाऱ्या 8 ड्रोन च्या साहाय्याने पतंग बाजांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे... महत्वाचं म्हणजे या ड्रोन मधून स्पीकर द्वारे पोलीस नागरिकांना बोलू ही शकतात त्यामुळं त्यातून पोलीस नागरिकांना आवाहन करणार आहे... तर चौकाचौकात पोलीस निरीक्षक स्वतः स्पीकर द्वारे आवाहन करत आहेत... नायलॉन मांजामुळे विशेषत: दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात येत असल्याची तक्रार सातत्याने येत होती. आणि आता या धोक्याला आळा घालण्यासाठी पोलिसांची हाय-टेक एंट्री केली आहे. बाईट : रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 13, 2025 02:47:42
Kalyan, Maharashtra:केडीएमसी प्रभाग रचना व आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका — शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव..सोमवारी याचिकेवर होणार सुनावणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. १२२ नगरसेवकांसाठी ३१ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या आरक्षण सोडतीवर गंभीर आक्षेप घेत शिंदे शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.रवी पाटील यांचा दावा आहे की, प्रभाग क्रमांक ३, ५ आणि १५ मध्ये नियमबाह्य पद्धतीने आरक्षण लावण्यात आले आहे. काही प्रभागांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी अशी तिन्ही आरक्षणे एकाच वेळी टाकण्यात आली असून, ही प्रक्रिया जनसंख्यानुसार नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आमचा निवडणुकीला विरोध नाही, मात्र नगरविकास विभागाने काढलेल्या जीआरनुसार जी प्रक्रिया अपेक्षित होती, ती राबवली गेलेली नाही. समान संधीचा दावा करणारा निवडणूक आयोग एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला पुरुष आणि महिला उमेदवारांवर अन्याय होत आहे.”एसटी, एससी आणि ओबीसी आरक्षण ठरवताना नियमांमध्ये विसंगती आहे,काही ठिकाणी थेट सोडत, तर काही ठिकाणी चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली ,एसटीचे आरक्षण आधी, नंतर एससी असे क्रम असायला हवा होता; मात्र ही प्रक्रिया उलट पद्धतीने राबवण्यात आली या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, निवडणूक आयुक्त आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र जीआरमध्ये बदल शक्य नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेणे hाच शेवटचा पर्याय उरल्याचे रवी पाटील यांनी स्पष्ट केले. विशेष बाब म्हणजे, प्रभाग क्रमांक ५ (बिर्ला कॉलेज, खडकपाडा, वायलेनगर परिसर) हा रवी पाटील आणि त्यांचे पुत्र अनिरुद्ध पाटील (युवासेना उपशहरप्रमुख) यांचा पारंपरिक राजकीय प्रभाव असलेला प्रभाग मानला जातो. मात्र नव्या आरक्षणामुळे हा प्रभाग एससी, एसटी, ओबीसी (महिला) आणि जनरल (महिला) असा घोषित झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.रवी पाटील यांचा दावा आहे की, फक्त तीन प्रभागांचा प्रश्न असून, जर दुरुस्ती केली तर एका दिवसात प्रश्न सुटू शकतो. आठवडाभरात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने हा वाद अत्यंत निर्णायक ठरणार आहे.सध्या या याचिकेवर सोमवारी किंवा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 13, 2025 02:47:08
Bhandara, Maharashtra:बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आधारे नोकरी मिळविलेल्या महसूली कर्मचारी बडতर्फ तर दुसऱ्यावर विभागीय चौकशी सुरू. राज्यभर बोगस दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू. या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण मंत्रालयाने परिपत्रक काढून तीन महिन्याच्या तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर तपासणी सुरू झाली आहे. भंडारा जिल्ह्यात देखील तपासणी अंती खोटे प्रमाणपत्र आढळून आल्याने एका महसुली कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले तर दुसऱ्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. एकूण 23 कर्मचाऱ्यांची तपासणी झाली असून आणखी कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त व्हायला आहेत. यात आणखी किती बोगस दिव्यांग आढळुन येतात ते पाहण्यासारख असेल....
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 02:45:56
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बीडच्याव संतोष देशमुख हत्या कांड बाबत, सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी केला आहे. आपला या हत्याकांडाशी संबंध नसून गोवण्यात आल्याचा युक्तिवाद करीत कराडच्या वतीने खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, सरकारी वकिलांनी बाजू मांडताना वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे सांगितले. तर सुनावणीदरम्यान देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे तब्बल २३ व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवण्यात आले. ही दृश्ये पाहताच उपस्थित नागरिक, वकील आणि देशमुख यांचे कुटुंबीय भावूक झाले. पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय यांना अश्रू अनावर झाले व त्यांनी न्यायालयाबाहेर जाऊन स्वतःला सावरावे लागले. पुढील सुनावणी 16 डिसेंबर ला होणार आहे....
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 13, 2025 02:31:02
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील उगवा फाटा ते आगर रोड, डाबकी रोड रेल्वे गेट–अमानंतपुर मार्ग तसेच चिचखेडा नाला आणि मळखंड पुलाच्या कामांना मंजूरी मिळून तब्बल आठ महिने उलटले तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दहा ते पंधरा गावांची दैनंदिन वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. काम सुरू न होण्यामागे काही लोकप्रतिनिधींकडून अडथळे येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या प्रशासकीय निष्काळजीपणाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत तातडीने रस्ते काम सुरू करण्याची मागणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोमवारी वर्क ऑर्डर काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास सोमवारपासून रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 13, 2025 02:30:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:बॅग लिफ्टींग करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद,दोघांना अटक करत लाखांचा मुद्देमाल जप्त. आंध्रप्रदेशमधील बॅग लिफ्टींग करणार्‍या टोळीच्या प्रमुखासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरजेत सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 35 हजारचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.या टोळीकडून सांगली,कोल्हापूर,अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील आठ गुन्हे उघडकीस आले असून या टोळीवर महाराष्ट्रसह छत्तीसगढ,मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश या राज्यामध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.बँकांसमोर आणि बाजारपेठेतून पैशे घेऊन जाणाऱ्या बॅगा प्रामुखाने टोळीकडून लंपास करण्यात येत होत्या.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 02:16:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:यातच भाजप अध्यक्ष बाईट् आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या मुलीने महापालिका निवडणुकीत तिकीट मागितले. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची मुलगी धर्मिष्ठा चव्हाण आता महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे; छत्रपती संभाजी नगर मध्ये तीन प्रभागातून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. धर्मिष्ठा चव्हाण यांच्या संभाजीनगर मध्ये अर्जुन चव्हाण यांच्या सोबत लग्न झालेले आहे. भाजप नेतृत्व माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडणुकीत तिकीट दिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वडिलांनीही तळागळातून राजकारणाची सुरुवात करा असं सांगितलं आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीतून सुरुवात करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी आमच्या प्रतिनिधी विशाल करोळे यांना सांगितले. धर्मिष्ठा चव्हाण 121.दरम्यान कुणालाही नेत्याचा मुलगा मुलगी म्हणून तिकीट मिळणार नाही निवडून येण्याचं मेरीट आणि पक्षासाठी काम करण्याची वृत्ती या परिस्थितींत मिळेल असं भाजप शहर अध्यक्ष यांनी सांगितला आहे त्यामुळे चव्हाण यांनी आतापर्यंत संभाजी नगरात पक्षात काम केलेलं नाही तर त्यांना तिकीट मिळेल का याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top