Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:19:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगरमध्ये लुटेरी दुल्हनचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात लग्नाच्या नावाने लुटणाऱ्या टोळीनंतर आता आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. कोरोना काळात पत्नीचे निधन झाल्याने दुसरे लग्न करू इच्छिणाऱ्या राजस्थान येथील एका सलून चालकाला शहरातील एका टोळीने बोलावले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून १ लाख ३० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर नवरी तिच्या मैत्रिणीसह मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून रात्रीच पळून गेल्याने फसवणूक झालेल्या तरुणाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, नवरी मात्र अजूनही फरार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 12, 2025 03:19:25
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करत एकूण पाच जणांना अटक केली. कारंजा शहरात राहणारा एक तरुण बनावट नोटा विक्रीचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती पोलिस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी इम्मी निनसुरवाले या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी घेतलेल्या चौकशीत त्याने ६९ बनावट ५०० रुपयांच्या नोटा बाळगल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पीसीआर मंजूर केली. पीसीआरदरम्यान केलेल्या चौकशीत इम्मीने आपल्या टोळीतील इतर सदस्यांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कारंजा पोलिसांनी तत्काळ पथके रवाना करून भिवंडीहून एक, मनमाडहून एक आणि नाशिकहून दोन अशा चार जणांना अटक केली. सर्व आरोपींना कारंजा पोलिस ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कारंजा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या रॅकेटमागील मूळ सूत्रधार आणि बनावट नोटांची उगमस्थाने शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. बाइट: दिनेश चंद्र शुक्ला, पोलिस निरीक्षक
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:19:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर येत असून, सरकारने संभाव्य कर्जमाफीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नुकतेच पत्र पाठवले आहे. बँकांनी अनेक्क्षर ए आणि बी ची माहिती तयार करून ठेवावी, असे या पत्रात नमूद केले आहे. सोबतच सुधारित नमुन्यातील माहिती तयार करून ठेवण्यात यावी व महाआयटीकडून पोर्टल कार्यान्वित झाल्यावर ती पोर्टलवर भरण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना पत्राद्वारे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या माहितीची जुळवाजुळव सुरू झाली असून, सरकारकडून मोठी घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 12, 2025 03:05:02
Nashik, Maharashtra:झी 24 तासने शिक्षण क्षेत्रातील केला होता मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सखोल तपासानंतर कारवाईला सुरुवात नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंकालक बी. बी. चव्हाण आणि नंदुरबारचे शिक्षणाधिकारी निलंबित. आतापर्यंत चार शिक्षणाधिकारी दोन उपसंचालक अटकेत शालार्थ क्रमांक / वैयक्तिक मान्यतांच्या घोटाळ्यात सहभाग चौकशीदरम्यान चौकशी पथकाला सहकार्य न केल्याचा आरोप. एका शाळेत बोगस शिक्षक भरती केल्यामुळे शासनाला आर्थिक नुकसान. संबंधित प्रकरणात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक व शिक्षण निरीक्षक यांच्यासह चव्हाण यांच्यावरही गुन्हा दाखल. गुन्हा मालेगाव पवारवाडी पोलीस ठाण्यात नोंद. या सर्व गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांना सेवेतून निलंबनाची कारवाई.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:04:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:तोतया आयएएस अधिकारी कल्पना भागवत , तोतया ओएसडी व प्रॉपर्टी एजंटच्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये पैसे दिलेल्या प्रमुख भागीदारांचा प्राथमिक जबाब देऊन पूर्ण झाला आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष चौकशी पूर्ण झाली असून अटकेतील तीन आरोपींची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. कल्पना भागवतच्या अटकेनंतर क्रमाने तिचा प्रियकर मोहम्मद अशरफ गिल, मित्र व केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई यांचेही चेहरे रॅकेटमध्ये समोर आल्याने ते थेट पोलिस कोठडीत गेले. मोठे पुरस्कार, बदल्या व व्हीआयपी पाहुणे आणण्याच्या नावाखाली लाखो रुपये गोळा करण्याच्या नावाखाताने कल्पनाचा साथीदार राहिलेल्या श्रीगोंद्याचा व्यावसायिक दत्तात्रय पांडुरंग शेटे यालाही ६ डिसेंबरला अटक झाली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:03:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिकमधील तपोवन वृक्ष तोड प्रकरण ताजे असतानाच ,आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रस्त्याच्या कामासाठी तब्बल 617 झाडांची कत्तल केली जाणार आहे. शहरातून नगर नाकामार्गे छावणी ते पडेगाव, मिटामिटा, शरणापूर-वंजारवाडी फाटामार्गे पुढे दौलताबाद टी-पॉईंटपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणातून चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेण्याचे निश्चित केले आहे. नववर्षात या कामाला सुरुवात होणार असल्याचे संकेत आहे. महापालिकेने त्या मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याची हद्द जुलै महिन्यात निश्चित केली होती. सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. ६९७ पैकी ८० वडाच्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येईल. उर्वरित ६१७ झाडे तोडण्यासाठी मनपाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 12, 2025 03:01:47
Washim, Maharashtra:११ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यवतमाळ हून शिर्डीकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला हा अपघात झाला.प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कारच्या पुढे धावत असलेल्या बोलेरो पिकअप वाहनचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी कार अनियंत्रित होऊन पिकअपला जोरदार धडकली. या अपघातात कारचालक तसेच विक्रम अशोकराव सौरगपते (वय ४०, रा. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला.तर अनुकूल मनोज यादव (वय ३५, रा. दत्त चौक, यवतमाळ) आणि मयूर दीपक डोनाडकर (वय २९, रा. दत्त चौक, यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 12, 2025 02:33:54
Nashik, Maharashtra:नाशिक मधील वृक्षतोडीचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात उभारण्यात येणार 4 नवे मलनिस्सारण केंद्र 4 केंद्र उभारणीसाठी अडथळा ठरणाऱ्या तब्बल 1 हजार 270 झाडांवर कुऱ्हाड, महापालिकेकडून अधिकृत स्पष्टीकरण पंचक मलनिस्सारण केंद्राकरीता 521, चेहडी मलनिस्सारण केंद्राकरीता 275. आगार टाकळी मलनिस्सारण केंद्राकरीता 154 व तपोवन मलनिस्सारण केंद्राकरीता 447 वृक्षांची कत्तल पालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या मागणीनूसार वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष प्राधिकरण समितीवर ठेवण्यात आला होता वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात नव्याने 17 हजार 680 वृक्षांची लागवड फाशीचा डोंगर परिसरात करण्यात आल्याचा महापालिकेचा दावा प्रस्ताव कधी सादर झाला ? पर्यावरण प्रेमींना विश्वासात का घेण्यात आले नाही ? आत्तापर्यंत किती झाडांवर कुऱ्हाड पडली ? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 12, 2025 02:33:17
Bhandara, Maharashtra:राजगुडा ग्रामपंचायत येथे दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप, अंगणवाडी केंद्रांना गॅस कनेक्शनचे वितरण, आणि महिला ग्राम संघांना बसण्यासाठी ग्रीन मॅटचे वितरण. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा गट ग्रामपंचायतीकडून मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियान अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप आणि अंगणवाडी केंद्रांना गॅस कनेक्शनचे वितरण आणि ग्राम संघांना बसण्यासाठी ग्रीन मॅटचे वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून 16 दिव्यांग बांधवांना हिवाळ्यातील संरक्षणासाठी ब्लँकेट आणि टोपीचे वाटप करण्यात आले. तर 15 व्या वित्त आयोगांतर्गत 5 अंगणवाडी केंद्रांना डब्बल सिलेंडर गॅस व डबल बर्नर गॅसस्टोव्हचे कनेक्शन देण्यात आले.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 12, 2025 02:32:43
Chendhare, Alibag, Maharashtra:पोलिस पाटलांच्या मानधनावर डल्ला ... कनिष्ठ लिपिकाने केला पावणेदोन कोटींचा अपहार ... एसपी ऑफिसमधील कनिष्ठ लिपीकाचा प्रताप ... राजेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल ... अपहारात राजेशच्या पत्नीचाही सहभाग समोर .... रायगड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिस पाटलांच्या मानधनात तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा अपहार झाल्याची बाब उघड झाली आहे. रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक राजेश जाधव याने हा प्रताप केलाय. या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कामावर हजर नसलेल्या पोलिस पाटलांची बनावट नावे यादीत घुसडून ती कोषागार कार्यालयातून मंजूर करून घेत असे आणि त्यांच्या मानधनाची रक्कम परस्पर हडप करत असे. हा प्रकार चार वर्षांपासून सुरू होता. या प्रकरणात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी रायगड जिल्हा परिषदेत देखील असाच मिळता जुळता प्रकार समोर आला होता. त्यात साडेचार कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला होता.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 12, 2025 02:02:07
Jalna, Maharashtra:जालना : पीकविम्याला कमी प्रतिसाद, केवळ 42 हजार शेतकऱ्यांनी उतरवला रब्बी पिकांचा पीकविमा,पीकपाणी, जनरल अँकर : राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा काढण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. मात्र, यंदा खरीप हंगामापासून ही सवलत बंद करण्यात आली. रब्बी हंगामाच्या पीकविम्यावरदेखील याचा परिणाम दिसून येत असून, आतापर्यंत फक्त 42 हजार 348 शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत विमा यंदाच्या भरण्याची मुदत आहे. खरीप हंगामात पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बीत उत्पादन चांगले राहील, अशी शक्यता असल्यानेच विमा उतरविण्याचे प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top