Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला

Oct 26, 2024 16:29:24
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 21, 2025 03:18:33
41
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 21, 2025 03:16:50
38
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 03:07:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्तीसगढ, दिल्लीच्या टोळ्यांसोबत हातमिळवणी करून शहरातील पाच उच्चशिक्षित तरुणांनी बोगस ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजीचे सेंटर उघडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुंभेफळ येथे किरायाने रो-हाऊस घेऊन चोवीस तास देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ४० खेळांसह कॅसिनो गेम्सद्वारे हा डिजिटल जुगार खेळवला जात होता. महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या या सेंटरचा स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड करत नऊ तरुणांना अटक केल्याचे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले. यातील सर्व आरोपी उच्चशिक्षित आहे, आरोपींमधील पचलोरे हा बीपीएड पदवीधर असून पोलिस अंमलदाराचा पुतण्या आहे. मानकर शहरातील नामांकित महाविद्यालयातून मेकॅनिकल अभियंता झाला असून, नवग्रह बीएसस्सी फिजिक्सचा विद्यार्थी आहे तर महाले छायाचित्रकार आहे. हे सर्व टक्केवारीवर काम करायचे. तर ताब्यात घेतलेल्या झारखंडच्या मुलांना २० ते ३० हजार रुपये पगार होता. शहादाब खान वकील खान हा या रॅकेटच्या सूत्रधारांसोबत थेट संपर्कात असल्याचेही पुढे आला आहे...
141
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 21, 2025 03:06:11
118
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 21, 2025 03:05:58
Pune, Maharashtra:Headline : लोणावळ्यात अजित पवार गट व शरद पवार गट नगरपरिषद निवडणुकीसाठी एकत्र लोणावळ्यात मध्यरात्री आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत केले जाहीर Anchor: लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एक मोठी आणि निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोणावळ्यातीत राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे.यामुळे लोणावळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी एकत्र येत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळ्यात मागील काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष दिसून आला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रितपणे भाजपविरोधात रणनीती आखत असून शरद पवार गटाने दिलेला बिनशर्त पाठिंबा हा केवळ एक राजकीय निर्णय नसून लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या पायाभरणीचा मोठा आधार ठरू शकतो. आमदार सुनील शेळके हे लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रमुख रणनीतिकार म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली आहे. या एकत्रित येण्याचा सरळ फायदा लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार असून یामुळे नगरपरिषद निवडणूक भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी अशी होणार आहे. लोणावळ्यातील ही नव्याने उभी झालेली राजकीय मैत्री ही निवडणुकीसाठी ‘गेंम-चेंजर’ ठरू शकते. बाईट : सुनील शेळके, आमदार मावळ (file no.03)
101
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 03:05:40
69
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 03:04:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राशन दुकानांवर गव्हासोबत यावेळी ज्वारीचा पुरवठा होणार आहे. गहू आणि तांदूळ रेशन दुकानांवर पोहचला आहे. परंतु तांदळाचा साठा निम्म्याच दुकानांवर आला आहे. परिणामी, लाभार्थ्यांना माल वाटप करण्यास उशीर होत आहे. ५ लाख ३८ हजार लाभार्थ्यांना १८०२ स्वस्त धान्य दुकानांतून धान्य वाटप होते. या महिन्यात शहरातील १९९ दुकानांना व ग्रामीण भागातील सोळाशे दुकानांना गहू, ज्वारीचा पुरवठा करण्यात आला आहे. प्रती लाभार्थी १ किलो गहू, १ किलो ज्वारी व ३ किलो तांदूळ देण्याचे प्रमाण आहे. दुकानदारांना प्रतिक्विंटल १७० रुपयेप्रमाणे दिला जाणारा मार्जीन मनी पुरवठा प्राप्त झाला आहे.
117
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 21, 2025 02:49:10
Latur, Maharashtra:लोंगूर लातूर ब्रेकिंग न्यूज... स्क्रिनप्लेक्स ::- विलासरावांच्या काळातही निलंग्यावर अन्याय झाला . निलंगेकरांचा स्फोटक आरोप... अमित देशमुख पालकमंत्री असतानाही निलंग्यावर अन्याय झाला .... आरोप–प्रत्यारोपांचा धडाका! निलंगा नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकारण पेटलं!...आरोप तपशिलांसह खोडून काढू – निलंगेकरांच्या टीकेवर अमित देशमुखांची प्रतिक्रिया!.... AC::- विलासराव देशमुख यांच्या काळातही निलंग्यावर अन्याय झाला… आणि पालकमंत्री असताना अमित देशमुख यांनीही निलंग्यावर अन्यायच केला… असा थेट आणि तीव्र आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. अमित देशमुख पालकमंत्री झाले तेव्हा त्याने टोपलंभर खडी सुद्धा निलंगा मध्ये टाकली नाही असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अमित देशमुख यांनी मात्र योग्य तपशिलांसह हे सर्व आरोप आम्ही खोडून काढू असे म्हणत त्यांनी पुढील भाष्य टाळलं आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदेचे बिगुल वाजताच आरोप–प्रत्यारोपांचा धडाका सुरू झाला असून आगामी निवडणुकीचा रंग आता अधिकच चढताना दिसत आहे. बाईट ::- संभाजी पाटील निलঙ্গেकर आमदार भाजपा बाईट ::- अमित देशमुख आमदार काँग्रेस
162
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 21, 2025 02:47:11
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. परिसरात बिबटे आणि मोकाट कुत्र्यांचा वाढलेला वावर पाहता गावात प्राणीहल्ल्यांच्या घटना सतत घडत असल्यामुळे जखमींना तात्काळ लस देणे आवश्यक असते. मात्र, आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने जखमींना निफाड किंवा लासलगाव येथील रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे लसीअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने पर्याप्त प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली
173
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 21, 2025 02:46:57
177
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 02:46:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील हवामानातील बदलांमुळे नागरिकांना जाणवणारी थंडी अधिक तीव्रतेने अनुभवता येत आहे. गुरुवारी किमान तापमान ११.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले. बुधवारपेक्षा गुरुवारी किमान तापमान किंचित वाढले असले तरी थंड वाऱ्यांमुळे वातावरणातील गारठा कमी झालेला नाही. वाऱ्याचा वेग आणि हवेतील आर्द्रता यासारख्या घटकांमुळे प्रत्यक्ष मोजलेल्या तापमानापेक्षा अधिक थंडी जाणवते आहे.. दरम्यान बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे वातावरणातील बदलांना गती मिळाली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. हे वादळ २७ ते २८ नोव्हेंबर रोजी किनारपट्टीला धडकेपर्यंत पुढील पाच ते सहा दिवस थंडी गायब राहणार आहे. त्यानंतर मात्र थंडी पुन्हा जोर धरेल असे तज्ञा सांगताय...
148
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 21, 2025 02:35:11
Satara, Maharashtra:सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे प्रथमच मनोमिलनातून भाजप पक्षाच्या चिन्हावर एकत्र येऊन निवडणूक लढवीत आहेत... साताऱ्यात आज दोघांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजप पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष उमेदवारीसाठी निश्चित झालेले अमोल मोहिते यांचा सन्मान दोन्ही राजेंनी केला.. यावेळी मंत्री शिवेंद्र राजे यांनी भाजपने सातारा नगरपालिकेमध्ये सर्व जागांवर आपले उमेदवार दिले असल्याचे स्पष्ट करत मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना देखील सातारा नगरपालिकेमध्ये एक जागा दिली असल्याचं यावेळी सांगितलं.... यावेळी त्यांनी आम्हाला खात्री आहे. भाजपच्या विचाराचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष सातारा नगरपालिकेत निवडून येतील. असा विश्वास देखील व्यक्त केला आहे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आणि भाजप पक्षातील ताकतीवर ही निवडणूक आम्ही नक्कीच जिंकू... माघार घेण्याचा उद्या दिवस असला तरी शंभर टक्के उद्या चित्र स्पष्ट होईल. अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे
63
comment0
Report
Advertisement
Back to top