Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात

Aug 26, 2024 17:30:55
Yavatmal, Maharashtra

यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Nov 28, 2025 04:47:15
75
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 28, 2025 04:34:47
Nashik, Maharashtra:गावठी कट्टा बाळगत दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताला अटक नाशिक शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोड, महाविद्यालय परिसरात गावठी कट्टा बाळगत दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताला अटक झालीये... निनावी फोन आल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने संशयिताचा माग काढत रामवाडी परिसरात ही कारवाई केली. रोहित कापकर असे या संशयिताचे नाव आहे. अंगझडतीमध्ये गावठी कट्टा, जिवंत काडतूस जप्त केले. गंगापूररोड, कॉलेज रोड परिसरात एक जण कमरेला गावठी कट्टा लावत दहशत निर्माण करत आहे, असा निनावी फोन पोलीस यांना आला. तो रामवाडी परिसरात राहणारा असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने त्याच्या घरी छापा मारला. त्याने पलायन केले पथकाने पाठलाग करत शीतळा देवी मंदिरासमोर त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतूस जप्त केले...
60
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 28, 2025 04:20:17
Beed, Maharashtra:बीड : न काही करता गप्प राहिल्यानंतर शिव्या बसतात, त्यामुळे आता परळीची बदनामी करणाऱ्यांना मतातून उत्तर द्या.. धनंजय मुंडेंची कॉर्नर सभेला हजेरी लावत केलं मुस्लिम मतदारांना भावनिक आवाहन आपला विजय ऐतिहासिक होणार आहे.. दुसरं कोणी विजयाच्या जवळ देखील नहीं.. जेवढे मतं नगरसेवकांना मिळतात तेवढेच मत नगराध्यक्षाला मिळाले पाहिजेत. मग जात पात धर्म परळीमध्ये चालत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायची गरज आहे. यासाठी मी तुमच्या पाया पडतो. आज पासून एक वर्ष विधानसभा निवडणूक झाल्यापासून ज्या पद्धतीने परळीला बदनाम करण्याचा डाव रचला. मी कुठेतरी म्हणालो आज के सफर मैने खामोश रहना पसंद किया है... क्योंकी की मैने बिना कुछ किये ही गालिया इतनी खाई है.. मला शिव्या दिल्या काही हरकत नाही पण माझ्या गावाला माझ्या शहराला या मातीला इथल्या मतदारांकडे बोट दाखवलं. याचे उत्तर असा देऊ की परळी परळीची माती परळीच्या माणسांकडे बोट दाखवायची कुणाची हिंमत होणार नाही. यासाठी हे मतदान आहे.. खासदाराचे काम आहे तुतारी वाजवण ते वाजवत आहेत. अशी टीका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 कॉर्नर सभेदरम्यान केली.
189
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 28, 2025 03:51:07
Latur, Maharashtra:लातूरमध्ये चैतन्य ई-टेक्नो स्कूल या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरुद्ध शिक्षण विभागाने दिलेल्या तक्रारीवरून शाळेच्या संचालक व मुख्याध्यापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून लातूर शहरात शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता ही शाळा अनधिकृत रित्या सुरू होती . अशी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही शाळा अनधिकृत असल्याचे निष्पन्न करून तिच्यावर टाळे ठोकण्याची कारवाई केली होती. मात्र, शाळा प्रशासनाने ते टाळे तोडून शाळा पुन्हा सुरू केल्याची माहिती उघड झाली त्यानंतर शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या शाळेविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
123
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 28, 2025 03:50:53
Yavatmal, Maharashtra:भलेही तुम्ही उपमुख्यमंत्री असाल, पण आमचा नेता गब्बर आहे, बॉस आहे त्यांच्या सही शिवाय तुमचंही भागत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतभेद करीत नाहीत असे सांगित असले तरी नगर विकासचा निधी अनेक पत्रव्यवहार करूनही त्यांनी दिला नाही असा घणाघाती आरोप यवतमाळच्या आर्णी केळापूर चे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी केला आहे. तोडसाम यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर देखील टीकास्त्र डागले, डी पी सी चा एक हजार कोटींचा निधी असतानाहीं त्याचे समसमान वाटप केल्या जात नसल्याचा आरोप तोडसाम यांनी केला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आतिश बोरेले यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. पांढरकवडा येथे दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली त्यावेळी त्यांनी नागरिकांना एमआयडीसी उभारण्यासह मोठा विकास निधी देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर आमदार राजु तोडसाम यांनी हे आरोप केले आहेत.
140
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 28, 2025 03:48:58
Nashik, Maharashtra:जिल्ह्यात एक डिसेंबरपासून एनए परवानगी ऑनलाइन-n/aN नाशिक जिल्ह्यातील एनए (नॉनअॅग्रिकल्चर) परवानगीप्रक्रियेत होणारे गैरव्यवहार थोपविण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 1 डिसेंबरपासून एनए परवानगीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबवली जाणार असून, यानंतर कोणतेही ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीतये. एनए मंजुरीप्रक्रियेत विलंब, दस्तऐवज पडताळणीसाठी वारंवार होणाऱ्या फेऱ्या आणि अर्थकारणाच्या तक्रारी यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होय. अर्जदारांची धावपळ कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी महसूल विभागाच्या बीएमएस प्रणालीद्वारे ही सेवा पूर्णतः डिजिटल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलीये.
159
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 28, 2025 03:45:58
Latur, Maharashtra:लातूरच्या एका नामांकित शाळेमध्ये गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन विद्यार्थिनींवरील छेडछाडचे प्रकार सुरू होते. शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील भाषा वापरून विनयभंग केला, तसेच तिच्या मैत्रिणीलाही अयोग्य वर्तनाचा त्रास दिला. मुलींनी हा प्रकार शाळेतील शिक्षिकांना सांगितला मात्र त्यांनी मदत केली नसल्याचा आरोप शाळेतील मुलींनी केला आहे. घटनेनंतर मुलींनी पालकांना माहिती दिल्यामुळे शाळेत पालकांची मोठी गर्दी झाली. पालकांनी संताप व्यक्त करत आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आणि शाळेबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून एका क्लर्कसह तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, संबंधित शिक्षकांला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..
223
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 28, 2025 03:33:43
Nashik, Maharashtra:महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमधील प्रचंड घोळामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवार त्रस्त झाले असून सुमारे साडेतीन हजारांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. अर्थात, हरकतींसाठी शासनाने मुदतवाढ दिल्याने महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला असून, घरोघर जाऊन पडताळणी करण्यास बीएलओंना दिलासा मिळालाय...महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी घोषित केली आहेत. त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी असून अनेक नावे वेगळ्याच प्रभागांत घुसवण्यात आली आहेत. अर्थात, ती राजकीय पक्षांच्या नेत्यांनीच घुसवली की यात निवडणूक शाखेतील गोंधळ झाला हे स्पष्ट झाले नसले तरी राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. विशेष म्हणजे त्यात महायुतीच्या पक्षांनीही आक्षेप घेतला आहे. महापालिकेकडे आत्तापर्यंत ३ हजार ६४४ हरकती दाखल झाल्या आहेत. चुकीचा पत्ता, नाव चुकलेले असणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. महापालिकेच्या बीएलओंना घरोघर जाऊन पडताळणी करावी लागणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले...
118
comment0
Report
Advertisement
Back to top