Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.

Aug 29, 2024 18:30:56
Yavatmal, Maharashtra

यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Dec 03, 2025 05:47:02
Satara, Maharashtra:सातारा जिल्हयातील दुष्काळी भागातील माण तालुक्यातील मलवडी गावाचे हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.दरवर्षी मोठ्या संख्येने श्री खंडोबाची यात्रा मलवडी गावामध्ये भरते खंडोबाची पालखी मंदिरातून बाहेर निघत असताना मंदिराच्या बाहेरील कमानीवरून मोठ्या प्रमाणात भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते. यानंतर रथोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सहपत्नी उपस्थिती लावली. या रथासमोर मानाच्या काठ्या नाचवण्याची परंपरा आहे... यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आपल्या खांद्यावर मानाची काठी नाचवीत यात्रेमध्ये ते सहभागी झाले.हा रथोत्सव पाहण्यासाठी भाविक जिल्हयातुन नव्हे तर बाहेर जिल्हयातुन यात्रेस हजेरी लावतात. ज्या ठिकाणी देवाची मुर्ती प्रकट झालेली आहे त्या जागेवर हेमाडपंथी मंदिर बांधण्यात आले आहे. श्री खंडोबाच्या हळदी मलवडी येथे, लग्न पाली येथे आणि वरात जेजुरी येथे काढण्यात येते अशी अख्यायिकाही सांगितली जाते. त्यामुळे मलवडीला खुप मोठे धार्मिक महत्व आहे. रथोत्सवाच्या दिवशी श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी या दोन्ही रथांची मलवडी गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 03, 2025 05:36:32
39
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 03, 2025 04:31:01
Chendhare, Alibag, Maharashtra:शिवसेना नेते विकास गोगावले यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल महाड पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांची तक्रार अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर खेचून पळवून नेले अशीही तक्रार मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी गेलो असता मारहाण केल्याची, गाड्या फोडल्याची तक्रार मंगळवारी महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या पुत्र विकास गोगावले यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादी कार्यकर्ते सुशांत जाबरे यांनी महाड तालुका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी गेलो असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडल्या, सोबतच्या व्यक्तींना मारहाण केली, अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर हिसकावुन घेतली आणि सोन्याची चेन, मोबाईल लंपास केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये जाबरे यांच्या सोबतच्या पाच जणांना गंभिर दुखापत झाल्याचे देखील तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालूसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालूसरे, वैभव मालूसरे, सुरज मालूसरे, सिद्धेश शेठ आणि इतर अनोळखी आठ ते दहा जणांविरोधाता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा हा गुन्हा महाड तालुका पोलिस ठाण्यात दाखल करून तपासा करिता महाड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणासही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
173
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 03, 2025 03:48:55
Latur, Maharashtra:लातूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर ४४० आक्षेप अर्ज प्राप्त.... लातूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांनी नोंदवलेल्या आक्षेपांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दोन डिसेंबर पर्यंत एकूण ४४० आक्षेप अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. प्राप्त झालेल्या सर्व आक्षेप अर्जाची छाननी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. प्रारूप मतदार यादीतील त्रुटी सुधारणे आणि अंतिम यादी अचूक बनवण्याच्या दृष्टीने हे आक्षेप अर्ज महत्त्वाचे ठरणार आहेत. आक्षेपांच्या छाननीनंतर स्थळ पाहणी होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे....
168
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 03, 2025 03:46:16
Washim, Maharashtra:वाशिम : रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील आडोळी परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सतीश इढोळे यांच्या शेतातील कोवळ्या गहू पिकावर रोही व हरणांनी रात्रीच्या वेळी हल्ला चढवून मोठा हाहाकार माजवला. परिणामी नव्याने उगवलेले गव्हाचे पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. गहूं पीक वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये हताशा पसरली आहे. परिसरात दररोज रात्री वन्यप्राण्यांची वर्दळ वाढत असून कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वन विभागाला तातडीने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना न झाल्यास हंगामाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
115
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 03, 2025 03:32:31
Washim, Maharashtra:ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या मनरेगा योजनेतील अनुदान वाढवूनही प्रत्यक्षात लाभार्थ्यांना निधी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. केंद्र सरकारने सिंचन विहिरीसाठीचे कमाल अनुदान चार लाखांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविले असले, तरी प्रत्यक्ष निधी वितरणात तब्बल एक ते दीड वर्षाचा विलंब होत असल्याचे चित्र आहे. या विलंबामुळे मनरेगा अंतर्गत हाती घेतलीली अनेक वैयक्तिक कामे विहिरींचे खोदकाम, शेततळे, बांधकामे अडकून पडली आहेत. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली असली, तरी अनुदान न मिळाल्याने त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडत आहे. अनुदान मिळण्यात होत असलेल्या या विलंबाबाबत शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने निधी वितरणाला गती द्यावी,अशी मागणी सातत्याने होत आहे.
164
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 03, 2025 03:31:56
243
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 03, 2025 03:31:01
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिम जिल्ह्यातील रिसोड,मंगरूळपीर,कारंजा नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायत येथे झालेल्या निवडणुकीत काल शांततेत मतदान पार पडले.जिल्ह्यात एकूण 65.47 टक्के मतदानाची नोंद झाली असून, चारही ठिकाणांपैकी सर्वाधिक मतदान रिसोड नगरपरिषदेत झाले.येथे तब्बल 71.22 टक्के मतदारांनी उत्साहाने हक्क बजावला.या निवडणुकीत ४ नगराध्यक्ष पदांसाठी एकूण २७ उमेदवार तर ९० नगरसेवक पदांसाठी तब्बल ३७४ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्रांवर ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीतरीत्या पार पडली.आता सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहेत. कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? विजयाचा गुलाल कोण उधळणार? याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागून राहिली आहे.
223
comment0
Report
Advertisement
Back to top