Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात

Aug 21, 2024 07:23:15
Yavatmal, Maharashtra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Dec 13, 2025 04:53:46
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ऊस कारखान्यांच्या विरोधात सुरू असलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आले यश - जनहित शेतकरी संघटनेने पुणे साखर आयुक्तालयात समोर केलेल्या आंदोलनाला यश - सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाचा दर जाहीर न करणे, ऊसाला साडेतीन हजार रुपये दर देण्याची मागणी, गेल्या वर्षी साखर कारखान्यांनी थकीत बिलावर 15 टक्के व्याज देण्याची मागणी करण्यात आली होती - जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख दोन दिवसापासून पुणे साखर आयुक्तालयासमोर करत होते आंदोलन - साखर आयुक्तांनी जनहित शेतकरी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाला दिले आदेश - जिल्ह्यातील कारखानदाराने साडेतीन हजार रुपये उसाचा दर जाहीर करावा अन्यथा कारखाने बंद पाडण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटने कडून देण्यात आला..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 13, 2025 04:53:31
Amravati, Maharashtra:उद्धव ठाकरे यांच्या विधानावर नवनीत राणा यांची जोरदार टीका; तुम क्या थे और क्या हो गये राणा यांचा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना “तुम क्या थे, तुम क्या हो गये” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राणा म्हणाल्या उद्धव ठाकरे जी तुम्ही फडणवीसजींना काय बोलता त्यापेक्षा आधी स्वतःला हा प्रश्न विचारा तुम क्या थे और क्या हो गये? असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. हिंदूंच्या बाजूने जेव्हा न्यायालय महत्त्वाचा निर्णय देते, जसे मदुराई येथील सुब्रमण्यम स्वामी मंदिरात दिवा लावण्याबाबत न्यायमूर्तींनी दिलेला निर्णय तेव्हा विरोधी पक्षातील नेते त्या न्यायमूर्तींच्या विरोधात जाऊन सह्या करतात. हेच तुमचे खासदार विरोधी पक्षात बसून हिंदूविरोधी भूमिकेचा भाग बनतात आणि त्या पत्रावर सही करतात. त्यामुळे उद्धव ठाकरे जी दुसऱ्यांवर टोमणे मारण्यापूर्वी स्वतःच्या पक्षातील लोकांचे कृत्य पाहा. देशातील हिंदूंच्या भावनांविरोधात जाणाऱ्या भूमिकेचे उत्तर तुम्हालाही द्यावे लागेल अशा शब्दांत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बाईट :– नवनीत राणा, माजी खासदार
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 13, 2025 04:46:30
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज भाजप नेते अशोक चव्हाण यांनी घेतले अंत्यदर्शन...शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले....अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली भावना... भाजप नेते खा. अशोक चव्हाण यांनी आज सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले... शिवराज पाटील चाकूरकर यांनी केंद्रात वेगवेगळी पदे भूषवली....राज्यासाठी आणि मराठवाड्यासाठी खूप मोठे काम त्यांनी केले...देशाच्या राजकारणात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले....त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले..अशी भावना खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 04:30:26
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश चाचणी परीक्षा आज ही परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.30 या वेळेत जिल्ह्यातील एकूण३२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात जाणार आहे. वाशिम शहरात आठ परीक्षा केंद्रे असून उर्वरित केंद्रे जिल्ह्यातील विविध तालुका व शहरांमध्ये आहेत.परीक्षा सुरळीत व पारदर्शक पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात ओळखपत्रा शिवाय प्रवेश तसेच मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साधनांवर बंदी घालण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या असून कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 04:18:00
Washim, Maharashtra:वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षशिस्त मोडणाऱ्या बंडखोरांवर कठोर कारवाई केली आहे. अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी दाखल केल्याने १६ बंडखोरांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपच्या जिल्हा कोरकमिटीच्या बैठकीनंतर जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम चितलांगे यांनी हा निर्णय घेतला आहे. या कारवाईत जिल्हा, शहर तसेच महिला मोर्चा, युवा मोर्चा व उत्तर आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. भविष्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे. करून काळे, छाया पवार, प्रभाकर काळे, वैभव उलेमाले, राजेश विश्वकर्मा, आशा खटके, गजानन ठेंगडे, धनंजय हेंद्रे, संगिता पिंजरकर, मदन राठी, मुकेश चौधरी, अनंत रंगभाळ, सावंतसिंग ठाकूर, सचिन पेंढारकर, अनिता इंगोले आणि गजू लांडगे यांना निलंबित करण्यात आलं आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 13, 2025 04:17:24
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 13, 2025 04:07:15
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनचा ठाणेदार नरेश रणधीर याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी वेषांतर करून ही कारवाई यशस्वी केली आहे. तक्रारदाराने मित्राला उसने दिलेले दहा लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी नरेश रणधीरने पाच लाख रुपये लाच मागितली होती. तडजोडीत तीन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील १ लाख रुपये स्वीकारत असताना महिला अधिकारी वेषांतर करून लहान मुलाला कडेवर घेऊन ठाणेदाराच्या कक्षात पोहोचली आणि लाच घेणाऱ्या ठाणेदार रणधीरला रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 04:04:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हरसूल चेतनानगर येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या बहुमजली टॉवरांना महानगरपालिकेने खास नावे दिली आहेत. अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली १४५ अतिक्रमणे यशस्वीपणे हटवून प्रकल्प जागा मोकळी केली. झोन ४ चे सहायक आयुक्त अशोक गिरी व अतिक्रमण विभागाचे नागरी मित्र पथकातील संजय पवार यांच्या समन्वयाने ही कारवाई झाली. यामुळे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पाहणी करून त्यांच्या धाडसाचे कौतुक करत या तीन इमारतींना या 3 अधिकाऱ्यांची नाव दिली आहेत, संतोष, अशोक आणि संजय अशी नाव इमारतीला देण्याचे ठरले आहे... मात्र महापुरुषांची नाव सोडून  अधिकाऱ्यांची नावे इमारतीना का  असा सवाल उपस्थित करत आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 04:01:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात मनपा निवडणुकीतील अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शिंदेसेनेत नाराजीनाट्य उफाळून आले. त्याची सुरुवात पक्षाची पहिली शाखा स्थापन झालेल्या गुलमंडी प्रभागापासून झाली. आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे पुत्र बंडी याच प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघातून विजयासाठी उद्धवसेनेची उमेदवारी तनवाणी यांनी नाकारली. त्याची परतफेड आता व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, जैस्वाल यांचे पुत्र रिंगणातून मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पक्षाच्या समन्वय समितीमध्ये समावेश असूनही माजी आमदार तनवाणी अर्ज वाटपाकडे दिवसभरात फिरकलेही नाहीत. त्‍याचबरोबर राजेंद्र जंजाळ यांना पक्षात पुन्हा मान मिळाल्यामुळे माजी महापौर त्र्यंबक तुपे गायब असल्याची चर्चा शिवसेना कार्यालयात होती. शिवसेनेने प्रथमच इच्छुकांसाठी छापील अर्जाचे वाटप केले. पहिल्या दिवशी ५३६ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. शनिवारीही अर्जाचे वितरण सुरू असेल.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 04:01:31
Washim, Maharashtra:अँकर: वाशीम जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत ३ हजार ९०० मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. साठा दाखल होताच शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी खत दुकानांवर मोठी गर्दी केली होती. अशातच मालेगाव तालुक्यात युरिया वितरणात गैरप्रकार करणाऱ्या दोन खत दुकानदारांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. वैभव कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांच्या नावावर १७१ बॅग युरियाची बनावट बिले तयार केल्याचे, तर सरस्वती कृषी सेवा केंद्रात ६५ बॅग युरिया बिलाविनाच विक्री केल्याचे आढळून आले. दोन्ही दुकाने बंद करून विक्रेते पसार झाल्याचेही निदर्शनास आले. माहिती मिळताच कृषी विभागाच्या अधिकारीांनी तातडीने कारवाई करत गोदाम उघडून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष युरिया वितरित केला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top