Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून

Aug 20, 2024 10:15:03
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Dec 13, 2025 14:01:00
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 13, 2025 14:00:45
Shirur, Maharashtra:‘यशवंत’च्या जमीन विक्रीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती; अजित पवार गटाला धक्का पुण्याच्या हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्री व्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या दखलीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. कारखान्याची 99 एकर 97 गुंठे जमीन 299 कोटी रुपयांना बाजार समितीला विक्री करण्यास यापूर्वी शासनाची मान्यता होती. मात्र महसूल विभागाची आवश्यक परवानगी न घेता व्यवहार होत असल्याचा आक्षेप काळभोर यांनी मांडला. त्यानुसार अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांना चौकशीचे आदेश देत, अहवाल येईपर्यंत स्थगिती लागू करण्यात आली आहे. सध्या बाजार समितीवर अजित पवार गटाचे वर्चस्व असून या जमीन खरेदीवरून संचालक मंडळात मतभेद उफाळले आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 13, 2025 13:46:34
Nagpur, Maharashtra:नितीन गडकरी बाईट ( सकाळी विधिमंडळातील पोडीयमवर हा बाईट झाला आहे ) यावर्षी काही काम मंजूर केले आहेत पुण्यापासून संभाजीनगर नवीन एक्सप्रेस हायवे बांधतो आहे 16000 कोटीचा है एम ओ यु झालेला आहे.. शिक्रापूर वरून नवीन महामार्ग बांधून अहमदनगरच्या बाहेरून संभाजीनगर पर्यंत ग्रीनफिल्ड हायवे बांधला जाईल.. या नव्या महामार्गामुळे पुणे ते संभाजीनगर प्रवास दोन तासात पूर्ण करता येईल.. निवडणूक आटोपल्या की भूमिपूजन होईल.. याशिवाय हडपसर ते यवत महामार्गाचा एम ओ यु झाला आहे.. याचाही निवडणुकीनंतर भूमिपूजन होईल.. एन एच ए आय कडून पुणे (खेड) ते नाशिक फाटा असा महामार्ग होईल.. 93% जमीन अधिग्रहण झाला आहे.. नाशिक ते आळंदी आणि आळंदी ते खेड असे दोन टप्प्यात काम होईल.. नागपूर ते काटोल सेक्शन, काटोल बायपास अशा रस्त्यांवर ही काम चालू आहे.. वार्षिक योजनेत जवळपास 60000 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे त्यापैकी 20,000 कोटींची काम एप्रूवल स्टेजवर आहे.. महाराष्ट्रात एकूण सव्वा लाख कोटींची काम केली जाणार आहे... येणाऱ्या वर्षात दीड लाख कोटींची काम महाराष्ट्रात केले जाईल.. त्यापैकी पन्नास हजार कोटींचे काम एकट्या पुणे आणि जवळपासच्या भागात होणार आहे...
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 13, 2025 13:04:29
Latur, Maharashtra:शिवराज पाटील-चाकूरकरांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखची भावुक पोस्ट.... लोकसभेचे सभापती, पंजाबचे राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री, राज्य विधानसभेचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांचे वृद्धापकाळानं निधन झाले.वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. तर अभिनेता रितेश देशमुख यानं देखील शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. काय म्हटलं आहे रितेशनं त्याच्या पोस्टमध्ये? श्री शिवराज पाटील साहेब यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून मन अत्यंत दुःखी व वेदनादायी झाले आहे. ते एक दूरदर्शी राजकारणी होते - काँग्रेस पक्षातील एक अत्युच्च व प्रभावी नेतृत्व. माझ्या जडणघडणीच्या काळात त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या वर्तनातील शुद्धता, व्यक्तिमत्त्वातील सन्मान आणि अपार विद्वत्ता उल्लेखनीय होती. त्यांची नम्रता त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर कायमची छाप सोडणारी होती.त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 13, 2025 13:04:07
Nagpur, Maharashtra:Nagpur- Nagpurat Yashwant Stadium yette aandolan karat aslele mukhya yuvardharita बेरोजगार तरुण आज prachand akramak झाले... त्यांची आणि पोलिसांमध्ये झटापट पण झाली आणि पोलिसांनी हलका बळाचा वापरही केला... humein rozgaar dya ya maagni karta hey aandolak akramak झाले ..त्यामुळे काही कालावधी करता Yashwant Stadium येथील तणावाचं वातावरण निर्माण झाले होते..Yashwant Stadium येथील बसलेले हे युवा प्रशिक्षणार्थी आंदोलक विधानसभावर मोर्चा काढायचा होता परंतु पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे आंदोलक विद्यार्थी प्रशिक्षणार्थी तरुण आणखी संतापले. कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणारच या मागणीवर आंदोलक आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत मैदानातून बाहेरपडणारे सगळे मार्ग बंद केले. प्रतिक्षेत असलेले अन्य मोर्चेही जागच्या जागी थांबले. चॉकलेट नको रोजगार द्या आम्हाला चॉकलेट करून सरकारकडून रोजगार द्या चॉकलेट नको अशी त्यांची मागणी होती.... यावेळी आंदोलन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 13, 2025 12:47:36
Malegaon, Maharashtra:मालेगावच्या डोंगराळे चिमुरडीवर अत्याचार खून प्रकरण पोहचलं अधिवेशनात. मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणात महिला न्यायाधीशांच्या नियुक्तीची लक्षवेधी द्वारे केली मागणी. मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून केल्याप्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज लक्षवेधी द्वारे नागपूर हिवाळी अधिवेशनात डोंगराळे ता. मालेगाव जि. नाशिक येथील घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात महा. महिला न्यायाधीशांची नियुक्ती व्हावी व 10 वर्षांखालील बालिकांवर होणा-या अत्याचारातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षेसाठी नवीन कायदा करण्यात यावा. अशी लक्षवेधी मांडली.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 13, 2025 11:11:10
Ambernath, Maharashtra:विषारी सर्पदंश देऊन पतीने काढला पत्नीचा काटा हत्येनंतर पतीने केला ब्रेन हॅमरेजचा बनाव बदलापूर पोलिसांकडून 3 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याची उकल बदलापूर पूर्वेतील एका इमारतीत 10 जुलै 2022 रोजी निरजा आंबेरकर या महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा पती रूपेश आंबेरकर याने ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यामुळे याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र 3 वर्षांपूर्वी हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय. बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे यांनी एका गुन्ह्यात ऋषिकेश चाळके या आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडे इतर गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्यानं सर्पदंशांने केलेल्या हत्येची माहिती दिली. निरजा यांचा पती रूपेश आंबेरकर यानं पायाला मालिश करण्याच्या बहाण्याने आपला मित्र कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि ऋषीकेश चाळके यांना घरी बोलावलं होतं. निरजा यांच्या पायाचा मसाज करण्याच्या बहाण्याने चेतन दुधाणे यांनं बरणीतून विषारी साप काढला आणि तो ऋषीकेशच्या हातात दिला. त्यानंतर त्यांनी निरजाच्या पायावर तीनवेळा सर्पदंश करून तिला संपवलं. तसच ब्रेन हॅमरेजचा बनाव करून नैसर्गिक मृत्यू आल्याचं भासवलं. मात्र ऋषिकेश चाळकेनं दिलेल्या जबाबानंतर या सर्वांनी केलेलं काळं कृत्य जगासमोर आलंय. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवून निरजा आंबेरकरचा पती रूपेश आंबेरकर, कुणाल चौधरी आणि चेतन दुधाणे यांना अटक केलीय. Byte – शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आता रूपेशनं निरजाची हत्या का केली? आरोपींचा याआधीही कोण-कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे काय? याचा आता पोलिस तपास करतायेत.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 13, 2025 11:05:13
Parbhani, Maharashtra:परभणी - शहरातील कचरा,पाणी आणि आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून महानगरपालिका शहरांमध्ये सुख सुविधा पोहोचविण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. शहरातील नागरिकांना सुविधा पोहोचवणे तर दूरच राहिले उलट परभण्यशहर कचऱ्यामध्ये आणि खड्ड्यामध्ये जात असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्गदर्शनाखाली आज परभणी शहर महानगरपालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत असे नामकरण केले. परभणी शहरांमध्ये मागील चार वर्षापासून प्रशासन आहे व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री हे परभणीचे असतानाही परभणी शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही ही गंभीर बाब आहे. शहरात कचऱ्याचे ठिकठिकाणी ढीग साचले असून मनपाच्या शाळा हळूहळू बंद होत आहेत, या परिस्थितीच्या निषेधार्थ आज नागरिकांनी जोरदार आंदोलन केले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 10:48:14
Washim, Maharashtra:निवडणुकीच्या पुढे ढकललेला प्रचार पुन्हा एकदा सुरू झाला असून उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास वेग दिला आहे. काही दिवस शांत असलेले शहर पुन्हा एकदा प्रचार भोंग्यांच्या आवाजाने गजबजून गेले आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे यांच्या उमेदवारीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावली. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी आवश्यक असलेला तीन दिवसांचा कालावधी न मिळाल्याने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवडणूक विभागाकडून 20 डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले होते. या निर्णयानुसार 29 नोव्हेंबरपासून निवडणूक प्रचारावर स्थगिती देण्यात आली होती. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा प्रचाराला जोर आला असून गुलाबी थंडीतही शहरातील राजकीय वातावरण तापत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 13, 2025 10:47:57
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली पोलीसांनी मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे 04 विविध गुन्हे केले उघड, आरोपींना केली अटक, चारचाकी, दूचाकी वाहन व मोबाईल टॉवरच्या बॅट-यांसह एकूण 27 लाख 71 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणाखाली जिल्ह्यात दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल टॉवरची उभारणी झाली आहे. परंतु गेल्या काही काळापासून मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने तपास वेगवान केला. जिल्ह्यात संवेदनशील भागातील रामपूर, तुमडीकसा, कनगडी, कुलभट्टी व तोयागोंदी गावात मोबाईल टॉवर बॅट-यांच्या चोरीच्या घटना नोंद झाल्या होत्या. पोलीस पथकाने तपासादरम्यान बालोद (छत्तीसगड) मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि विशिष्ट वाहन मालकावर पाळत ठेवली. हा संशयित येरकड हद्दीत संशयितरित्या फिरत असल्याचे स्पष्ट झाले. मोवाड येथुन 04 आंतरराज्यीय आरोपी नामे 1) साबीर रमजान मलिक, वय 39 वर्षे, रा. मोहल्ला कल्याणसिंग मवाना (उ.प्र.), 2) अशोक हरीसींग मोर्या, वय 49 वर्षे, रा. न्यु सरेंद्रनगर थट्टीपूर, ग्वालीयर (म.प्र.), 3) जितेंद्र कुमार लक्समीचंद राठोड, वय 26 वर्षे, रा. नेताजी नगर, जाजगीर ता. जि. जाजगरी (छ.ग.) व 4) नामदेव रामा कांबळे, वय 43 वर्षे, रा. नेताजी नगर, एम.पी. नगर, भोपाल (म.प्र.) यांना ताब्यात घेण्यात आले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 13, 2025 10:19:43
Nagpur, Maharashtra:नागपूर - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - (On पट्टे वाटप) गेल्या 30-40 वर्षात झोडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे... यासाठी संघर्ष केलाय, त्याही वेळेस पट्टेवाटप सुरू केले होते आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले आज एक हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे दिले, अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल, मालकी हक्काचे पट्टे देणार आहोत त्याबरोबर सिंधी निर्वासितांना पट्टे देत आहोत नागपूर मॉडेल आम्ही तयार केल आहे, त्याच्या जीआर आम्ही आता पूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे, महाराष्ट्रात जिथे-जिथे झोपडपट्टी लोक आहेत तिथे एम एम आर डी ए मध्ये एसआरए करतो म्हणून त्यांनाही लागू नाही कोणाचा कच्च घर असेल तर कोणालाही पक्क घर बांधण्यास अर्थसहाय्य देणार 50 हजार लाभार्थी होतील, आतापर्यंत 25 हजार झाले आहेत, यात वेगवेगळे प्रोसेस असते ती प्रोसेस सुरू असते हापट्टे बँकेबल आहेत, कुणाला कर्ज काढायचं असेल तर त्यांना कर्ज काढता येईल (On भाजप मुंबई कार्यकर्ते नाराजी ) मला असं वाटतं की फार कोणात नाराजी असेल असं वाटत नाही, कार्यकर्त्यांना वाटतं मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणे, विकासविमुख आणि पारदर्शक शासन आणणे आणि त्यासाठीच आम्ही महायुतीचा निर्णय घेतला आहे (On पालघर आदिवासी मुली -) याच्या चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत, आणि लवकरच चौकशी केली जाईल (On भाजप कल्याण डोंबिवली जागा - ) फक्त 55 जागांची मागणी भाजप का करेल?, भाजपा महत्त्वाचा पक्ष आहे त्यांनी अजून कुठली मागणी केली नाही, कल्याण डोंबिवली मध्ये मागच्या वेळेस 42 आमच्या जागा आल्या होत्या, तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत एक शिवसेना आणि दुसरा भाजप तिसरा पक्षाचा तिथे काही वजुद नाही, आम्ही आपसात बसून जागा वाटप करू - फॉर्मुला कुठेच राहणार नाही, जिंकणे हाच फॉर्मुला आहे (On अजित पवार बार्टी/सारथी) दादा अनेक वेळा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा लोक वेगळा अर्थ काढतात, पण मुळात ही योजना सुरू केली आहे ते जे काही आपले हुशार मुलं आहेत पण पीएचडी एफोर्ड करू शकत नाही, त्याकरिता ते काढलाय, त्यामुळे पाच लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातील जे होतकरू गरीब लोक आहेत त्यांना लाभ मिळणार नाही, याची चिंता दादांनी व्यक्त केली योग्य प्रकारे याबाबत निर्णय घ्यावा लागेल (On मनरेगा प्रियांका गांधी -हिंदी ) मला असं वाटतं त्या मनरेग कधी बोलतात,काम केलं नाही तरी त्या बोलतात, त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, खूप सकारात्मक बदलाव मोदीजींच्या सरकारने केला आहे त्यामुळे ग्राम विकास और ग्राम रोजगार निर्मितीत खूप मोठा फायदा होईल ( On संजय राऊत भाजप - शिंदे ) भाजपच्या नेतृत्वाला आम्ही जास्त ओळखतो की संजय राऊत (On राज ठाकरे पत्र - ) मी अजून पत्र वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुली संदर्भात मी आकडेवारी सहित त्याची कारणे दिली आहेत, परत किती येतात हेही सांगितलेल आहे, यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि परत तीन दिवसात आली तरीही आपण बेपत्ता कंप्लेंट दाखल करतो त्यामुळे त्याची संख्या मोठी दिसते वर्षभरात 90% च्या वर मुली परत आणतो... (On नवाब मलिक-नवनाथ बन -) यावर आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे. रोज स्पष्ट करण्याची गरज नाही (On विरोधक अधिवेशनात - ) आमची कुठलीही रणनीती नाही, उलट या अधिवेशनात भरपूर चर्चा चालली आहे, याचा मला आनंद आहे ..- जे बिल मंजूर झाले त्याचाही आनंद आहे, चर्चा चालली त्याचा आनंद मानला पाहिजे, पायऱ्यावर आंदोलन करायचा आणि चर्चेत भाग घ्यायचं नाही याला लोकशाहीत स्थान नाही,त्यामुळे जास्तीत जास्त चर्चा करते याचा मला आनंद आहे (On संजय राऊत विदर्भ - ) हे काय बोलतात, ते काय बोलतात, त्याचा उत्तर देण्याकरिता मुख्यमंत्री आहेत का, एवढेच काम राहिले का मुख्यमंत्र्यांना
0
comment0
Report
Advertisement
Back to top