Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Dec 08, 2025 03:50:27
Beed, Maharashtra:बीड ते वडवणी रेल्वे लोहमार्गावर पहिली इंजन चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचणी केली जाणार आहे. पहिल्यांदाच या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावला आहे. बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर रेल्वे धावल्यानंतर आता बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. बीड पासून वडवणी हे 30 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून रेल्वे विभागाकडून या मार्गावर चाचण्या केल्या जात आहेत. या मार्गावर कालच रेल्वे इंजिन चाचणी केली जाणार होती मात्र काही तांत्रिक बाबीमुळे इंजिन चाचणी होऊ शकली नाही. मात्र आज या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावले..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 08, 2025 03:49:50
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम–हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटजवळ सुरू असलेले लोअर हाइट सबवेचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही सबवेचे काम अचानक थांबवण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.सुरकंडी, मोहगव्हाण, देवाळा, उकळी पेन आणि फाळेगाव या गावांतील नागरिकांना दररोज मोठा फेरा मारावा लागत आहे.त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून वाहतुकीतही सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. सबवेचे काम पुन्हा कधी सुरू होणार याबाबत कोणती ही अधिकृत माहिती न मिळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
77
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 08, 2025 03:48:33
Nagpur, Maharashtra:नागपूर *गुप्तचर यंत्रणेचा हायल्टर, सूत्रांची माहिती* - ऑपरेशन सिंदूर’नंतर जेम (Jaish-e-Mohammad) कडून घातपाताचा धोका वाढल्याचा गुप्तचर यंत्रणांचा इशारा, नागपूर उपराजधानी हायअलर्टपर. - हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर महालमधील RSS मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिभवन, धार्मिक ठिकाणे गर्दीच्या जागांवर उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणेची करडी नजर, - विधानभवन परिसरात कडक बंदोबस्त, मुख्य स्थळांची बॉम्बशोधक नाशक पथकांकडून सखोल तपासणी. - सीसीटीव्ही, कठडे आणि AI-आधारित नजर ठेवणीद्वारे संवेदनशील परिसराची सतत मॉनिटरिंग. - साध्या वेशातील पोलिसांची असणारा करडी नजर, हॉटेल–लॉजची तपासणी वाढवली. - हिवाळी अधिवेशनासाठी फोर्स वन तुकड्या नागपूरात तैनात, राज्यातील विविध जिल्ह्यांतील अतिरिक्त 3 हजारावर पोलिस अधिकारीकर्मचारी दाखल. - SRPF च्या ५ तुकड्या, होमगार्डसह एकूण 10 हजार वर पोलिसांची उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर तैनाती.
35
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 08, 2025 03:17:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:कोल्हापुरच्या कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याविरुद्ध जतमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जत पोलिस ठाण्यात लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. जत तालुक्यातील बिळूर येथे 9 ऑक्टोबर रोजी एका प्रवचनात कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजाकडून लिंगायत समाजाच्या भावना दुखवणारे भाषण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील पोलीस ठाण्यात शंकरगौड शिवनगौड बिरादार यांनी तक्रार दाखल केली होती, त्यानुसार जत पोलीस ठाण्यात कणेर मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महारज यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
228
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 08, 2025 03:17:13
156
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 08, 2025 03:16:58
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात थंडी वाढली... तापमान चार दिवशी १२ अंशांवर... मागील वर्षी थंडीने फारसे दर्शन दिले नव्हते. मात्र यंदाच्या हिवाळ्यात लातूर जिल्ह्यात थंडीने हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसांपासून पहाटे तापमान तब्बल १३ अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहेत. तर अनेक जण पहाटेच्या वेळी व्यायामावर लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. काही दिवस गायब झालेली थंडी हि गेल्या चार दिवसांपासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. यामुळे लातूरकर चांगलेच गारठले आहेत. दिवसभरही वातावरण थंड राहत आहे. त्यामुळे थंडीमुळे नागरिक बेजार होताना दिसत आहेत...
100
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 02:50:36
Pune, Maharashtra:सगर उत्सव अँकर अहिल्यानगर येथे अनिल भैय्या राठोड विचार मंचच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या उत्सवात गवळी समाज आपल्या म्हशीना रंगरंगोटी करून सहभागी करतात एक प्रकारे म्हशीचं प्रदर्शन या उत्सवाच्या माध्यमातून भरवला जात. नगर शहरासह शेजारी जिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या भागातील गवळी बांधवांनी आपल्या म्हशीसह मोठ्या संख्येने या उत्सवात सहभाग नोंदवला. माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांनी हा उत्सव सुरू केला असून त्यांच्या पित्यार्न त्यांचा मुलगा विक्रम राठोड हा या उत्सवाचे आयोजन करतो चंपाषष्ठीच्या पूर्वसंध्येला हा उत्सव साजरा करण्यात येतो या उत्सवात यावर्षी मोठ्या प्रमाणात गवळी बांधव आपल्या म्हशीसह सहभागी झाले होते
158
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 08, 2025 02:49:54
Nashik, Maharashtra:शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे रब्बी हंगाम पीक स्पर्धा २०२५-२६ जाहीर झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेण्यात येणार असून अर्जाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर ठरवण्यात आली आहे. स्पर्धेत सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे तालुका स्तरावर ५,०००, ३,००० व २,००० रुपये; जिल्हा स्तरावर १०,०००, ७,००० व ५,००० रुपये; तर राज्य स्तरावर ५०,०००, ४०,००० व ३०,००० रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. सहभागी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे, किमान ४० आर क्षेत्रात सलग लागवड असणे आणि ७/१२, ८-अ उतारा, नकाशा, बँक दस्तऐवज व प्रवेश शुल्क चलन जोडणे आवश्यक आहे. इच्छुकांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
231
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 08, 2025 02:49:38
Chendhare, Alibag, Maharashtra:आतापर्यंत केवळ चार हजार शेतकऱ्यांची नोंदणी ......... रायगडात शेतकरयांचा अल्‍प प्रतिसाद ...... भातातील आर्द्रतेमुळे शेतकरी नाराज .........आजपासून प्रत्‍यक्ष भातखरेदी सुरू होणार ........ अँकर – बरयाच दिवसांच्‍या प्रतिक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी ४६ केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणीला शेतकरयांकडून अल्प प्रतिसाद मिळतो आहे. भातातील जास्त आर्द्रतेमुळे शेतकरी नाराज असून, त्याचा खरेदीवर प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ चार हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, आजपासून प्रत्यक्ष भातखरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे.
107
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 02:45:19
Pune, Maharashtra:अहिल्यानगर शहराजवळ केडगाव परिसरात नगर - पुणे महामार्गावर शिवाई बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास झाला आहे या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी ड्रायव्हर च्या दोन्ही पायांवर मोठी इजा झाली असून पाच ते सहा प्रवासी देखील जखमी झाले आहेत. पुण्याहून छ. संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस कंटेनरवर आदळली...कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी जोरदार होती की, यात शिवाई बस चालकाच्या पायाचा अक्षरशः चुराडा झाला आहे, बसमधील इतर ५ ते ६ प्रवासी देखील जखमी झाले आहेत. २ गंभीर जखमींवर शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला. सुदैवाने या भीषण अपघातात अद्याप पर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
131
comment0
Report
Advertisement
Back to top