Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ में दत्त जयंती पर पालखी शोभायात्रा ने भक्तों में धूम मचाई

SRSHRIKANT RAUT
Dec 04, 2025 09:37:06
Yavatmal, Maharashtra
यवतमाळात दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रातून स्वामींची भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या संख्येने सेवेकरी यात्रेत सहभागी झाले. श्री दत्त व स्वामींची आकर्षक मूर्ती असलेल्या पालख्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या. दत्त जयंतीनिमित्त केंद्रात अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहा दरम्यान ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी, मंडल स्थापना, अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, बली पूर्णाहुती, श्री दत्त जन्मोत्सव, श्री सत्यदत्त पूजन व देवता विसर्जन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गावरून उत्साहात व भक्तिमय वातावरणात पालखी शोभायात्रा काढण्यात आली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 10:46:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:साई इन्स्टिट्यूट कॉलेज ची पोलखोल आता विद्यापीठाने केलीय, मूलभूत पायाभूत सुविधा नसलेले हे कॉलेज आहे याबाबत अहवाल सादर करण्यात आलाय, त्यामुळं त्यांची संलग्नता घेतली नसल्याचं खुलासा विद्यापीठाने केला... विद्यापीठाला संलग्न नाही याबाबत पत्र नाही त्यामुळं विद्यापीठचा याबाबत संबंध नाही , हो सगळी चूक कॉलेज ची आहे असं विद्यापीठ सांगताय. याबाबत एक अहवाल बनवण्यात आला होता त्या अहवालात सगळ्या त्रुटी नमूद केल्यास विद्यापीठांना सांगितलं.. काय आहे अहवालात या कॉलेज ची संलग्निकरण नाकारण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे. १) प्रस्तूत महाविद्यालयास मान्यता प्राप्त प्राचार्य उपलब्ध नाही. परंतू MBA या विषया करीता मान्यता प्राप्त शिक्षक व प्राचार्य यांची नेमणूक अद्याप केलेली नाही. २) प्रस्तूत महाविद्यालयात MCA अभ्यासक्रमा करीता लागणाऱ्या संगणकांची संख्या उपलब्धता नाही. ३) प्रस्तूत महाविद्यालयाने MCA विषयाकरीता पुस्तके प्रत्यक्षात खरेदी केलेली दिसून येत नाही. ४) प्रस्तूत महाविद्यालयाने संस्था व कुलसचिव यांच्या संयुक्त नावे असलेली मुदत ठेवी बाबत कार्यवाही केलेली नाही. अ.क्र ५० अन्वये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतन करीता १० लक्ष रुपयांची तरतूद केलेले प्रमाणपत्र उपलब्ध नाही. ५) प्रस्तूत महाविद्यालयास मागील १५ वर्षा पासून MBA हा अभ्यासक्रम चालू असून अद्यापर्यत NAAC महाविद्यालयाने केलेली नाही. ६) महाविद्यालय दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा उपलब्ध नाही. ७) अधिष्ठाता मंडळ बैठक दिनांक २४-११-२०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये तज्ञ समितीच्या अहवालानुसार सदर महाविद्यालयास प्रथम संलग्निकरण देण्यात येऊ नये असे ठरले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 04, 2025 10:18:53
143
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 10:12:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कॉलेजाच्या गलथान कारभारामुळे 133 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागलेय हा प्रकार संभाजीनगर मधील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये घडला आहे. हे विद्यार्थी कालपासून कॉलेजमध्ये हॉल तिकीट आणायला जाताय, मात्र त्यांना कोणीही दाद न दिल्याने अखेर या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनची पायरी गाठली आहे. कॉलेज ची घोडचूक, 133 विद्यार्थी परीक्षेला मुकले; न्याय मागण्यासाठी विद्यार्थी पोलीस ठाण्यात. कॉलेज संचालक मात्र बेपत्ता. रडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शॉट्स पासून सुरुवात करा. एमसीएच्या प्रथम वर्षात शिकणारे हे सर्व विद्यार्थी आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला मुकले आहेत; यात चूक विद्यार्थ्यांची नाही तर ज्य कॉलेजचा ते शिकत होते त्या कॉलेजची आहे; त्यांच्या कॉलेजने विद्यार्थ्याकडून पैसे घेतले परंतु विद्यापीठात ते भरलेच नाही. अखेर विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर झी मीडियाची टीम साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये गेली परंतु कार्यालय व वर्गखोल्या रिकाम्या होते. कॉलेजचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांना फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते वेळ मारून नेली. विद्यापीठाच्या या कॉलेजला सलग्नता नव्हती त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न होणार असल्याचे सांगितले, परंतु प्रवेश झाले पैसेही घेतले; विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिली नाहीत; त्यामुळे फसवणुकीचा प्रश्न उभा राहतो. पुढील तपास विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर.
166
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 04, 2025 10:06:13
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव जवळील मुळानदीच्या पुलाखाली चार ते पाच महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.. चिमुकल्याची ओळख पटवून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि मृतदेह पुलाखाली कसा आला याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.. आज सकाळी घारगाव नजीक असणाऱ्या मुळानदीकडे गेलेल्या काही लोकांना पुलाखाली चिमुकल्याचा मृतदेह आढळून आलाय.. संबंधितांनी पोलिसांना माहिती देताच घारगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असला तरी या चिमुकल्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.. हा चिमुकला नेमका कोण? त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? आणि मृतदेह पुलाखाली कसा आला? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.. कुणाला याबाबत काही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन घारगाव पोलिसांनी केले आहे..
84
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 04, 2025 09:48:47
Kalyan, Maharashtra:श्रमजीवी संघटनेची केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचे बेमुदत आंदोलन सुरु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सफाई कामगार व वाहन चालक कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध श्रमजीवी रयत कामगार संघटनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर धडक देत कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काम करणारे सफाई कामगार हा कल्याण शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आपले कर्तव्य बजावतात, परंतु कामगारांना कामगार हक्क कायदे Prosper? मसल? (सूचना खाली) सवलत मिळत नाही, कामगारांना कामांच्या ठिकाणी महानगरपालिका व सुख सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. किमान वेतन कायद्याप्रमाणे कामगारांना वेतन मिळत नाही, कामावर सुट्टी नाही, ओवर टाइम कामाचा मोबदला नाही, पगारात तफावत आढळतात. या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर धडक देत बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे
125
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 09:47:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर दादा भुसे पीसी टीईटी हा विषय सुप्रीम कोर्टातून आलाय,  2010 पूर्वीचे शिक्षक बाबत येणाऱ्या काळात कसे मार्गक्रमण करता येईल याबाबत शासन निर्णय घेईल, या आधी ही शिक्षक सोबत  बैठक झाल्या आहेत,देशपातळीवर चा हा टीईटी निर्णय आहे इतर राज्य काय भूमिका घेताय यावर आपले लक्ष आहे... विधी व न्याय विभाग संवाद सुरू आहे , मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरुय शिक्षकांना विनंती आवाहन आहे आम्ही याबाबत गंभीर आहोत सकारात्मक निर्णय करू,  आपण आंदोलन उद्या करू नये,  शासन सकारात्मक आहे, मग असे असताना आंदोलन कशाला आम्ही संवाद साधू शकतो ओन कोल्हापूर शिक्षक घोटाळा कोल्हापूर मधे जे काही प्रयत्न केला जात होता त्यात चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे. - एस आय टी मार्फत अपेक्षित असलेला डाटा कलेक्ट केलेला आहे. आणखीन तीन महिन्याची मुदतवाढ या एस आय टी दिले आहे. - प्राथमिक पातळीवर चुकीचं काम केले जात होते तेथेच कारवाई करण्यात आली आहे. ऑन त्रिभाषा अहवाल. पाठीमागच्या काळात त्रिभाषा संदर्भात विचार झाला. समिती नेमण्यात आले आहे. ते वेगवेगळ्या विभागाशी संवाद साधून चर्च करीत आहेत. त्याचा अहवाल येईल. समितीला जे अपेक्षित आहेत तसे कार्य करीत आहेत. समितीचा अधिकारी आहे. - कुठलीही शाळा बंद होणार नाही, पटसंख्या काही वाढेल याचे नियोजन सुरू आहे. ऑन बदली. - ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जी प शिक्षकाच्या बदल्या होतात, कुणाच्या चुकीच्या पद्धतीने बदली होत असेल, तसे आढळले तर कारवाई केली जाईल. ऑन ठाणे जिल्हाप्रमुख आरोप. - या संदर्भात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापातळीवर बैठक संपन्न झाली आहे. ही युती नैसर्गिक युती आहे. दोन्हीही एकमेकाचे कार्यकर्ते घेणार नाही, दोन्ही पक्ष अंमलबजावणी करतील. - एकमेकांचे कार्यकर्ते घेण्याच्या अशा घटना होत असतील तर वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊ - एकनाथ शिंदे यांचे आम्हाला स्पष्ट आदेश आहेत.की युतीच्या माध्यमातून निवडणुकीत सामोरे जायचे आहे. - महायुतीच्या पक्ष एकमेकांसमोर पण निवडणुका झाल्या आहेत हे देखील मान्य करेल... ऑन सपकाळ आरोप - ज्या निवडणूक झालेल्या बघितल्या.. आता जे बोलायला लागले त्यातील एकही निवडणुकीत नव्हता... पराभव होणार हे माहिती होते, म्हणून प्रचाराला विरोधक फिरकले नाही.
86
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 04, 2025 09:34:43
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग – सोलापुरात प्रेम प्रकरणातून तृतीय पंथीयाची गळफास घेत आत्महत्या. सोलापुरातून धक्कादायक घटना समोर. प्रेम प्रकरणातून सोलापुरातील एका तृतीयपंथीय व्यक्तीने गळफास घेत केली आत्महत्या. प्रकाश कोळी असे आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीय व्यक्तीचे नाव. सुजीत जमादार नामक प्रियकर तृतीयपंथीय व्यक्तीला फसवून दुसऱ्या सोबत लग्न करत असल्याने घडली घटना. प्रकाश कोळी यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत मांडली व्यथा. सदर घटनेने सोलापुरात एकच खळबळ माजली असून शासकीय रुग्णालय परिसरात तृतीय पंथी यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
88
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 04, 2025 09:34:15
Nanded, Maharashtra:मतदार यादीत घोळ असल्याचे नवनवीन प्रकार दररोज समोर येत आहेत. नांदेडमध्ये तर तब्बल 2800 मतदार ओळखपत्राचा पत्ता खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेड महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार प्रारूप यादी जाहीर झालीये. या यादीत मध्ये धक्कादायक प्रकार आढळून आलाय. एक दोन नव्हे तर तब्बल 2800 मतदार ओळखपत्राचा पत्ता हा खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा आहे. नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक पाच ची प्रारूप मतदार यादी पाहताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार दिसून आला. जवळपास एक हजार विद्यार्थ्यांच्या मतदार ओळखपत्रावर IIB कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे. तर जवळपास सहाशे ओळखपत्रावर RCC कोचिंग क्लासेस चा पत्ता आहे. तर चारशे मतदार ओळख पत्रावर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे. असे एकूण 2800 मतदार ओळखपत्रावर कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता आहे. मतदार नोंदणी वाढवण्यासाठी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अश्याप्रकारे नोंदणी करण्यात आली. शेकडो ओळख पत्रात पत्ता, घर क्रमांक नाही. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील असताना त्यांचा पत्ता हा इथला नसताना त्यांना मतदार ओळखपत्र कसे देण्यात आले असा सवाल मनसेने उपस्थित केलाय. याबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिलीये. जुना नांदेड शहरातील मतदार यादीतही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. जुना नांदेडमध्ये सराफ बाजारात पश्चिम बंगाल चे कारागीर आहेत. हे कारागीर इथले रहिवाशी नसताना जवळपास आठशे कारागीरांना इथले मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. जवळपास बाराशे दुबार मतदार आहेत. तर शोकडो मतदार ओळखपत्रावर पत्ताच नाही. याबाबत शिवसेना शिंदे गटाने तक्रार देऊन ही यादी दुरुस्त करण्याची मागणी केलीये. मतदार याद्यामध्ये अनेक चुका, गंभीर त्रुटी आढळत आहेत. मतदार नोंदणी वाढवण्यासाठी हा हे झाले असेल तरी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता असलेले हे विद्यार्थी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आणि इतर जिल्ह्यातूनही आलेले आहेत. त्यांनी महापालिकेसाठी मतदान केले तर याचा परिणाम निवडणूकवर होणार नाहीका हा प्रश्न आहे. शिवाय पश्चिम बंगाल मधील कारागीर इथले मतदार कसे होऊ शकतात हा देखील प्रश्न आहे. विरोधी आणि सत्ताधारीही हा प्रकार समोर आणताहेत. त्यामुळे निवडणूक आयोग या मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी काय कार्यवाही करते हे पाहावे लागणार आहे.
155
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 04, 2025 09:23:39
108
comment0
Report
Advertisement
Back to top