Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 17, 2025 03:16:26
Nashik, Maharashtra:गेल्या आठवड्याभरापासून नाशिक शाळा सह परिसरामध्ये थंडीची लाट येताना पाहायला मिळते... आज देखील नाशिकचं तापमान 10 अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली आहे... तर सगळ्यात नीचांक म्हणून निफाड तालुक्यात 9 अंश सेल्सिअस एवढे तापमानाची नोंद करण्यात आली. शहरात वाढलेल्या थंडीमुळे गोदावरीच्या डोहावरती धुक्यांची चादर पसरताना पाहायला मिळते... यावरून थंडी किती प्रमाणात वाढत चालली याचा अंदाज देखील वर्तवला जातोय... तर दुसऱ्या बाजूला थंडीचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी हे गोदावरी मध्ये बोटिंग करताना पाहायला मिळतात... नाशिककर देखील मोठ्या संख्येत घरा बाहेर पडले असून शहरातील अनेक जॉगिंग ट्रॅक वरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळते... या संदर्भात नाशिक मधून थंडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
50
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 17, 2025 03:05:07
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अजितदादा गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणात अनगरला पोहोचल्या. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अजितदादा गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणात अनगरला पोहोचल्या. भाजप नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांकडून थिटे यांना संरक्षण देण्यात आले. उज्ज्वला थिटे या पहाटे 5 वाजता अनगर नगरपंचायतीत दाखल झाल्या. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून शस्त्रधारी पोलीस पाठवण्यात आले. राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे उज्ज्वला थिटे या आज आपला उमेदवारी अर्ज भरू शकतात की नाही हे पाहणे महत्वाचे आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
168
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 17, 2025 03:02:09
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ नगरपरिषदच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आघाडी, पक्षाचे आमदार राजू खरे यांच्या विरोधात तयार झाला नवा गट - मोहोळ नगरपालिका के नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आघाडी - मोहोळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करत भरला उमेदवारी अर्ज.. - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अश्विनी जाधव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करण्यात आली जाहीर.. - माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली भरण्यात आला अर्ज. - मोहोळ नगर परिषदेत तिरंगी होणार लढत - मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या विरोधात भूमिका घेत माजी आमदार रमेश कदम यांनी स्वातंत्र गट केला तयार यातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आजी-माजी आमदार एकमेकांसमोर येणार.
46
comment0
Report
WJWalmik Joshi
Nov 17, 2025 03:00:59
39
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 17, 2025 03:00:46
Washim, Maharashtra:जिल्ह्यात चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नामांकन प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे.आज सकाळपासूनच नामांकन केंद्रांवर उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात एकूण १२४ नगरसेवक पदांसाठी कालपर्यंत 645 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.त्यात वाशिममध्ये 196, कारंजा मध्ये 143, रिसोडमध्ये 135, मंगरुळपीरमध्ये 114 आणि मालेगाव नगरपंचायतीत 58 अर्ज दाखल झाले आहेत.तसेच नगराध्यक्ष पदासाठी वाशिममध्ये 11,रिसोड आणि मंगरुळपीरमध्ये प्रत्येकी 10, मालेगावात 6 आणि कारंजा नगरपरिषदेत 3 अर्ज दाखल झाले आहेत.आज शेवटचा दिवस असल्याने अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे。 *जिल्ह्यात नगरसेवक उमेदवारी अर्ज* वाशिम – 196 कारंजा – 143 रिसोड – 135 मंगरुळपीर – 114 मालेगाव – 58 *नगराध्यक्ष पदासाठी अर्ज* वाशिम – 11 रिसोड – 10 मंगरुळपीर – 10 मालेगाव – 6 कारंजा – 3
64
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 02:45:56
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून एक घटना समोर आली आहे… नायलॉन मांजाने दुचाकीस्वार तरुण व्यापाऱ्याचा गळा कापल्याची घटना वैजीनाथ महादेव मंदिराजवळ रविवारी घडली. या घटनेत तरुण व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. विशाल बोथरा दुचाकीवरून जात असताना अचानक नायलॉन मांजा गळ्यात अडकला आणि थेट गळा कापला गेला. उपस्थित नागरिकांनी तत्फाळ मदत करत त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेत विशालला तब्बल १३ टाके पडले आहे. नायलॉन मांजावर बंदी असतानाही तो नेमका येतो कुठून? विक्री करणाऱ्यांवर कारवाई होते… पण वापरणाऱ्यांवरही कडक कारवाई झाली तरच अशा घटनांना आळा बसेल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे आणि प्रशासनाच्या नायलॉन मांजा बंदीच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
88
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 02:31:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर-पुणे विमानसेवा तूर्तास 'वेटिंग'वर 'सुखोई'च्या सरावामुळे नवीन स्लॉट देणे अशक्य छत्रपती संभाजीनगर येथून पुणे शहरासाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे, परंतु पुणे विमानतळावरील वाढत्या वाहतुकीमुळे तूर्तास ही मागणी पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिव्हिल अॅव्हिएशन कमिटीने या हवाई सेवेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी पुणे एअरपोर्टच्या संचालकांची भेट घेऊन हवाई सेवा सुरू करण्याची विनंती केली. मात्र नवीन सेवेसाठी स्लॉट शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. सुखोई विमानाचा सराव सुरू आहे सोबतच तासाला वीस विमान पुण्यात उतरत आहे त्यामुळे नव्या स्लॉटला संधी नाही असं सांगण्यात आलं आहे...
191
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 02:30:34
181
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 02:19:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवार संध्याकाळपर्यंत ४०९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात अध्यक्ष पदासाठी २० आणि सदस्य पदासाठी ३८९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी ५ अर्ज तर सदस्य पदासाठी ७३ अर्ज आले आहेत. कन्नड नगरपालिकेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी १ तर सदस्य पदासाठी ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पैठण नगरपालिकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दोन तर सदस्य पदासाठी ८७ अर्ज वैजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी दोन तर सदस्य पदासाठी ४५ अर्ज दाखल गंगापूर नगर पालिका निवडणुकीसाठी अध्यक्ष पदासाठी ६ आणि सदस्य पदासाठी ३१ अर्ज दाखल केले आहेत. खुलताबाद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी ४ तर सदस्य पदासाठी ३१ उमेदवारी अर्ज आणि फुलंब्री नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी सदस्य पदासाठी ३७ अर्ज दाखल झाले आहेत. अध्यक्षपदासाठी अद्याप एकही अर्ज आलेला नाही.
146
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 02:18:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला दगड मारून २५ लाख रुपयांची लूट करणाऱ्या चार आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक करून मोठ्या दरोड्याचा पर्दाफाश केला. ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी याटोळीने कट रचून हा गुन्हा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या चार आरोपींपैकी दोघे हे ग्रामपंचायत सदस्यांचे पुत्र असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दरोड्याचा हा प्लॅन मुख्य आरोपी भारत रूपेकर याने पूर्ण आठ दिवस रेकी करून तयार केला होता. दरोड्याच्या दिवशी रूपेकरने बँकेत जाऊन पैसे जमा करण्याची स्लिप भरली. मात्र, त्याने स्वतःचा नव्हे, तर पत्नीचा मोबाइल नंबर स्लिपवर टाकला होता. रूपेकरच्या स्वतःच्या गावात बँक असतानाही त्याने याच शाखेत व्यवहार का केला, यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व व्यवहारांच्या स्लिप तपासल्या. स्लिपवरील पत्नीच्या नंबरवरून पोलिसांनी रूपेकरला तातडीने ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बाईट: पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड
146
comment0
Report
Advertisement
Back to top